ग्राहक तक्रार क्र. 122/2014
दाखल तारीख : 05/06/2014
निकाल तारीख : 27/05/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 23 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. जयश्री प्रकाश सुलाखे,
वय - 27 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.पाडोळी, (आ),ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. फयूचर जनरल इंडीया इन्शुरंन्स कंपनी लि,
सहारा प्लाझा, विंडफॉल, चौथा मजला, 401403
जे.बी. नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी(पुर्व), मुंबई 400059.
2. तहसिलदार साहेब,
तहसिल कार्यालय, उस्मानाबाद.
3. तालुका कृषि अधिकारी,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रादारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.एस.एकंडे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.(एकतर्फा)
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : एकतर्फा.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. सदस्या, सौ. विद्युलता जे.दलभंजन, यांचे व्दारा :
अ) अर्जदार जयश्री सुळाखे या मौजे पाडोळी (आ) येथील रहिवाशी आहेत त्यांनी विरुध्द पक्षकार यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे.
1. अर्जदार या (संक्षिप्त रुपात मयत प्रकाश) यांची पत्नी आहेत व मयत प्रकाश मृत्यू समयी शेतकरी होते त्यांचे नावावर मौजे पाडोळी (आ.) ता.जि.उस्मानाबाद येथे जमीन गट क्र.35 मध्ये क्षेत्र 1 एच 29 आर. असून स्वत: वहिवाटीत होते.
2. दि.27/10/2013 रोजी मयत प्रकार हे मोटार सायकलवर क्र.एम.एच.25 सी.1590 यावरुन बसून उस्मानाबाद येथील बायपास रोडने सांजा चौकाकडे येत असतांना रात्री अंदाजे 8.45 वाजणेचे दरम्यान पाठीमागून येणारे कंटेनर क्र.सी.जे. 6XX1537 चे चालकाने प्रकाश यास जोराची धडक दिली त्यामुळे प्रकाश यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला व सदर घटनेची नोंद पोलिस स्टेशन उस्मानाबाद शहर येथे गु.र.नंबर 224/13 अन्वये झाली त्याबाबत अर्जासोबत एफ.आय.आर. घटनास्थळ पंचनामा पोस्टमार्टम रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. मयत प्रकाश हे शेतकरी असल्याने त्यांचा विप क्र.1 (संक्षिप्त रुपात विमा कंपनी) यांचेकडे विमा उतरविला असल्याने अर्जदार हिने दि.07/01/2014 रोजी विप क्र.3 (संक्षिप्त रुपात कृषी अधिकारी) यांचेकडे विहीत नमून्यात अर्ज, तलाठी प्रमाणपत्र, पोलिस पंचनामे, सातबारा उतारा, 8 - अ उतारा, बँक पासबूक व अन्य आवश्यक कागदपत्रासह सादर केली व पोच घेतली पोच जोडली आहे असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
4. कृषी अधिकारी यांनी विमा कंपनीकडे सदर प्रस्ताव पाठवला व विमा दावा क्र.0005165 असा नंबर दिला. त्यानंतर विमा कंपनीने अर्जदारास दि.11/02/2014 रोजी पत्र पाठवून मयत प्रकाश यांचे मोटरसायकल चालवण्याचा परवाना दाखल करा असे कळवले त्यानुसार अर्जदार यांनी विमा कंपनी यांना पत्राच्या अनुषंगाने वाहन चालवण्याचा परवाना हरवले असल्याने सादर करु शकत नाही से कळवले.
5. त्यानंतर दि.28/03/2014 रोजी विमा कंपनीने अर्जदार हिस मयत प्रकाश यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने तो दाखल न केल्याने विमादावा क्र.0005965 फेटाळण्यात येतो असे कळवले.
6. अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की वाहन परवाना गहाळ झाल्याने ती सादर करु शकली नाही वास्तवीक पाहता मयत प्रकाश ची कसलीच चूक नसतांना पाठीमागून धडक दिली. पालिसांनी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. विमा कंपनीने विमा दावा फेटाळला हे नियमबाहय आहे. मंचास तक्रारीची दखल घेऊन निकाली काढणेचा अधिकार मंचास आहे त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन अर्जदार यांनी विमा रक्कम रु.10,0000/-द.सा.द.शे.15 टक्के व्याज दराने द्यावे तसेच मानसिक त्रासापेाटी रु.5,000/- तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- विमा कंपनीने द्यावा अशी विनंती केलेली आहे.
ब) विप क्र.1 विमा कंपनी यांना नोटिस मिळून ही हजर नसल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश दि.01/11/2014 रोजी पारीत केला.
क) विप क्र.2 तहसिलदार हे हि मंचाची नोटिस मिळूनही हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश पारीत केला.
ड) विप क्र.3 कृषी अधिकारी यांनी त्याचे म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे त्यांचे म्हणण्यानुसार दि.07/01/2014 रोजी विमा प्रस्ताव दोन प्रतीत प्राप्त झाले त्यामध्ये क्लेम फॉर्म, तलाठी प्रमाणपत्र प्रपत्र – ग, सातबारा, आठ अ, टी.सी., फेरफार नक्कल, एफ.आय.आर. घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एफ. रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्रासह तालूका कृषी अधिकारी यांचे पत्र अशा प्रकारे दोन प्रतीत विमा प्रस्ताव प्राप्त झाला पुढील कार्यवाहीस्तव पाठवला असे कृषी अधिकारी यांचे म्हणणे आहे.
इ) अर्जदाराने तक्रारी सोबत एफआयआर, अर्ज, सातबारा, आठ अ, विमा कंपनीचे अर्जदारास पत्र, अर्जदाराचे विमा कंपनीला पत्र, विमा कंपनीचे दि.28/03/2014 चे विमा नाकारल्याचे पत्र, इ. कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले. अर्जदाराचा लेखी युक्तिवाद वाचला असता सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) विमा कंपनीने अर्जदारास त्रुटीयुक्त सेवा दिली आहे का ? होय.
2) अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
ई) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. अर्जदार यांचे पती मयत प्रकाश हे रस्ता अपघातात मृत्यू पावले आहेत अभिलेखावर शासन निर्णय प्रपत्र ड प्रमाणे एफ.आय.आर. घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र इ. आवश्यक कागदपत्रे शेतकरी अपघात विमा मिळविण्यासाठी पुरेसे आहेत जे की अर्जदाराने शासन निर्णयाप्रमाणे विमा कंपनीकडे दाखल केलेले आहेत. शासन निर्णय प्रपत्र ड मध्ये परवाना दाखल करा असे नमूद केलेले नाही तरी पण शासन निर्णयाला डावलून विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकरलेला आहे. मयत प्रकाश यांची विधवा पत्नीस विमा रक्कमेपासून वंचित ठेवलेले आहे जे की चुकीचे आहे. विमा कंपनीला शासन निर्णय प्रपत्र – ड प्रमाणे सर्व कागदपत्रे मिळालेली आहेत परंतु केवळ नकारात्मक दृष्टीकोण ठेऊन अर्जदार हिच्या पतीचा चालक परवाना नसल्याने नामंजूर करुन त्रुटीयूक्त सेवा दिलेली आहे.
2. अर्जदाराचे पतीस कंटेनर ने पाठीमागून धडक देऊन मयत झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतक-यांसाठी कल्याणकारी योजना राबवलेली आहे. शेतक-यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याकरीता शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहेत.
3. अर्जदाराचा विमा प्रस्ताव विमा कंपनीला मिळालेला आहे परंतू परवाना नसल्याने दावा नामंजूर केलेला आहे.
4. अपघात घडला हे कागदपत्रावरुन जर सिध्द होत असेल तर विमा कंपनीने कुठलेही तांत्रिक कारण पुढे करुन विमादावा नामंजूर करुन नये स्वत:ची मनमानी करण्याचा अधिकार विमा कंपनीला शासनाने दिलेला नाही.
5. शेतक-यांना अर्थिक अडचणीतून मुक्त करणे व त्यांचे हित संरक्षण करणे हा पॉलिसीचा मुख्य उद्देश आहे केवळ तांत्रिक बाबींकडे लक्ष देऊन नकारत्मक दृष्टीकोनातुन विमा पॉलिसीकडे न पाहता व्यवसायिक दृष्टीकोनातून विमा पॉलिसीकडे न पाहता सकारत्मक विचार करणे अपेक्षीत असतांना विमा कंपनीने अर्जदाराला त्रुटीयूक्त सेवा दिलेली आहे ही बाब गंभीर आहे.
6. नमुद प्रकरणात आम्ही मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या शकुंतला भ्र. धोंडीराम मुंढे विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र 2010 (2) महा लॉ जनरल पेज क्र.880, या निवाडयाचा संदर्भ घेऊ इच्छित आहोत त्या निवाडयात खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे.
Besides it is to be borne in mind that as per the government Resolution date on 05/01/2005 as well as minuts of the meeting dated on 16/02/2006 that the said scheme is social welfare scheme and it is beneficial to the family members of the farmers who expired in accidental death and respondent no. 4 insurance should not have adopted the technical approach while grautivs the claims of the family members of the deceased farmer for compensation but said respondent No. 4 insurance company although as stated here in above the petitioner completed the necessary formalities and submitted the claim along with the necessary documents.
विमा कंपनीला सर्व कागदपत्रे मिळालेले असतांनासुध्दा तांत्रिक बाबींचा आधार घेत अर्जदाराला रकमेपासून वंचित ठेवलेले आहे. लाभार्थ्याला असे वंचित ठेऊन हक्क संपूष्टात येत नसतो त्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
1) विमा कंपनीने अर्जदारास विमा रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) दि.28/03/2014 पासून रक्कम देय होईपर्यंत द.सा.द.शे.9 दराने व्याज आदेश पारीत दिनांकापासून 30 (तीस) दिवसात द्यावे.
2) कंपनीने अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) आदेश पारीत दिनांका पासून 30 (तीस) दिवसात द्यावेत.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज दयावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..