Maharashtra

Nanded

CC/09/78

Prakashsing D.Pardeshi - Complainant(s)

Versus

Gadre Engineering Services - Opp.Party(s)

01 Aug 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/78
1. Prakashsing D.Pardeshi Babhulgaon Dist NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Gadre Engineering Services N.H.6 Shioni.AkolaNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 01 Aug 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र. 2009/78
                                                     प्रकरण दाखल दिनांक  08/04/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 11/08/2009.
                                                   
समक्ष         -    मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील          अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती सुजाता पाटणकर,          सदस्‍या.
                       मा.श्री.सतीश सामते,                 सदस्‍य.
 
प्रकाशसिंह पि. दामुसिंह परदेसी
वय, 46 वर्षे, धंदा व्‍यापार
रा.सर्व्‍हे नंबर 14, बाभूळगांव
जि.नांदेड.                                             अर्जदार
 
विरुध्‍द
 
1.   गदरे इंजिनिअरिंग सर्व्‍हीसेस
     मार्फत श्री.सुशिल ठाकरे, ब्रॅच मॅनेजर,
     एम.आय.डी.सी. शिवनी एन.एच.-6,
     अमरावती-नागपूर रोड, अकोला.
2.   जे.सी.बी. इंडिया लि.
     23/7 मथुरा रोड, हरीयाणा-121 004.                 गैरअर्जदार
3.   बॉश लि.
     मार्फत, श्री. मनीष पाठक, दमेक हाऊस,
     पहिला मजला, रंगोली हॉटेल जवळ, लॉ कॉलेज रोड,पुणे.
4.   प्रिमिअर अटो वकर्स,
     बाफना रोड, बाफना मोटर्स समोर,
     हैद्राबाद रोड, नांदेड.
 
 
अर्जदारा तर्फे.               - अड.जी.आर. भराडे
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे     - अड.आर.आर. देशपांडे.
गैरअर्जदार क्र.3 तर्फे          - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.4 तर्फे          - अड.पी.एस. भक्‍कड.
 
 
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
              सर्व गैरअर्जदारांच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल अर्जदार आपल्‍या तक्रारीत म्‍हणतात की, त्‍यांनी दि.04.10.2008 रोजी एक जेसीबी मशीन त्‍यांचे निर्माते गैरअर्जदार क्र.2 असून त्‍यांचे वितरक गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून खरेदी केले. एक वर्ष किंवा 2000 तास पूर्ण होईपर्यत गैरअर्जदार क्र.1 ने मशीनची वॉरंटी दिली आहे. वॉरंटी कालावधीमध्‍ये मशीनचे अल्‍टीनेटर दि.18.11.2008 रोजीला 137 तासावर खराब झाले. ताबडतोब अर्जदाराने गैरअर्जदारांना फोन केला, या बाबत कळविले. गैरअर्जदाराचे सर्व्‍हीस इजिनिंअर दि.21.11.2008 रोजी साईट वर आले तपासणीनंतर अल्‍टरनेटर पार्टस त्‍यांनी नांदेड येथील प्रेमीअर अटो वर्क्‍स यांचेकडे दूरुस्‍त करुन फिट केले परंतु हा पार्ट नेहमीपेक्षा जास्‍त गरज होत आहे. दोन दिवसांनंतर पून्‍हा हा पार्ट चालू बंद होऊ लागला या बाबत परत गैरअर्जदार क्र.1 ला कळविण्‍यात आले. त्‍यांने मशीन चालू ठेवण्‍यास सांगितले परंतु ते चालू ठेवले असता रिंडीग 10 च्‍या पटीने वाढू लागली.  गैरअर्जदाराच्‍या इंजिनिअरने बॅटरीची पॉवर संपली असून त्‍यामूळे असे होते असे सांगितले. यानंतर पून्‍हा दि.08.01.2009 रोजी श्री. रामकूमार जैस्‍वाल यांना गैरअर्जदार यांनी पाठविले त्‍यांनी परत गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे पार्ट दूरुस्‍तीला टाकले, दूरुस्‍त करुन परत मशीनला लावला. असे परत दोन तिन तासानंतर जरी खराब झाले, असे सतत चार पाच दिवस झाले पण पार्ट दूरुस्‍त करण्‍यात यश आले नाही. त्‍यामूळे अर्जदाराने नवीन पार्टसची मागणी केली परंतु गैरअर्जदार क्र.1 च्‍या इंजिनिअरने सदरील नादूरुस्‍त असलेले पार्ट मशीला लाऊन ते निघून गेले. अर्जदाराने खराब अवस्‍थेतील पार्ट स्‍वतः दूरुस्‍त  करुन आणला व दि.23.01.2009 रोजी मशीनला लावला. आता तो चांगल्‍या स्थितीत सूरु आहे. दि..18.11.2008 ते 23.01.2009 या कालावधीतील 65 मध्‍ये 60 दिवस मशीन बंद होते. त्‍यामूळे अर्जदाराचा स्‍टोन क्रेशरचा व्‍यवसाय बंद पडला व टिपरही बसून राहीले त्‍यामूळे त्‍यांचे रु.8,04,000/- नुकसान झाले ती रक्‍कम 18 टक्‍के व्‍याजासह, तसेच मानसिक ञासापोटी रु.1,00,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.25,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
 
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचा पहिला आक्षेप असा घेतला आहे की, अर्जदार यांची तक्रार ही व्‍यावसायीक स्‍वरुपाची असल्‍याने ती या मंचात चालू शकत नाही. वारंटी कालावधीमध्‍ये दि.18.11.2008 रोजीला अल्‍टीनेटर खराब झाल्‍यावर गैरअर्जदार क्र.1 ने त्‍यांचे सर्व्‍हीस इंजिनिअरला पाठविले होते. यात अल्‍टीनेटर खराब झाल्‍यामूळे बॅटरीची पावर संपली होती व त्‍यामूळे इतर पार्टसवर त्‍यांचा परीणाम झाला. गैरअर्जदार यांनी तक्रार अर्जात जे आरोप केलेले आहेत ते सर्व आरोप गैरअर्जदार यांना अमान्‍य आहेत. गैरअर्जदार यांचे असे म्‍हणणे आहे की, अल्‍टीनेटर हा पार्ट बॉश लि. कंपनी याद्वारे निर्मीत आहे व सदरची वॉरंटी बॉंश कंपनीने दिली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे जेसीबी कंपनीचे अधिकृत विक्रेते आहे. गैरअज्रदार क्र.2 यांनी जेसीबी यांचे निर्माण केले जरी असले तरी यात वेगवेगळे कंपनीचे जे पार्टस बसविलेले आहेत त्‍यांची त्‍या कंपनीची  वॉरंटी आहे. अर्जदाराने जेसीबी मशीन दि.4.10.2008 रोजी खरेदी केल्‍यानंतर दि.8.11.2008 रोजी पहिली फ्रि सव्‍हीसिंग करुन दिली. त्‍यादिवशी मशीन ओके होती. दि.8.11.2008 रोजी अर्जदाराचे मशीनने 109 तास काम केले होते. यानंतर प्रथमतः गैरअर्जदार यांचेकडे दि.21.1.2008 रोजी फोन द्वारे मशीनमध्‍ये बीघाड झाल्‍याचे सांगितल्‍यावर त्‍यांनी श्री.जैस्‍वाल यांना पाठविले व त्‍यांनी मशीनची दूरुस्‍ती करुन, मशीन मधील अल्‍टीनेटर या पार्टमध्‍ये बिघाड झाला व तो पार्ट काढून त्‍यांनी गैरअर्जदार क्र.3बॉश लि. या कंपनीचे अधिकृत डिलर गैरअर्जदार क्र.4 प्रिमियम ऑटो वर्कस यांचेकडे दूरुस्‍तीसाठी दिला तो पार्ट दूरुस्‍त झाल्‍यावर मशीनमध्‍ये बसविला. मशीन व्‍यवस्थितरित्‍या काम करीत होती. दि.8.1.2009रोजी पर्यत गैरअर्जदार यांचेकडे कोणतीही तक्रार प्राप्‍त झाली नाही. म्‍हणजे दिड महिने अर्जदाराची मशीन व्‍यवस्थित काम करीत होती. यानंतर दि.8.1.2009 रोजी फोनद्वारे परत बीघाडा बददल सूचना प्राप्‍त झाली. परत इंजिनिअर श्री.जैस्‍वाल यांनी दि..8.1.2009 रोजी जागेवर जाऊन मशीनची तपासणी केली. मशीनचा अल्‍टीनेटर हा पार्ट आऊट पूट देत नाही त्‍यामूळे मशीनची बॅटरी चार्ज होत नाही व त्‍यांचा इतर बाबीवर परीणाम झाला आहे.त्‍यामूळे तो पार्ट काढून गैरअर्जदार क्र.4 कडे दुरुस्‍तीस दिला व तो दूरुस्‍तीला गेल्‍यावर तो पार्ट दि.9.1.2009 रोजी दुरुस्‍त केल्‍यावर गैरअर्जदार क्र.1 यांचे इंजिनिअरने तो बसविला. यानंतर कोणताही बीघाड आढळला नाही. मशीनने एकूण 287 तास काम केले आहे. यानंतर दि.15.1.2009 रोजी अल्‍टीनेटर गरम होत असल्‍याचे आढळले. त्‍यानंतर गैरअर्जदार क्र.1 च्‍या इंजिनिअरने मशीनची दि..2.2.2009 व 21.3.2009 रोजी वांरटी काळातील भेट देऊन तपासणी केली. सदर दोन्‍ही वेळेस अल्‍टीनेटर व मशीन व्‍यवस्थित काम करीत असल्‍याचे आढळले. अर्जदाराचे मशीन दि.2.2.2009 रोजी मशीनने 369 तासांपर्यत व दि.21.3.2009रोजी 510 तासापर्यत काम केले होते. परत दि..2.4.2009रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराकडून परत तक्रार मिळाल्‍यावर लगेच दि.3.4.2009 रोजी नांदेड येथे जाऊन तपासणी केली असता अल्‍टीनेटर बंद आढळले. हे असे वारंवार होते म्‍हणून गेरअर्जदार क्र.1 ने दि.3.4.2009 रोजी नवीन अल्‍टीनेटर पार्टस बदलून दिले. गैरअर्जदार क्र.1 व 2 विशेष नमूद करतात की, अल्‍टीनेटर या पार्टसची वॉरंटी त्‍यांची नसताना देखील त्‍यांनी मशीनमध्‍ये नवीन अल्‍टीनेटर टाकून बसवून दिले परंतु नवीन अल्‍टीनेटर सूध्‍दा दोनच दिवसात बंद पडले.  गैरअर्जदार यांनी उचित सेवा देण्‍याचे उददेशाने लूकास कंपनीचे नवीन अल्‍टीनेटर विकत घेतले व ते दि.6.4.2009 रोजी मशीनमध्‍ये बसविले. यानंतर आजपर्यत ती मशीन व्‍यवस्थित चालू आहे व यानंतर कोणतीही तक्रार प्राप्‍त झाली नाही. अल्‍टीनेटर बदलून देण्‍या बाबत जो काही विलंब झाला त्‍यास गैरअर्जदार कारणीभूत नाहीत. गैरअर्जदार क्र.4 यांनी वॉरंटी कालावधीमध्‍ये अल्‍टीनेटर तिन वेळेस दूरुस्‍त केले. नंतर असे लक्षात आले की, ते दूरुस्‍त होऊ शकत नाही त्‍यामूळे ते बदलून दिले. गैरअर्जदार यांची वॉरंटीतील पार्टस बदलण्‍याची जबाबदारी आहे परंतु त्‍यामूळे अर्जदार यांचा व्‍यवसाय बंद पडला असेल व त्‍यामूळे काही नूकसान झाले त्‍यांस गैरअर्जदार जबाबदार नाहीत. गैरअर्जदार यांनी पूरेशी योग्‍य ती सेवा अर्जदार यांना दिली तरी देखील गैरअर्जदार यांचेकडून पैसे उकळण्‍याचे हेतूने हा खोटा अर्ज दाखल केलेला आहे म्‍हणून हा अर्ज खारीज करावा असे म्‍हटले आहे.
 
              गैरअर्जदार क्र.3 हे नोटीस मिळूनही गैरहजर राहीले म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
              गैरअर्जदार क्र.4 यांनी वकिलामार्फत आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराच्‍या मशीनच्‍या अल्‍टीनेटर पार्टमध्‍ये खराबी आली होती. गैरअर्जदार क्र.1 चे सर्व्‍हीस इंजिनिअर तो पार्ट घेऊन आले त्‍यावेळेस अल्‍टीनेटर चे मूख्‍य चार पार्टस गैरअर्जदाराने विनाशूल्‍क बदलून दिले. अल्‍टीनेटर चे काम मशीनद्वारे चेक करुन व्‍यवस्थित असल्‍याची खाञी करुन दिली. दि.21.11.2008 रोजी ला ते बसविले. यानंतर परत दि..2.1.2009 रोजीला दूस-या वेळेस तो पार्टस त्‍यांचेकडे आले. त्‍यामूळे दोन दिवसांत अल्‍टीनेटर खराब झाले असे म्‍हणता येत नाही कारण तो दिड महिना चालला. दि.9.1.2008 रोजी सर्व्‍हीस इंजिनिअर ते पार्ट घेऊन आले त्‍या मधील दोन पार्टस विनाशूल्‍क बदलून दूरुस्‍त करुन दिले. सदरचे पार्टस हे इलेक्‍ट्रानिक्‍स पार्टस आहेत व हे पार्टस अल्‍टीनेटर गरम झाले व वितळून जातात. त्‍यामूळे गैरअर्जदाराने व्‍यवस्थित दूरुस्‍त केले नाही असे म्‍हणता येत नाही. दि.15.1.2009 रोजी पून्‍हा अल्‍टीनेटर गरम झाल्‍यामूळे दूरुस्‍तीसाठी त्‍यांचेकडे आले. पूर्वी बदलण्‍यात आलेले पार्टस पैकी एक पार्टस वितळला होता. तो दूरुस्‍त केल्‍यानंतर इंजिनिअरने परत मशीनवर फिट केला. यानंतर परत अल्‍टीनेटर गरम होऊ लागल्‍यामूळे दि.6.4.2009 रोजी अल्‍टीनेटर परत घेऊन अर्जदारास नवीन अल्‍टीनेटर दिले. जूने अल्‍टीनेटर गैरअर्जदार क्र.3 ला पाठवून दिले. यात अर्जदाराच्‍या कथनाप्रमाणे कोणतेही नूकसान झालेले नाही. कोणताही व्‍यापारी रु.7,000/- च्‍या किंमतीच्‍या अल्‍टीनेटर करिता स्‍वतःचे रु.8,04,000/- चे नूकसान करु शकत नाही. अर्जदार स्‍वतः हे गैरअर्जदार यांचेकडे कधीही आलेले नाहीत. अर्जदारानी त्‍यांचे मशीनवर नवीन अल्‍टीनेटर बसवून दिले ही बाब मंचापासून लपवून ठेवली. त्‍यामूळे ते स्‍वच्‍छ हाताने समोर आलेले नाहीत. गैरअर्जदाराने नीशूल्‍क सेवा दिली व सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. त्‍यामूळे खर्चासह तक्रार फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र. 1, 2 व 4 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ तसेच कागदपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व सर्वानी केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                               उत्‍तर
   1.   अर्जदार यांची तक्रार व्‍यावसायीक स्‍वरुपाची
       आहे काय                                    नाही.
      2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द
       करतात काय  ?                                नाही.
   2.  काय आदेश ?                        अंतिम आदेशाप्रमाणे.
                            कारणे
मूददा क्र.1 व 2 ः-
 
              गैरअर्जदारांकडून अर्जदार यांना व्‍यवसायासाठी जेसीबी मशीन विकत घेतले म्‍हणून तक्रार ही व्‍यावसायीक स्‍वरुपाची असल्‍या कारणाने ती चालणार नाही असा आक्षेप जरी घेतला असला तरी येथे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी जेसीबी मशीन अर्जदारास विकली. त्‍यामूळे निर्मात्‍याने त्‍या मशीन बददल जी वॉरंटी दिली आहे त्‍या वॉरंटी बददल अर्जदार तक्रार करु शकतात. व्‍यवसायासाठी जरी मशीन असले तरी वॉरंटीसाठी अर्जदार यांना  तक्रार दाखल करता येते. याबददल मा. राष्‍ट्रीय आयोग 2004 NCJ 345 (NC)  यात मिरा अन्‍ड कंपनी लि.   विरुध्‍द चिनार सांटेक्‍स लि. यात आदेश केल्‍याप्रमाणे
Consumer Protection Act, 1986--- Section 2(1)(d) (ii) ---Consumer---Commercial purpose---Warranty---Generating set purchased for commercial purpose---Service during warranty---Is consumer-
 
 
Consumer Protection Act, 1986---Section 2(1)(g) ---Deficiency in service---Warranty---Defects during warranty not ratified, payment insisted and to be made---Is deficiency in service.
 
Consumer Protection Act, 1986---Section 14(1)---Liability of dealer during warranty period---Liability of dealer even if manufacturer is not made a party-
 
म्‍हणून जीथे वॉरंटीचा प्रश्‍न येतो तेथे व्‍यावसायीक स्‍वरुप न बघता वॉरंटीसाठी अर्जदार ग्राहक होतात. म्‍हणून गैरअर्जदाराचा आक्षेप फेटाळण्‍यात येतो.
              अर्जदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जात जे नमूद केलेले आहे त्‍यात त्‍यांनी स्‍वतः कबूल केले आहे की, दि.21.11.2008 रोजी नंतर  दि.9.1.2009 रोजी ला दि.15.1.2009 रोजीला असे तिन वेळा गैरअर्जदाराने अल्‍टीनेटर हा पार्ट काढून अर्जदाराची सूचना मिळाल्‍याबरोबर ताबडतोब येऊन  तो पार्ट दूरुस्‍त  केला. यावरुन गैरअर्जदार यांनी प्रामाणीकपणे सेवा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे हे अर्जदार स्‍वतःच कबूल करतात. परंतु अर्जदाराने तक्रार अर्जात असे म्‍हटले आहे की, दि.23.01.2009 रोजी गैरअर्जदारांनी नादूरुस्‍त पार्ट मशीमध्‍ये लावुन नीघुन गेले. तो पार्ट परत खराब झाल्‍यानंतर अर्जदाराने स्‍वःता तो काढून शहरात फिरुन दुरुस्‍त करुन दि.23.01.2009 रोजी  बसविला व मशीन सध्‍या चांगल्‍या स्थितीत सूरु आहे. गैरअर्जदाराचे म्‍हणणे पूर्णतः पाहिल्‍यानंतर त्‍यांनी जॉब शिट दाखल केलेले हे तपासल्‍यानंतर असे दिसून येते की, अर्जदाराने यांची तक्रार खोटी व बनवाबनवी करुन दाखल केलेली आहे. दि.9.1.2009 रोजीचे जॉब शिट या प्रकरणात दाखल आहे. त्‍यात सर्व्‍हीस इंजिनिअर जैस्‍वाल यांनी तो अल्‍टीनेटर पार्ट काढून गैरअर्जदार क्र.4 यांचेकडून दूरुस्‍त करुन घेतला व परत बसविला. आता ती मशीन व्‍यवस्थित सूरु आहे. यावर अर्जदार यांची स्‍वाक्षरी आहे. यानंतर परत दि.17.1.2009 रोजीचे जॉब शिट आहे. यात अल्‍टीनेटर हे गैरअर्जदार क्र.3 ला बदलून देण्‍याची त्‍यांनी विनंती केली होती व ते दूरुस्‍त करुन परत बसविले. गैरअर्जदार यांनी आपले म्‍हणण्‍यात दि.3.4.2009 रोजी अल्‍टीनेटर हा पार्ट दूरुस्‍त केल्‍यानंतर काही दिवसांनी परत  खराब होते व तो दूरुस्‍त होत नाही असे लक्षात आल्‍यावर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांची जबाबदारी नसताना तो पार्ट नवीन बॉश कंपनीचा बदलून देण्‍यात आले. मशीन ही 591 तास चालली आहे. परंतु हा नवीन पार्ट देखील गरम होऊ लागला व तो परत खराब झाला म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 ने  स्‍वतःच्‍या पैशाने नवीन लूकास कंपनीचे अल्‍टीनेटर खरेदी केले व ते जेसीबी मशीनवर फिट केले आहे व तशी जॉब शिटवर अर्जदार यांची सही देखील आहे. यानंतर दि.4.4.2009 रोजी नंतर कोणतीही तक्रार गैरअर्जदार यांना प्राप्‍त झाली नाही व मशीन ही व्‍यवस्थित सूरु आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांना व्‍यवस्थित सेवा दिलेली आहे असे असतानाही अर्जदार यांना आपल्‍या तक्रार अर्जात  नवीन पार्ट बदलून दिल्‍या बददल कोणताही उल्‍लेख केलेला नाही. नवीन अल्‍टीनेटर पार्ट बदलून दिल्‍यानंतर मंचापासून ती गोष्‍ट लपवून ठेवली. यावरुन त्‍यांची तक्रार खोटी आहे हे दिसून येते. दूसरी बाब दि.6.4.2009 रोजी गैरअर्जदाराने अल्‍टीनेटर हा पार्ट नवीन बदलून दिल्‍या बरोबर कोणतीही तक्रार नसताना परत गैरअर्जदारा विरुध्‍द दि.8.4.2009 रोजी सेवेतील ञूटी बददलची तक्रार ताबडतोब दोन दिवसातच दाखल केली आहे. त्‍यामूळे  अर्जदार हे स्‍वच्‍छ हाताने समोर आलेले नाहीत व त्‍यांनी ब-याच गोष्‍टी लपवून ठेवण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. अल्‍टीनेटर हा पार्ट बॅटरी चार्जीगचे काम करतो व इतर बाबी बददल अर्जदार यांनी तक्रार केलेली होती ती बॅटरी डिसचार्ज झाल्‍यामूळे त्‍यांचा परीणाम इतर बाबीवर झाला. गैरअर्जदार क्र.1 च्‍या मते अल्‍टीनेटर पार्ट हे बॉश कंपनीचे आहे व त्‍यांनी त्‍या कंपनीकडून घेऊन जेसीबी वर फिट केला. तसे  जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.3 चीची आहे तरी देखील आम्‍ही ग्राह‍काचे नूकसान होऊ नये म्‍हणून अल्‍टरनेटर खरेदी करुन योग्‍य ती सेवा देण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. त्‍यामूळे ञूटीची सेवा देण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. अल्‍टीनेटर पार्ट नवीन खरेदी केल्‍याबददल गैरअर्जदार क्र.4 चे बिल अर्जदार यांनी दाखल केलेले आहे. मशीन वारंवार दूरुस्‍त केल्‍याबददल व त्‍यात मशीन व्‍यवस्थित चालू बददल व ग्राहकाची स्‍वाक्षरी असल्‍याबददल जॉब कार्ड नंबर 14895 मध्‍ये स्‍पष्‍ट नमूद केलेले आहे. यानंतर जॉब कार्ड 16363 मध्‍ये अल्‍टीनेटर बदली किया है मशीन चालू किया है मशीन मे कोई प्रॉब्‍लम नही है सभी लाईट चालू है, यावर अर्जदाराची सही आहे. यानंतर परत जॉब कार्ड नंबर 16364 यात नवीन अल्‍टीनेटर लूकास कंपनीचा बदलून दिला आहे व मशीन की चार घंटे ट्रायल लिया है मशीन बरोबर चालू है. यावर अर्जदाराची सही आहे. (बिल दि.6.4.2009 रु.10,675/- चे आहे)   वारंवार एसएमएस, इमेल, रिपोर्ट या प्रकरणात दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्र.1 नी जेसीबी मशीनचा पार्ट विनाशूल्‍क नवीन बदलून अर्जदारास सेवा दिलेली आहे. मशीनच्‍या वॉरंटीत पार्ट बदलले तो पार्ट दूरुस्‍त किंवा बदलून देण्‍याची जबाबदारी ही निर्मात्‍याची किंवा डिलरची असते. मशीन दूरुस्‍त करण्‍यास जो अवधी लागतो त्‍या अवधीमध्‍ये तक्रारदाराचा व्‍यवसाय बंद पडला असेल व त्‍यापासून काही नूकसान झाले असेल तर त्‍यास गैरअर्जदार जबाबदार राहत नाहीत. अर्जदारांनी त्‍यांचेकडे दोन क्रेशर मशीन असल्‍याबददल तसेच सहा टिप्‍पर असल्‍याबददल व  हा सर्व व्‍यवसाय जेसीबी मूळे बंद पडल्‍यामूळे त्‍यांचे रु,8,04,000/- चे नूकसान झाल्‍याने नूकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे पण अशा नूकसानीस गैरअर्जदार हे जबाबदार राहू शकत नाहीत. म्‍हणून आपली ही मागणी खारीज करण्‍यात येते. अर्जदाराचा तक्रारीतील सूर हा अर्धा खरा व अर्धा खोटा अशा स्‍वरुपाचा आहे. हे नवीन अल्‍टीनेटर त्‍यांनी घेतले व स्‍वतः मी दूरुस्‍त करुन घेतले असे म्‍हणणे म्‍हणजे शूध्‍द खोटे पणा आहे. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी यात दिसून येत नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                          आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येतो.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)     (श्रीमती सुजाता पाटणकर)   (श्री.सतीश सामते)
           अध्यक्ष.                              सदस्‍या                             सदस्‍य
 
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.