Maharashtra

Kolhapur

CC/14/374

Sampada Pandurang Jadhav - Complainant(s)

Versus

Future Generali India Insurance co ltd., for Br Mgr. - Opp.Party(s)

R. G. Shelke

31 Dec 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/374
 
1. Sampada Pandurang Jadhav
Sawarwadi, Tal. Karveer,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Future Generali India Insurance co ltd., for Br Mgr.
M. J. Market, Nr. Parwati Talkies,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madke PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 
For the Complainant:R. G. Shelke, Advocate
For the Opp. Party:
Adv.P.R.Kolekar
 
ORDER

नि का ल प त्र:- (व्‍दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्‍यक्ष) (दि. 31-12-2015) 

1)   तक्रारदार यांनी वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि., यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.   

2)    तक्रारीचे संक्षिप्‍त स्‍वरुप खालीलप्रमाणे आहे.

     (अ)  तक्रारदार श्रीमती संपदा पांडूरंग जाधव यांचे पती कै.पांडूरंग भिवा जाधव हे सावरवाडी, ता. करवीर, जि. कोल्‍हापूर येथील शेतकरी होते.  त्‍यांचे नावे शेतजमीन होती. सदर जमिनीचा खाते नं. 215 असून 7/12 उता-यावर तशी नोंद आहे.  तक्रारदार यांचे पतीचा “शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना”, या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि.प. कडे विमा उतरवला आहे. 

          (ब)   पांडूरंग भिवा जाधव यांचे दि. 8-10-2012 रोजी सी.पी.आर, हॉस्‍पीटल कोल्‍हापूर येथे निधन झाले.  ते शेतात ऊस पिकांवर तणनाशक औषध फवारणी करीत असताना विषारी औषधाचा अंश, नाकातोंडात गेल्‍याने बेशुध्‍द झाल्‍याने, त्‍यांना दि. 7-10-2012 रोजी अॅडमिट केले होते. 

     (क) सदर  घटनेची नोंद सी.पी.आर. हॉस्‍पीटल मार्फत करवीर पोलीस ठाणे यांचेकडे दिली आहे.  तपासामधील सर्व कागदपत्रे अर्जासोबत दाखल केली आहेत.

     (ड) तक्रारदार यांनी पतीचे निधन झाल्‍याने “शेतकरी अपघात विमा योजने”प्रमाणे क्‍लेम फॉर्म दि. 20-05-2013 रोजी वि.प. कंपनीस पाठविला.  सदर अर्जाविषयी वि.प. कंपनीने विमा प्रस्‍तावाबद्दल काही कळविले नाही.

        (इ) तक्रारदार वि.प. ची ग्राहक असून, वि.प. यांनी तक्रारदारास तात्‍काळ सेवा देणे बंधनकारक असूनही सेवेत त्रुटी केली आहे.  

        (ई)   तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून “शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने”मार्फत मिळणारी रक्‍कम रु. 1,00,000/-, व्‍याज, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाची खर्चाची मागणी केली आहे.                              

3)  वि.प. कंपनीतर्फे दि. 19-03-2015 रोजी तक्रारीस खालीलप्रमाणे म्‍हणणे दाखल केले आहे.    

    (अ)  तक्रारदाराची तक्रार साफ खोटी, लबाडीची व चुकीची असून, खर्चासह नामंजूर करावी.

     (ब) तक्रारदार यांनी तिचे पतीचे अपघाती मृत्‍यूबाबत विमा क्‍लेमची रक्‍कम मिळणेसाठी   कृषी अधिकारी यांचेकडे फॉर्म भरुन दिला व सदर अर्ज       अपुरे कागदपत्राचे कारणावरुन, विमा कंपनीस पाठवणेस असमर्थता दर्शविली म्‍हणून तक्रारदार यांनी स्‍वत: क्‍लेम फॉर्म वि.प. कडे  सादर केला.

     (क) महाराष्‍ट्र शासन, कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हैअर  व वि.प. यांचे दरम्‍यान कराराप्रमाणे, मयत व्‍यक्‍तीचे वारसांनी क्‍लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी होऊन कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हेअर  यांचेमार्फत विमा कंपनीकडे पाठविले जातात.  तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे क्‍लेम स्विकारणेस नकार दिलेनंतर जिल्‍हा कृषी अधिकारी यांचेमार्फत प्रस्‍ताव पाठविणे योग्‍य होते.

    (ड)  तक्रारदार चुकीचे पध्‍दतीचा अवलंब करुन क्‍लेम घेऊन पाहत आहे.  वि.प. नी तक्रारदारांना देणेचे सेवेमध्‍ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.  तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी.   

4)  तक्रारदाराची तक्रार व सर्व कागदपत्रे, वि.प. यांचे म्‍हणणे व  दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करता, खालील मुद्दे विचारात घेता येतात.

                         मुद्दे                                                             उत्‍तरे                 

    1.   वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्‍यात

        येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ?                              होय

    2.   तक्रारदार‍ नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत का ?     होय 

    3.   काय आदेश ?                                                             तक्रार अर्ज अंशत: मंजूर.

 

का र ण मि मां सा

5)    तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जासोबत एकूण एकवीस कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दि. 20-05-2013 रोजी वि.प. ना दाखल केलेला अर्ज, क्‍लेम फॉर्म नं.  1, क्‍लेम फॉर्म नं. 1 चे सहपत्र, पांडूरंग भिवा जाधव यांचे शेतजमिनीचा 7/12 चा उतारा, गावचा नमुना नं. 8 अ, जमिनीचा खाते उतारा, वारसा नोंदवही, क्‍लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, तक्रारदाराचे  प्रतिज्ञापत्र  दि. 9-11-2012, शाळेचे  प्रमाणपत्र, मृत्‍यूचा दाखला, सी.पी.आर. हॉस्‍पीटल कोल्‍हापूर यांचा (cause of death ) सर्टिफिकेट, शव-विच्‍छेदनाचा रिपोर्ट, मरणोत्‍तर पंचनामा, शिधापत्रिका इत्‍यादी कागदपत्रे आपले तक्रारीच्‍या पुराव्‍यासाठी दाखल केलेले आहेत.

6)  प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदार यांचे वतीने अॅड. आर.जी. शेळके व वि.प. तर्फे अॅड.पी.आर. कोळेकर, यांनी युक्‍तीवाद केला.  दोन्‍ही बाजूंच्‍या वतीने लेखी युक्‍तीवाद व प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत.  तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या वरील कागदपत्रांवरुन कै. पांडूरंग भिवा  जाधव हे शेतकरी होते व त्‍यांचा मृत्‍यू दि. 8-10-2012 रोजी किटकनाशकाच्‍या फवारणीच्‍या वेळी झालेल्‍या परिणामाने झाला असे दिसून येते.  तक्रारदार हया मयत पांडूरंग भिवा जाधव   यांच्‍या वारस असल्‍याचे प्रमाणपत्रावरुन सिध्‍द होते व पांडूरंग भिवा जाधव यांचे अपघाताने  मृत्‍यू झाला हे सिध्‍द होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन करता, त्‍यांनी तक्रारीतील मजकूर पुराव्‍यानिशी सिध्‍द केला आहे असे स्‍पष्‍ट दिसून येते.  

7)    वि.प. यांचे अॅडव्‍होकेट यांनी आपल्‍या लेखी व तोंडी युक्‍तीवादामध्‍ये तक्रारदार यांनी क्‍लेम दाखल करतांना करारानुसार जे बंधन घातले आहे त्‍याचे पालन केले नसल्‍याचे म्‍हटले आहे.  तथापि तक्रारदार यांनी दि. 20-05-2013 रोजी वि.प. कडे जो अर्ज दिला.  त्‍यामध्‍ये दि. 17-05-2013 रोजी कृषी पर्यवेक्षक यांचेशी संपर्क साधला होता पण प्रतिसाद न मिळाल्‍याने वि.प. कडे अर्ज देत असल्‍याचे म्‍हटले आहे.  सबब, तक्रारदार यांचा अर्ज त्‍या कारणावरुन नाकारणे संयुक्तिक नाही. 

8)   तक्रारदार यांनी दि. 20-05-2013 रोजी क्‍लेम फॉर्म सर्व कागदपत्रासोबत व वि.प. कडे दाखल केला आहे.  सदर विमा क्‍लेम सबंधी वि.प. कंपनीने तत्‍परतेने निर्णय घेणे न्‍यायाचे होते.  वि.प. विमा कंपनीने योग्‍य मुदतीत निर्णय न घेणे ही सेवेतील त्रुटी आहे.   

9) तक्रारदार यांच्‍या पतीने निधन दि. 8-10-2012 रोजी झाले,  तदनंतर अर्ज सात महिन्‍यांनी दाखल केला, पण वि.प. विमा कंपनीने गेली अडीच वर्षे तक्रारदाराच्‍या क्‍लेम-फॉर्मचा विचार   केला नसल्‍याचे दिसून येते.  वि.प. यांनी दि. 20-07-2013 रोजीपर्यंत अर्जाच्‍या क्‍लेम फॉर्मच्‍यासंबंधी निर्णय घेणे उचित होते.  वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्‍याचे दिसून येते.

10)  मंचाचे मते, तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जातील मजकूर पुराव्‍यानिशी सिध्‍द केला आहे.  वि.प. यांनी तक्रारदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख ) देणे बंधनकारक आहे.  तक्रारदार यांना विम्‍याच्‍या रक्‍कमेवर द.सा.द.शे.  6  %  प्रमाणे  दि. 20-07-2013 पासून व्‍याज मिळणे आवश्‍यक आहे.  तक्रारदार यांच्‍यावर त्‍यांच्‍या दोन अज्ञान मुलगी कु. प्रतिक्षा पाडूंरंग जाधव व मुलगा तेजस पांडूरंग जाधव यांची जबाबदारी आहे.  तसेच वि.प. विमा यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/-(रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.                                                          

11)  न्‍यायाचे दृष्‍टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.  सबब, आदेश.

                                                 आ दे श

1)   तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

2)   वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि,  यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्‍त) द.सा.द.शे.  6  %  व्‍याजाने दि. 20-07-2013 रोजी पासून  द्यावेत.          

3)   वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त)  द्यावेत.

4)   वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.

5)   सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madke]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.