// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक :107/2014
दाखल दिनांक : 27/05/2014
निर्णय दिनांक : 09/03/2015
सुरेश पुंडलिक भटकर
वय 42 वर्षे, धंदा - मजुरी
रा. सिव्हील लाईन दर्यापूर
ता. दर्यापूर जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
व्यवस्थापक/वितरक,
गद्रे ट्रॅक्टर्स, राजापेठ चौक,
अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. तायडे
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. लखोटीया
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 09/03/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सदरील तक्रार दाखल केली.
ग्राहक तक्रार क्रमांक : 107/2014
..2..
2. विरुध्दपक्ष यांनी सदर अर्जाव्दारे, तक्रारदाराचा निशाणी 1 चा मुळ अर्ज मदतबाहय असल्यामुळे रद्द करण्याची विनंती केली.
3. विरुध्दपक्षातर्फे अॅड. लखोटीया व तक्रारदारातर्फे अॅड. तायडे यांचा युक्तीवाद ऐकला व त्यावरुन खालील मुद्दा विचारार्थ घेण्यात आला.
मुद्दे उत्तर
- तक्रार अर्ज मुदती दाखल केला आहे
का ? .... .... नाही
- आदेश काय ? .. अंतीम आदेशा प्रमाणे
4. विरुध्दपक्षाने निशाणी 20 च्या अर्जात नमुद केले की, तक्रारदाराने विरुध्दपक्षा विरुध्द सदर अर्ज वि. मंचात दि. १५.५.२०१४ रोजी दाखल केला. त्यात म्हटले की, तक्रारदाराने सदर गाडी
विरुध्दपक्षाकडून दि. १०.१२.२०१० रोजी विकत घेतली व त्यात दि. २९.११.२०११ रोजी दोष आढळून आला.
ग्राहक तक्रार क्रमांक : 107/2014
..3..
5. विरुध्दपक्षाच्या म्हणण्याप्रमाणे, सदर तक्रारी मध्ये दि. १०.१२.२०१० रोजी कारण घडले म्हणून विरुध्दपक्षा विरुध्द तक्रार 2 वर्षाचे आत म्हणजे दि. ९.१२.२०१२ पर्यंत दाखल करणे आवश्यक होते. परंतु ते दि. १५.५.२०१४ रोजी दाखल केली म्हणुन तक्रार अर्ज मुदत बाहय असल्यामुळे तो रद्द करण्याची विनंती केली.
6. तक्रारदाराच्या मुळ अर्ज निशाणी 1 चे अवलोकन केले असता, तक्रारदाराने सदर अर्ज वि. मंचात दि. १९.५.२०१४ रोजी दाखल केला व नमुद केले की, सदर गाडी मध्ये कोणत्या प्रकारचा दोष आहे हे दर्यापुर येथील मॅकेनिकला दि. ३.४.२०१२ रोजी दाखविले असता, त्यातील महत्वाचे पार्टस, स्टार्टर, हार्ड गिअर इत्यादी निकामी असल्याचे आढळले म्हणून कारण हे दि. ३.४.२०१२ रोजी घडले.
7. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे कारण हे दि. ३.४.२०१२ रोजी घडले असे गृहीत धरले तर सदर तक्रार 2 वर्षे मुदतीच्या आत म्हणजे दि. २.४.२०१४ रोजी किंवा त्यापुर्वी दाखल करणे
ग्राहक तक्रार क्रमांक : 107/2014
..4..
आवश्यक होते. परंतु दि. १५.५.२०१४ रोजी दाखल केली आहे. तसेच सदर अर्जासोबत तक्रारदाराने “Condo nation of Delay” साठी कोठेही विनंती केली नाही किंवा तसा अर्ज पण दाखल केला नाही.
8. वरील सर्व विवेचनावरुन तक्रारदाराचा मुळ अर्ज हा मुदत बाहय असल्यामुळे रद्द होण्यास पात्र आहे. हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असून त्यानुसार मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
आदेश
- तक्रारदाराचा निशाणी 1 वरील अर्ज मुदत बाहय असल्याने रद्द करण्यात येतो.
- खर्चाबाबत काहीही आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
(आर.के. पाटील) (एम.के. वालचाळे)
SSR सदस्य अध्यक्ष