Maharashtra

Kolhapur

CC/20/268

Annasaheb Sangappa Hataragi And Other - Complainant(s)

Versus

Gadhinglaj Talukha Shetakari Sahakri Kharedi Vikri Snagh Ltd, Gadhinglaj - Opp.Party(s)

R.G.Khavare

13 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/20/268
( Date of Filing : 09 Sep 2020 )
 
1. Annasaheb Sangappa Hataragi And Other
At.Haninnal, Tal.Gadhinglaj
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Gadhinglaj Talukha Shetakari Sahakri Kharedi Vikri Snagh Ltd, Gadhinglaj
Main Road, Gadhinglaj
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Jan 2023
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      वि.प.क्र.1 ही सहकार कायद्याप्रमाणे नोंदणीकृत संस्‍था असून वि.प. क्र.2 व 3 हे संस्‍थेचे अनुक्रमे चेअरमन व व्‍हा.चेअरमन आहेत.  वि.प. क्र.1 संस्‍थेचा संपूर्ण व्‍यवहार वि.प. क्र.2 व 3 हे पहातात. तक्रारदार हे 2015 पूर्वी साधारणतः 28 ते 30 वर्षे वि.प. क्र.1 संस्‍थेमध्‍ये कर्मचारी म्‍हणून काम करीत होते.  वि.प.क्र.1 संस्‍थेच्‍या कर्मचा-यांची एक सेवक पतसंस्‍था देखील वि.प.क्र.1 शी संलग्‍नपणे कार्यरत होती.  वि.प.क्र.1 हे प्रत्‍येक कर्मचा-यांचे पगार, शेअर्स, व्‍याज, डिव्‍हीडंड या संस्‍थेत जमा होत असत.  निवृत्‍तीवेळी एकूण सर्व जमा रक्‍कम कर्मचा-याला मिळत असे.  यातील तक्रारदार हे वि.प.क्र.1 कडे सन 2015 पर्यंत कार्यरत होते. ता. 26/6/15 रोजी तक्रारदार हे निवृत्‍त झाले.  तत्‍पूर्वी तक्रारदार यांच्‍या नांवे वि.प. क्र.1 यांनी त्‍यांच्‍या पगारातून वेळोवेळी कपात करुन शेअर्स, ठेव, व्‍याज व डिव्‍हीडंड रुपाने रकमा जमा केलेल्‍या आहेत. ता. 31/10/2014 अखेर कर्मचारी पतसंस्‍थेकडे एकूण रक्‍कम रु.1,10,000/- इतकी जमा असून देय होती.  मात्र तक्रारदारांनी वेळोवेळी मागणी करुन देखील सदरची रक्‍कम त्‍यांना मिळत नसलेने तक्रारदार यांनी सदर कर्मचारी संस्‍थेचा सभासदत्‍वाचा राजिनामा दिला व वरील रकमेची लेखी मागणी केली.  वि.प.क्र.1 संस्‍थेकडे तक्रारदार क्र.1 व 2 यांचे पैसे परत करण्‍यासाठी रोख रक्‍कम उपलब्‍ध नसलेचे सांगून त्‍याऐवजी तक्रारदार क्र.1 व 2 यांना वि.प.क्र.1 संस्‍थेने खालील नमूद बंद ठेव पावती करुन दिली.  त्‍याचा तपशील पुढील प्रमाणे -

अ.क्र.

ठेव रक्‍कम रु.

पावती नं.

ठेव दिनांक

ठेव मुदत

व्‍याज

1

1,11,000/-

 790

01/11/2014

12 महिने

12%

2

  15,000/-

 575

04/02/2008

12 महिने

12%

 

 

सदरच्‍या रकमेची वेळोवेळी मागणी करुनही वि.प. यांनी सदरची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली आहे.  सबब, ठेवीच्‍या रकमा अनुक्रमे रु. 1,11,000/- व रु. 15,000/- दि.2/09/2020 पासून रक्‍कम वसूल होइतोपर्यंत 12 टक्‍केप्रमाणे व्‍याजासह मिळावी, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचा खर्च देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत दोन ठेवपावत्‍यांच्‍या प्रती, तक्रारदारांचे आधारकार्ड, तक्रारदार यांनी सेवक पतसंस्‍थेला दिलेला अर्ज, तसेच वि.प.क्र.1 यांना दिलेला अर्ज, तक्रारदार यांनी सहायक निबंधक, सहकारी संस्‍था गडहिंग्‍लज यांना दिलेले अर्ज, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेल्‍या नोटीसा, सदर नोटीसच्‍या पोस्‍टाच्‍या पावत्‍या व पोहोच पावत्‍या इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. क्र.1 व 3 यांना प्रस्‍तुत तक्रारीची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत तसेच त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, त्‍यांचेविरुध्‍द दि. 12/10/2021 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला.

 

4.   तक्रारदारांचा तक्रारअर्जदाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

5.    वि.प.क्र.1 ही सहकार कायद्याप्रमाणे नोंदणीकृत संस्‍था असून वि.प. क्र.2 व 3 हे संस्‍थेचे अनुक्रमे चेअरमन व व्‍हा.चेअरमन आहेत.  वि.प. क्र.1 संस्‍थेचा संपूर्ण व्‍यवहार वि.प. क्र.2 व 3 हे पहातात.  त्‍याअनुषंगाने तक्रारदारांनी तक्रारीसोबत ता. 26/10/2020 रोजी वि.प. संस्‍थेच्‍या संचालकांची यादी दाखल केलेली असून सदर यादीमध्‍ये वि.प. क्र.2 व वि.प.क्र.3 यांची नांवे नमूद असून सदरची यादी वि.प. यांनी नाकारलेली नाही.  तक्रारदार हे 2015 पूर्वी साधारणतः 28 ते 30 वर्षे वि.प. क्र.1 संस्‍थेमध्‍ये कर्मचारी म्‍हणून काम करीत होते.  वि.प.क्र.1 संस्‍थेच्‍या कर्मचा-यांची एक सेवक पतसंस्‍था देखील वि.प.क्र.1 शी संलग्‍नपणे कार्यरत होती.  वि.प.क्र.1 हे प्रत्‍येक कर्मचा-यांचे पगार, शेअर्स, व्‍याज, डिव्‍हीडंड या संस्‍थेत जमा होत असत.  निवृत्‍तीवेळी एकूण सर्व जमा रक्‍कम कर्मचा-याला मिळत असे.  यातील तक्रारदार हे वि.प.क्र.1 कडे सन 2015 पर्यंत कार्यरत होते. ता. 26/6/15 रोजी तक्रारदार हे निवृत्‍त झाले.  तत्‍पूर्वी तक्रारदार यांच्‍या नांवे वि.प. क्र.1 यांनी त्‍यांच्‍या पगारातून वेळोवेळी कपात करुन शेअर्स, ठेव, व्‍याज व डिव्‍हींडंड रुपाने रकमा जमा केलेल्‍या आहेत. ता. 31/10/2014 अखेर कर्मचारी पतसंस्‍थेकडे एकूण रक्‍कम रु.1,10,000/- इतकी जमा असून देय होती.  मात्र तक्रारदारांनी वेळोवेळी मागणी करुन देखील सदरची रक्‍कम त्‍यांना मिळत नसलेने तक्रारदार यांनी सदर कर्मचारी संस्‍थेचा सभासदत्‍वाचा राजिनामा दिला व वरील रकमेची लेखी मागणी केली.  वि.प.क्र.1 संस्‍थेकडे तक्रारदार क्र.1 व 2 यांचे पैसे परत करण्‍यासाठी रोख रक्‍कम उपलब्‍ध नसलेचे सांगून त्‍याऐवजी तक्रारदार क्र.1 व 2 यांना वि.प.क्र.1 संस्‍थेने खालील नमूद बंद ठेव पावती करुन दिली.  त्‍याचा तपशील पुढील प्रमाणे -

 

अ.क्र.

ठेव रक्‍कम रु.

पावती नं.

ठेव दिनांक

ठेव मुदत

व्‍याज

1

1,11,000/-

 790

01/11/2014

12 महिने

12%

2

  15,000/-

 575

04/02/2008

12 महिने

12%

 

सदर पावत्‍यांचे अवलोकन करता सदर पावत्‍यांवर वि.प. संस्‍थेचे नाव नमूद असून त्‍यावर चेअरमनची सही आहे.  सदरच्‍या मुदतबंद ठेव पावत्‍या वि.प. यांनी आयोगामध्‍ये हजर होवून नाकारलेल्‍या नाहीत.  सदर मुदत‍बंद पावत्‍यांवरील रकमांचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.   सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2 व 3

 

6.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील ठेवपावत्‍यांवरील रकमांची तक्रारदार क्र.1 व 2 यांनी वेळोवेळी मागणी करुन देखील सदर रक्‍कम त्‍यांना मिळत नसलेने शेवटी नाईलाजास्‍तव तक्रारदार यांनी सदर कर्मचारी संस्‍थेच्‍या सभासदत्‍वाचा राजीनामा दिला व त्‍यानंतर रकमेची लेखी मागणी केली.  तथापि, मुदत पूर्ण होवून देखील सदरची ठेव रक्‍कम वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेली नाही.  सबब, वि.प. संस्‍था यांनी तक्रारदार यांना मुदत बंद ठेव पावतीवरील रक्‍कम व्‍याजासह अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत तक्रारदार क्र. 1 व 2 यांच्‍या ठेवपावत्‍या दाखल केल्‍या आहेत.  अ.क्र.5 ला तक्रारदार यांनी दि.9/5/2013 रोजी सेवक पतसंस्‍था चेअरमन यांना दिलेल्‍या अर्जाची प्रत दाखल केलेली आहे.  सदर पत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या नावे जमा असलेल्‍या सर्व रकमा त्‍यांना सदर रकमेची अत्‍यंत गरज असलेने ताबडतोब मिळाव्‍यात व त्‍यांचा राजीनामा मंजूर करुन घ्‍यावा असा अर्ज दिलेला आहे.  सदरच्‍या अर्जावर वि.प. सेवक पतसंस्‍थेची पोहोच म्‍हणून मिळालेली सही व शिक्‍का आहे.  अ.क्र.6 ला सदर सेवक पतसंस्‍थेने सदर संस्‍थेचे मॅनेजर यांना तक्रारदार यांची संस्‍थेकडील जमा असलेली शेअर्स, ठेव, व्‍याज, डिव्‍हीडंड रक्‍कम देणे आवश्‍यक असल्‍याने एकूण रक्‍कम रु.1,11,122/- तक्रारदार यांना देणेत यावी असे दि.31/10/2014 चे पत्र दिलेले आहे. अ.क्र.7 ला ता. 4/7/2013 रोजी तक्रारदार क्र.1 यांनी मा. सहा.निबंधक, सहकारी संस्‍था, गडहिंग्‍लज यांना पत्र दिलेले असून सदर पत्राचे अवलोकन करता,

 

      पतसंस्‍थेला कंटाळून मी दि.9/5/13 रोजी माझ्या सभासदत्‍वाचा राजीनामा देवून माझे येणे रकमेविषयी लेखी मागणी केली आहे. तरीसुध्‍दा संचालक मंडळाने माझ्या अर्जाचा विचार केलेला नाही. म्‍हणून मी दि.6/6/13 रोजी संस्‍थेला स्‍मरणपत्र लिहून माझ्या अडचणीबद्दत विनंती केली आहे. तरीसुध्‍दा दाद देणेस तयार नाहीत.  प्रत्‍यक्षात रोखीचे व्‍यवहार काहीही नाहीत, फक्‍त कागदोपत्री आपल्‍या कार्यालयातला जमा दाखवित आहेत. माझी संस्‍थेकडे शिल्‍लक असलेली रक्‍कम मला मिळवून द्यावी.

 

असे नमूद आहे.  अ.क्र.8 ला ता.08/07/2013 रोजी मा.सहा.निबंधक, ता. गडहिंग्‍लज यांनी वि.प. क्र.1 यांना पत्र दिलेले असून सदर पत्रामध्‍ये संबंधीत संस्‍थेला उपविधीतील तरतुदीनुसार व कायद्यातील तरतुदीनुसार रक्‍कम अदा करणेची कार्यवाही लवकरात लवकर करावी असे सांगितलेले आहे.  अ.क्र.9 ला तक्रारदार यांनी ता. 18/5/2015 रोजी वि.प.क्र.1 यांनी दिलेले सेवानिवृत्‍तीचे पत्र दाखल केले आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रे वि.प. यांनी आयोगामध्‍ये हजर होवून नाकारलेली नाहीत.  सदर कागदपत्रांचा बारकाईने विचार करता तक्रारदार यांनी वेळोवेळी वि.प. संस्‍थेचे चेअरमन, मॅनेजर तसेच सहा. निबंधक, सहकारी संस्‍था, गडहिाग्‍लज यांना तक्रारदार यांच्‍या जमा असलेल्‍या मुदतबंद ठेव पावतीच्‍या रकमेची मागणी केलेली आहे.  तसेच मा.सहा.निबंधक, सहकारी संस्‍था, गडहिंग्‍लज यांनी देखील वि.प. यांना तक्रारदार यांची मुदतबंद ठेवपावतीवरील रक्‍कम कायद्यतील तदतुदीनुसार अदा करणेच्‍या सूचना केलेल्‍या आहेत.  शेवटी तक्रारदार यांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि.11/2/2020 रोजी नोटीस पाठविलेली असून सदर नोटीस वि.प. यांना दि.13/2/2020 रोजी मिळालेली असून देखील वि.प. यांनी तक्रारदार यांची रक्‍कम परत केली नाही अथवा नोटीसीला उत्‍तर दिले नाही. सदरच्‍या नोटीसा तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या आहेत.  सबब, वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना तक्रारदा यांची मुदतबंद ठेवपावती व्‍याजासह अद्याप अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

7.    प्रस्‍तुतकामी वि.प. क्र.2 व 3 हे संस्‍थेचे चेअरमन व व्‍हा.चेअरमन असून वि.प. क्र.2 व 3 यांनी सदरची बाब आयोगामध्‍ये हजर होवून नाकारलेली नाही.  सबब, संस्‍थेच्‍या सर्व कायदेशीर पूर्ततांची व जबाबदारींचे उत्‍तरदायित्‍व देखील वि.प. क्र.2 व 3 यांचेवर चेअरमन व व्‍हा.चेअरमन या नात्‍याने आहेत. त्‍या कारणाने प्रस्‍तुतकामी हे आयोग वि.प.क्र.2 व 3 यांना तक्रारदार क्र.1 व 2 यांच्‍या ठेवपावत्‍या संयुक्‍तीकरित्‍या अदा करणेस जबाबदार धरीत आहेत या निष्‍कर्षास‍ हे आयोग येत आहे.  

 

8.    प्रस्‍तुतकामी या आयोगाने मा. राज्‍य आयोग यांचेसमोरील अपिल क्र.ए/17/177, ए/17/178 आणि ए/17/180, प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्‍था विरुध्‍द श्री सुनिल नारायण निकम व इतर या निवाडयाचा आधार घेतला आहे.  सदर निवाडयाचा विचार करता असे स्‍पष्‍टपणे दिसून येते की, पतसंस्‍थेकडे जमा असणा-या ठेवपावत्‍यांच्‍या मुदतीअंती देय रकमा देण्‍याची जबाबदारी ही वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या पतसंस्‍थेबरोबरच तिचे संचालकांवरही असते.  सदरचे निवाडयात मे.राज्‍य आयोगाने खालील निरिक्षण नोंदविलेले आहे.

 

      The liability imposed upon the opponents is joint and several and it would survive as long as amounts due on Fixed Deposits are not repaid as per maturity value thereof by or on behalf of the opponents.  It is true that Directors normally may not be personally liable.  However, it does not mean that the Directors who were in-charge of and were in the administration of the affairs of the Co-operative Society at the time of making of Fixed Deposits can escape the liability for to honour the Fixed Deposits or their maturity, more so, when the amounts were invested in Fixed Deposits, at the time, when such Directors were in-charge of or in the control of the administration of the said society.  This can certainly be inquired into by the executing Forum before making the Directors liable to honour the Fixed Deposits personally.  The liability is collective preliminarily that of a Cooperative Credit society which accepted the Fixed Deposits and vicariously that of its officer bearers who were in charge of and were in control or who were looking after administration of the said Cooperative Credit Society.  In the facts and circumstances, therefore, we maintain the Awards passed by the learned Forum below and dismiss these appeals.   Costs in the sum of Rs.3,000/- for each of the appeals shall be paid by the appellant in addition to the costs awarded by the learned District Forum below and the liability shall be jointly and severally.

 

सबब, तक्रारदार हे वि.प. क्र.1 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या व वि.प. क्र.2 व 3 यांचेकडून संयुक्तिकरित्‍या न्‍यायनिर्णय कलम 5 मध्‍ये नमूद केलेल्‍या मुदतबंद ठेवपावत्‍यांची रक्‍कम पावतीवरील व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदर ठेवपावतीवरील मुदत संपले तारखेपासून सदरची रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4

 

9.    वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.8,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5  -  सबब आदेश.

 

 

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प. क्र.1 पतसंस्‍था यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या व वि.प. क्र.2 व 3 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना न्‍यायनिर्णय कलम 5 मध्‍ये नमूद केलेल्‍या मुदतबंद ठेवपावत्‍यांची रक्‍कम पावतीवरील नमूद व्‍याजासह अदा करावी व सदर रकमेवर ठेवीची मुदत संपले तारीखेपासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प. क्र.1 पतसंस्‍था यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या व वि.प. क्र.2 व 3 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.8,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्‍वये वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.