DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/291/2017 | ( Date of Filing : 13 Jul 2017 ) |
| | 1. Shri Yogesh Narsibhai Waghela, Prop. Studio Nakul Arts | R/o. U-1, Archana, HB Town, Old Pardi Naka, Nagpur 440035 | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Fujifilm India Private Limited, Through its Directors/Aughorized Person | Office- 6th floor, Universal Trade Tower, Gurgaon-Sohna Road, Sector- 49, Haryana 122001 | Haryana | Haryana | 2. Shadows Photography, Through its Authorized Signatory Prop. Hiren Patel | Central Avenue, Shop No. 4, Jaideo Apartments, Chhapru Nagar, Nagpur 440008 | Nagpur | Maharashtra | 3. Vardhaman Photo Emporium, Through its Authorized Signature | Shop No. 06, Khatod Complex, Nirala Bazar Road, Aurangabad 431001 | Aurangabad | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT | | HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | |
|
For the Complainant: | For the Opp. Party: | |
Dated : 13 Mar 2019 |
Final Order / Judgement | आदेश ( पारित दिनांक 13.03.2019) मा. अध्यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्या आदेशान्वये - तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याचा नकुल आर्टस फोटोग्राफी स्टुडिओ आहे आणि सदरहू व्यवसाय तो स्वतःच्या उपजीविकेसाठी करतो. विरुध्द पक्ष क्रं. 1 हा फ्युजीफिल्म ब्रान्ड प्रिंटरचा उत्पादक आहे आणि विरुध्द पक्ष क्रं. 2 व 3 हे डिलर आहेत. विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्याने ASK 300 Thermal Printer and three Rolls दिनांक 25.07.2016 रोजी रुपये 60,500/- ला खरेदी केले. सदरहू प्रिन्टर हा योग्य प्रकारे काम करीत नव्हता, म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्याकडे तक्रार केली. परंतु विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांच्या पैकी कुणीही सदरचा प्रिन्टर दुरुस्ती करण्याकरिता आले नाही. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने दि.25.03.2017 रोजी विरुध्द पक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली आणि नोटीस प्राप्त झाल्यानंतर ही विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी सदरहू प्रिन्टर हा दुरुस्त करुन दिला नाही व वॉरन्टी कालावधीत असतांना ही बदलवून दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्द पक्ष यांनी सदरहू Thermal Printer हा बदलून द्यावा किंवा त्याची किंमत रक्कम रुपये 60,500/- परत करावी आणि सदरहू रक्कमेवर द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याजाची मागणी केली. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/-, व्यवसायातील नुकसानी पोटी रुपये 25,000/-, नोटीस खर्चाबाबत रुपये 2,000/- आणि तक्रारीचा खर्च ही विरुध्द पक्षाकडून मिळावा अशी मागणी केली.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ही ते मंचासमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे दिनांक 17.07.2018 रोजी त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने केलेला तोंडी युक्तिवाद, त्यांनी तक्रारी बरोबर दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद इत्यादीचे अवलोकन केले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे .
मुद्दे निष्कर्ष - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीच्या समर्थनार्थ Invoice No. 103 ची प्रत नि.क्रं. 2(1) वर दाखल केली आहे. सदरहू Invoice हा विरुध्द पक्ष 2 यांनी ASK 300 Thermal Printer करिता दिलेला आहे आणि त्याची किंमत रक्कम रुपये 60,500/- दर्शविलेली आहे. नि.क्रं. 2(2) मध्ये वॉरन्टीच्या शर्ती सुध्दा आहेत आणि तक्रारकर्त्याने नि.क्रं. 2(4) प्रमाणे विरुध्द पक्ष यांना ई-मेल सुध्दा पाठविलेला आहे. तसेच अॅड. गुप्ता यांच्या मार्फत पाठविलेल्या नोटीसची प्रत ही अभिलेखावर दाखल केली आहे. सबब तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक असून त्यांनी सदरहू प्रिन्टर हा दुरुस्त करुन दिला नाही आणि वॉरन्टी कालावधीत असतांना बदलवून ही दिला नाही, ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष यांना नोटीस मिळाल्यानंतर ही ते मंचात हजर झाले नाही आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे तक्रारीला आक्षेप घेतलेला नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार वाजवी खर्चासह मंजूर करणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी सदरहू Thermal Printer हा बदलून द्यावा किंवा त्याची किंमत तक्रारकर्त्याला परत करावी असा आदेश देणे योग्य आहे. तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 10,000/- व तक्रार खर्चापोटी रक्कम रुपये 5,000/- देणे योग्य आहे असे आमचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिमआदेश पारित करण्यात येते. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला ASK 300 Thermal Printer हा बदलून द्यावा . किंवा ते शक्य नसल्यास सदरहू प्रिन्टर परत घेऊन तक्रारकर्त्याला प्रिन्टरची किंमत रक्कम रुपये 60,500/- परत द्यावी आणि सदरहू रक्कमेवर द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याज तक्रार दाखल तारीख म्हणजेच दिनांक. 13.07.2017 पासून प्रत्यक्ष रक्कमेच्या अदाएगी पर्यंत द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000 व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL] | PRESIDENT
| | [HON'BLE MR. NITIN M. GHARDE] | MEMBER
| | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| |