Maharashtra

Nagpur

CC/147/2022

SHRI. KAMLESH OMPRAKASH JEJANI - Complainant(s)

Versus

G.B. REALTORS THROUGH DIRECTOR/ PARTNER- SHRI. SANTOSHKUMAR NANDKUMAR GANDEWAR - Opp.Party(s)

ADV. A.T. SAWAL

20 Oct 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/147/2022
( Date of Filing : 25 Feb 2022 )
 
1. SHRI. KAMLESH OMPRAKASH JEJANI
R/O. KEDAR BHAVAN, CHANDURKAR CHOWK, NEAR MAHURKAR HOSPITAL, DHANTOLI, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. G.B. REALTORS THROUGH DIRECTOR/ PARTNER- SHRI. SANTOSHKUMAR NANDKUMAR GANDEWAR
SHRINAGAR, NAGPUR/ NEAR CONGRES NAGAR GAURDEN, CONGRESS NAGAR, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. ASHUTOSH (TILLU)
SHIV RESIDENCY, NEAR GAURDEN, CONGRES NAGAR, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. A.T. SAWAL, Advocate for the Complainant 1
 
Dated : 20 Oct 2022
Final Order / Judgement

मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये –

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम  35  नुसार दाखल केलेली आहे.
  2. तक्रारदाराने वि.प.-जी.बी रिअॅलेटर्स, प्रो.श्री संतोषकुमार नंदकुमार गंधेवार,  आणि श्री आशुतोष उर्फ टिल्लू यांचे विरुध्‍द तक्रार दाखल केली असुन हे दोघे जी.बी रिअॅलेटर्स या नावाने बांधकाम करुन सदनिका विकण्‍याचा व्यवसाय करतात. तक्रारदाराने वि.प.यांच्या मौजा- धंतोली, भुखंड क्रं.22,येथील आशीष अपार्टमेंट या नावाचे  इमारतीमधील सदनिका क्रं.103, एकुण आराजी 1865.00 चौ.फुट असुन त्यांची एकुण किंमत 1,35,00,000/- मध्‍ये दिनांक 18.4.007 रोजी सदनिका आरक्षीत केली असुन करारनामा करतेवेळी तक्रारदाराने दिनांक 28.3.2017 रोजी 51,000/- चा धनादेश दिला होता. त्यानंतर तक्रारदाराने वेळोवेळी एकुण रक्कम रुपये 10,00,000/- दिले असे एकुण रुपये 10,51,000/- वि.प.ला दिले व उर्वरित रक्कम 1,24,49,000/- समान 10 हप्त्यांमधे देण्याचे ठरले होते. परंतु वि.प. ने आजतागायत सदर इमारतीचे जागेवर बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.कडे असलेली जमा रक्कम रुपये 10,51,000/- परत मागीतली होती. त्यानंतर वि.प.ने नोव्हेंबर 2020 मध्ये तक्रारदाराचे नावे आरटीजीस व्दारे रुपये 2,00,000/- परत केले. परंतु अजुनही वि.प.कडुन 8,51,000/- परत मिळणे शिल्लक आहे.  त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 13.12.2021 वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीस मिळूनही वि.प.ने त्याची दखल घेतली नाही व रक्कमही परत केली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.प. ने तक्रारदाराची शिल्लक असलेली रक्कम रुपयें 8,51,000/-, सन 2017 पासून द.सा.द.शे.24 टक्के व्याजासह परत करावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 5,50,000/- मिळावे अशी मागणी केली आहे.
  3. तक्रार दाखल करुन वि.प.1 व 2 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविण्यात आली. सदर नोटीस प्राप्त होऊन सुध्‍दा वि.प. 1 व 2 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18.8.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारदाराने तक्रारीत दाखल केलेले दस्तावेज, तसेच लेखी व तोंडी युक्तीवादाबाबत दाखल पुरसिसचे अवलोकन करता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

 

  •                                     उत्तरे
    1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?           होय
    2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?    होय
    3. काय आदेश                              अंतिम आदेशानुसार

 

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने वि.प.-जी.बी रिअॅलेटर्स, प्रो.श्री संतोषकुमार नंदकुमार गंधेवार,  आणि श्री आशुतोष उर्फ टिल्लू यांचे विरुध्द तक्रार दाखल केली असुन हे दोघे जी.बी रिअॅलेटर्स या नावाने  व्यवसाय करतात. तक्रारदाराने वि.प.यांच्या आशीष अपार्टमेंट मधील सदनिका क्रं. 103, एकुण आराजी 1865.00 चौ.फुट असुन त्याची एकुण किंमत 1,35,00,000/- मध्ये दिनांक 18.4.2017 रोजी आरक्षीत केला होता. त्याकरिता तक्रारदाराने वि.प.ला एकुण रक्कम रुपये 10,51,000/- वेळोवेळी दिले व उर्वरित रक्कम रूपये 1,24,49,000/- समान 10 हप्त्यांमधे देण्‍याचे ठरले होते. परंतु वि.प. ने आजतागायत सदर इमारतीचे जागेवर बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.कडे असलेली जमा रक्कम रुपये 10,51,000/- परत मागणी केली असता वि.प.ने नोव्हेबर 2020 मध्ये तक्रारदाराचे नावे आरटीजीस व्दारे रुपये 2,00,000/- परत केले. परंतु उर्वरित रक्कम रुपये 8,51,000/- वि.प.कडुन परत मिळणे शिल्लक आहे.  त्यामूळे तक्रारकर्ता वि.प.क्रं. 1 व 2 यांचेकडुन  सदनिकेचे खरेदीपोटी दिलेली रक्कमेपैकी उर्वरित रक्कम रुपये 8,51,000/- शेवटचा हप्ता दिनांक 31.4.2017 पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. 

सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

  •  
  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. क्रं.1 व 2, जी. बी. रिअॅलेटर्स, प्रो. श्री संतोषकुमार नंदकुमार गंधेवार, व श्री आशुतोष टिल्लु यांनी तक्रारदाराकडुन मौजा-धंतोली, भुखंड क्रं.22,येथील आशीष अपार्टमेंट या नावाच्या इमारतीमधील सदनिका क्रं.103 चे आरक्षणापोटी स्व‍िकारलेल्या रक्कमेपैकी उर्वरित रक्कम रुपये 8,51,000/- तक्रारदारास परत करावी व सदर रक्कमेवर वि.प.यांना शेवटाचा हप्ता प्राप्त झाल्याचा दिनांक 1.5.2017 पासून तक्रारदारास रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो 12 टक्के द.सा.द.शे.व्याज दराने परत करावी.
  3. वि.प. क्रं.1 व 2 ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, नुकसान भरपाई म्हणुन रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/- अदा करावे.
  4. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाचे आत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
  6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.