ग्राहक तक्रार क्र. 185/2013
अर्ज दाखल तारीख : 07/01/2014
अर्ज निकाल तारीख: 14/05/2015
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 08 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती छाया विजयकुमार विभुते (मयत) – वारस
1. वर्षा विजयकुमार विभुते,
वय – 19 वर्षे, धंदा – शेती,
रा.घाटंग्री, ता. जि. उस्मानाबाद.
2. विनोद विजयकुमार विभुते,
वय – 17 वर्षे, धंदा शिक्षण,
अ.पा.क. अर्जदार क्र. 1, रा. सदर.
3. मंगेश विजयकुमार विभुते,
वय- 14 वर्ष, धंदा – शिक्षण,
अ.पा.क. अर्जदार क्र. 1 रा. सदर.
4. अश्वीन विजयकुमार विभुते,
वय – 12 वर्षे, धंदा – शिक्षण,
अ.पा.क. अर्जदार क्र. 1, रा. सदर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. फयूचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
व्दारा – विभागीय कार्यालय,
श्री. प्रेम शिवदास,
मा. व्यवस्थापक तथा शाखाधिकारी,
फयूचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
डीजीपी हाऊस, पहिला मजला, 88 सी,
जुनीप्रभादेवी रोड, बेंगल केमिकल जवळ,
प्रभादेव, मुंबई-400025.
2. श्री. नंदकुमार प्रभाकर देशपांडे,
शाखाधिकारी,
डेक्कन इन्शुरन्स अॅड रि-इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
फरकाडे बिल्डींग, भानुदास नगर,
बिग बझारच्या मागे, जालना रोड,
औरंगाबाद-431001.
3. श्री. जाधव डी.एन.
तालूका कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.ऐ.बेलूरे
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. सदस्या, सौ. विदयुलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
अ) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1. अर्जदार (तक) श्रीमती छाया विजयकुमार विभूते (मयत) वारस 1) वर्षा विजयकुमार विभूते 2) विनोद विजयकुमार विभूते, 3) मंगेश विजयकुमार विभूते, 4) अश्वीन विजयकुमार विभूते सर्व रा. घाटंग्री ता.जि.उस्मानाबाद आणि अर्जदार नं.1 या अर्जदार क्र. 2, 3, 4 च्या अ.पा.क. आहेत त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपात विमा कंपनी) (वि.प.)2 संक्षिप्त रुपात ब्रोकर) आणि विप क्र.3 (संक्षिप्त रुपात कृषी अधिकारी) यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदार क्र.1 ते 4 यांचे वडीलांचे नामे मौजे घाटंग्री येथे जमीन गट क्र.453 एकूण क्षेत्र 1 हे. 50 आर क्षेत्र असून तसा 7/12 दाखल केलेला आहे.
3. अर्जदारांचे वडील विजयकुमार बापूराव विभुते हे दि.26/10/2012 रोजी 9.30 वाजता आरोपी कल्याण शिवदास शिंदे व विष्णू शिवदास शिंदे हे रा. घाटंग्री ता.जि. उस्मानाबाद यांनी काम आहे असे सांगून तू लमान लोकांना तुझ्या दुकानात का येऊ देतो, त्याचे कपडे का शिऊन देतो म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करत कल्याण शिंदे यांनी विजयकुमार बापूराव विभुते यांच्या डोकीत मारला त्यामुळे ते रक्तबंभाळ होऊन विजयकुमार यांचा खून झाला ते 43 वर्षाचे होते.
4. सदर अपघाती मृत्यू घटनेची नोंद पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रा.) यांचेकडे दिल्यावर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा करुन मयत शेतकरी विजयकुमार बापूराव विभुते यांचे पी. एम. करण्यात केले.
5. अर्जदाराने कृषी अधिकारी यांचेकडे दि.15/01/2013 रोजी रितसर अर्ज करुन क्लेम फॉर्म सोबत मुळ अर्ज, सहपत्र, सातबारा, 6 – अ, फेरफार नोंद, 6 – क, क्लेम फॉर्म 2, तलाठी प्रमाणपत्र, शपथपत्र, निवडणूक ओळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, एफ. आय. आर. घटनास्थळ पंचनामा, पी.एम रीपोर्ट, बँक पासबुक इ. पुर्तता करुन विम्याची रक्कमेची मागणी केली. कृषी अधिकारी यांनी विप क्र.2 ब्रोकर यांचेकडे सादर करुन विमा रक्कमेचा लाभ घेण्याकरीता विनंती केली.
6. ब्रोकर यांनी विमा कपंनीकडे सर्व कागदपत्रे दाखल करुन विमा रक्कमेची मागणी केली.
7. कृषी अधिकारी यांनी प्रस्तावात त्रुटी बद्दल दि.10/06/2013 रोजी पत्र देऊन कळवले व कृषी अधिकारी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन त्रूटीची पुर्तता केली.
8. विमा कंपनीने आज तागायत रक्कम दिली नाही व कळविलेले नाही. विप विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत. म्हणून अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीव्दारे विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व खर्चाबद्दल रक्कम रु.3,000/- विमा कंपनीकडून मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
ब) विमा कंपनीने म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार विजयकुमार विभुते यांचा खून झाला. त्यांची पत्नी छाया विभुते यांनी कार्यवाही करणे आवश्यक असतांना त्या विहीरीत पडल्या व उपचारा दरम्यान डॉक्टरांनी उपचार करणे शक्य नसल्याने घरी आणले व मृत्यू झाला अर्जदार क्र.1 वर्षा हिने स्वत:साठी व भावंडासाठी 1 ते 4 वतीने दाखल केलेले आहे. त्यांनी छाया विभुते यांचे बद्दलही कथन केलेले नाही व पुरावा दिलेला नाही. अर्जदार क्र.1 ही सज्ञान असून अर्जदार क्र.2 ते 4 यांचेसाठी अ.पा.क. होऊ शकते यांचे पुरावे दिलेले नाहीत, वारस प्रमाणपत्र दिलेले नाही. अर्जदार क्र.1 हिने अर्जदार क्र.2 ते 4 यांचेसाठी अ.पा.क. नेमणेबाबत कोठेही अर्ज केलेला नाही. विजयकुमार यांचा खून झाला व त्यानुसार पोलिसांनी तपास केला हे अर्जदाराने सिध्द करावे. आवश्यक कागदपत्रासह विमादावा कृषी अधिकारी यांच्याकडे दिला हे असत्य आहे. परीपुर्ण दावा सादर करण्यास सांगितले परंतू अर्जदाराने परीपुर्ण कागदपत्रे विप क्र. 2 व 3 कडे दाखल केला नाही व मंचाकडे धाव घेतली जी की चुकीची आहे असे म्हंटले आहे. दावा दाखल केला ही वस्तुस्थिती अमान्य केलेली आहे. अर्जदाराने पाठविलेल्या नोटीसचे उत्तर दिलेले आहे. नोटिसचे कथन अर्जदाराने कोठेही केलेले नाही. विमा रक्कम, व्याज, मानसिक त्रास खर्चाबाबत तक्रार चुकीची, निराधार व अमान्य आहे. परीपुर्ण दावा अर्जदाराने विमा कंपनीला दिलेला नाही म्हणून त्यावर विचार करण्याचा प्रश्नच उरत नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.
क) विप क्र. 2 ब्रोकर यांनी त्यांचे म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे त्याप्रमाणे अर्जदाराचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही त्यामुळे आमच्या संस्थेस जबाबदार धरण्यात येऊ नये असे म्हंटले आहे.
ड) विप क्र. 3 कृषी अधिकारी यांनी म्हणणे दाखल केले आहे त्यांचे म्हणणे असे की अर्जदाराचा प्रस्ताव प्राप्त नाही. अर्जदाराने तक्रारी सोबत क्लेम फॉर्म भाग क्र.3 प्रतिज्ञापत्र (पत्नी छाया याचे) सातबारा, धारणा नोंदवही (पत्नी छाया यांच्या नाव नोंदीचा) एफ.आय.आर., (विजयकुमार विभुते यांचा खुनाचा) घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम. रीपोर्ट, वारस नोंद तालूका कृषी अधिकारी यांचे छाया विभुते यांना पत्र, फेरफार नक्कल, नोटिस कृषी पर्यवेक्षक यांचे छाया विभुते यांना पत्र इ. कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले लेखी युक्तिवाद वाचला, तोडी युक्त्विाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खलीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1) अर्जदाराने कृषी अधिकारी यांचे कडे विमा प्रस्ताव
दाखल केला आहे हे कागदपत्रावरुन सिध्द होत का ? नाही.
2) विमा कंपनीने सेवेत त्रुटी केली का ? नाही.
3) अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे का ? प्रस्ताव मिळाल्यावर विप
क्र. 1 ने निर्णय घ्यावा.
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
1) मुद्दा क्र. 1
अर्जदाराने विमा प्रस्ताव कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केला हे निदर्शनास आणून देणारा एकही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
2) मुद्दा क्र.2
अर्जदाराने कृषी अधिकारी यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल न केल्यामुळे तो विमा कंपनीकडे पाठवू शकले नाही आणि असे असतांना सेवेत त्रुटी केली हे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे आम्ही मद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
3) अर्जदाराने विमा प्रस्ताव दाखल न केल्यामुळे ते विमा रक्कम मिळण्याबददल काहीही म्हणू शकत नाही त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.4 चे उत्तर प्रस्ताव मिळाल्यावर निर्णय घ्यावा असे देऊन खालीलप्रमाणे अर्जदारास व विमा कंपनीस आदेश देत आहोत.
आदेश.
1) तक्रारदार व विप यांना खालीलप्रमाणे आदेशीत करण्यात येते.
2) अर्जदाराने क्लेमफॉर्म व अर्जासह एफ.आय. आर. मरणोत्तर पंचनामा पी. एम. रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, सातबारा वारस प्रमाणपत्र इ. सर्व कागदपत्रे आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात विमा कंपनीकडे द्यावेत व तशी पोच घ्यावी.
3) अर्जदाराने सर्व कागदपत्र दिलेल्या तारखेपासून 30 दिवसात सर्व कागदपत्रांची छाननी करावी व अर्जदाराने दिलेल्या सर्व कागदपत्राच्या दिनांकापासून 30 दिवसात विमा रक्कमेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
4) वरील आदेशाची पुर्तता तक यांनी केल्यास विप यांनी पुढील योग्य ती कार्यवाही करुन
45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी
मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी
सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.