Maharashtra

Nagpur

CC/334/2020

SHRI AKASH KRISHNARAO GHATOLE - Complainant(s)

Versus

FULLERTON INDIA CREDIT CO.LTD. THROUGH BRANCH MANAGER & 1 OTHER - Opp.Party(s)

A.T. SAWAL

17 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/334/2020
( Date of Filing : 09 Sep 2020 )
 
1. SHRI AKASH KRISHNARAO GHATOLE
R/O HOUSE NO. 563, BHARATWADA ROAD, NEAR GOKUL DAIRY, BHARAT NAGAR, BHANDEWADI, NAGPUR 440 008
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. FULLERTON INDIA CREDIT CO.LTD. THROUGH BRANCH MANAGER & 1 OTHER
PLOT NO. 15, DECOR BUILDING, CHHAPRUNAGAR, C.A, ROAD, NEAR GHANDHI GRAIN MARKET, BAGADGANJ NAGPUR 08
NAGPUR
MAHARASHTRA
2. FULLERTON INDIA CREDIT CO.LTD. THROUGH MAIN BRANCH MANAGER
REGISTERED OFFICE 3RD FLOOR, OLD NO. 307, NEW NO. 165, PUNAMMALLI HIGH ROAD, MADURAYAVAL, CHENNAI 600095
CHENNAI
TAMILNADU
3. FULLERTON INDIA CREDIT CO.LTD. THROUGH MAIN BRANCH MANAGER
REG. OFF.AT, SUPRIME COURT PARK, 5TH & 6TH FLOOR, B WING, SUPRIME CITY, BEHIND LAKE CASTEL POWER, MUMBAI - 400073
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:A.T. SAWAL, Advocate for the Complainant 1
 ADV. MONICA PETER, Advocate for the Opp. Party 1
Dated : 17 Jan 2023
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने वि.प. 1 यांच्‍याकडून कर्ज करारनामा क्रं. 400900110269885 अन्‍वये एकूण रुपये 27,50,000/- एवढया रक्‍कमेचे कर्ज घेऊन MH 40-BG5952 विकत घेतले होते व सदरच्‍या कर्जाची परतफेड ही प्रतिमाह 65,000/- प्रमाणे करावयाची होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे मार्च 2018 ते जुन 2019 पर्यंत एकूण रक्‍कम रुपये 9,75,000/- एवढी रक्‍कम अदा केली परंतु त्‍यानंतर माहे जुन 2019 पासून कर्ज रक्‍कम अदा करु शकला नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे वाहन जप्‍त केले व त्‍यावेळी त.क.च्‍या वाहनाची इन्‍श्‍युरन्‍स प्रमाणपत्राप्रमाणे विमामुल्‍य किंमत रुपये 32,00,000/- एवढी होती.  
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने त्‍याचे वाहन जप्‍त करुन विकले,  परंतु सदरचे वाहन किती किंमतीत विकले याची माहिती दिली नाही. तसेच विक्रीच्‍या वेळी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत रुपये 29,00,000/- इतकी होती व तक्रारकर्त्‍याला वाहन कर्जापोटी विरुध्‍द पक्षाला रुपये 21,00,000/- अदा करावयाचे होते. म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून रुपये 8,00,000/- परत घेण्‍यास पात्र आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वाहन विक्रीबाबतचे कोणतेही दस्‍तावेज दिले नाही व तक्रारकर्त्‍याकडून रुपये 5 ते 6 लाख एवढया रक्‍कमेची मागणी करीत आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची धोकाधडीने विक्री करुन सेवेत त्रुटी केली असून निष्‍काळजीपण दाखविला आहे म्‍हणून दि. 07.11.2019 रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस असता विरुध्‍द पक्षाने त्‍यावर खोटे उत्‍तर दिले असल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वाहनाच्‍या विमा विमामुल्‍याप्रमाणे  रक्‍कम रुपये 8,00,000/- नोव्‍हेबंर 2019 पासून  द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.  विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, त्‍याने तक्रारकर्त्‍याला सन 2018 मध्‍ये कर्ज करारनामा क्रं. 400900110269885 अन्‍वये एकूण रुपये 27,75,000/- एवढया रक्‍कमेचे द.सा.द.शे. 13.09% प्रमाणे कर्ज दिले होते व सदरच्‍या कर्जाची परतफेड ही मासिक हप्‍ता रुपये 64,831/- प्रमाणे दि. 04.05.2018 ते 04.02.2023 प्रमाणे एकूण 58 मासिक हप्‍त्‍यात करावयाची होती.  सदरची बाब ही दि. 27.02.2018 चे Loan Cum Hypothecation Agreement प्रमाणे Crystal Clear  आहे आणि सदरच्‍या कर्ज करारनामात Co-Borrower म्‍हणून तक्रारकर्त्‍याचे वडील कृष्‍णराव घाटोले यांचे नांव नमूद आहे. तक्रारकर्त्‍याने मार्च 2018 ते जुन 2019 पर्यंत कर्जाची परतफेड केली व त्‍यानंतर जुन 2019 पासून कर्जाची परतफेड केलेली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला दि. 09.10.2019 ला Pre Sale Notice  पाठविण्‍यात आली होती, त्‍यावर देखील तक्रारकर्त्‍याने कोणतेही दखल न घेतल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला नाईलाजास्‍तव पुढील कार्यवाही  करण्‍याशिवाय पर्याय नव्‍हता. तक्रारकर्त्‍याचे वाहन रुपये 17,80,000/- एवढया रक्‍कमेत विकल्‍या गेले असून तक्रारकर्त्‍याकडून उर्वरित कर्जापोटी रक्‍कम रुपये 9,11,401.27/- एवढी रक्‍कम घेणे बाकी आहे. तकारकर्त्‍याने दि. 07.11.2019 रोजी पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीसला विरुध्‍द पक्षाने उत्‍तर पाठविलेले असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रारीतील प्रार्थना मान्‍य होण्‍या योग्‍य नसल्‍याने खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.   
  2.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                  होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?            नाही

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

5. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –.तक्रारकर्त्‍याने वि.प. 1 यांच्‍याकडून सन 2018 मध्‍ये कर्ज करारनामा क्रं. 400900110269885 अन्‍वये एकूण रुपये 27,75,000/- चे कर्ज द.सा.द.शे. 13.09% प्रमाणे दिले होते व सदरच्‍या कर्जाची परतफेड ही मासिक हप्‍ता रुपये 64,831/- प्रमाणे दि. 04.05.2018 ते 04.02.2023 प्रमाणे एकूण 58 मासिक हप्‍त्‍यात करावयाची होती.  सदरची बाब ही दि. 27.02.2018 चे Loan Cum Hypothecation Agreement प्रमाणे Crystal Clear  आहे व  सदरच्‍या कर्ज कारारनामात तक्रारकर्त्‍याचे वडील कृष्‍णराव घाटोले यांचे नांव Co-Borrower म्‍हणून  नमूद आहे हे नि.क्रं.9 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते, यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने मार्च 2018 ते जुन 2019 पर्यंत कर्जाची परतफेड केली व त्‍यानंतर जुन 2019 पासून कर्जाची परतफेड केलेली नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला दि. 09.10.2019 ला Pre Sale Notice  पाठविली होती हे नि.क्रं. 9(4) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यावर तक्रारकर्त्‍याने कोणतीही दखल न घेतल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने उर्वरित कर्ज वसुलीकरिता नियमाप्रमाणे कार्यवाही केलेली असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे दिसून येते.   

     सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.