Maharashtra

Nanded

CC/15/31

Smt.Swarna Pandit Kendre - Complainant(s)

Versus

Future General India Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv.Udhav Paul

08 Apr 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/15/31
 
1. Smt.Swarna Pandit Kendre
Mansingadi Tal.Kandhar
Nanded
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Future General India Insurance Co.Ltd.
Near BAner Telephone Exchange,Pune
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.B.Kulkarni PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्‍यक्ष)

 

1.     अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटीच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

      अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.    अर्जदार स्‍वर्णा केंद्रे ही मयत पंडीत उर्फ पंढरी विठठल केंद्रे यांची पत्‍नी आहे.  पंडीत केंद्रे यांचा दिनांक 22.01.2013 रोजी ट्रक क्रमांक एमएच 26/7961 पलटी झाल्‍यामुळे मृत्‍यु झालेला आहे.  पोलीस स्‍टेशन भंडारा,जिल्‍हा भंडारा येथे गुन्‍हा क्रमांक 41/2013 कलम 279,304(अ) भा.द.वि. प्रमाणे गुन्‍हा नोंदविला.  अर्जदाराचे पती मयत पंडीत  हे व्‍यवसायाने शेतकरी होते,त्‍याचे नावाने मौजे गौळ तालुका कंधार,जिल्‍हा नांदेड येथे गट क्रमांक 409 मध्‍ये 1 हेक्‍टर 20 आर एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्‍याने तो  महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी वैयक्‍तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्‍याची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे महाराष्‍ट्र शासनाने घेतली होती. महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी वैयक्‍तीक अपघात योजनेंतर्गत  अर्जदार यांनी पतीचे मृत्‍यु पश्‍चात तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक 16.02.2013 रोजी आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह क्‍लेम फॉर्म दाखल केला. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्‍कम मिळणेसाठी विनंती केली असता तुमचा क्‍लेम वर पाठविलेला आहे असे आश्‍वासन दिले व शेवटी दिनांक 17.12.2014 रोजी विम्‍याची रक्‍कम देण्‍याचे नाकारले. त्‍यामुळे अर्जदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली आहे.  तक्रारीमध्‍ये अर्जदार यांनी विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह व्‍याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्‍याचा आदेश करावा.  तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्‍यादी रक्‍कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्‍दारे केलेली आहे.

3.          गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस तामील होऊनही ते प्रकरणात हजर झालेले नाहीत. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस तामील झाल्‍यानंतर तक्रारीत हजर झाले. गैरअर्जदार 2 यांनी तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांनी स्‍वतंत्रपणे आपले लेखी जबाब व शपथपत्र  दाखल केलेले आहे.

            गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणेः-

4.          सदर प्रस्‍तावाची मुळ कागदपत्रे व प्रस्‍तावाबाबत कसलाही दावा सुचना त्‍यांना जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी,नांदेड यांचेकडून तथा अन्‍य कोणाकडूनही आजतागायत मिळालेला नाही.  जोपर्यंत प्रस्‍ताव आमच्‍याकडे येत नाही तोपर्यंत आम्‍ळी कोणत्‍याही प्रकारची कार्यवाही करु शकत नाही.  त्‍यामुळे या दाव्‍यातून आम्‍हाला मुक्‍त करण्‍यात यावे अशी विनंती  गैरअर्जदार क्र. 2 यांनी केलेली आहे.

            गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणेः-

5.          महाराष्‍ट्र शासनाने गैरअर्जदार क्र. 2 यांचे सोबत शेतकरी वैयक्‍तीक अपघात योजनेंसंदर्भात करार केलेला असून सदर करारातील अटी व शर्ती दोन्‍ही पक्षावर बंधनकारक आहे.  करारानुसार काही वाद निर्माण झाल्‍यास गैरअर्जदार ,महाराष्‍ट्र शासन व सल्‍लागार समिती यांचे प्रतिनिधी यांची जिल्‍हास्‍तरीय समिती स्‍थापन करण्‍यात आलेली आहे.  सदरील समिती समोर सर्व पक्षाची बाजू एकून 15 दिवसाच्‍या आत समिती निर्णय घेईल असे ठरलेले आहे.  त्‍यामुळे सदरील मंचास अर्जदाराची तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही.  अर्जदाराचे प्रस्‍तावावर दिनांक 15.03.2014 रोजी कागदपत्राचे पुर्ततेसाठी  गैरअर्जदार यांनी पत्र पाठविलेले आहे. परंतु कागदपत्रे मिळालेली नसल्‍याने दिनांक 14.01.2014 व दिनांक 03.03.2014 रोजी विनंती पत्र पाठविलेली आहेत. विहित कालावधीत कागदपत्रे न मिळाल्‍यामुळे दिनांक 15.03.2014 पर्यंत कागदपत्रांचे पुंर्ततेसाठी गैरअर्जदार यांनी वाट पाहिली व अर्जदाराचा दावा कंपनीने बंद केला.  गैरअर्जदार यांनी अर्जदारास 6(ड) व 6(क) हया कागदपत्रांची पुर्तता करणे संदर्भात पत्रे पाठविली होती. तसेच तहसिलदार बिलोली यांचे पत्रानसार गट कमांक 409 ची फेरफार नोंद अभिलेख शाखेत उपलब्‍ध नसल्‍याने गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा प्रस्‍ताव योग्‍यरीत्‍या नामंजूर केला व  गैरअर्जदार क्र. 3 यांनी मंचास अशी विनंती केलेली आहे की, अर्जदाराची तक्रार त्‍यांचेविरुध्‍द खर्चासह फेटाळण्‍यात यावी.

6.          अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्‍याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकला.  दोन्‍ही बाजूंनी दाखल  केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात. 

7.          अर्जदार यांचे पती मयत पंडीत केंद्रे यांचा सातबारा अर्जदार यांनी दाखल केलेला आहे.  परतु गैरअर्जदार यांनी मागणीनुसार 6(ड) व 6(क) चा उतारा अर्जदाराने दाखल केलेला नाही किंवा सदर कागदपत्रे गैरअर्जदार यांना दिल्‍याचा पुरावाही दिलेला नाही.  अर्जदाराचे  पतीचा मृत्‍यु हा अपघाती झाला आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या पोलीस पेपरवरुन स्‍पष्‍ट होते.

            महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी वैयक्‍तीक अपघात योजनेनुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्‍कम मिळणेसाठी अर्ज केला असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास कागदपत्रांची पुर्तता करणेस सांगितले. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास 6(ड) व 6(क) चा उतारा पाठविणे संदर्भात वेळोवेळी पत्र पाठविली.  अर्जदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता 6(ड) व 6(क) ही कागदपत्रे मंचासमोर नाहीत त्‍यामुळे अर्जदाराने कागदपत्रे गैरअर्जदार विमा कंपनीस दिल्‍यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्‍या प्रस्‍तावावर गुणवत्‍तेवर निर्णय घ्‍यावा असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन  मंच खालील खालील आदेश देत आहे.

                       आ दे श

 

1.     अर्जदार यांची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 3,विमा कंपनी यांचेकडे 30 दिवसाच्‍या आंत विमा दावा व त्‍यासंबंधीची कागदपत्रे दाखल करावी व गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे विमा प्रस्‍तावावर 15 दिवसाच्‍या आत गुणवत्‍तेवर निर्णय घ्‍यावा.

3.    खर्चाबाबत आदेश नाही.

4.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात. 

5.    वरील आदेशाच्‍या  पुर्ततेचा अहवाल दोन्‍ही पक्षकारांनी निकालाच्‍या तारखेपासून  45 दिवसांच्‍या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर   आदेशाच्‍या पुर्ततेसाठी ठेवण्‍यात यावे. 

 
 
[HON'BLE MRS. S.B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.