ग्राहक तक्रार क्र. 123/2014
अर्ज दाखल तारीख : 26/06/2014
अर्ज निकाल तारीख: 04/03/2015
कालावधी: 0 वर्षे 08 महिने 09 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सचिन नरेंद्र गांधी,
वय- सज्ञान, धंदा – व्यापार,
रा. प्रो.प्रा. प्रगती पाईप अॅण्ड फिटींग्स,
शिवाजी चौक, विक्रम राजे कॉम्पलेक्स,
उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. जी.एस.लगदिवे,
प्रो.प्रा. मयुर एन्टरप्रायझेस, समता नगर,
एच.डी.एफ.सी. बँक शेजारी, उस्मानाबाद,
ता.जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.ए.जी.गरड.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.के.बी.ताटे.
न्यायनिर्णय
मा. सदस्य, श्रीमती विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
अ) 1. अर्जदार सचिन नरेंद्र गांधी हे उस्मानाबाद येथील रहिवाशी असून त्यांनी विरूध्द पक्ष यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदार यांचे प्रगती पाईप अॅण्ड फिटींग्ज शिवाजी चौक विक्रम राजे कॉम्प्लेक्स उस्मानाबाद. ता. जि. उस्मानाबाद या दुकानाचे प्रोपराईटर आहेत. विप हे मयुर एन्टरप्रायईजेस समता नगर, उस्मानाबाद या दुकानाचे मालक आहेत व A.C., Washing Machine, D. freeze या सर्व वस्तूचे दुरुस्तीचे काम करतात.
3. अर्जदार दि.17/06/2013 रोजी ‘’Videocon’’ कंपनीचे वाशिंग मशीन बिघाड झाल्यामुळे विप यांचेकडे दुरुस्तीला टाकली. अर्जदाराने वॉशिंग मशीन दुरुस्त होईल का अशी विचारणा केली तर विप ने मशीनचे गिअर बॉक्स खराब झाले व तो बदलल्यास व्यवस्थित चालू होईल असे सांगितले.
4. त्यानंतर दि.20/07/2013 रोजी फोन करुन वॉशिंग मशीन दुरुस्त झाल्याचे कळाले वॉशिंग मशीनची दुरुस्तीची रक्कम व गिरबॉक्सची एकूण रक्कम रु.3,100/- देऊन तशी पावती घेतली. त्या पावतीवर विप ने गीअर बॉक्सची गॅरंटी 1 वर्षाची असल्याची लेखी नोंद करुन दिली.
5. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी अर्जदार यांची वॉशिंग मशीन पाणी सोडल्यावर फिरत नव्हती अर्जदाराने फोनव्दारे विप यांना कल्पना दिली व त्यांनी स्वत: येतो व पाहतो असे सांगितले. विप हे आले नाहीत त्यामुळे अर्जदाराने वॉशिंग मशीन विप यांचेकडे स्वत: दुरुस्तीसाठी घेऊन आले.
6. त्यानंतर दि.20/07/2013 रोजी. फोन करुन वॉशिंग मशीन दुरुस्त झाल्याचे कळाले. वॉशिंग मशीनची दुरुस्तीची रक्कम व गिअर बॉक्सची एकूण रक्कम रु.3,100/- देऊन तशी पावती घेतली. त्या पावतीवर विप ने गीअर बॉक्सची गॅरंटी 1 वर्षाची असल्याची लेखी नोंद करुन दिली.
7. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी अर्जदार यांची वॉशिंग मशीन पाणी सोडल्यावर फिरत नव्हती अर्जदाराने फोनव्दारे विप यांना कल्पना दिली व त्यांनी स्वत: येतो व पाहतो असे सांगितली. विप हे आले नाहीत त्यामुळे अर्जदाराने वॉशिंग मशीन विप यांचेकडे स्वत: दुरुस्तीसाठी घेऊन आले.
8. विप यांनी वॉशिंग मशीन दुरुस्त करुन दिली. विप यांवर विश्वास ठेऊन अर्जदार मशीन घरी घेऊन गेले. अर्जदार 2 दिवस गुलबर्गा येथे गेल्यामुळे वॉशिंग मशीन चालू असल्याचे पाहीले नाही. गुलबर्गा येथून आल्यावर अर्जदाराने वॉशिंग मशीन चालू करुन पाहीले असता ती व्यवस्थित चालू झाली नव्हती. अर्जदाराने मशीन बंद केली व पुन्हा विप यांस फोन करुन सांगितले. विप यांनी मी येऊन पहातो असे सांगितले.
9. विप यांनी घरी येऊन मशीनची पाहणी केली असता मशीनचा गिअर बॉक्स व ड्रम व्यवस्थित न बसल्याने मशीन फिरत नाही मला दुरुस्ती करावी लागेल मी मशीन घेऊन जातो व दुरुस्त करुन आणून देतो असे सांगितले.
10. विप यांनी जानेवारी 14 मध्ये अर्जदारास मशीन दुरुस्त करुन परत आणून दिली व मशीनचे पार्ट घेऊन येतो दुरुस्त करुन देतो असे सांगून निघून गेला.
11. अर्जदार यांनी वारंवार फोन व SMS व्दारे सुचना दिल्यानंतर दि.29/02/2014 रोजी अर्जदाराचे घरी आले व मशीन दुरुस्तीसाठी परत घेऊन गेले त्यावेळी अर्जदाराने चौकशी केली व मला एवढेच काम नाही मला तुमची मशीन दुरुस्त करण्यास वेळ लागेल अर्जदारास 10 – 12 दिवसांनी येण्यास सांगितले. 10-12 दिवसांनी अर्जदाराची मशीन स्वत: घरी घेऊन गेले तरी वॉशिंग मशीन चालू झाली नाही. विप यांचेकडे चौकशी केली असता विप ने उत्तर दिले की, तुमचे काम करु शकत नाही गीअर बॉक्सची वॉरंटी दिली आहे. आता तुम्ही दुस-याकडून काम करुन घ्या.
12. विप यांना पुर्वी अर्जदाराने विचारले होते की, मशीन दुरुस्त होईल का व विप ने खात्री दिल्यामुळे मशीन दुरुस्तीसाठी विप कडे दिली व त्याचे पार्टसची दुरुस्तीची रक्कम अदा केली व विप ने खोटे आश्वासन दिले व अर्जदाराची पिळवणून करुन मानसिक त्रासास अर्जदारास सामोरे जावे लागले. त्यामुळे विप यांचे कडून दुरुस्तीपोटी रु.4,000/- मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व मशीन दुरस्त करुन देण्याचा आदेश विप यांना व्हावा अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे.
ब) 1. विप यांनी लेखी कैफियत अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्यांचे म्हणण्या नुसार तक्रार चुकीची आहे. कसल्याही प्रकारची त्रुटी केलेली नाही.
2. त्यानंतर परिच्छेद नं.2 मधील कलम 1 चा मजकून त्यांनी अंशत: खरा आहे असे म्हंटले आहे. अर्जदाराने व्हीडीओकॉन कंपनीचे जुने मशीन दुरुस्तीस आणले होते. मशीन जुने झालेले असून कार्यक्षम राहीलेले नव्हते बदलून टाका नेहमी नेहमी नादुरुस्त होत जाईल अर्जदाराने जोपर्यंत चालेल तितके चालू असे सांगून दुरुस्ती करण्याची विनंती केली. गीअर बॉक्स बदलल्यास मशीन काम करु लागेल असे सुचवले. घरी नेल्यावर अर्जदाराच्या घरातील महिलांनी ते मशीन चालवून पाहीले असता मशीन व्यवस्थित काम करत असल्याने समाधान व्यक्त करुन विप चे आभार मानले. मशीन व्यवस्थित काम करत नव्हते, पुन्हा दुकानात आणले हे खोटे आहे.
3. फेब्रूवारी 2014 मध्ये वॉशिंग मशीन प्रथम बंद पडल्याने अर्जदाराचे घरी जाऊन पाहणी केली असता मशीनचे युजर बोर्ड हा निकामी झाला असल्याने operating system चालू शकत नाही व घरातील व्यक्तिंना user board बदलण्याचा सल्ला देऊन अंदाजे खर्च सांगितला असता विचार करुन सांगतो असे म्हणाले.
4. 8 ते 10 दिवसांनी दुकानी येऊन खर्च तुम्हीच करुन दयावा लागेल विप ने गिअर बॉक्सचे संबंधाने मशीन चे बाबत काहीही काम निघल्यास करुन देतो असे सांगण्याचा प्रयत्न केला असता अर्जदार हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व तुम्हास बघून घेतो अशी धमकी देऊन निघून गेले.
5. अर्जदाराच्या मशीनचा गिअर बॉक्स बदलून दिल्यानंतरही ती सुमारे 6 महीने व्यवस्थित चालली त्यांनंतर तिचे इतर पार्ट नादुरुस्त झाल्याने मशीन बंद आहे. गिअर बॉक्स आज ही सुव्यवस्थितपणे कार्यरत आहे. सेवेत कसलीही त्रुटी नाही. तक्रार अर्ज मानसिक त्रास देण्याच्या विचाराने दाखल केलेला आहे.
6. त्यामुळे अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती विप यांनी केलेली आहे.
क) अर्जदाराने तक्रारी सोबत गिअर बॉक्स बदलून घेतला त्याची पावती, दि.20/07/2013 ची नोटीस, लेखी म्हणणे, इ. कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. लेखी युक्तिवाद वाचला. तोंडि युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणत खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1) अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली का ? अंशत: होय
2) अर्जदार हे नुकसान भरपाई मागण्यास पात्र आहेत का ? तज्ञांच्या अहवालावर अवलंबून.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
ड) 1. मुद्दा क्र.1: अर्जदाराने विप यांचेकडे वॉशिंग मशीनचा नादुरुस्त बॉक्स बदलून घेतला परंतू वॉशिंग मशीन पाणी टाकल्यावरही व्यवस्थित फिरत नाही ही अर्जदाराची तक्रार आहे. विप यांचे म्हणणे असे आहे की वॉशिंग मशीन जुनी आहे. वॉशिंग मशीनचा user board बिघडलेला आहे. अशा परीस्थितीत तज्ञांचे मत घेणे गरजेचे ठरते परंतू सदर प्रकरण निर्णयासाठी लागेपर्यंमत अर्जदार व विप या दोघांनीही तज्ञांचे मत मागवलेले नाही.
2. सदर प्रकरणात तज्ञांचे मत मागवलेले योग्य होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर अंशत: होय असे देत आहोत.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर
3. तज्ञांचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी मंचात दाखल करावा त्यावर अवलंबून असेल या निर्णयाप्रत आम्ही आलेलो आहोत त्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2) अर्जदार व विरुध्द पक्ष यांनी दोघांनीही एक मताने मॅकेनिकल इंजिनिअर चे नांव सुचवून त्यास ठरविलेल्या तारखेस दोघांच्यासमोर वॉशिंग मशीन दाखवावी सदर वॉशिंग मशीन मधील गिअर बॉक्स व user board चे परीक्षण तज्ञांनी दोघांच्या समोर करुन अहवाल दयावा विप ने नाव न सुचवल्यास अगर हजर न राहील्यास त्याचे अपरोक्ष परीक्षण करावे.
3) तज्ञांनी ठरविलेल्या दिनांका पासून अर्जदाराचे वॉशिंग मशीनचा अहवाल परीक्षण केल्यापासून 15 दिवसात अर्जदारास व विरुध्द पक्ष यांना दयावा अथवा मंचात दाखल करावा.
4) तज्ञांची परीक्षण केल्याची फि अर्जदार यांनी प्रथम दयावी अर्जदाराचे बाजूने अहवाल दिल्यास विप कडून वसूल करावी तसेच विप ने गिअर बॉक्सची किंमत रु.3,100/- तसेच झालेल्या त्रासापोटी व खर्चापोटी रु.5,000/- तक ला दयावे.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.