Maharashtra

Kolhapur

CC/14/349

Dattatray Ishwara Gurav - Complainant(s)

Versus

Future Generali India Insurance co ltd., for Br Mgr. - Opp.Party(s)

R. G. Shelke

31 Dec 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/349
 
1. Dattatray Ishwara Gurav
Minache Khurd, Tal. Bhudargad
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Future Generali India Insurance co ltd., for Br Mgr.
M. J. Market, Nr. Parwati Talkies,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madke PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 
For the Complainant:R. G. Shelke, Advocate
For the Opp. Party:
Adv.P.R.Kolekar
 
ORDER

नि का ल प त्र:- (व्‍दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्‍यक्ष) (दि. 31-12-2015) 

1)   तक्रारदार यांनी वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि., यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.   

2)    तक्रारीचे संक्षिप्‍त स्‍वरुप खालीलप्रमाणे आहे.

     (अ)  तक्रारदार  यांचा मुलगा कु. विशाल दत्‍तात्रय गुरव  हा   मिणचे खुर्द,  ता. भुदरगड, जि. कोल्‍हापूर येथील शेतकरी होते.  त्‍यांचे नावे शेतजमीन होती. सदर जमिनीचा खाते नं. 442  असून 7/12 उता-यावर तशी नोंद आहे.  तक्रारदार यांचे मुलाचा “शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना ”, या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि.प. कडे विमा उतरवला आहे. 

    (ब)   तक्रारदार  यांचा मुलगा कु. विशाल दत्‍तात्रय गुरव  हा  दि. 9-10-2011 रोजी  गावातील मित्रासोबत ओहळ नावाचे ओढयावर आंघोळीसाठी गेला असता त्‍याने ओढयात आंघोळीसाठी उडी मारली असता त्‍याचे डोक्‍यास पाण्‍यातील दगड लागून मानेचा मज्‍ज्‍यारज्‍जूला मार लागलेने बेशुध्‍द झाला. त्‍यावेळी त्‍याला औषधोपचाराकरिता सिध्‍दगिरी हॉस्पिटल, कणेरीमठ, कोल्‍हापूर येथे दि. 9-10-2011  ते 9-11-2011 रोजीपर्यंत दाखल केले.  त्‍यानंतर गावातील डॉक्‍टरांचेकडे उपचार सुरु होते.  तक्रारदाराचे मुलावर बराच औषधोपचार करुनही दि. 12-02-2012 रोजी मयत झाला.  तक्रारदाराचा मुलगा घरी मयत झालेने मुलाचे प्रेताचे शवविच्‍छेदन केले नव्‍हते.  तक्रारदार हे अल्‍पशिक्षित असलेने त्‍यांना शवविच्‍छेदनाबद्दलची माहिती नव्‍हती.  तक्रारदाराचा मुलगा ओढयात आंघोळीसाठी ओढयातील पाण्‍यातील दगडे डोक्‍यास लागून जखमी होऊन मयत झालेबाबतचा दाखला गावकामगार पोलिस पाटील, मिणचे खुर्द, ता. भुदरगड यांनी दिला आहे. तसेच डोक्‍यास व मज्‍ज्‍यारज्‍जूस जखम झालेबाबतचा रिपोर्ट सिध्‍दीगरी हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर यांनी दिला आहे.  त्‍यानंतर दि. 12-02-2012 रोजी मयत झाला आहे.                         

     (क)  सदर घटनेचा तक्रारदाराचा मुलगा मयत झालेबाबतचा दाखला गावकामगार पोलिस पाटील मिणचे खुर्द, ता. भुदरगड यांनी दिला आहे. तसेच सिध्‍दीगरी हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर यांनी रिपोर्ट दिला आहे.  तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रे अर्जासोबत दाखल केली आहेत.

     (ड)  तक्रारदार यांचा मुलगा  दि. 12-02-2012 निधन झाल्‍याने “ शेतकरी अपघात विमा योजने” प्रमाणे तालुका कृषी  पर्यवेक्षक, मिणचे खुर्द , ता. राधानगरी, यांचेकडे प्रत्‍यक्ष भेटून प्रस्‍ताव स्विकारणेबाबत विनंती केली असता विमा प्रस्‍ताव मुदतीबाहेर आहे.  आपला मुलगा लहान वयात मयत झालेने प्रस्‍ताव स्विकारता येत नाही असे सांगून प्रस्‍ताव स्विकारणेस नकार दिला.   त्‍यानंतर दि. 13-06-2013 रोजी क्‍लेम फॉर्म भरुन योग्‍य त्‍या कागदपत्रांसह  वि.प. कंपनी, कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी व  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्‍हापूर यांचेकडे प्रस्‍ताव पाठविला.  परंतु विमा प्रस्‍तावाबाबत काहीही कळविले नाही. दि. 17-06-2013 रोजीचे पत्राने जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्‍हापूर यांनी तक्रारदारांना विमा प्रस्‍ताव सहा महिन्‍याच्‍या कालावधीत सादर केला होता का खुलाश्‍यासह पुरावा सादर करणेबाबत कळविले. 

(इ)  तक्रारदार वि.प. ची ग्राहक असून, वि.प. यांनी तक्रारदारास तात्‍काळ सेवा देणे बंधनकारक असूनही सेवेत त्रुटी केली आहे.  

(ई)   तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून “शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने”मार्फत मिळणारी रक्‍कम रु. 1,00,000/-, व्‍याज, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाची खर्चाची मागणी केली आहे.                          

3)  वि.प. कंपनीतर्फे दि. 24-03-2015 रोजी तक्रारीस खालीलप्रमाणे म्‍हणणे दाखल केले आहे.    

 (अ)  तक्रारदाराची तक्रार साफ खोटी, लबाडीची व चुकीची असून, खर्चासह नामंजूर करावी.

(ब) तक्रारदार यांनी त्‍यांचा मुलाचे अपघाती मृत्‍यूबाबत विमा क्‍लेमची रक्‍कम मिळणेसाठी  कृषी अधिकारी यांचेकडे क्‍लेम फॉर्म भरुन दिला होता.  तथापि, कृषी अधिकारी यांनी सदर क्‍लेम  मुदतीस नसलेचे व तक्रारदाराचा मुलगा वयाने लहान असलेने प्रस्‍ताव वि.प. विमा कंपनीस पाठविणेस असमर्थता दर्शविलेने तक्रारदारांनी वि.प. कडे स्‍वत: क्‍लेम फॉर्म पाठविला.  

 (क)  महाराष्‍ट्र शासन, कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हैअर  व वि.प. यांचे दरम्‍यान कराराप्रमाणे, मयत व्‍यक्‍तीचे वारसांनी क्‍लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी होऊन कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हेअर यांचेमार्फत विमा कंपनीकडे पाठविले जातात.  तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे क्‍लेम स्विकारणेस नकार दिलेनंतर जिल्‍हा कृषी अधिकारी यांचेमार्फत प्रस्‍ताव पाठविणे योग्‍य होते.

(ड)  तक्रारदार चुकीचे पध्‍दतीचा अवलंब करुन क्‍लेम घेऊन पाहत आहे.  वि.प. नी तक्रारदारांना देणेचे सेवेमध्‍ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.  तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी.   

4)  तक्रारदाराची तक्रार व सर्व कागदपत्रे, वि.प. यांचे म्‍हणणे व  दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करता, खालील मुद्दे विचारात घेता येतात.

                          मुद्दे                                                                उत्‍तरे                 

    1.   वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्‍यात

        येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ?                                   होय

    2.   तक्रारदार‍ नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत का ?            होय 

    3.   काय आदेश ?                                                                    तक्रार अर्ज अंशत: मंजूर.

 

का र ण मि मां सा

5)    तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जासोबत एकूण एकवीस कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दि. 13-06-2013 रोजी वि.प. ना दाखल केलेला अर्ज, क्‍लेम फॉर्म नं.1 व 2 , क्‍लेम फॉर्म नं. 1 चे सहपत्र,  विशाल दत्‍तात्रय गुरव याचे गट नं. 414  शेतजमिनीचा 7/12 चा उतारा, नं.442 चा 8 अ चा उतारास,  डायरी नं. 908 , जमिनीचा खाते उतारा,  6 क उतारा डायरी,  क्‍लेम फॉर्म,  तक्रारदार यांचे मुलाचा जन्‍म व  मृत्‍यूचा दाखला,  गावकामगार पोलिस पाटील यांनी दिलेला दाखला व पंचनामा,  मयताचे सिध्‍दीगिरी हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर   यांचेकडील  रिपोर्टस,  विमा प्रस्‍ताव वि.प. कंपनी, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठविलेला प्रस्‍ताव पोहच पावती इत्‍यादी कागदपत्रे आपले तक्रारीच्‍या पुराव्‍यासाठी दाखल केलेले आहेत.

6)  प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदार यांचे वतीने अॅड. आर.जी. शेळके व वि.प. तर्फे अॅड.पी.आर. कोळेकर, यांनी युक्‍तीवाद केला.  दोन्‍ही बाजूंच्‍या वतीने लेखी युक्‍तीवाद व प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत.  तक्रारदार तक्रारदाराचा मुलगा ओढयात आंघोळीसाठी ओढयातील पाण्‍यातील दगडे डोक्‍यास लागून जखमी होऊन मयत झालेबाबतचा दाखला गावकामगार पोलिस पाटील, मिणचे खुर्द, ता. भुदरगड यांनी दिला आहे. तसेच डोक्‍यास व मज्‍ज्‍यारज्‍जूस जखम झालेबाबतचा रिपोर्ट सिध्‍दीगरी हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर यांनी दिला आहे. तक्रारदार हे मयत विशाल दत्‍तात्रय गुरव यांचे वारस असल्‍याचे प्रमाणपत्रावरुन सिध्‍द होते व मयत विशाल दत्‍तात्रय गुरव याचा अपघाताने मृत्‍यू झाला हे सिध्‍द होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन करता, त्‍यांनी तक्रारीतील मजकूर पुराव्‍यानिशी सिध्‍द केला आहे असे स्‍पष्‍ट दिसून येते.  

7)    वि.प. यांचे अॅडव्‍होकेट यांनी आपल्‍या लेखी व तोंडी युक्‍तीवादामध्‍ये तक्रारदार यांनी क्‍लेम दाखल करतांना करारानुसार जे बंधन घातले आहे त्‍याचे पालन केले नसल्‍याचे म्‍हटले आहे.  तथापि, तालुका कृषी पर्यवेक्षक, मिणचे खुर्द, ता. भुदरगड यांचेकडे विमा प्रस्‍ताव सादर केला असता प्रस्‍ताव मुदतीबाहेर असलेचे व मुलगा लहान वयात मयत झालेने प्रस्‍ताव स्विकारता येत नसलेचे सांगितले.  त्‍यानंतर तक्रारदार यांनी दि. 13-06-2013 रोजी विमा    प्रस्‍ताव वि.प. कंपनी, कबाल जनरल इन्‍शुरन्‍स, पुणे तसेच जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्‍हापूर यांना क्‍लेम फॉर्म भरुन योग्‍य त्‍या कागदपत्रांसह पाठविला होता.  वि.प. कंपनीस प्रस्‍ताव मिळूनही तक्रारदारास प्रस्‍तावाबाबत काहीही कळविले नाही.  सबब, तक्रारदार यांचा अर्ज त्‍या कारणावरुन नाकारणे संयुक्तिक नाही. 

8)   तक्रारदार यांनी दि. 13-06-2013 रोजी क्‍लेम फॉर्म सर्व कागदपत्रासोबत व वि.प. कडे दाखल केला आहे.  सदर विमा क्‍लेम सबंधी वि.प. कंपनीने तत्‍परतेने निर्णय घेणे न्‍यायाचे होते.  वि.प. विमा कंपनीने योग्‍य मुदतीत निर्णय न घेणे ही सेवेतील त्रुटी आहे.   

9) तक्रारदार यांचे मुलाचे निधन दि. 12-02-2012 रोजी झाले, तदनंतर अर्ज दि. 13-06-2013 रोजी दाखल केला, पण वि.प. विमा कंपनीने  तक्रारदाराच्‍या क्‍लेम-फॉर्मचा विचार केला नसल्‍याचे दिसून येते.  वि.प. यांनी दि. 13-08-2013 रोजीपर्यंत अर्जाच्‍या क्‍लेम फॉर्मच्‍यासंबंधी निर्णय घेणे उचित होते.  वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्‍याचे दिसून येते.

10)  मंचाचे मते, तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जातील मजकूर पुराव्‍यानिशी सिध्‍द केला आहे.  वि.प. यांनी तक्रारदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख ) देणे बंधनकारक आहे.  तक्रारदार यांना विम्‍याच्‍या रक्‍कमेवर द.सा.द.शे. 6 %  प्रमाणे  दि. 13-08-2013 रोजीपासून व्‍याज मिळणे आवश्‍यक आहे.   तसेच वि.प. विमा यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/-(रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.                                                      

11)  न्‍यायाचे दृष्‍टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.  सबब, आदेश.

                                                   आ दे श

1)     तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

2)    वि.प. फयुचर जनरेली इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि, यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्‍त) द.सा.द.शे. 6 %  व्‍याजाने दि. 13-08-2013 रोजीपासून द्यावेत.          

3)   वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त)  द्यावेत.

4)   वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.

5)   सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madke]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.