Maharashtra

Nagpur

CC/14/561

Shri Adv Ramesh Pannalal Darda - Complainant(s)

Versus

Fullerton India Credit Co Ltd - Opp.Party(s)

Vilas Dongre

15 Dec 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/14/561
 
1. Shri Adv Ramesh Pannalal Darda
R/o 11,Pruthvi Wandan Ramdaspeth Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Fullerton India Credit Co Ltd
Central Avenue Road Nagpur
Nagpur
Maharastra
2. Reserve Bank Of India
R.B. I Square Nagpur.
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Vilas Dongre, Advocate
For the Opp. Party:
ORDER

(Passed on : 15/12/2014)

तक्रारकर्त्‍यातर्फे अधिवक्‍ता श्री. विलास डोंगरे यांचा दाखलपूर्व सुनावणी युक्तिवाद ऐकला, त्‍यांनी सांगितले की, तक्रारकर्ता नामवंत वकील असून त्‍यांनी विरुध्‍द कंपनीस कायदे विषयक व्‍यावसायिक सेवा पुरविली आहे. सदर सेवेबाबत फी रु.3,20,650/- ची बिले तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे (दि.07.08.2010 ते 01.04.2012) या कालावधीची पाठविली परंतु वारंवार पाठपुरावा करुनही विरुध्‍द पक्षाने सदर बिलांची रक्‍क्‍म तक्रारकर्त्‍यास दिली नाही. म्‍हणून सदर बिलांच्‍या रकमेच्‍या वसुलीसाठी सदर तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीतील वरील कथनावरुन तक्रारकर्ता हा सेवादाता असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाकडून त्‍याने कोणतीही सेवा विकत घेतली नसल्‍याने तो विरुध्‍द पक्षाचा ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 2 (i) (d) प्रमाणे ग्राहक होत नाही व म्‍हणून मंचाला सदरची तक्रार ग्राह‍क तक्रार म्‍हणून चालविण्‍याची अधिकारकक्षा नाही.

तक्रारकर्त्‍याच्‍या विव्‍दान अधिवक्‍त्‍यांनी III(2000) CPJ 104, R.A.Thorat -v/s- Govindan Gopinathan या महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्‍या निवाडयाचा दाखला देत सदर तक्रार चालविण्‍याची मंचाला अधिकारकक्षा असल्‍याचा युक्तिवाद केला.

वरील न्‍याय निर्णयातील वस्‍तुस्थिती आमच्‍या समोरील प्रकरणातील वस्‍तुस्थितीला पूर्णतः विरुध्‍द होती. त्‍या प्रकरणात वकीलांनी पक्षकाराकडून केस स्विकारल्‍यानंतर ती योग्‍य प्रकारे चालविली नाही तर ही बाब वकीलाने द्यावयाच्‍या सेवेतील न्‍यूनता आहे व त्‍यासाठी  पक्षकारास ग्राहक संरक्षण अधिनियमाचे तरतुदी अंतर्गत्‍ ग्राहक तक्रार दाखल करता येते असा निर्णय मा. राज्‍य आयोगाने दिला आहे. आमच्‍या समोरील प्रकरणातील वस्‍तूस्थिती भिन्‍न असल्‍याने तक्रारकर्त्‍यास सदर न्‍याय निर्णयाचा फायदा घेता येणार नाही.

आमच्‍या समोरील प्रकरणातील तक्रारकर्ता स्‍वतः सेवादाता असून कोणत्‍याही प्रकारे तो विरुध्‍द पक्षाचा ग्राहक होत नसल्‍याने त्‍याची तक्रार दाखल करुन घेण्‍याची मंचाला अधिकारकक्षा नसल्‍याने तक्रार खारिज करण्‍यांत येत आहे.

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.