(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 23 जुन 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदारास त्याचे व्यवसायामध्ये मोबाईलची आवश्यकता असल्याने, अर्जदार यांनी मोबाईल विक्रेता गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून स्वतःचे नावे HTC कंपनीचा Desire 816 रुपये 24,900/- मध्ये दि.13.7.2014 बिल क्र.1362 अन्वये मोबाईल खरेदी केला. सदर मोबाईलची 12 महिन्याची वॉरंटी देण्यात आली असून त्याची वॉरंटी दि.13.7.2015 पर्यंत होती. सदर मोबाईल हॅन्डसेट खरेदी केल्यानंतर अवघ्या 2 दिवसात ऑटोरोटेडचा बिघाड निर्माण झाला. सर्विस सेंटरला मोबाईल दुरुस्तीकरीता 1 किंवा 2 सप्टेंबर 2014 ला दिल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर 2 ऑक्टोंबर 2014 ला मिळाला. परंतु, 2 ते 3 दिवसात पुन्हा मोबाईलचे कॅमे-यामध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे अर्जदार यांनी दि.15 नोव्हेंबर 2014 ला सर्विस सेंटर नागपुर येथे गेले असता त्यांनी मदर बोर्ड किंवा कॅमेरा बदलावा लागेल असे सांगीतले. त्यामुळे अर्जदार यांनी मोबाईल रिप्लेसमेंट करुन मिळावा असे सर्विस सेंटरला सांगीतले. सर्विस सेंटर नागपुर यांनी जुण्या डिझायर 816 मध्ये बिघाड आल्याचे व रिपेअर करीता हॅन्डसेंट देण्याचे सांगीतले, परंतु अर्जदारास मान्य नसल्याने ते परत आले. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना 4 नोव्हेंबर 2014 ला नोटीस पाठविली. परंतु, त्यानी नोटीसाचे उत्तर दिले नाही. त्यामुळे अर्जदार HTC कंपनीचा Desire 816 हॅन्डसेट बदलवून देण्यात यावा, ते शक्य नसल्यास हॅन्डसेटची किंमत रुपये 24,900/- परत करावा, तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- व प्रकरणाचा खर्च रुपये 10,000/- देण्याची प्रार्थना अर्जदाराने केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.5 नुसार लेखीउत्तर व दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ला शेवटची संधी देवून सुध्दा लेखीउत्तर दाखल केले नाही, त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 विरुध्द प्रकरण गैरअर्जदार क्र.2 चे लेखीउत्तराशिवाय पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर दि. 23.4.2015 ला पारीत करण्यात आला.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.5 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदार श्रीकांत बाबुराव कातरकर यांनी दि.13.7.2014 ला HTC कंपनीचा Desire 816 आग्रहावर ऑर्डर देवून मागवीला होता. HTC कंपनीचा Desire 816 हा मोबाईल देण्याचे अगोदर ग्राहकाला सांगण्यात आले होते की, या कंपनीशी गैरअर्जदाराचे काहीही व्यवहार नसल्यामुळे सर्विस संबंधीत काहीही सहायता आम्ही करु शकणार नाही. HTC Desire 816 मध्ये काहीही बिघाड आल्यास तुम्हाला सर्वीस सेंटर मध्ये जावे लागेल. अर्जदाराने HTC कंपनीचा Desire 816 हाच मोबाईल मागवून द्या, त्याची सर्वीसची पूर्णपणे जबाबदारी माझी राहील, या अटीवर अर्जदारास HTC कंपनीचा Desire 816 हा मोबाईल दि.13.7.2014 ला मागवून दिला. मोबाईल घेतांना अर्जदाराने सर्व अटी मान्य केल्या होत्या, तरीही या प्रकरणात आम्ही ग्राहकाची काहीही सहायता करु शकत नाही. तरी आम्ही HTC कंपनीच्या सर्वीस सेंटरला अशी विनंती करतो की, ते लवकरात लवकर मोबाईल मधले बिघाड दुर करावे किंवा ग्राहकाला मोबाईल बदलवून द्यावा.
4. अर्जदाराने नि.क्र.6 नुसार प्रतीउत्तर व नि.क्र.7 नुसार 1 दस्ताऐवज, नि.क्र.18 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.9 नुसार प्रतीउत्तर, नि.क्र.19 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. नि.क्र.1 वर दि.27.5.2015 ला गैरअर्जदाराचे शपथपञाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारीत. तसेच गैरअर्जदार क्र.2 चे लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर दि.15.6.2015 ला पारीत केला. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी बयान, प्रतीउत्तर, दस्ताऐवज, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : नाही.
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदारास त्याचे व्यवसायामध्ये मोबाईलची आवश्यकता असल्याने, अर्जदार यांनी मोबाईल विक्रेता गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून स्वतःचे नावे HTC कंपनीचा Desire 816 रुपये 24,900/- मध्ये दि.13.7.2014 बिल क्र.1362 अन्वये मोबाईल खरेदी केला, ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द कोणतेही आरोप केलेले नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द व त्याचे सर्वीस सेंटरबाबत आरोप केलेले आहे. अर्जदाराने तक्रारीतील मागणी गैरअर्जदार क्र.2 नी पुर्तता केली असून नि.क्र.14 वर अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 चे नांव प्रकरणात कमी करुन देण्याचा अर्ज शपथपञासोबत दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 नी अर्जदाराला गैरअर्जदार कंपनीचे हॅन्डसेंट बदलवून दिले व त्यासोबत 3 महिन्याची वॉरंटी सुध्दा दिलेली आहे. त्याबाबत अर्जदाराला समाधान असून गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द तक्रार मागे घेण्यास तयार आहे, असे अर्जदाराने दाखल नि.क्र.14 वरील अर्जामध्ये नमूद आहे. गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द तक्रारीत कोणतेही आरोप नसल्याने व गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदारास गैरअर्जदार कंपनीचे हॅन्डसेट बदलवून दिले व अर्जदाराला त्यावर समाधान असल्याने असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन व गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द तक्रारीत कोणतेही आरोप नसल्याने व गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदारास गैरअर्जदार कंपनीचे हॅन्डसेट बदलवून दिले व अर्जदाराला त्यावर समाधान असल्याने, अर्जदाराने तक्रारीत केलेली मागणी पूर्ण झाली असल्याने मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षानी आप-आपला खर्च सहन करावे.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/6/2015