जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 191/2011.
तक्रार दाखल दिनांक :
तक्रार आदेश दिनांक : 16/11/2011.
पुनराज चांगदेव सोनटक्के, रा. गवत्या मारुती चौक,
मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. गांधी मोटार्स, 297, केगाव, पुणे रोड, सोलापूर.
2. महिंद्रा अन्ड महिंद्रा प्रा.लि., ताडीवाला रोड, पुणे. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. व्ही.जे. दलभंजन, सदस्य
आदेश
सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार विरुध्द पक्ष यांच्याकडून महिंद्रा मॅक्सिमो वाहनाची किंमत किंवा दोषयुक्त महिंद्रा मॅक्सिमो वाहन बदलून मिळविण्यासाठी दाखल केलेली आहे. आज रोजी तक्रारदार यांनी तक्रार बोर्डावर घेण्याचा अर्ज दाखल केला. त्यांनी मंचासमोर पुरसीस दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द तक्रारीत केलेल्या मागण्या शिल्लक राहिल्या नसल्यामुळे तक्रार बिनर्शत माघार घेत असल्याचे नमूद करुन त्या पृष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे.
2. तक्रारदार यांच्या पुरसीसप्रमाणे तक्रार निकाली काढण्यात येते.
(सौ. व्ही.जे. दलभंजन) (सौ. शशिकला एस. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/161111)