Maharashtra

Nagpur

CC/11/733

Sopan Baburao Bhalekar - Complainant(s)

Versus

Future Generali India Insurance Co.Ltd. Throgh Authorised Signatory - Opp.Party(s)

Adv. D.R.Nirwan

15 Apr 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/733
 
1. Sopan Baburao Bhalekar
Sawarband, Post. Wadad, Tah. Sakoli,
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Future Generali India Insurance Co.Ltd. Throgh Authorised Signatory
(I.R.D.A. Regd.No. 132), 001, Trade Plaza, 414, Veer Sawarkar Marg, Prabha Devi,
Mumbai 400025
Maharashtra
2. Future Generaly India Insurance Co.Ltd., Through Branch Manager
3rd floor,Land Mak, Ramdas Peth, Wardha Road,
Nagpur 440010
Maharashtra
3. Pantaloon Retail (India) Ltd.
Plot No. 117, Road No. 18, Opp. Armi & Navy Press, M.I.D.C., Marol, Andheri (East)
Mumbai 400093
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
PRESENT:Adv. D.R.Nirwan, Advocate for the Complainant 1
 
ORDER

श्री. मनोहर चिलबुले, अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.

 

 

 

 

- आदेश -

 (पारित दिनांक 15/04/2014)

तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण खालीलप्रमाणे.

 

1.                                 तक्रारकर्ता सोपान बाबुराव भालेकर हा मे. एस.के.मेहता अँड कं., सुरगाव, जि. नागपूर यांचे‍ टिप्‍पर क्र. MH 40 N  0120 वर दरमहा रु.5,500/- मासिक पगारावर चालक म्‍हणून नोकरीस होता. त्‍याचे वि.प. फ्युचर जनरली विमा कंपनीकडून फ्युचर गृप परसनल एक्‍सीडेंट पॉलिसी क्र. 488010000609 25 मार्च 2010 ते 24 मार्च 2011 या कालावधीसाठी खरेदी केली होती. सदर पॉलिसीप्रमाणे अपघातात मृत्‍यु अगर कायम अपंगत्‍व आल्‍यास विमाकृत व्‍यक्‍तीस रु.1,00,000/- अधिक 10 महिन्‍यांचा पगार रु.15,000/- चे मर्यादेपर्यंत असा लाभ देय आहे.

 

                  दि.12.02.2011 रोजी सकाळी 10.00 वाजता तक्रारकर्ता वरील टिप्‍पर गीट्टी भरुन पुसाला ते पंढरी, जि. अमरावती मार्गाने चालवित असता मौजा पंढरीजवळ पो.स्‍टे.शेंदूरजनाघाट, जि. अमरावतीचे हद्दीत ब्रेक कनेक्‍शन व फ्रंट एक्‍सल डिसलोकेट होऊन मॅनेनिकल फेल्‍युअरमुळे रोड साईडच्‍या झाडास आदळला व झालेल्‍या अपघातात तक्रारकर्त्‍याच्‍या दोन्‍ही पायांना व शरीराच्‍या इतर भागास गंभीर दुखापत झाली. तक्रारकर्त्‍यास प्राथमिक स्‍वास्‍थ केंद्र, वरुड व नंतर सेंटर पाईंट हॉस्पिटल, नागपूर येथे उपचारासाठी हलविण्‍यात आले. तेथे दि.12.02.2010 ते 26.04.2011 या कालावधीत तक्रारकर्त्‍यावर उपचार व शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली व त्‍याचा उजवा पाय गुडघ्‍याचे वरपासून कापावा लागला. शासकीय सर्वोपचार रुग्‍णालय, भंडारा येथील मेडीकल बोर्डाने तक्रारकर्त्‍यास 70 टक्‍के कायमचे अपंगत्‍व आल्‍याबाबत प्रमाणपत्र क्र. 1678/2011 दि.23.05.2011 रोजी दिले आहे. तक्रारकर्त्‍याचा पायच कापावा लागल्‍यामुळे तो वाहन चालकाचे काम कधीही करुन शकत नसल्‍याने त्‍याला कायमचे पूर्ण अपंगत्‍व प्राप्‍त झाले असून आपल्‍या रोजगारापासून कायमचे वंचित व्‍हावे लागले आहे.

 

                  तक्रारकर्त्‍याचे वडिलांनी सदर अपघाताबाबतची सुचना वि.प.ला दि.16.02.2011 रोजी पोस्‍टाद्वारे पाठविली आणि त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि.03.06.2011 रोजी संबंधित दस्‍तऐवज व अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र वि.प.क्र. 1 ला पाठविले. परंतू त्‍यांनी अद्यापपर्यंत तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर केलेला नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल केली असून त्‍यात खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

1)    पॉलिसीची रक्‍कम    रु.1,00,000/-

2)    10 महिन्‍यांचा पगार रु.45,000/-

3)    वरील रकमेवर 12.02.2011 पासून द.सा.द.शे.12 प्रमाणे व्‍याज.

4)    मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.5,000/-.

5)    तक्रारीचा खर्च रु.5,000/-.

 

 

2.                वि.प.क्र. 3 ला नोटीस मिळून गैरहजर राहिले, म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍यात आले. वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍त लेखी जवाब दाखल केला आहे आणि तक्रार अर्जास सक्‍त विरोध केला आहे.

 

3.                तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद अपघात विमा पॉलिसी त्‍यांचेकडून काढल्‍याचे मान्‍य केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, तक्रारकर्त्‍याने जे पोलिस पेपर्स दाखल केले आहेत, त्‍यावरुन सदर अपघात तक्रारकर्त्‍याच्‍या निष्‍काळजीपणामुळे झाला असल्‍याने त्‍याबाबत नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र नाही. त्‍यांचा दुसरा आक्षेप असा की, अपघातानंतर 15 दिवसांचे आत माहिती देणे आवश्‍यक असतांना तक्रारकर्त्‍याने किंवा त्‍याचेतर्फे विमा कंपनीस मुदतीचे आत माहिती दिली नाही. त्‍यामुळे विमा शर्तीचा भंग झाला असल्‍याने तक्रारकर्ता कोणताही विमा लाभ मिळण्‍यास पात्र नाही. यापुढे त्‍यांचे म्‍हणणे असे की, तक्रारकतर्यास कायमचे अपंगत्‍व आले नाही व त्‍यामुळे तो पॉलिसीत नमूद रक्‍कम रु.1,00,000/-, तसेच 10 महिन्‍याचा पगार असे लाभ मिळण्‍यास पात्र नाही, म्‍हणून तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

 

4.                उभय पक्षांच्‍या परस्‍परविरोधी विधानांवरुन खालील मुद्दे मंचासमक्ष विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

 

मुद्दे                                                              निष्‍कर्ष

1) वि.प.ने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा निकाली न काढून सेवेत न्‍यूनतापूर्ण

   व्‍यवहार केला आहे काय ?                                          होय.

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र आहे काय ?                अंशतः.

3) आदेश काय ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

-कारणमिमांसा-

5.          मुद्दा क्र. 1 बाबत तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 2 कडे पैसे भरुन वि.प.क्र. 1 ने निर्गमित अपघात विमा पॉलिसी क्र. 488010000609 कालावधी 25.03.2010 ते 24.03.2011 या कालावधीसाठी खरेदी केली होती व सदर पॉलिसीप्रमाणे अपघाती मृत्‍यु किंवा 100 टक्‍के कायमच्‍या अपंगत्‍वासाठी विमा लाभ रु.1,00,000/-, तसेच रु.15,000/- पर्यंत 10 महिन्‍यांचा पगार देण्‍याचे वि.प. यांनी कबूल केले होते याबाबत वाद नाही. तक्रारकर्त्‍याने सदर विमा प्रमाणपत्र दस्‍तऐवज क्र. 1 वर दाखल केले आहे.

 

6.                दि.12.02.2011 रोजी पुसला ते पंढरी रस्‍त्‍यावर तक्रारकर्ता टिप्‍पर क्र. MH 40 N  0120 चालवित असतांना अपघात झाला व त्‍यात तो गंभीर जखमी झाला आणि त्‍याच्‍यावर सेंटर पाईंट हॉस्‍पीटल, नागपूर येथे शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली व त्‍यात गुडघ्‍याच्‍या वरुन त्‍याचा पाय कापण्‍यात आला आणि तो सदर उपचारासाठी दि.12.02.2011 ते 26.04.2011 पर्यंत वरील हॉस्पिटलमध्‍ये भरती होता हे दर्शविण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 3 वर पो.स्‍टे.शेंदूरजनाघाट, जि.अमरावती मध्‍ये एफ आय आर नोंदविल्‍याची प्रत दस्‍तऐवज क्र. 3 वर, क्राईम डिटेल फॉर्म दस्‍तऐवज क्र. 4, एक्‍सीडेंट रीपोर्ट फॉर्म दस्‍तऐवज क्र. 5 वर, इंजूरी रीपोर्ट दस्‍तऐवज क्र. 6 वर आणि डिसचार्ज समरी दस्‍तऐवज क्र. 7 वर व तक्रारकर्त्‍याचा चालक परवाना दस्‍तऐवज क्र. 8 वर दाखल केला आहे. म्‍हणजेच तक्रारकर्त्‍यास झालेला अपघात हा पॉलिसी कालावधीत झाल्‍याचे तक्रारकर्त्‍याने सिध्‍द केले आहे.

 

7.                वि.प.चे म्‍हणणे असे की, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या एफ आय आर प्रमाणे तक्रारकर्त्‍याने निष्‍काळजीपणे वाहन चालविल्‍याने त्‍याचेविरुध्‍द भा.दं.वि.चे कलम 279, 337 प्रमाणे अपराध क्र. 13/2011 नोंदविला असल्याने सदर अपघातास तक्रारकर्ता जबाबदार आहे व त्‍यामुळे विमा कंपनी विमा दावा देण्‍यास जबाबदार नाही. एफ आय आर ही तक्रारकर्त्‍याच्‍या सांगण्‍याप्रमाणे नोंदविण्‍यात आली नाही व त्‍याचे बयानही नोंदविण्‍यात आलेले नाही. तक्रारकर्त्‍यास उपचारासाठी दवाखान्‍यात नेल्‍यावर त्‍याचे पश्‍चात एफ आय आर, चौकशी अधिकारी हे.कॉ.बंडू जगन्‍नाथ देऊळकर यांनी नोंदविली आहे. त्‍यामुळे त्‍यातील माहिती पूर्णतः खरी आहे असे समजता येणार नाही. तक्रारकर्त्‍याने म्‍हणणे असे की, ब्रेक फेल झाल्‍याने अपघात झाला. दस्‍तऐवज क्र. 5 एक्‍सीडेंट रीपोर्ट फॉर्ममध्‍ये वाहन निरीक्षक यांनी नमुद केले आहे की, “Break connections are dislocated and damaged” सदर अपघात मेकॅनीकल डिफेक्‍टमुळे झाला किंवा कसे याबाबत ‘ M.V.is not roadworthy condition, hence opinion could not be opined.”  असा अभिप्राय दिला आहे. म्‍हणजेच ज्‍याच्‍या ताब्‍यात वाहन होते, त्‍या तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे की, अपघात ब्रेक फेल्‍युअरमुळे झाला हे खोटे ठरावे असा कोणताही पुरावा उपलब्‍ध नाही, म्‍हणून सदर अपघात वाहनात तांत्रिक दोष निर्माण झाल्‍यामुळे घडला या तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यावर अविश्‍वास दाखविण्‍यास कोणतेही सबळ कारण नाही. याशिवाय, सदर अपघात हा तक्रारकर्त्‍याने सहेतूक घडवून आणला किंवा तो थां‍बविणे शक्‍य असतांनाही तसा प्रयत्‍न केला नाही व अपघातास स्‍वतः कारण झाला असा कोणताही पुरावा वि.प. यांनी दाखल केला नाही, म्‍हणून पॉलिसीच्‍या Exclusion Clause 4 प्रमाणे वि.प.ला तक्रारकर्त्‍याचा दावा नाकारण्‍याचा अधिकार प्राप्‍त होऊ शकत नाही.

 

8.                सदर प्रकरणात दि.12.02.2011 रोजी तक्रारकर्त्‍याच अपघात झाल्‍यावर त्‍यास उपचारासाठी सेंटर पाईंट हॉस्‍पीटल, नागपूर येथे दि.12.02.2011 रोजी भरती केले व तेथे तो 26.04.2011 रोजीपर्यंत भरती होता. त्‍याच्‍यावर शस्‍त्रक्रिया करुन गुडघ्‍याच्‍या वर  (above knee)  उजवा पाय कापण्‍यात आला. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्‍याने विमा कंपनीला अपघाताबाबत स्‍वतः कळविणे अपेक्षित नव्‍हते. तक्रारकर्त्‍याचे वतीने त्‍याचे वडील बाबुराव बाजीराव भालेकर यांनी दि.16.02.2011 रोजी वि.प.क्र. 1 यांना अपघाताची सुचना दिल्‍याबाबतच्‍या पत्राची प्रत तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 20 वर दाखल केली आहे. तसेच दवाखान्‍यातून सुट्टी झाल्‍यावर दि.03.06.2011 ला पाठविल्‍याबाबत पत्राची प्रत दस्‍तऐवज क्र. 13 वर आणि त्‍याबाबत पोस्‍टाची पावती दस्‍तऐवज क्र. 15 वर आणि सदर दावा प्रपत्र वि.प.क्र. 1 ला प्राप्‍त झाल्‍याबाबतच पोचपावती दस्‍तऐवज क्र. 16 वर दाखल आहे. मात्र सदर दाव्‍याची वि.प.ने कोणतीही दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि.06.07.2011 रोजी अधिवक्‍ता निर्वाण यांचेमार्फत वि.प.क्र. 1 ला रजि. पोस्‍टाने नोटीस पाठवून विमा दाव्‍याची मागणी केली. सदर नोटीसची स्‍थळप्रत दस्‍तऐवज क्र. 17 वर, पोस्‍टाची रजि. पावती दस्‍तऐवज क्र. 18 वर आणि वि.प.ला नोटीस मिळाल्‍याची पाचे दस्‍तऐवज क्र. 19 वर दाखल आहे. सदर नोटीस प्राप्‍त होऊनही वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याच्‍या दाव्‍याची दखल घेतलेली नाही व दावा मंजूर केला नाही किंवा नामंजूरीचे कारणही कळविले नाही.

 

9.                तक्रारकर्त्‍याने वेळेवर अपघाताची सुचना दिली. तसेच आवश्‍यक कागदपत्रांसह दावा प्रपत्र सादर करुनही, असा दावा वाजवी मुदतीत म्‍हणजे 3 महिन्‍याचे आत निकाली न काढणे ही विमा कंपनीने विमा ग्राहकाप्रती दिलेली सेवेतील न्‍युनता व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे, म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

10.         मुद्दा क्र. 2 बाबत तक्रारकर्त्‍याने सदर तक्रारीत कायमच्‍या पूर्ण अपंगत्‍वाबाबत रु.1,00,000/- आणि दहा महिन्‍यांचा पगार रु.45,000/- ची मागणी केली आहे.

 

                  तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 2 प्रमाणे दाखल केलेला जिल्‍हा सर्वोपचार रुग्‍णालय, भंडारा यांच्‍या वैद्यकीय मंडळाने तक्रारकर्त्‍यास दि.23.05.2011 चा जो अपंगत्‍वाचा दाखल दिला आहे, त्‍यात उजवा पाय गुडघ्‍याच्‍या वरुन कापण्‍यात आल्‍यामुळे 70 टक्‍के कायमचे अपंगत्‍व आल्‍याचे नमुद केले आहे.

 

11.               दस्‍तऐवज क्र. 1 वर पॉलिसी प्रमाणपत्र आहे, त्‍यात कायमच्‍या अपंगत्‍वाबाबत मिळणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत.

 

Permanent Total Disablement:

 

Following ------------------------------------------------------ certificate of Insurance.)

 

वि.प.तर्फे Accident Surksha Personal Accident Policy चे माहिती पत्रक दस्‍तऐवज क्र. 1 वर दाखल केले आहे. त्‍यात  Permanent Total Disablement ची व्‍याख्‍या/परीभाषा खालीलप्रमाणे दिली आहे.

   “Means disablement which entirely prevents an Insured Person from attending to any Business or Occupation of any and every king and which lasts 12 months and at the expiry of that period is behind hope of improvement.”

 

सदर माहितीपत्रकात 3. WHAT WE WILL PAY या  शिर्षकाखाली कोणत्‍या अवयवाच्‍या नुकसानीसाठी किती टक्‍केवारीत विमा लाभ देण्‍यात येईल याची सुची दिली आहे. त्‍यात पायाच्‍या क्षतिग्रस्‍त होण्‍यासाठी नुकसान भरपाईकरीता खालीलप्रमाणे माहिती दिली आहे.

 

Event percentage of Sum insure

 

A leg above mid-thigh

75%

 

                                                        

सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याचा उजवा पाय गुडघ्‍याच्‍या वरुन कापण्‍यात आला आहे. म्‍हणजेच सदर दुखापतीसाठी तक्रारकर्त्‍यास आश्‍वासित रकमेच्‍या 75% म्‍हणजे रु.75,000/- विमा दावा मिळणे आवश्‍यक आहे. 10 महिन्‍यांचा पगार हा केवळ पूर्ण म्‍हणजे 100 टक्‍के अपंगत्‍वासाठी देय असल्‍याने तो लाभ मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍यास विमा दावा रु.75,000/- आणि तक्रारकर्त्‍याने दि.03.06.2011 रोजी विमा दावा दाखल केल्‍यानंतर 3 महिन्‍यांच्‍या कालावधीत म्‍हणजे 03.09.2011 पर्यंत विमा दावा मंजूर न केल्‍यामुळे सदर दावा रकमेवर 03.09.2011 पासून रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍केप्रमाणे व्‍याजरुपात नुकसान भरपाई, तसेच शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मंजूर करणे न्‍यायोचित होईल असे मंचास वाटते. म्‍हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.

 

                  वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

-आदेश-

तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 चे कलम 12 खालील तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

1)    वि.प.क्र. 1 ते 3 यांनी संयुक्‍त व वैयक्‍तीक रीत्‍या तक्रारकर्त्‍यास विमा दाव्‍याची रक्‍कम रु.75,000/- दि.03.09.2011 पासून सदर रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारकर्त्‍याचे हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह अदा करावी.

2)    वरील रकमेशिवाय वि.प. क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास संयुक्‍त व वैयक्‍तीक   रीत्‍या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा.

3)    सदर आदेशाची पूर्तता वि.प.क्र. 1 ते 3 यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत करावी. 

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.