ग्राहक तक्रार क्र. 113/2014
दाखल तारीख : 20/06/2014
निकाल तारीख : 14/05/2015
कालावधी: 0 वर्षे 10 महिने 24 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. विजयाबाई पोपटराव लोमटे,
वय - 50, धंदा – घरकाम व शेती,
रा.मलकापूर, ता.कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. फयूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,
तिसरा मजला, इस्ट विंग, फोर्बस बिल्डींग चरणजीत राय मार्ग,
फोर्ट मुंबई-400001.
2. शाखाधिकारी,
डेक्कन इन्शुरन्स अॅण्ड रिइन्शुरन्स ब्रोकर प्रा. लि.,
मॉन्ट वर्ट झेनिथ, ऑफिस नं.201, एल.जी. शोरुम समोर, बानेर
टेलीफोन एक्सचेंज जवळ, बानेर रोड, बानेर पुणे-411045.
3. तालुका कृषी अधिकारी साहेब,
तालूक कृषी कार्यालय,
ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.जी.ए.कस्पटे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे : श्री.एस.पी.दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे : स्वत:
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. सदस्या सौ. विदयुलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
अ) 1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार विजयाबाई पोपटराव लोमटे (तक) या मौजे मलकापुर ता. कळंब ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपात विमा कंपनी) (विप) यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2) अर्जदाराचे पत्ता (संक्षिप्त रुपात मयत पोपट) यांचे नावे जमीन गट क्र.248, 236, 237, 238, 289 एकूण क्षेत्र 6 हे. 19 आर एवढे क्षेत्र आहे व ते शेतकरी होते.
3) अर्जदाराचे पती पोपट हे दि.15/07/2013 रोजी मोटार सायकलवरुन येरमाळा येथून त्यांचे गावी मलकापुर येथे येत होते सायंकाळी 6.45 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र.299 येरमाळा शिवाराम आराधना हॉटेलसमोर उस्मानाबाद औरंगाबाद रस्त्यावर एका अज्ञात जीपने पोपटराव यांचे मोटारसायकलला जोराची धडक देऊन निघून गेला. अपघातात पोपटराव यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या व त्यांना उपचाराकरीता सिव्हील हॉस्पिटल उस्मानाबाद येथे उपचारा दरम्यान मयत झाले.
4) अर्जदाराने रितसर दि.02/09/2013 रोजी विप क्र.3 (संक्षिप्त रुपात कृषी अधिकारी) यांचेकडे प्रस्ताव दिला. कृषि अधिकारी यांनी विप क्र. 2 (संक्षिप्त रुपात ब्रोकर) याचेकडे पाठवून व ब्रोकरने विप क्र.1 विमा कपंनीकडे पाठवला.
5) विमा कंपनीने दि.13/11/2013 रोजी पत्रानुसार अर्जदाराच्या पतीचे वाहन चालविण्याचे परवान्याची सांक्षांकित प्रतीबाबत मागणी केली. पोपपटराव यांचे अपघातावेळी त्यांचे सोबत त्यांचे मुळ वाहन चालविण्याचे परवाना असल्याने मयत पोपटराव यांना अनेक तीव्र जखमा रक्त स्त्राव होऊन व अपघाताच्या वेळी परवाना गहाळ झाला त्यामुळे दि.17/12/013 रोजी कृषी अधिकारी यांना व लेखी स्वरुपात कळवला आहे.
6) कृषी अधिकारी यांनी दि.08/01/2010 रोजी मयत पोपट यांचेकडे वाहन परवाना नसल्याने अर्जदाराचा प्रस्ताव फेटाळला.
7) सदरच्या अपघाताबद्दल अज्ञात जीप चालकाच्या विरुध्द गुन्हा नोंद केलेला आहे त्यात पोपटची चूक नव्हती. विमा कंपनीने जाणीपूर्वक विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीव्दारे शेतकरी जनता अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- 12 टक्के व्याज दराने मानसिक, आर्थिक व तक्रारीचा खर्च रक्कम रु.20,000/- विमा कंपनी कडून मिळावेत अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे.
ब) विप क्र.1 विमा कंपनीचे म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे त्यांचे म्हणण्यानुसार विमा कराराचे पालन करणे शेतकरी यांचेवर बंधनकारक आहे. सदर अपघात वेळेस पोपटराव हे स्वत: मोटरसायकल चालवित होते. वैध परवान्याची सांक्षांकीत प्रत सादर केली नाही. अपघातावेळी परवाना गहाळ झाला हे खोटे आहे. शेतकरी अपघात विमा योजनेमधील अटी व शर्ती नुसार मोटर वाहन चालविण्या-या शेतक-याकडे आवश्यक चालक परवाना असणे आवश्यक आहे. सेवा देण्यास कसुर केला नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.
क) विप क्र. 2 ब्रोकरचे म्हणणे असे आहे की दाव्याची रक्कम देणे न देणे हा निर्णय फक्त विमा कंपनीच्या हातात असतो ब्रोकरच्या हातात नसतो ब्रोकरला मिळणा-या कसल्याही आर्थिक लाभासाठी जबाबदार धरण्यात येऊ नये.
ड) विप क्र. 3 कृषी अधिकारी त्यांचे म्हणणे असे की पोपट यांचा दि.15/07/2013 रोजी मृत्यू झाला त्यांनी दि.02/09/2013 रोजी कृषी कार्यालयात शेतकरी अपघात विमा प्रस्ताव सादर केला.
इ) अर्जदाराने तक्रारीसोबत विमा रक्कम मिळण्यासाठी अर्जासह कागदपत्राची यादीचा अर्ज दि.02/09/2013 शपथपत्र अर्जदाराचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, सातबारा, पोपट यांचा 8-अ, फेरफार पत्रक 6 –क, निवडणूक ओळखपत्र, पोपट यांचे शिधापत्रीका, एफ.आय. आर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, विमा कपंनीला लिहीलेले पत्र, अर्ज, विमा कंपनीचे प्रस्ताव फेटाळण्याचे पत्र, दि.08/01/2014 इ. कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन कले, अर्जदाराचा लेखी युक्तिवाद वाचला, तोंडी युक्तिवाद ऐकला त्यानुसार सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदार यांच्या पतीचा रस्ता अपघात झाल हे
सिध्द होते काय ? होय.
2) अर्जदाराला शेतकरी अपघात विमा रक्कम
मिळविण्यासाठी चालक परवान्याची नितांत गरज आहे काय ? नाही.
3) विमा कंपनीने अर्जदाराला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली का ? होय.
4) अर्जदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहे का ? होय.
5) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
फ) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 :
1) अर्जदार यांनी त्यांचे पती पोपट हे रस्ता अपघातात मयत झाले हे अभिलेखावर प्रथम माहिती अहवाल (एफ.आय.आर.) घटनास्थळ पंचनामा मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र इ. आवश्यक कागदपत्रे शेतकरी अपघात विमा रक्कम मिळविण्यासाठी पुरेसे आहेत जे की अभिलेखावर आहेत. शासन निर्णय प्र-पत्र ड प्रमाणे अर्जदाराने कागदपत्रे दाखल केलेले आहेत. शासन निर्णयामध्ये कुठेही असे लिहिलेले नाही की परवाना दिल्याशिवाय विमा रक्कम देऊ नका उलट पक्षी अपघात सिध्द होत असल्यास विमा कंपनीने विमा प्रस्ताव मंजूर करावेत असा शासन निर्णय सांगतो. विमा प्रस्ताव फेटाळून रक्कम न देता तांत्रिक कारण पुढे करुन विमा रक्कम देण्यास जाणून बुजून टाळाटाळ केलेली आहे. शेतकरी अपघात विमा रक्कम देतांना परवान्याची गरज नाही.
केवळ अपघात झाला या कारणास्तव विम्याचे दावे मंजूर करावेत असे शासन निर्णयात नमूद केलेले आहे.
2) महाराष्ट्र शासनाला शेतक-यासाठी व त्यांच्या आर्थिक हित जोपासण्यासाठी सदर योजना कार्यान्वित केलेली आहे. शासन निर्णयाला डावलून विमा कंपनीने शेतक-याच्या विधवा पत्नीला रक्कमेपासून वंचीत ठेवलेले आहे. रक्कम देण्यास तांत्रिक कारण पुढे करुन रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे हि सेवेतील गंभीर त्रुटी आहे. विमा कंपनीने जरी अर्जदाराची रक्कम दिलेली नाही तरी त्यांचा हक्क संपूष्टात येत नाही. अपघाताचे पुराव्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक आहेत ती आवश्यक कागदपत्रे अभिलेखावर दाखल आहेत.
3) वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पाहोचलो आहेत की, अर्जदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहे त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो, मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देतो व मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर होकारार्थी देऊन खलीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विमा कंपनीने अर्जदारास शेतकरी अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) दि.08/01/2014 पासून 9 व्याज दराने आदेश पारीत दिनांकापासून 30 (तिस) दिवसात दयावेत.
3) विमा कंपनीने अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम र.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात दयावेत.
4) विप क्र.1 यांनी वरील आदेशाची 30 दिवसात पुर्तता करुन 45 दिवसात तसा अहवाल
मा. मंचासमोर सादर करावा. सदरकामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे.
सदर आदेशाची पुर्तता वि.प. यांनी न केल्यास तक्रारदार यांनी विपने आदेशाची पुर्तता
केली नसल्याबाबत मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.