सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 54/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.14/09/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.19/10/2015
श्री विलास विनायक गावडे
वय 27 वर्षे, व्यवसाय – नोकरी,
रा.मु.पो.गोळवण (गावडेवाडी)
ता.मालवण, जिल्हा - सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) फ्यूचरिस्टिक बजाज,
एम.के.जी. रोड, सांगिर्डेवाडी, कुडाळ,
ता.कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग
2) बजाज अॅटो लिमिटेड,
आकुर्डी, पूणे, पिन- 411 035 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
आदेश नि.1 वर
(दि. 19/10/2015)
द्वारा : श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष.
- तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाकडून खरेदी केलेल्या Bajaj Discover 100 M Disc या वाहनात ‘निर्मिती दोष’ असल्याने सदरच्या वाहनापोटी स्वीकारलेली रक्कम परत मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
- सदर प्रकरण दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष यांना दि.23/10/2014 रोजी मंचासमोर उपस्थित राहणेबाबत नोटीस बजावण्यात आली होती.
- दरम्यान तक्रारदार यांनी आज दि.19/10/2015 रोजी प्रकरण बोर्डवर घेऊन उभय पक्षात तडजोड होत असलेने तक्रार अर्ज निकाली करणेकरीता नि.7 वर पुरसीस दाखल केली. तसेच उभय पक्षात होत असलेल्या तडजोडीबाबतची कागदपत्रे नि.7/1 व नि.7/2 वर दाखल करण्यात आली.
- सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
i) तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.7 वरील पुरसीसला अनुसरुन सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
ii) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 19/10/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.