Maharashtra

Ahmednagar

CC/16/285

Vasant Asaram Bhagwat - Complainant(s)

Versus

Founder Chairman,Pramod Bhaichand Raisoni And Others 2 - Opp.Party(s)

Self

11 Dec 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/285
( Date of Filing : 14 Oct 2016 )
 
1. Vasant Asaram Bhagwat
A- Vadule, P- Kukana, Tal- Newasa,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Founder Chairman,Pramod Bhaichand Raisoni And Others 2
E-2/3,4,5 Raymond Chauphuli, MIDC, Ajintha Road, Jalgaon- 425 001
Jalgaon
Maharashtra
2. Chief Executive Officer/ Avasayak Officer, Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co.op. Credit Society Ltd.
E-2/3,4,5 Raymond Chauphuli, MIDC, Ajintha Road, Jalgaon-425 001
Jalgaon
Maharashtra
3. Branch Manager, Bhaichand Hirachand Raisoni Multi-State Co-op. Society Ltd.
Branch- Kukana, Tal- Newasa,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Self, Advocate
For the Opp. Party: v.S.Sonavane, Advocate
Dated : 11 Dec 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.    तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये सामनेवाला विरुध्‍द दाखल केली आहे.

2.    तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, तक्रारदार हे मौजे वडुले ता.नेवासा जि.अहमदनगर येथील रहिवासी असून सामनेवाला नं.1 हे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्‍टीस्‍टेट को.ऑफ सोसायटी लि.जळगांव या संस्थेचे मुख्‍य कार्यालयाचे शाखाधिकारी आहेत. सदर संस्‍था महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थेच्‍या कायद्याप्रमाणे अस्तित्‍वात आलेली संस्‍था असून तिचे मुख्‍य कार्यालय जळगांव येथे आहे. सामनेवाला नं.1 हे सदर संस्‍थेचे चेअरमन आहेत. सामनेवाले नं.2 हे सदर संस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी/ आवश्‍यक म्‍हणुन काम पाहत आहेत. सामनेवाला नं.3 हे शाखाधिकारी आहेत. सदर संस्‍था ही निरनिराळया ठेवीदाराकडून ठेवी गोळा करणे आणि कर्जदारांना कर्जपुरवठा करणे इत्‍यादी स्‍वरुपाचे बँकिंग काम सदरील सामनेवाले नं.1 कुकाण येथे संस्‍थेचे माध्‍यमातून करतात. तक्रारदार यांनी भविष्‍यकाळात स्‍वतःच्‍या आजारपणासाठी, औषधोपचारासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी, अडीअडचणीसाठी व मुलांच्‍या शिक्षण तदानुषंगिक कारणांसाठी पैशाची तरतुद व्‍हावी म्‍हणुन मेहनतीने जमा केलेले पैसे सामनेवाला नं.1 यांच्‍या कुकाणा येथील शाखेत भविष्‍यकाळाची आवश्‍यकता म्‍हणुन तक्रारदाराने स्‍वतःच्‍या नावाने मुदत ठेवीने गुंतवणुक केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मुदत ठेवीची पावती दिलेली असून त्‍यावर संस्‍थेच्‍या वतीने संस्‍थेचे मॅनेजर, कॅशिअर व क्‍लार्क यांनी सहया केलेल्‍या आहेत. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांना मुदत ठेवीने ठेवलेल्‍या रक्‍कमेचा तपशिल खालील प्रमाणे असा आहे.

अ.क्र.   

ठेवीदाराचे नांव   

पावती क्रमांक

गुंतवणुक दिनांक   

गुंतवणुक रक्‍कम

देय दिनांक   

मिळणारी रक्‍कम

1.

वसंत आसाराम भागवत

0168638

5.12.13

78,000

5.12.14

88,140

2.

वसंत आसाराम भागवत

0168689

9.1.14

50,000

9.1.15

56,500

3.

वसंत आसाराम भागवत

0168785

20.3.14

10,000

20.3.15

11,300

 

 

 

एकुण गुंतवणुक

1,38,000

मिळणारी रक्‍कम

1,55,940

अशा प्रकारे तक्रारदार यांनी वर नमुद केलेल्‍या ठेव पावतीव्‍दारे सामनेवाला नं.1 संस्‍थेकडे मुदत ठेवीने सदरील रकमेची 13 टक्‍के व्‍याज दराने गुंतवणुक केलेली आहे. सामनेवाला यांनी मुदत पुर्तीनंतर मुदत ठेवीची रक्‍कम व त्‍यावर नियमाप्रमाणे होणारे व्‍याज तक्रारदाराना परत करण्‍याचे सामनेवाले यांचेवर कायदेशीर व नैतिक बंधन होते व आहे. तक्रारदार यांना पैशाची अत्‍यंत आवश्‍यकता असल्‍याने त्‍यांनी सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी मागणी केली. परंतु सामनेवाले यांच्‍या कर्मचा-यांनी तक्रारदारास रक्‍कम न देता उडवा-उडवीची उत्‍तरे दिली तक्रारदाराने वेळोवेळी सामनेवाला यांना कार्यालयात भेटून रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही. व रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. म्‍हणून तक्रारदार यांनी वरील नमुद मुदत ठेवीमध्‍ये गुंतविलेल्‍या रकमा व्‍याजासह मिळणेसाठी सदरील मंचात तक्रार दाखल करुन परिच्‍छेद (5) प्रमाणे रकमेची मागणी केली.

3.    तक्रारदार यांची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले नं.1 ते 3 यांना नोटीस पाठविण्‍याचा आदेश पारीत झाला व सामनेवाला नं.1 ते 3 यांना मंचातर्फे नोटीस पाठविण्‍यात आल्‍या. सामनेवाला नं.2 मुख्‍य कार्यकारी अधिकारी/ अवसायक हे सदर प्रकरणात वकील श्री.विशाल सोनवणे यांचेमार्फतम हजर झाले. परंतू त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. सबब सामनेवाला नं.2 यांचेविरुध्‍द निशाणी 1 वर विना कैफियतचा आदेश पारीत करण्‍यात आला.

4.    सामनेवाला नं.1 यांना मे.मंचातर्फे पाठविलेली नोटीस “ दिलेल्‍या पत्‍त्‍यावर सदर व्‍यक्‍ती राहत नाही ” असा पोष्‍टाचा शेरा मारुन परत आली आहे. आणि सामनेवाला नं.3 यांना मे.मंचातर्फे पाठविलेली नोटीस “ सदर नावाची पतसंस्‍था बंद आहे सबब पाठविणारास परत ” असा पोष्‍टाचा शेरा मारुन परत आली आहे.   सबब तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 व 3 यांचे विरुध्‍द कार्यवाही करणेबाबत स्‍टेप्‍स घेणेबाबत संधी दिली होती. परंतू तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 व 3 यांचे विरुध्‍द कोणतीही कार्यवाही करणेबाबत स्‍टेप्‍स घेतली नाही. म्‍हणून सामनेवाला नं.1 व 3 यांचे विरुध्‍द प्रस्‍तूतची तक्रार खारीज करण्‍याचा आदेश निशाणी 1 वर करण्‍यात आला.  

5.    तक्रारदार यांची तक्रार, प्रतिज्ञापत्र व सोबत जोडलेली कागदपत्र यांचे अवलोकन केले. व प्रस्‍तूत निकालाचे न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित  होतात. व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.

मुद्देः

  उत्‍तर

(1)सामनेवाले यांनी तक्रारदाराला सेवा देण्‍यात त्रुटी

केली आहे काय ?

:होय

(2)तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांच्‍याकडून मुदत ठेवीच्‍या रक्‍कमा आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत काय.?

: होय

केवळ सामनेवाला नं.2 कडून

(3) आदेश काय ?

:अंतिम आदेशाप्रमाणे

कारण मिमांसा

6.    मुद्दा क्र.12’:-  तक्रारदार यांनी सामनेवाले संस्‍थेच्‍या कुकाणा ता.नेवासा जि.अहमदनगर शाखेत खालील नमूद केल्‍याप्रमाणे

 

अ.क्र.   

ठेवीदाराचे नांव   

पावती क्रमांक

गुंतवणुक दिनांक   

गुंतवणुक रक्‍कम

देय दिनांक   

मिळणारी रक्‍कम

1.

वसंत आसाराम भागवत

0168638

5.12.13

78,000

5.12.14

88,140

2.

वसंत आसाराम भागवत

0168689

9.1.14

50,000

9.1.15

56,500

3.

वसंत आसाराम भागवत

0168785

20.3.14

10,000

20.3.15

11,300

 

 

 

एकुण गुंतवणुक

1,38,000

मिळणारी रक्‍कम

1,55,940

 

वरील नमुद पावतीवरील रकमा १३ टक्‍के व्‍याजदराने एक वर्ष मुदतीसाठी ठेव योजनेत ठेवले. याप्रमाणे तक्रारदार ठेव पावतींचा तपशील नि.नं.1 परिच्‍छेद 2 मध्‍ये दिलेला आहे. सदरहु मुदत ठेव पावत्‍या नि.नं.3/1 ते 3/3 वर क्षेरॉक्‍स प्रतित दाखल आहेत. याप्रमाणे सामनेवालेने पावतीवर दर्शविल्‍याप्रमाणे व्‍याजही देण्‍याचे बंधन घालून घेतले आहे.                          

7.    तक्रारदार यांनी सामनेवालेंकडे मुदत ठेवीत रक्‍कम गुंतविली व त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे. सामनेवाले नं.2 यांना नोटीस बजावणी झाली व ते वकीलामार्फत प्रकरणात हजर झाले परंतू त्‍यांनी कैफियत दाखल केली नाही. त्‍यानी तक्रारदाराचे म्‍हणणे खोडून काढण्‍याची संधी गमावली.

8.    सामनेवाला नं.1 व 3 यांना पाठविलेल्‍या नोटीसा पोष्‍टाचा शेरा मारुन परत आल्‍या. त्‍यावर तक्रारदार यांनी त्‍यांचे विरध्‍द कार्यवाही करणेबाबत कोणतीही स्‍टेप्‍स घेतली नाही. म्‍हणून सामनेवाला नं1 व 3 यांचे विरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार खारीज करण्‍याचे आदेश निशाणी 1 वर करण्‍यात आले आहे.

9.    तक्रारदार यांनी आपल्‍या कथनाचे पुष्‍टयर्थ सबळ कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केला आहे. सामनेवाले सोसायटीकडे मुदत ठेवीच्‍या रकमेची व्‍याजासह मागणी करुनही सामनेवालेंनी त्‍याची दखल घेतली नाही व रक्‍कम अदयापही अदा केली नाही. वास्‍तवीक सदर मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपल्‍यावर व तक्रारदाराने मागणी केल्‍यावर सदर रक्‍कम पावतीवर नमुद असलेल्‍या व्‍याजासह तक्रारदार यांना देणे सामनेवाले यांचेवर बंधनकारक व गरजेचे होते. परंतु त्‍यांनी ती रक्‍कम न दिल्‍यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले. सबब तक्रारदार हे मुदत ठेवीच्‍या रकमा व्‍याजासह मिळण्‍यास पात्र असून ते मिळण्‍याकामी सामनेवाले यांनी सेवा देण्‍यात निश्चितच त्रुटी केली आहे.

10.   भाईचंद हिराचंद रायसोनी मल्‍टीस्‍टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटीचे सामनेवाले नं.1 संस्‍थापक चेअरमन आहेत, सामनेवाले नं.२ मुख्‍य कार्यकारी अधिकारी/अवसायक आहेत तर सामनेवाले नं.3 हे शाखाधिकारी आहेत. सामनेवाला नं.1 व 3 यांचे विरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार खारीज करण्‍याचे आदेश निशाणी 1 वर पारीत केले आहेत. सबब तक्रारदार यांना मुदत ठेवीच्‍या रकमा व्‍याजासह परत करण्‍यास सामनेवाले नं.2 हे जबाबदार असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब वरील मुदत ठेवीमध्‍ये दर्शविलेल्‍या रकमा व्‍याजासह होणारी रक्‍कम तक्रारदार यांना देण्‍याचा आदेश करणे न्‍यायोचित होईल.

11.        तक्रारदार यांनी ठेव रकमेची मागणी करुनही ती न मिळाल्‍याने त्‍यांना  निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब त्‍यापोटी व या तक्रार अर्जाचे खर्चापोटी काही रक्‍कम तक्रारदार यांना मंजूर करणे न्‍यायसंगत होईल. म्‍हणुन मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

12.        मुद्दा क्र.3:-सबब मुद्दा क्र. ‘1’ व ‘2’ चे अनुषंगाने खालील आदेश पारित करण्‍यात येत आहे.  

:- आदेश -:

1.    तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.                

2.    सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.0168638(नि.नं.3/1) नुसार ठेव दि.05/12/2013 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.05/12/2013 पासून द.सा.द.शे.13 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार यांना अदा करावी.

3.    सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.0168689(नि.नं.3/2) नुसार ठेव दि.09/01/2014 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.09/01/2014 पासून द.सा.द.शे.13 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार यांना अदा करावी.

4.    सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.0168785(नि.नं.3/3) नुसार ठेव दि.20/03/2015 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.20/03/2015 पासून द.सा.द.शे.13 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार यांना अदा करावी.

5.    सामनेवाले नं.1 व 3 यांचे विरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार खारीज करण्‍यात येते.

6.    सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारास झालेल्‍या आर्थिक,शारीरीक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्‍कम रु .10,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दहा हजार मात्र) व या अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) द्यावेत व त्‍यांनी या अर्जाचा खर्च स्‍वतः सोसावा.

    7.    या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना मोफत देण्‍यात यावी.

    8.    या प्रकरणाची “ब” व “क” फाईल तक्रारदार यांना परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.