निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11.11.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 15.11.2010 तक्रार निकाल दिनांकः- 29.03.2011 कालावधी 04 महिने 14 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. राजहंस बापूराव हेंगे अर्जदार वय 35 वर्षे धंदा सुशिक्षीत बेरोजगार, ( स्वतः ) रा.मु.पो.चांदज ता.जिंतूर, परभणी जि.परभणी. विरुध्द 1 गजानन मधुकरराव डाके गैरअर्जदार वय सज्ञान धंदा टंकलेखन संस्था मेन रोड, जिंतूर रा.जिंतूर जि. परभणी. 2 पप्पू उर्फ महेश मधुकरराव काकडे वय सज्ञान धंदा टंकलेखन संस्था व संगणक, रा.गणपती गल्ली जिंतूर जि.परभणी. ( गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे अड.बी0.ए.सुतार ) -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) MS. CITकोर्सचे प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत गैरअर्जदारानी केलेल्या सेवा त्रूटीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तूतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे अर्जदार सुशिक्षीत बेकार आहे त्याने गैरअर्जदारांच्या जिंतूर येथील संस्थेत MS. CIT कोर्स ऑक्टोंबर 2008 ते डिंसेबर 2008 या सत्रासाठी प्रवेश घेतला होता. प्रवेश फीच्या ऑन लाईनच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत. प्रवेश घेतल्यानंतर नियमाप्रमाणे रोज दोन तास शिकवणी, तीन दिवस प्रात्यक्षीक व तीन दिवस सिध्दांत याप्रमाणे प्रशिक्षण देणे गरजेचे असताना त्याप्रमाणे बॅच मधील विद्यार्थ्याना शिक्षण दिले जात नव्हते परिणामी अर्जदारासह त्या बॅचचे बरेच विद्यार्थी नापास झाले. गैरअर्जदाराच्या इन्स्टीटयूटमध्ये शिकवणारे प्रशिक्षक हे MS. CIT ट्रेनर या पात्रतेचे नव्हते. पूर्ण कोर्सच्या फी मध्ये परीक्षाफी समाविष्ट असताना अनेक विद्यार्थ्याकडून पुन्हा जास्तीचे रुपये 50/- आकारले त्याची पावतीही दिली नाही. अशारीतीने विद्यार्थ्यावर अन्यायकरुन त्याना मानसिक त्रास देवून कोर्ससाठी घेतलेला प्रवेश वाया गेला व नापास व्हावे लागले. त्या सेवा त्रूटीची नुकसान भरपाई मिळणेसाठी गैरअर्जदाराना नोटीस पाठवली होती परंतू नोटीशीला ही दाद दिली नाही. म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन रुपये 2400/- कोर्स फी सह प्रवास भाडे मानसिक त्रास व खर्च अशी एकूण रुपये 41400/’ नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदाराचे शपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि.3 लगत एकूण 22 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे दाखल करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर दिनांक 17.01.2011 रोजी त्यानी एकत्रीतरित्या आपले लेखी म्हणणे सादर केले. आपले लेखी जबाबात ( नि.9 ) तक्रार अर्जातील त्यांचे विरुध्द केलेले सर्व आरोप साफ नाकारले असून अर्जदार नापास झाल्यामुळे आकसापोटी त्यांचे विरुध्द खोटी तक्रार केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचा श्री. कॅम्प्यूटर इन्स्टीटयूट जिंतूर शी काहीही संबध नाही. त्या इन्स्टीटयूटचे ते मालक नाहीत. अर्जदार आक्टोबर 2008 ते डिसेंबर 2008 च्या बॅचसमध्ये परिक्षेमध्ये नापास झाला त्यानंतर सप्लीमेंटरी परीक्षा त्याने दिली नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 हा इन्स्टीटयूट मध्ये फक्त देखदेखीचे काम करीत होता. अर्जदाराने सप्लीमेंटरी परिक्षा फी भरणे आवश्यक होते ती भरली नाही. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या इन्स्टीटयूट मध्ये सर्वकष परिपूर्ण व्यवस्था आहे परंतू त्याबाबत तक्रार अर्जात खोटी विधाने करुन अर्जदाराने मंचाची दिशाभूल केली आहे. अर्जदारा व्यतिरीक्त अन्य कोणत्याही विद्यार्थ्याने इन्स्टीटयूट बद्यल आजपर्यंत कसलीही तक्रार केलेली नाही. अर्जदाराने मा. जिल्हाधिकारी परभणी यांचेकडेही लोकशाही दिनी इन्स्टीटयूट बद्यल तक्रार दिली होती. जिल्हाधिकारी यानी पोलीस निरीक्षक परभणी याना त्याबाबत तपास करण्याचे आदेश दिल्यावर पोलीस निरीक्षकानी दिलेल्या अहवालात इन्स्टीटयूटबाबत कोणचीही तक्रार नाही. अर्जदाराची कोणत्याही प्रकारे फसवणूक केलेली नाही अथवा नुकसान केलेले नाही तो केवळ नापास झाल्यामुळे खोडसाळपणामुळे गैरअर्जदाराचे विरुध्दात लोकशाहीदिनी खोटा अर्ज दिलेला आहे असा अहवाल दिला. अहवालावरुन देखील अर्जदाराने ग्राहक मंचात दाखल केलेली प्रस्तूतची तक्रार बोगस असल्यामुळे ती रुपये 5000/- चे कॉपेनसेटरी कॉस्टसह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र ( नि.10 ) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 12 लगत एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदार व गैरअर्जदारातर्फे लेखी युक्तिवाद सादर केला.. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये.. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराने ऑक्टोबर 2008 ते डिसेंबर 2008 या सत्रातील MS-CIT कोर्ससाठी प्रवेश घेतल्यानंतर गैरअर्जदाराने नियमाप्रमाणे प्रशिक्षण न देता अर्धवट देवून सेवात्रूटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - . शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या MS-CIT म्हणजे संगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कोर्स राज्यातील प्रत्येक जिल्हयात कार्यरत आहेत. परभणी जिल्हयात MS-CIT कोर्स शिकवणि-या इन्स्टीटयूटची नावे व बेसीक माहिती अर्जदाराने पुराव्यात नि. 3/2 वर दाखल केली आहे. त्यातील शेवटच्या पानावर परभणी जिल्हयात कोर्स चालू असणा-या प्रशिक्षण केंद्राची नावे व पत्ते दिलेले आहेत त्यामध्ये जिंतूर तालुकयामधील ‘’ श्री. कॅम्प्यूटर इन्स्टीटयूट ‘’ चाही समावेश आहे. अर्जदाराने ग्राहक मंचात दाखल केलेल्या प्रस्तूत प्रकरणातील दोन्ही बाजूच्या पक्षकारानी पुराव्यात दाखल केलेल्या संपूर्ण कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता असे लक्षात येते की, माहे ऑक्टोंबर 2008 ते डिसेंबर 2008 या सत्रातील MS-CIT साठी अर्जदाराने ‘’ श्री. कॅम्प्यूटर इन्स्टीटयूट ‘’ मध्ये प्रवेश घेतलेला होता ही अडमिटेड फॅक्ट आहे. माहिती पत्रकात फी बाबतचा उललेख असा आहे की, कोर्सचा कालावधी पूर्ण होइपर्यंत प्रवेश फी पासून परीक्षा देइपर्यत एकूण शिक्षण शुल्क रुपये 1980/- + परीक्षा शुल्क रुपये 250/- असे एक रक्कमी रुपये 2210/- भरावेत. दोन हप्त्यात फी भरावयाची झाल्यास शिक्षण शुल्क रुपये 1160/- चे दोन हप्ते असे एकूण रुपये 2320/- भरावेत आणि तीन हप्त्यात फी भरावयाची झाल्यास रुपये 950/- चे तीन हप्ते असे एकूण रुपये 2400/- भरावे लागतील हे नि. 3/2 वरील माहितीपत्रकाचे शेवटच्या पानावर छापलेले आहे. अर्जदारानी तीन हप्त्यात एकूण रुपये 2400/- भरलेले होते ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदाराने MS-CIT साठी ‘’ श्री. कॅम्प्यूटर इन्स्टीटयूट ‘’ जिंतूर येथे प्रवेश घेतलेला होता ती संस्था गैरअर्जदाराचे मालकीची नाही व तिच्याशी त्यांचा कसलाही संबंध नाही असा दोन्ही गैरअर्जदारानी लेखी जबाबात बचाव घेतलेला आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 हा फक्त देखरेख करीत होता असेही म्हटलेले आहे परंतू लोकशाही दिनी अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी परभणी यानी पोलीस निरीक्षक जिंतूर यांचेकडे तपासासाठी ते प्रकरण पाठविल्यावर तपासाचे कामी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी दिनांक 15.12.2009 रोजी स्वतःचे सहीने जबाब लिहून दिलेले होते त्याच्या छायाप्रती नि.3/3 व नि. 3/6 दाखल केल्या आहेत त्यामध्ये गजानन ढाके याने आपल्या जबाबात माझा टंकलेखन व्यवसाय व संतोष सोपान चौधरी यांचा श्री कम्प्यूटर ट्रेनिंग व्यवसाय एकाच जागेत आसून जागेचे भाडे दोघेजण अर्धेअर्धे भरतो तसेच श्री कॅम्प्यूटर मध्ये मी भागीदार आहे असेही म्हटलेले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 श्री. महेश काकडे याच्या नि. 3/4 वरील जबाबात त्याने मी ‘’ श्री. कॅम्प्यूटर इन्स्टीटयूट ‘’ मध्ये सन मे 2007 ते मे 2008 या काळात प्रशिक्षक म्हणून दरमहा रुपये 1000/- पगारावर नोकरीस होतो असे म्हटलेले आहे त्याचे नियुक्तीपत्राची कॉपीही अर्जदाराने पुराव्यात नि. 3/8 वर दाखल केलेली आहे. पुराव्यातील या कागदपत्रातून अर्थातच दोन्ही गैरअर्जदारानी वस्तूस्थितीला बगल देवून लेखी जबाबात खोटी विधाने करुन बचाव घेतलेला आहे हे स्पष्ट होते. अर्जदाराने प्रवेश घेतल्यानंतर वास्तविक त्याने ज्या ज्या वेळी कोर्स फी पोटी रककमा जमा केल्या होत्या त्या त्या वेळी रितसर ऑन लाईन रिसीट देण्याची संस्थेच्या मालकाची जबाबदारी असताना गैरअर्जदार क्रामंक 1 ने स्वतःचे ढाके टंकलेखन संस्थेची अर्जदारास कशी काय पावती दिली ? पुराव्यातील नि. 3/1 व नि. 13/4 वर दाखल केलेल्या त्या पावत्यावरुन दिसते. तसेच या पावत्यावर MS-CIT असा स्पष्ट उललेख न करता कॅम्प्यूटर II हप्ता परत III st असा त्रोटक उल्लेख करुन गैरअर्जदार क्रमांक 1 ने स्वतःचे सहीच्या पावत्या देवून अर्जदाराची फसवणूक केलेली असल्याचे निष्पन्न होते. अर्जदाराने लोकशाही दिनी गैरअर्जदाराविरुध्द कॉम्प्यूटर इन्स्टीटयूट विषयी जिल्हाधिकारी परभणी यांचेकडे लेखी तक्रार दिल्यावर पोलीसानी केलेल्या चौकशी व तपासाचे कामी गैरअर्जदाराने अर्जदाराने भरलेल्या फी रक्कमेच्या आन लाईन दिनांक 16.08.2008 दिनांक 16.09.2008 आणि 16.10.2008 या तीन पावत्या पोलीस स्टेशनला त्यानी सादर केलल्या होत्या तर मग अर्जदाराला तशा का दिल्या नाहीत ? गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे सहीच्या पावत्या देण्याची काय आवयश्यकता होती ? यावरुन ही तपास कामी अर्जदाराने सादर केलेल्या पावत्या गैरअर्जदारानी नंतर तयार करुन आपली कातडी बचावण्याचे उद्येशानेच दिलेल्या असल्या पाहीजेत असे अनुमान निघते. अर्जदारासह इतर विद्यार्थ्यानी इन्स्टीटयूटमध्ये MS-CIT कोर्ससाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्याना नि. 3/2 वरील माहिती पत्रका प्रमाणे 12 आडवठयाचे दोन सत्रामध्ये आठवठयात तीन दिवस थेअरी तीन दिवस प्रॅक्टीकल याप्रमाणे प्रशिक्षण दिले जात होते हे शाबीत करणारा एकही ठोस पुरावा गैरअर्जदारानी प्रकरणात सादर केलेला नाही याउलट प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यापैकी 1) ज्ञानेश्वर गणेश चव्हाण 2) गणेश ज्ञानदेव शिंदे 3) राजेश सखाजी जाधव 4) सुनिता मनोजराव जोगवाड 5) जगन अचूतराव वायाळ यानी आपली शपथपत्रे अनुक्रमे नि. 3/19 ते नि. 3/21 , नि. 3/22 (डि) नि. 13/3 वरील विद्यार्थ्यानी शपथेवर सांगितलेल्या मजकूरामध्ये गैरअर्जदारानी नियमाप्रमाणे कधीही दोन तास शिकवणी अगर प्रॅक्टीकल घेतले नाही कॅम्प्यूटर वर बसू दिले जात नव्हते. संस्थेत फक्त तीनच संगणक सेट होते , बॅटरीची व्यवस्था नव्हती, शिकवणारे प्रशिक्षक अधिकृत शैक्षणीक पात्रतेचे नव्हते वगैरे गैरसोइमुळे परिक्षेला विद्यार्थी उत्तीर्ण होवू शकले नाहीत नापास झाले त्याला संस्था चालक हाच सर्वस्वी जबाबदार असल्याचे विद्यार्थ्यानी ज्या अर्थी स्टॅप पेपरवर शपथेवर निवेदन केले आहे त्याअर्थी त्यात निश्चीतपणे तथ्य आणि सत्यता असली पाहीजे याकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. लोकशाही दिनी अर्जदाराने जिल्हाधिकारी परभणी यांचेकडे दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने पोलीस अधिक्षक परभणी यानी अर्जदाराला दिनांक 03.04.2010 रोजी पाठवलेल्या पत्रातून अर्जदाराची श्री कॅम्प्यूटर तर्फे कोणत्याही प्रकारची दिशाभूल अगर फसवणूक झाल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले नाही असे नमूद करुन अर्जदाराची तक्रार निकाली काढण्यात आल्याचे कळविले होते ते पत्र पुराव्यात गैरअर्जदारानी नि. 12/1 ला दाखल केले आहे. तरी परंतू प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यानीच जर शपथपत्राव्दारे शपथेवर खरी वस्तूस्थिती मंचासमसेर मांडली असेल तर पोलीसांची दिनांक 03.04.2010 च्या पत्रातील निष्कर्षाविषयी शंका आल्या शिवाय राहात नाही. गैरअर्जदारानी लेखी जबाबातून घेतलेला बचाव व पुराव्यातील त्यांचे जबाब लक्षात घेता ते परस्पर विरोधी असून विसंगत असल्यामुळे आपली चुक दडवण्यासाठी त्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. वरील सर्व बाबींवरुन व पुराव्यातील वस्तूस्थितीवरुन अर्जदाराचे तक्रारीमध्ये निश्चीतपणे खरेपणा वाटतो आणि MS-CIT चे प्रशिक्षण देण्याचे बाबतीत गैरअर्जदारानी अनूचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा त्रूटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. सबब सेवा त्रूटीची योग्य ती नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार निश्चीतपणे पात्र आहे. तक्रार अर्जातून वेगवेगळया तपशीलाखाली एकूण रुपये 41,400/- ची मागणी अर्जदाराने केलेली आसली तरी ती अवास्तव असल्यामुळे मान्य करता येणार नाही मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराने भरलेली संगणक शैक्षणीक फी रुपये 2400/- त्याला परत करावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 1400/- तक्रार अर्जाचा खर्च रुपये 600/- आदेश मुदतीत दयावा. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |