Maharashtra

Beed

CC/12/129

Shaikh Shakil Sk Sattar - Complainant(s)

Versus

Gajraj Hemraj Palewal - Opp.Party(s)

Adv Garje

12 Nov 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/129
 
1. Shaikh Shakil Sk Sattar
R/o Peth Mohalla Parali Ta Parali
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Gajraj Hemraj Palewal
R/0 Bhavani Nagar Parali
Beed
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

निकालपत्र
                            दिनांक 12.11.2013
                    (घोषित द्वारा ः-श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष )
            तक्रारदार शेख शकील शेख सत्‍तार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेमध्‍ये कसूर केल्‍याबददल नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी म्‍हणून दाखल केली आहे.
            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, सामनेवाले हे पालीवाल पॅलेस भवानी नगर या वास्‍तूचे मालक आहेत. पहिला मजला बॅकेला भाडयाने दिलेला आहे. सर्वात वरच्‍या मजलयावर सामनेवाले हे स्‍वतः राहतात. तळ मजल्‍यावर जलतरण तलाव आहे.
            मयत इम्रान हा तक्रारदार यांचा मुलगा होता. सदरील मयत इम्रान हा तक्रारदारांना त्‍यांचे दैनदिन कामात मदत करीत असत. मयत इम्रान हा हूशार व शरीराने सृदूढ होता.
            दि.12.05.2010 रोजी मयत इम्रान हा सामनेवाले यांच जलतरण तलावावर रु.30/- प्रति तास फि भरुन पोहण्‍यासाठी गेला होता. मयत इम्रान हा सकाळी 9 वाजेस घरातून पोहण्‍यासाठी गेला व तक्रारदार यांचेकडून खर्चासाठी रु.100/- बरोबर घेऊन गेला. दि.12.05.2010 रोजी संध्‍याकाळी 6.30 चे दरम्‍यान तक्रारदार हे काम आटोपून त्‍यांचे घरी आले त्‍यावेळेस तक्रारदार क्र.2 यांनी तक्रारदार क्र.1 यांना मयत इम्रान अजून घरी आला नाही या बाबत सांगितले. दि.13.5.2010 रोजी तक्रारदार क्र.1 हे कामानिमीत बाहेरगांवी गेले होते.  संध्‍याकाळी ते परत आले त्‍यावेळी मयत इम्रान हा घरी परत आलेला नव्‍हता. संध्‍याकाळी 7 वाजेचे सुमारास एक मुलगा तक्रारदार यांचे घरी आला व सरकारी दवाखाना परळी वैजनाथ येथे अज्ञात मूलाचे प्रेत आहे असे कळ‍विले.  तक्रारदार हे सरकारी दवाखान्‍यात प्रेताची पाहणी करण्‍यासाठी गेले ते प्रेत तक्रारदार यांचा मुलगा इम्रान यांचे आहे असे आढळून आले. तक्रारदार यांनी चौकशी केली असता त्‍यांना असे समजले की, त्‍यांचा मुलगा पोहण्‍यासाठी जलतरण तलावामध्‍ये गेला होता. दि.13.05.2010 रोजी अंदाजे 4 वाजता तक्रारदार यांचा मुलगा इम्रान फि भरुन पोहण्‍यासाठी गेला.  दुपारी 4.45 वाजेचे सुमारास मयत इम्रान हा जलतरण तलावामध्‍ये पोहत असताना बूडाला व मयत झाला.त्‍या बाबत पोलिसांना कळविण्‍यत आले. पोलिसांनी गुन्‍हयाची नोंद केली व सामनेवाले यांचे विरुध्‍द भारतीय दं संहिता 304-अ अन्‍वये गुन्‍हयाची नोंद केली. पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला व त्‍यांचे प्रेत शवविच्‍छेदनासाठी पाठविले. वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्‍छेदन केले. इम्रान यांचा मृत्‍यू शरीरात पाणी गेल्‍यामुळे झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. डॉक्‍टरांनी मृत्‍यूचे कारण “Due to drowing in Swimming pool ” असे दिले.
            सामनेवाले हे जलतरण तलावाचे मालक आहे. तक्रारदार यांचा मुलगा पोहण्‍यासाठी फी भरुन तलावात पोहण्‍यास गेला होता. तक्रारदाराचा मुलगा हा सामनेवाले यांचा ग्राहक आहे. सामनेवाले यांनी पोहण्‍याची फि घेतलेली आहे. सामनेवाले यांनी तलावात सुरक्षा ठेवणे गरजेचे होते. सामनेवाले यांनी कोणतीही सुरक्षा ठेवलेली नव्‍हती. तक्रारदार यांचा मुलगा यांस पोहता येत नसल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला. सामनेवाला हे तक्रारदार यांचे मुलाचे मृत्‍यूस जबाबदार आहेत. सामनेवाले यांनी जलतरण तलावावर व्‍यवस्‍थीत सुरक्षा न ठेवल्‍यामुळे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सामनेवाले यांनी योग्‍य ते प्रशिक्षक नेमून जलतरण तलावावर पोहणा-या व्‍यक्‍तीची काळजी घेतली नाही. तक्रारदार यांचा मुलगा इम्रान यांचा मृत्‍यू सामनेवाले यांचे निष्‍काळजीपणामुळे व सेवेत त्रूटी ठेवल्‍यामुळे झाला आहे. तक्रारदार हे मुलाचे मृत्‍यू बाबत रक्‍कम रु.4,00,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार हे मयत यांचे उत्‍पन्‍नावर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- मिळण्‍यास पात्र आहेत तसेच तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पात्र आहेत असे एकूण रु.5,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
            सामनेवाला हे मंचापूढे हजर झाले. त्‍यांनी नि.10 अन्‍वये लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील मजकूर स्‍पष्‍टपणे नाकारला आहे. सामनेवाले यांनी ते पालीवॉल पॅलेस यांचे मालक आहेत ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा मुलगा दि.13.5.2010 रोजी दुपारी 4 वाजता फि भरुन पोहण्‍यासाठी आला होता व पोहत असतांना त्‍यांचा मृत्‍यू झाला ही बाब नाकारलेली आहे. तक्रारदार यांचा मुलगा सामनेवाले यांचे निष्‍काळजीपणामुळे मयत झाला आहे ही बाब नाकारलेली आहे. सामनेवाले यांनी त्‍यांचे तळ मजल्‍यावर जलतरण तलाव आहे ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाले यांचे कथन की, सदर जलतरण तलावावर दोन विभाग आहेत. त्‍यातील एका भागाची खोली 2 ½ फुट आहे व त्‍यांस बेबी तलाव असे संबोधले जाते व दुसरा भाग 4 ½ ते 5 ½ फुट खोलीचा आहे. 15 वर्षे खालील मुला मुलीना बेबी जलतरण तलावामध्‍ये पोहण्‍याची मुभा देण्‍यात येते व 15 वर्षे वरील मुलामुलींना जलतरण तलावाच्‍या कोणत्‍याही भागात पोहण्‍याची मुभा देण्‍यात येते. जलतरण तलावामध्‍ये पोहण्‍याची वेळ सकाळी 6 ते सांयकाळी 6 वाजेची आहे. जलतरण तलावा मध्‍ये पोहण्‍यासाठी महिनेवारी किंवा रोज कूपन देऊन पोहण्‍यासाठी प्रवेश दिला जातो. कूपन देते वेळेस त्‍या व्‍यक्‍तीकडून त्‍यांचा फोटो, ओळखपत्र दुरध्‍वनी क्रमांक घेतला जातो. 18 वर्षाखालील मुलामुली साठी त्‍यांचा फोटो, ओळखपत्र व आईवडीलांची संमती पत्र घेऊनच जलतरण तलाव प्रवेश दिला जातो. पोहण्‍याचे प्रशिक्षण देणेकामी व देखरेख करणेकामी सामनेवाले यांनी आंनत शामसूंदर पालीवाल व विजय अशोकराव जाधव यांची नियूक्‍ती केली आहे. सदरील व्‍यक्‍ती जलतरण तलावावर प्रशिक्षण देण्‍याचे काम करतात. लाईफ गार्ड म्‍हणून विनायक बळवंत यांची नियूक्‍ती केली आहे. सदर व्‍यक्‍ती कायम स्‍वरुपात जलतरण तलावात येणा-या व्‍यक्‍तीवर देखरेख करीत असतो. जलतरण तलावावर हवाबंद टयूब ठेवलेल्‍या आहेत.
            सामनेवाले यांचे पूढे कथन की, तक्रारदार यांचा मुलगा हा जलतरण तलावावर कोणताही महिनेवारी अथवा रोज कूपन द्वारे आलेला नव्‍हता. त्‍यांने कोणतेही कूपन दि.13.5.2010 रोजी सामनेवाले यांचेकडून घेतलेले नव्‍हते. मयत इम्रान यांना मासिक मेंबरशिप किंवा रोज कूपन दिलेले नव्‍हते व नाही. मयत इम्रान हा जानकी जलतरण तलावा मध्‍ये अधिकृतरित्‍या पोहण्‍यासाठी आलेला नव्‍हता तो सामनेवाले यांचा ग्राहक नव्‍हता. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्‍द तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही.सबब सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार रदद करावी अशी विनंती केली आहे.
            तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.11 सोबत दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत गुन्‍हयाची पहिली खबर रिपोर्ट, घटनास्‍थळ पंचनामा,मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, ही कागदपत्र दाखल केली आहेत. सामनेवाले यांनी पुराव्‍याचे शपथपत्र नि.10 अन्‍वये दाखल केली आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.गर्जे यांचा यूक्‍तीवाद ऐकला. सामनेवाले यांनी नि.12 अन्‍वये लेखी यूक्‍तीवाद दाख केला आहे. न्‍याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     सामनेवाले यांनी जलतरण तलावासाठी सुरक्षेची काळजी न
      घेऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे काय ?                         होय.
2.    तक्रारदार यांचा मुलगा सामनेवाले यांचे निष्‍काळजीपणामुळे
     मयत झाला आहे काय ही बाब तक्रारदार यांनी सिध्‍द केली
      आहे काय ?                                            होय.
3.    तक्रारदार यांचा मुलगा मयत इम्रान हा सामनेवाले यांचा ग्राहक
      आहे काय ?                                            होय.
4.    तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?            होय.
5.    काय आदेश ?                                   अंतिम आदेशाप्रमाणे.
                                                                                कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 5 ः-
            तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन व सामनेवाले यांचे जबाबातील कथन यांचे अवलोकन केले असता तक्रारदार व सामनेवाले यांना खालील बाबी मान्‍य आहेत. तक्रारदार हे मयत इम्रान चे आईवडील आहेत. सामनेवाले हे पालीवॉल पॅलेज यांचे मालक आहेत. पॉलिवाल पॅलेस मध्‍ये तळ मजल्‍यावर जानकी जलतरण तलाव हा सामनेवाले चालवतात ही बाब मान्‍य आहे.
            तक्रारदार यांचे वकील श्री. गर्जे यांनी असा युक्‍तीवाद केला की, दि.13.5.2010 रोजी तक्रारदार यांचा मूलगा मयत इम्रान हा सामनेवाले यांचे जलतरण तलावात पोहण्‍यासाठी गेला व तलावात बूडून त्‍यांचा मृत्‍यू झाला. मयत इम्रान यांनी जलतरण तलावात पोहण्‍याची फि भरुन नंतरच तो तलावात पोहण्‍यासाठी गेला होता. सामनेवाला हे जलतरण तलावाचे मालक असून पोहण्‍यास येणा-या व्‍यक्‍तीचे संरक्षण करणरे, त्‍यांचेवर देखरेख करणे, पोहणा-या व्‍यक्‍तीस प्रशिक्षण देणे व त्‍याकामासाठी व्‍यक्‍तीची नियूक्‍ती करणे हे सामनेवाले याचे कर्तव्‍य आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा मुलगा इम्रान हा पोहण्‍यास आला असता तलावामध्‍ये कोणत्‍याही प्रकारची सुरक्षा ठेवली नाही. योग्‍य व्‍यक्‍तीची नेमणूक केली नाही. सामनेवाले यांचे निष्‍काळजीपणामुळे तक्रारदार यांचा मुलगा मयत झाला आहे. सामनेवाला यांनी पोहण्‍यास येणा-या व्‍यक्‍तीस जी सेवा देणे आवश्‍यक होते ती सेवा दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचा मुलगा मयत झाला. तक्रारदार यांचा मुलगा वय 14 वर्षाचा आहे व तो तक्रारदार यांना त्‍यांचे कामामध्‍ये मदत करीत आहे. तक्रारदार यांचा मुलगा मयत झाल्‍यामुळे तक्रारदार यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. त्‍यांना मानसिक व शारीरिक त्रास आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई ही योग्‍य व वाजवी आहे व ती मिळण्‍यास ते पात्र आहेत.
            सामनेवाले यांनी त्‍यांचे लेखी युक्‍तीवादात तक्रारदार यांनी मुलगा हा कोणतीही फि भरुन आला नव्‍हता त्‍यांचा जलतरण तलावात पोहत असताना मृत्‍यू झाला आहे ही बाब नाकारलेली आहे. तसेच सामनेवाले यांनी असा यूक्‍तीवाद केलो आहे की, तक्रारदार यांनी त्‍यांचा मुलगा फि भरुन जलतरण तलावात पोहण्‍यासाठी गेला होता या बाबत कोणताही दस्‍ताऐवज दाखल केलेला नाही. सामनेवाले यांनी जलतरण तलावात पोहण्‍यासाठी येणारे व्‍यक्‍तीसाठी नियमावलीचा ऊहापोहच लेखी यूक्‍तीवादात केला आहे. तसेच मयत इम्रान हा जलतरण तलावात पोहण्‍यासाठी आला होता या बाबत कार्यालयात नोंद नसल्‍याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांनी सदरील तक्रारीत मूदती बाहेर दाखल केली आहे असे नमूद केले आहे.
            तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल करण्‍यास विलंब झाला आहे या बाबत विलंब माफीचा अर्ज नि.11 वर दाखल केलो आहे. त्‍यावर या मंचाने तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब माफ करुन तक्रारदार यांना तक्रार दाखल करण्‍यास परवानगी दिली आहे.
            तक्रारदार व सामनेवाले यांचा यूक्‍तीवाद लक्षात घेता व दाखल कागदपत्राचे अवलोकन केले असता या मंचाचे असे निदर्शनास येते की, दि.13.5.2010 रोजी तक्रारदार यांचा मुलगा सामनेवाले यांचे जलतरण तलावामध्‍ये पोहण्‍यासाठी गेला होता. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन असे निष्‍पन्‍न होते की, तक्रारदार यांचे मुलाचे प्रेत सामनेवाले यांचे जलतरण तलावा मध्‍ये आढळून आले. त्‍याठिकाणी पोलिसांनी घटनास्‍थळ पंचनामा केला. सामनेवाले यांचे पॉलिवाल पॅलेसचे तळ मजल्‍यामध्‍ये 50 50 चा पोहण्‍याचा तलाव आहे. त्‍यामध्‍ये बेबी जलतरण तलाव व मोठया व्‍यक्‍तीसाठी जलतरण तलाव अशी रचना केली आहे. सदरील जलतरण तलावाचे मध्‍यभागी मयत हा पोहच असताना डूबू लागला त्‍यावेळेस आंनत श्‍यामलाल पालीवाल यांनी पाण्‍यात उडी टाकून त्‍यांस काठावर आणले. परंतु मयत यांचे शरीरात पाणी गेल्‍यामुळे तो मयत झाल्‍या बाबत निदर्शनास येते.
 
            सामनेवाले यांचा यूक्‍तीवाद की, मयत इम्रान यांनी कोणतीही फिस भरली नव्‍हती व तो सामनेवाले यांचा ग्राहक नव्‍हता. सामनेवाले यांचे कथन लक्षात घेता सदर तलावात देखरेख करणेकामी त्‍यांनी काही व्‍यक्‍तीची नेमणूक केलेली दिसते. पोहण्‍यासाठी येणारी कोणत्‍याही व्‍यक्‍तीला सदर ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. योग्‍य ती फिस भरुनच तलावामध्‍ये प्रवेश दिला जातो. तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, त्‍यांचे मुलाने त्‍यांचेकडून रु.100/- घेऊन तो घरातून गेला. सामनेवाले हे कोणासही फि घेतल्‍याशिवाय जलतरण तलावामध्‍ये पोहण्‍याची परवानगी देत नाहीत.यावरुन असे निष्‍पन्‍न होते की, सामनेवाले यांनी मयत यांचेकडून फि घेऊनच पोहण्‍याची परवानगी दिली. मयत इम्रान हा 14 वर्षाचा मुलगा होता तो पोहत असताना त्‍यांची काळजी घेण्‍याची जबाबदारी सामनेवाले यांचेवर होती. त्‍याकामी सामनेवाले यांनी रक्षकाची नेमणूक करणे गरजेचे होते व तो रक्षक जलतरण तलावावर सतत लक्ष ठेऊन पोहणा-या व्‍यक्‍तीस इजा होणार नाही यांची काळजी घेणे गरजेचे होते. सामनेवाले यांनी तलावात पोहणा-या व्‍यक्‍तीचे रक्षण करण्‍यासाठी व देखरेख करण्‍यासाठी व्‍यक्‍तीची नेमणूक करुन काळजी घेणे आवश्‍यक होते. सदरील इम्रान हा पोहत असताना योग्‍य काळजी सामनेवाले यांनी घेणे बंधनकारक आहे. सामनेवाले यांनी ती काळजी घेतलेली दिसत नाही. मयत यांचा मृत्‍यू पोहताना बुडाल्‍यामुळे झाला आहे असे शवविच्‍छेदन अहवालावरुन स्‍पष्‍ट होते. सामनेवाले यांनी पोहण्‍यास येणा-या व्‍यक्‍तीची योग्‍य काळजी घेतली नाही. त्‍यामुळे इम्रान यांचा मृत्‍यू झाला या संदर्भात भारतीय दंडसंहिता कलम 304-अ अन्‍वये सामनेवाले यांचेवर गुन्‍हयाची  नोंद केली आहे व ती केस प्रथमवर्ग न्‍यायालयात परळी वैजनाथ यांचे कोर्टात प्रलंबित आहे.
            या मंचासमोर आलेल्‍या संपूर्ण पुराव्‍यावरुन या मंचाचे असे मत आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा मुलगा जलतरण तलावात पोहण्‍यास आला असता त्‍यांचे संरक्षण करण्‍याची जबाबदारी असतानाही योग्‍य ती काळजी घेतली नाही. सामनेवाले यांनी निष्‍काळजीपणा करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे व त्‍यामुळे तक्रारदार यांचा मुलगा जलतरण तलावात बूडून मरण पावला आहे. तक्रारदार यांचे मुलाचे वय 14 वर्षाचे होते. तक्रारदार यांना एकूण तिन मूले आहेत. त्‍यापैकी मयत इम्रान हा दुस-या नंबरचा मुलगा आहे. सर्व परिस्थिती विचार केला असता तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून इम्रान यांहचे मृत्‍यूबददल व निष्‍काळजीपणाबददल रक्‍कम रु..2,00,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- मिळण्‍यास पात्र आहेत व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.3,000/- मिळण्‍यास पात्र आहेत.
            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
2.    सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार 
      यांना मुलाच्‍या मृत्‍यूबददल रक्‍कम रु.2,00,000/-(अक्षरी रुपये दोन
       लाख फक्‍त) निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत.
      सदरील रक्‍कम 30 दिवसांचे आंत न दिल्‍यास त्‍यावर द.सा.द.शे. 9
      टक्‍के व्‍याज तक्रार दाखल दि.19.02.2012 पासून संपुर्ण रक्‍कम वसुल
      होईपर्यत दयावे.
3.    सामनेवाले   यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार  
      यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व
      दाव्‍याच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3000/- दयावेत.
      4.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                             जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.