Maharashtra

Nanded

CC/15/17

Balaji Govindrao Tidake - Complainant(s)

Versus

Fullerton India Credit Company Ltd. - Opp.Party(s)

Adv. Shaikh Shafi

06 Jul 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/15/17
 
1. Balaji Govindrao Tidake
Malkoli, Tq. Loha
Nanded
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Fullerton India Credit Company Ltd.
Ali Bhai Tower Bulding, Shivaji Nagar, Nanded
Nanded
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकालपत्र   

(घोषीत द्वारा- मा. सौ.  स्मिता बी.कुलकर्णी, अध्‍यक्षा )

 

             अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द सेवेत त्रुटी दिल्‍याच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे आहे.

1.          अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द अर्जदाराचा मालासहीत (लोखंडी पाईप, अंदाजे किंमत 10 लाख रु. ) ट्रक क्र. एम.एच. 26 एच-9198 ही बेकायदेशीररित्‍या जप्‍त करुन अर्जदारास रु.5,000/- प्रतीदिन नुकसान होण्‍यास गैरअर्जदार कारणीभूत झाल्‍याने रक्‍कम रु. 50,000/- तसेच अर्जदारास झालेल्‍या मानसिक त्रास व दाव्‍याच्‍या खर्चाबाबत रक्‍कम इत्‍यादी गोष्‍टी मिळण्‍याबाबत तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराच्‍या तक्रारीवरुन अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून ट्रक खरेदीसाठी रक्‍कम रु. 11,50,000/- कर्ज घेतले असून सदरील कर्ज व्‍याजासह एकूण 48 हप्‍त्‍यामध्‍ये भरणा करावयाचे होते. अर्जदाराने आजपर्यंत 34 हप्‍त्‍यांचा भरणा केलेला आहे. अर्जदार अपघातामध्‍ये जखमी होवून अर्जदाराचा हात फॅक्‍चर झाल्‍याने अर्जदार उर्वरीत 14 हप्‍ते भरु शकलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कुठलीही पूर्वसुचना किंवा नोटीस न देता अर्जदाराचा ट्रक दिनांक 25/12/2014 रोजी बेकायदेशीररित्‍या जप्‍त केलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांना विनंती करुनही गैरअर्जदाराने अर्जदाराचा ट्रक परत केलेला नाही त्‍यामुळे अर्जदाराने वरील मागणीसाठी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीसोबत अर्जदाराने अंतरीम मनाई हुकूमाचा अर्जही दिलेला होता. अंतरीम मनाई हुकुमाच्‍या अर्जावर मंचाने नोटीस काढली. त्‍यानंतर दिनांक 6.1.2015 रोजी अंतरीम आदेश पारीत करण्‍यात आला. सदरील आदेशामध्‍ये मंचाने अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे थकीत हप्‍त्‍यापोटी रक्‍कम रु. 2,50,000/- भरणा करावे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन रक्‍कम भरणा केल्‍यानंतर त्‍वरीत अर्जदारास परत दयावे असा आदेश दिलेला होता. सदरील आदेशाची प्रत अर्जदार यांनी दिनांक 13.1.2015 रोजी घेतलेली आहे. सदर आदेश पारीत केल्‍यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडे रक्‍कम भरणा केलेला असल्‍याबद्दलचा कुठलाही पुरावा मंचामध्‍ये दाखल केलेला नाही व अर्जदार प्रकरणात उपस्थित राहिलेला नाही. यावरुन अर्जदाराच्‍या तक्रारीचे निराकरण झालेले असावे किंवा अर्जदाराला तक्रारीमध्‍ये स्‍वारस्‍य राहिलेले नसल्‍याचे दिसून येते. अर्जदाराने अंतरीम आदेशाचे पालन केलेले असल्‍याबद्दलचा कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्‍यामुळे मंचासमोर अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्‍याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

            वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.   

                                    दे

1.    अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येतो.

2.     निकालाच्‍या प्रती दोन्‍ही पक्षकारास मोफत देण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.