Maharashtra

Gondia

CC/11/32

Shri Murli S/o Kevalram Jotwani - Complainant(s)

Versus

Force Motors Limites,Through its Managing Director, Mr. Prasan Raj Firodia - Opp.Party(s)

M.S.Khandait/M.Bapat/G.Bapat/S.V.Khanted/S.R.Rathod/Anita R.Das

22 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/32
 
1. Shri Murli S/o Kevalram Jotwani
R/o 258,Zulelal Ward, Sindhi Colony, Gondia
Gondia
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Force Motors Limites,Through its Managing Director, Mr. Prasan Raj Firodia
Mumbai Pune Road,Akurdi
Pune -411035
Maharashtra
2. M/s Shree Motors,Through Rahul Radheshyam Somani
Nag Mandir Sq. ,Nr. NITM Garden, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shri. Pradeep Pyaselal Dube,Sr. Marketing Executive
Bajaj Ward, Gondia
Gondia
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. R.D. Kundle PRESIDENT
 HON'ABLE MRS. Alka Patel MEMBER
 HONABLE MS. Geeta R. Badwaik MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रार क्रमांक     32/2011
 
 
( आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्षा, श्रीमती आर.डी.कुंडले)
 
                                  -- निकालपत्र --
                           ( पारित दि. 21 नोव्‍हेबंर 2011)
 
      .
1                    तक्रार थोडक्‍यात–
तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 प्रदिप दुबे, मार्केटिंग एग्‍झेक्‍युटिव्‍ह यांच्‍याकडून स्‍वतःच्‍या उदरनिर्वाहाकरिता वाहन खरेदी केले. त्‍याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
      Kind of Vehicle               - SCV
          Type of body                  – 4 WPU Trum -15
          Year of Manufacture        – April 2010
          Maker Name                   - Force Motors
          Chassis No.                     - MCIBIADA3AA001987
          Engine No.                      - D30007489
          Fuel used in Engine         - Diesel
          No. of Cylinder               - One         
                            
2                    विरुध्‍द पक्ष 1 हे उपरोक्‍त वाहनाचे पुणे येथील उत्‍पादक आहेत. विरुध्‍द पक्ष 2 हे विरुध्‍द पक्ष 1 चे नागपूर येथील अधिकृत विक्रेते आहेत. विरुध्‍द पक्ष 3 हे विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांचे एजंट ( Sub-Delear) आहेत . ते स्‍थानिक गोंदिया येथे राहतात.
3                    तक्रारकर्त्‍याने वाहन नोव्‍हेबंर 2010 मध्‍ये खरेदी केले. त्‍याची मुळ किंमत रुपये 2,90,000/- व व्‍याज रुपये 40,000/- होते. तक्रारकर्त्‍याने रुपये 75,000/- Down payment  म्‍हणून सुरुवातीला दिले .दरमहा हप्‍ता रुपये 7,000/- ठरला होता असे त.क. म्‍हणतो.
4                    जानेवारी-2011 मध्‍ये वाहनात Starting Problem  उत्‍पन्‍न झाला म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वाहन विरुध्‍द पक्ष 3 (गोंदिया) कडे नेले. त्‍याच्‍या सल्‍ल्‍यावरुन ऑईल बदलले, त्‍याचा खर्च रुपये 1,000/- आला.
5                    पुन्‍हा 15 दिवसानी तोच दोष उत्‍पन्‍न झाला. म्‍हणून यावेळी वाहन विरुध्‍द पक्ष 2 नागपूर यांच्‍याकडे दुरुस्‍तीसाठी नेले. त्‍यांनी 2 दिवसानी वाहन परत केले.
6                    पुन्‍हा फेब्रुवारी मध्‍ये तोच दोष उत्‍पन्‍न झाला. विरुध्‍द पक्ष 2 चे तज्ञांनी वाहन तपासून पंपामध्‍ये हवा गेली आहे असे सांगितले.
7                    पुन्‍हा 2 दिवसानंतर तोच दोष उत्‍पन्‍न झाल्‍याने विरुध्‍द पक्ष 2 ला सांगितले होते. त्‍यांनी काहीही केले नाही. नंतर वायर तुटल्‍याचे लक्षात आले म्‍हणून विरुध्‍द पक्ष 3 गोंदिया यांनी 
ती बदलून दिली. त्‍याचा खर्च रुपये 405/- आला. मे-2011 मध्‍ये वाहन चालू असतांना तिरोडा येथे एकदम थांबले व पुन्‍हा सुरु झाले नाही.  तक्रारकर्त्‍याने वाहन विरुध्‍द पक्ष 2 नागपूर यांच्‍या सर्व्हिसिंग स्‍टेशनमध्‍ये नेले . तेथे पंप बदलल्‍यानंतर वाहन सुरु झाले पण केवळ 4 – 5 दिवस चालले व पुन्‍हा बंद पडले. ही बाब विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांना कळविली. त्‍यांनी दुरुस्‍तीसाठी तज्ञ पाठविले पण ते वाहन दुरुस्‍त करु शकले नाही. सध्‍या हे वाहन विरुध्‍द पक्ष 3 गोंदिया यांच्‍या ताब्‍यात नादुरुस्‍त अवस्‍थेत पडून आहे. वाहन फक्‍त 7178 कि.मी. चालले. दि. 05-06-2011 नंतर हे वाहन चालले नाही.
8                    यावरुन विरुध्‍द पक्ष 1, 2, 3 यांनी तक्रारकर्त्‍याला सदोष वाहन विकले ते दुरुस्‍ती पलीकडचे आहे ही बाब सेवेतील त्रृटी तसेच अनुचित व्‍यापार प्रथा ठरते असे तक्रारकर्ता म्‍हणतो.
9                    तक्रारकर्ता गरीब आहे. त्‍याचे वाहन चालू नसल्‍याने वाहनाचा हप्‍ता रुपये 7000/- भरणे व उदरनिर्वाह चालविणे कठिण झाले आहे. विरुध्‍द पक्षाने वेळोवेळी आश्‍वासन दिले प्रत्‍यक्ष वाहन दुरुस्‍ती केली नाही.
10                विरुध्‍द पक्ष 1 (उत्‍पादक पुणे ) यांनी अटी व शर्ती प्रमाणे पहिली फ्री सर्व्हिसिंग ( मोफत सेवा) विरुध्‍द पक्ष 2 व 3 कडून करुन दिले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने owner’s manual नुसार वेळोवेळी वाहनाचे सर्व्हिसिंग करुन घेतले आहे तरी ही ते वारंवार नादुरुस्‍त होते. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण वाहन विकले असे तक्रारकर्ता म्‍हणतो.
11                सर्व्हिस बुक व कुपन विरुध्‍द पक्षाच्‍या ताब्‍यात आहे. मागणी करुन ही ते तक्रारकर्त्‍याला दिले नाही. विरुध्‍द पक्ष 3 ने जॉब कार्डवर सहया घेतल्‍या आहेत.
12                वाहन नसल्‍याने तक्रारकर्त्‍याचे दररोजचे रुपये 2000/- चे उत्‍पन्‍नाचे नुकसान होत आहे.
13                तक्रारी सोबत तक्रारकर्त्‍याने एकूण 4 दस्‍त जोडले आहे.
14                तक्रारकर्त्‍याची प्रार्थना ः-
14अ. विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेत त्रृटी आहे असे जाहीर करावे.
ब. वाहन बदलून देण्‍याचा आदेश व्‍हावा.
क. दररोजचे उत्‍पन्‍न रुपये 2000/- प्रमाणे दि. 5.6.2011 पासून तक्रार दाखल दिनांका   
    पर्यंत एकूण रुपये 48,000/- + Down payment रुपये 75,000/- + अन्‍य रुपये   
    1,405/- असे एकूण रुपये 1,24,405/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.
ड. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सर्व दस्‍तावेज ( सर्व्हिस बुक इत्‍यादी) परत करावे.
इ. शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्‍हणून रु.5000/- रुपये देण्‍याचा आदेश
   व्‍हावा.
ई. तक्रार खर्च मिळावा.
      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत 4 दस्‍त व एक केस लॉ दाखल केला आहे.
 
 
 
15                विरुध्‍द पक्ष 1 च्‍या उत्‍तरानुसार
      सुरुवातीला प्राथमिक आक्षेप आहेत. तक्रार वाईट हेतुने दाखल केल्‍याने व खोटी असल्‍याने मंचासमोर चालू शकत नाही. विरुध्‍द पक्ष 1 हे व्‍यापारी तत्‍वावरील वाहनाचे उत्‍पादक आहे. विरुध्‍द पक्ष 2 डिलर नागपूर यांच्‍याशी त्‍याचा मालक ते मालक (Principal to Principal) संबंध असल्‍याने दोघेही स्‍वतंत्र आहेत. विरुध्‍द पक्ष 2 ने विकलेल्‍या वाहनासंदर्भात विरुध्‍द पक्ष 1 वर कोणतीही जबाबदारी येत नाही. अधिकृत डिलर उत्‍पादकाकडून एकत्रित वाहन खरेदी करतात व अनेक ग्राहकांना विकतात व विक्री पश्‍चात सेवा देतात. यात विरुध्‍द पक्ष 1 चा कोणताही संबंध येत नाही.
तक्रारकर्त्‍याचे वाहन कमर्शिअल या सदरात मोडते म्‍हणून तक्रारकर्ता तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) नुसार तो ग्राहक ठरत नाही. म्‍हणून ही तक्रार मंचाला चालविण्‍याचा अधिकार नाही.
      तक्रारकर्त्‍याने वाहन कर्जावर घेतले आहे. त्‍याचा हप्‍ता भरु न शकल्‍याने तक्रारकर्त्‍याने ही खोटी तक्रार दाखल केली असावी.
विरुध्‍द पक्ष 1 ही नामांकित उत्‍पादक कंपनी आहे. वाहनाची कार्यक्षमता उच्‍च दर्जाची राहावी म्‍हणून सर्व वाहने अत्‍यंत कठिण व काटेकोर परीक्षणाद्वारा विरुध्‍द पक्ष 1 च्‍या गुणवत्‍ता नियंत्रणाखाली तयार होतात. प्रयोग शाळेत कडक चाचणी झाल्‍यानंतरच   दोषरहित वाहनेच विक्रीसाठी उपलब्‍ध केले जातात. तक्रारकर्त्‍याला विकलेले वाहन असे चाचणीतून पास झालेले आहे. त्‍यात उत्‍पादन दोष नाही. त्‍यासंबंधीचा दस्‍त म्‍हणून पुरावा म्‍हणून सोबत जोडले आहे.
अयोग्‍य पध्‍दतीने वाहन हाताळल्‍यामुळे नंतरही दोष उद्भवू शकतो. जसे ड्रायव्‍हरच्‍या सवयी, निगा न राखणे , रस्‍त्‍यांची दशा, ऑईल व फ्यूएलचा दर्जा, वाहनातील अतिरिक्‍त वजन ही कारणे असल्‍यास तक्रारकर्त्‍याचा स्‍वतःचा दोष असतो. त्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष 1 वर येत नाही.
पहिली मोफत सेवा खरेदी पासून 5500 ते 6000 कि.मी. किंवा 60 दिवस असे होते. तक्रारकर्त्‍याने सर्व्हिसिंग करुन घेतले नाही. त्‍यामुळे वाहन सुस्थितीत राहिले नसावे तरीही तक्रारकर्त्‍याला Good-will warranty  म्‍हणून क्षतिग्रस्‍त पार्ट मोफत बदलून देण्‍यात आले. ऑईलची किंमत आकारणे ही सेवेतील त्रृटी ठरत नाही ती तक्रारकर्त्‍याला द्यावी लागते असे सर्व्‍हीस बुक मध्‍ये नमूद आहे. केबल वायरची दुरुस्‍ती वॉरन्‍टीमध्‍ये समाविष्‍ट नाही. त्‍याबद्दल दुरुस्‍ती चार्जेस लावणे ही सेवेतील त्रृटी ठरत नाही. शिवाय अशा दुरुस्‍तीचे रुपये 406/-चे दि. 16.05.2011 चे बिल तक्रारकर्त्‍याने अजूनही दिलेले नाही.
06 एप्रिल 2011 ही तिसरी मोफत सेवेची तारीख होती. तक्रारकर्त्‍याने सर्व्हिसिंगसाठी वाहन एक महिना उशिराने आणले तरीही Goodwill Gesture म्‍हणून तक्रारकर्त्‍याला मोफत सेवा देण्‍यात आली.
 
23 मे 2011 रोजी गोंदिया येथे विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍याला बॅटरी बद्दल मोफत सेवा दिली. तक्रारकर्त्‍याच्‍या निष्‍काळजीपणामुळे त्‍यात distilled water टाकण्‍यात आले नव्‍हते.
तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 चे दि. 20 डिसेंबर 2011 ( विरुध्‍द पक्षाने नमूद केलेल्‍या तारखेप्रमाणेच) रोजीचे बिलाचे रुपये 1,566/- भरले नाही.
वरीलप्रमाणे तक्रारकर्त्‍याला वेळोवेळी सेवा प्रदान केल्‍या आहेत व त्‍याबद्दल समाधान झाल्‍याचे तक्रारकर्त्‍याने मान्‍य केले आहे. वाहन विशिष्‍ट कि.मी. किंवा काही काळ चालल्‍यानंतर त्‍याचे सर्व्हिसिंग करुन घेणे ते सुस्थितीत ठेवण्‍यासाठी अनिवार्य असते. तक्रारकर्त्‍याने ते करुन घेतले नाही. त्‍यामुळे manual मधील अटीनुसार वाहनाची वॉरन्‍टी संपुष्‍टात येते.
तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांच्‍यातील व्‍यवहाराबद्दल विरुध्‍द पक्ष 1 यांचा काहीही संबंध नाही. तक्रारकर्त्‍याने वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले , त्‍याचा हप्‍ता फेडू न शकल्‍याने ही खोटी तक्रार दाखल केल्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. तक्रार खोटी असल्‍यामुळे खर्चासह त्‍वरित खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍द पक्ष 1 करतात.
16                विरुध्‍द पक्ष 2 व 3 च्‍या उत्‍तरानुसार
      सुरुवातीला प्राथमिक आक्षेप आहेत. जसे तक्रारीस कारण घडलेले नाही. मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात नाही. वाहनाचा उपयोग मालवाहतूक म्‍हणजेच व्‍यापारी तत्‍वावर नफा कमाविण्‍यासाठी होत असल्‍याने व तसे वाहनाचे रजिस्‍ट्रेशन असल्‍याने तक्रारकर्ता ‘‘ग्राहक ’’ या व्‍याख्‍येत बसत नाही म्‍हणून मंचाला अधिकार-क्षेत्र नाही.
      तक्रारकर्त्‍याचे वाहनावर एकूण वॉरन्‍टी 360 दिवस किंवा 36,000/- कि.मी. (यापैकी प्रथम जे घडेल ) ते आहे. या संपूर्ण काळात 6 मोफत सर्व्हिसिंग शेडयुलनुसार करुन घेणे अनिवार्य होते. ठराविक वेळेवर सर्व्हिसिंग करुन न घेतल्‍याने वॉरन्‍टी संपुष्‍टात येते. तक्रारकर्त्‍याने मॅन्‍युअलमधील अटीप्रमाणे फ्री सर्व्हिसिंग दिलेल्‍या वेळेत करुन घेतले नाहीत. त्‍यामुळे वॉरन्‍टी संपुष्‍टात आली आहे. असे असले तरी तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन मुदत संपल्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याला विनामुल्‍य सेवेचा लाभ Goodwill Gesture म्‍हणून देण्‍यात आला. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्‍याच्‍या निष्‍काळजीपणामुळे वाहनाचे भाग खराब झाल्‍यास नुकसान भरपाईची जबाबदारी विरुध्‍द पक्ष 2 व 3 वर येत नाही.
      दि. 5.1.2011 रोजी प्रथमच तक्रारकर्त्‍याने, वाहन बंद पडल्‍याने विरुध्‍द पक्ष 2 नागपूरकडे आणले तो पर्यंत वाहनातील दोषाबद्दल तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांना कोणत्‍याही प्रकारे सूचना दिली नाही.
      केबल वायर तुटल्‍याने दि. 20.12.2010 रोजी गोंदिया येथे दुरुस्‍ती करुन देण्‍यात आली.
 
 
सदर वाहन खरेदीच्‍या तारखेपासून ते 2.5.2011 पर्यंत 2617 कि.मी. चालले होते. यावरुन वाहन सुस्थितीत असल्‍याचे निष्‍पन्‍न होते.
तक्रारीच्‍या परिच्‍छेद – 9 मध्‍ये तक्रारकर्त्‍याने वाहन 7178 कि.मी. चालल्‍याबद्दल उल्‍लेख केला आहे. कारखान्‍यातून स्‍थानिक ठिकाणा पर्यंत वाहन चालवित आणले ( पुणे ते नागपूर) तेव्‍हा कोणतीही अडचण/दोष आढळला नाही. हे वाहन दि. 2.5.2011 ते तक्रार दाखल करे पर्यंत 4561 कि.मी. चाललेले आहे.
दि. 23.05.2011 रोजी विरुध्‍द पक्ष 2 यांनी बॅटरीतील कामासाठी वाहन तपासले त्‍यावेळी ते 3000 कि.मी. चाललेले होते. विरुध्‍द पक्ष 2 नुसार तक्रारकर्त्‍याचे वाहन सुस्थितीत आहे. विरुध्‍द पक्ष 2 व 3 च्‍या सेवेत त्रृटी नाही. तक्रारकर्ता, केवळ दोन वेळा    (दि. 5.1.2011 व 2.5.2011) विरुध्‍द पक्ष 2 च्‍या सर्व्हिस स्‍टेशनमध्‍ये नागपूर येथे आला. त्‍यावेळी फ्री सर्व्हिसिंगची मुदत संपली असली तरी  Goodwill Gesture म्‍हणून तक्रारकर्त्‍याला मोफत सेवा प्रदान केली. तसेच तक्रारकर्त्‍याचे गोंदिया येथील स्‍थानिक ठिकाणी सुध्‍दा दि. 10.02.2011, 24.04.2011, 23.05.2011 रोजी सेवा प्रदान केल्‍या आहेत.
वाहनाच्‍या छोटया-छोटया तक्रारी जसे इंधन नसणे , पंपाचे सर्व्हिसिंग, बॅटरी लो होणे, या तक्रारकर्त्‍याच्‍या सदोष हाताळण्‍याने व निष्‍काळजीपणामुळे उत्‍पन्‍न झाल्‍या तरीही विरुध्‍द पक्षाने त्‍यांची जबाबदारी नसतांना त्‍याबद्दल तक्रारकर्त्‍याला सेवा प्रदान केल्‍या आहेत.
वाहन विकण्‍यापूर्वी ते अनेक कठिण परीक्षणातून पास करुन घेतलेले असते. ग्राहकाचे समाधान झाल्‍यावरच ते ग्राहकाच्‍या ताब्‍यात दिले जाते. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची प्राथमिक चाचणी झाली त्‍यावेळी कोणताही दोष तक्रारीत न आढळल्‍याने  तक्रारकर्त्‍याने ते वाहन स्विकारले होते. जर वापरानंतर वाहनात दोष उत्‍पन्‍न झाला तर तो अयोग्‍य हाताळण्‍यामुळे व निष्‍काळजीपणामुळे झाला आहे.
वाहनात Starting Problem आहे यावरुन उत्‍पादन दोषपूर्ण आहे( Manufacturing Defect ) असे सिध्‍द होत नाही. एकदा तर वाहनात इंधन नसल्‍याने वाहन सुरु झाले नाही असे आढळले आहे. वाहन अकुशल व्‍यक्तिने हाताळल्‍यास , अयोग्‍य पध्‍दतीने चालविल्‍यास, क्षमतेपेक्षा जास्‍त भार वाहनात भरल्‍यास ते खराब होऊ शकते. यासाठी विरुध्‍द पक्षाला जबाबदार धरता येणार नाही. विरुध्‍द पक्ष 2 केवळ विक्रेते आहेत उत्‍पादक नाही म्‍हणून जरी   Manufacturing defect सिध्‍द झाला तरी विरुध्‍द पक्ष 2 व 3 वर नुकसान भरपाईची जबाबदारी येत नाही.
विरुध्‍द पक्ष 2 ला तक्रारकर्त्‍याकडून अजूनही दुरुस्‍तीचे बिलाची बाकी रुपये 1972/- घेणे आहे.तक्रार खोटी असून रक्‍कम उकळण्‍याच्‍या दृष्टिने दाखल केली आहे. म्‍हणून खर्चासह खारीज करावी.
विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनी तक्रारी सोबत एकूण 19 दस्‍त दाखल केले आहे.
 
 
17                मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला, रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्र तपासली.
17                
 मंचाचे निरीक्षण व निष्‍कर्ष
 
18                 विरुध्‍द पक्ष 1, 2 व 3 यांनी घेतलेले प्राथमिक आक्षेप जसे तक्रारकर्ता ग्राहक ठरत नाही , तक्रार मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात नाही, वाहनाचा उपयोग व्‍यापारी तत्‍वावर होतो. यामध्‍ये मंचाला तथ्‍य वाटत नाही. तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) नुसार विरुध्‍द पक्षाकडून त्‍यांनी वाहन खरेदी केल्‍यामुळे ‘‘ग्राहक’’ ठरतो. हे वाहन त्‍यांनी स्‍वतःच्‍या उपजिविकेसाठी खरेदी केले आहे. त्‍यामुळे ते व्‍यापारी तत्‍वावरील नफा कमविण्‍यासाठी घेतले असे म्‍हणता येत नाही. सदर तक्रारीस कारण मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात घडल्‍याने मंचाला निर्णय देण्‍याचा अधिकार आहे.
19                तक्रारकर्त्‍याची तक्रार व दस्‍ताऐवज तपासले असता असे आढळून येते की, तक्रारकर्त्‍याने केवळ  Starting Problem म्‍हणून तक्रारी केल्‍या आहेत अशा तक्रारी करतांना त्‍यांनी नेमक्‍या तारखा नमूद केल्‍या नाहीत. वारंवांर केवळ   Starting Problem,  उद्भवला असे म्‍हटले आहे. असे असले तरी हे वाहन चालू स्थितीत होते. तक्रारीच्‍या परिच्‍छेद – 9 मध्‍ये तक्रारकर्त्‍याने हे वाहन 7178 कि.मी. चालल्‍याबद्दल उल्‍लेख केला आहे. यावरुन वाहन सुस्थितीत होते हे सिध्‍द होते. वारंवांर उद्भवलेल्‍या छोटया-छोटया तक्रारी जसे केबल वायर तुटणे, बॅटरीचे काम, इंधन नसणे अतिश्‍य शुल्‍लक स्‍वरुपाच्‍या आहेत. त्‍या, वाहन निष्‍काळजीपणे हाताळल्‍यामुळे उद्भवू शकतात. यामुळे वाहन दोषपूर्ण आहे असे म्‍हणता येत नाही असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.
20                वेळोवेळी उद्भवलेल्‍या छोटया – छोटया तक्रारीचे विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनी त्‍यांच्‍या जबाबदारीचे भान ठेवून त्‍याचे निराकरण केले आहे असे निष्‍पन्‍न उपलब्‍ध कागदपत्रावरुन होते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1, 2, 3 यांच्‍या सेवेत त्रृटी नाही असे मंचाचा निष्‍कर्ष आहे.
21                तक्रारकर्त्‍याने मोफत सर्व्हिसिंगचा लाभ मुदतीत घेतलेला नाही. वाहन सुस्थितीत राखण्‍याच्‍या दृष्टिने वेळेवर सर्व्हिसिंग करुन घेणे गरजेचे असते ते न केल्‍याने जर वाहनात तक्रारी उत्‍पन्‍न झाल्‍या तर त्‍याबद्दल विरुध्‍द पक्ष 1, 2 व 3 यांना दोष देता येत नाही असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.
22                तक्रारकर्त्‍याने मुदतीनंतर वाहन सर्व्हिसिंगसाठी नेले तरीही त्‍याला मोफत सर्व्हिसिंगची सेवा देण्‍यात आल्‍याचे निष्‍पन्‍न रेकॉर्डवरुन होते.
23                वाहन सदोष आहे याबद्दल तक्रारकर्त्‍याने कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही (उदा. तज्ञांचा अहवाल).
 
 
 
 
24                तक्रारकर्त्‍याने नुकसान भरपाई मागतांना त्‍याचे रुपये 2000/-चे दररोजचे उत्‍पन्‍न ग्राहय धरले आहे परंतु याबद्दल कोणताही पुरावा नसल्‍याने तक्रारकर्त्‍याला रु.2000/- चे उत्‍पन्‍न होत होते हे मंच ग्राहय मानत नाही.
25                तक्रारकर्त्‍याच्‍या मागण्‍या अत्‍यंत अवास्‍तव आहेत. तक्रारकर्त्‍याने वाहनाचा लाभ घेतल्‍यानंतरही ते भरलेली सर्व रक्‍कम आणि नविन वाहन अशी मागणी करतात. ती मंचाला अजिबात ग्राहय वाटत नाही कारण वाहनामध्‍ये उत्‍पादन दोष अथवा तांत्रिक दोष असल्‍याचे तक्रारकर्त्‍याने कोणत्‍याही स्‍वतंत्र पुराव्‍याद्वारे सिध्‍द केलेले नाही. त्‍यामुळे वाहन बदलून मिळण्‍याची मागणी हे मंच फेटाळून लावते. भरलेली रक्‍कम परत मिळण्‍याची मागणी सुध्‍दा हे मंच फेटाळून लावते.
26                विरुध्‍द पक्ष 1, 2 व 3 हया सर्वांच्‍या म्‍हणण्‍यात, उत्‍तरात व कागदपत्रांमध्‍ये  मंचाला वा‍स्‍तविकता व वस्‍तुस्थिती आढळून येते म्‍हणून मंच ते सर्व ग्राहय मानते.
27                वि.प. 2 व 3 यांनी वाहनात दोष नसल्‍याबद्दल त्‍यांच्‍या वर्कस मॅनेजरचे 01/09/2011
27(पवन महादेवराव वालदे) विस्‍तृत शपथपत्र रेकॉर्डवर दाखल केले आहे, ते मंचाला सर्वथा ग्राहय वाटते. त्‍यातील मुद्दे तक्रारकर्त्‍याने खोडून काढले नाहीत.
28                तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला केस लॉ त्‍यानी तज्ञाचे शपथपत्र /पुरावा दाखल न केल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍याच विरोधात बोलतो.
सबब आदेश
 
आदेश
1     तक्रारकर्त्‍याची तक्रार त्‍यांनी सिध्‍द न केल्‍याने खारीज करण्‍यात येते.
2     विरुध्‍द पक्ष 1, 2 व 3 यांच्‍या सेवेत कोणतीही त्रृटी नाही किंवा त्‍यांनी अनुचित व्‍यापार
प्रथेचा अवलंब केला नाही असा निष्‍कर्ष हे मंच नोंदविते .
3     खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
 
 
 
(श्रीमती गीता रा. बडवाईक)     (श्रीमती अलका उ. पटेल)            (श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
        सदस्‍या               सदस्‍या                    अध्‍यक्षा
                                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गोंदिया
 
 
 
 
 
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गोंदिया
                                       
ग्राहक तक्रार क्रमांक - 32/2011
 
बहुमताचा असहमतीदर्शक आदेश
(Dessenting Order)
( पारित द्वारा मा. श्रीमती अलका उमेश पटेल, सदस्‍या)
                     ( पारित दिनांक 22 नोव्‍हेबंर 2011)
 
1                    The Consumer Protection Regulation 2005 च्‍या regulation 18(7) प्रमाणे युक्तिवाद झाल्‍यानंतर15 दिवसाच्‍या आत आदेश पारित करणे आवश्‍यक आहे. जर 15 दिवसाच्‍या नंतर आदेश पारित झाला तर तो 15 दिवसानंतर पारित करण्‍यात आला याबाबत कारण नमूद करणे आवश्‍यक आहे. सदर तक्रारीमध्‍ये दि. 25/10/2011 ला युक्तिवाद ऐकण्‍यात आल्‍यानंतर मा. अध्‍यक्षांनी निकाल लिहिण्‍यासाठी सदर प्रकरण त्‍यांच्‍याकडेच ठेवले व निकालासाठी दि. 21/11/2011 तारीख ठेवली. मा. राज्‍य आयोगाच्‍या दि. 05.09.2011 च्‍या आदेशाप्रमाणे गोंदिया मंचाचे कामकाज प्रत्‍येक महिन्‍याच्‍या 16 तारखेपासून 30 ते 31 तारखेपर्यंत असते. त्‍यामुळे 15 दिवसामध्‍ये मंच कार्यान्वित नसल्‍यामुळे आदेश 15 दिवसाच्‍या आत पारित करण्‍यात आला नाही. मा. अध्‍यक्षांनी पारित केलेल्‍या आदेशाशी असहमत असल्‍यामुळे असहमतीचा आदेश आज पारित करीत आहे.
2                    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रृटीबद्दल सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी स्‍वयंरोजगारासाठी वि.प. नं. 1 द्वारा निर्मित वाहन वि.प.नं. 2 व 3 च्‍या मार्फत खरेदी केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून रु.2,90,000/- मध्‍ये हायपोथीकेशनवर दि. 30.09.2010 ला खरेदी केले. वाहन खरेदी केल्‍यानंतर काही कालावधीतच वाहनात दोष उत्‍पन्‍न झाला. जानेवारी 2011 मध्‍ये वाहनामध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाला. वाहन सुरु होण्‍यासाठी त्रास देत होते. तक्रारकर्त्‍याने वि.प.नं. 3 च्‍या निदर्शनास दोष आणून दिल्‍यावर वि.प.नं. 3 ने दोष दुरुस्‍त केला. त्‍यानंतर आणखी 15 दिवसांनी वाहनामध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाला. वि.प. नं. 2 ने दोन दिवसानंतर दोष दुरुस्‍त करुन दिला. त्‍यानंतर फेब्रुवारी महिन्‍यात वाहन सुरु करण्‍याचा त्रास सुरु झाला. वि.प.नं. 2 च्‍या तंत्रज्ञांनी (Mechanices) ने दोष दुरुस्‍त केला. त्‍यानंतर पुन्‍हा दोन दिवसांनी वाहनामध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाला, तो दोष वि.प.ने दुरुस्‍त केला. मे-2011 मध्‍ये वाहनामध्‍ये पुन्‍हा दोष उत्‍पन्‍न झाला. तक्रारकर्त्‍याने वि.प.नं. 2 कडे दुरुस्‍तीकरिता वाहन नेले. वि.प.नं. 2 ने वाहनातील पंप दुरुस्‍त केले. त्‍यानंतर 4-5 दिवस वाहन सुरु होते. परंतु वाहन चालणे बंद झाले. तक्रारकर्त्‍याने वाहन बंद झाल्‍याची सूचना वि.प.नं. 2 व 3 यांना दिली. वि.प. नं. 2 ने तंत्रज्ञाला दुरुस्‍तीकरिता पाठविले परंतु त्‍यांनी वाहनातील दोष दुरुस्‍त करण्‍याचा प्रयत्‍न केला
 
 
परंतु दोष दुरुस्‍त झाला नाही. सद्यास्थितीत सदर वाहन हे विजय मार्केटींग गोंदिया यांच्‍या   
ताब्‍यात आहे.
3                    तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की,  दि. 5.6.2011 पासून वाहन बंद स्थितीत आहे. वाहनामध्‍ये खरेदी केल्‍यापासून अल्‍पावधीत दोष उत्‍पन्‍न झाला आहे. वि.प. ला त्‍याबाबत सूचना देऊनही त्‍यांनी वाहनातील दोष दुरुस्‍त करुन दिला नाही. वि.प.ने तक्रारकर्त्‍यास defective सदोष वाहनाची विक्री केली आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी वाहनांची service manual प्रमाणे वेळोवेळी  service केल्‍या आहेत. परंतु  service manual आणि free coupen   वि.प.यांनी आपल्‍या ताब्‍यात घेतले आहे.  तक्रारकर्त्‍यानी वि.प.ला free coupen आणि  service book परत करण्‍याची विनंती केली परंतु वि.प.नी service manual आणि   free service coupen तक्रारकर्त्‍याला परत केले नाही. तसेच वि.प. नं. 3 ने  तक्रारकर्त्‍याच्‍या  job card वर सहया सुध्‍दा घेतलेल्‍या आहे परंतु वाहनाची पूर्णपणे दुरुस्‍ती करुन दिली नाही. वि.प. ने तक्रारकर्त्‍याला योग्‍य सेवा दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे वाहन नादुरुस्‍त स्थितीतच आहे. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन त्‍यांच्‍या उपजिविकेसाठी खरेदी केले असल्‍यामुळे त्‍यास प्रतिदिन रु.2000/-आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वि.प.ने तक्रारकर्त्‍याला योग्‍य सेवा प्रदान केली नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मंचामध्‍ये तक्रार दाखल करावी लागली. तक्रारकर्त्‍याने प्रार्थनेप्रमाणे दाद मिळण्‍याची विनंती केली आहे.
4                    वि.प. नं. 1 , 2 व 3 चे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याने वाहन हे व्‍यावसायिक उपयोगासाठी खरेदी केले आहे. तक्रारकर्त्‍याने वाहनाचा उपयोग व्‍यवस्थितपणे केला नाही, त्‍यामुळे वाहनामध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाला. तक्रारकर्त्‍याने Free Service चा उपभोग घेतला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.
5                    दोन्‍ही पक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांचे युक्तिवाद दि. 25/10/2011 ला ऐकला.
6                    तक्रारकर्त्‍याने दिनांक 30.09.2010 ला वि.प.कडून वाहन खरेदी केले तर मंचामध्‍ये वाहनासंबंधीची तक्रार दि. 30.06.2011 ला दाखल केली. म्‍हणजेच वाहन खरेदी केल्‍यानंतर 1 वर्षाच्‍या आधिच. तक्रारकर्त्‍याचे वाहन बंद स्थितीत आहे व वि.प.हे वाहनांतील दोषांचे समुळ उच्‍चाटन करण्‍यास अयशस्‍वी ठरले. त्‍यामुळेच तक्रारकर्त्‍याला तक्रार दाखल करावी लागली. तक्रारकर्ता हा स्‍वतः वाहन वापरित असल्‍यामुळे वाहनामध्‍ये कोणत्‍या प्रकारचा दोष उत्‍पन्‍न झाला याबाबत त्‍यांना पुरेपुर माहिती आहे. त्‍यांनी वाहनातील दोष वि.प.च्‍या निदर्शनास आणून दिल्‍यानंतर देखील वि.प.ने दोषाचे संपूर्णपणे निराकरण केले नाही. केवळ तक्रारकर्त्‍याने Free Service manual प्रमाणे  Service घेतल्‍या नाही , त्‍यामुळे दोष उत्‍पन्‍न झाला या वि.प.च्‍या म्‍हणण्‍यात आम्‍हाला काहीही तथ्‍य वाटत नाही. वस्‍तुच्‍या विक्रीनंतर वस्‍तुबाबतची सेवा पुरविण्‍याची जबाबदारी ही वि.प.ची असते. परंतु वि.प.ने आपली जबाबदारी योग्‍यरित्‍या पार पाडली नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे वाहन बंद अवस्‍थेत पडून आहे.
 
तक्रारकर्त्‍याने शपथेवर केलेले कथनावरुन मंचास तक्रारकर्त्‍याचे वाहन बंद अवस्‍थेत आहेत व त्‍या वाहनाची दुरुस्‍ती विरुध्‍द पक्षानी केली नाही. या म्‍हणण्‍यात तथ्‍य वाटते. तक्रारकर्त्‍याने Free Service चा कालावधीपूर्ण होण्‍याच्‍या अगोदरच वॉरन्‍टी काळामध्‍ये वाहनामध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाल्‍याबाबत तक्रार दाखल केली आहे. विरुध्‍द पक्षाने वाहनातील दोषाचे समुळपणे उच्‍चाटन केले असते तसेच त.क.ला दोषर‍हित वाहनाची विक्री केली असती तर तक्रारकर्त्‍याला मंचामध्‍ये तक्रार दाखल करण्‍याचे कारणच उद्भवले नसते.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास सदोष वाहनाची विक्री केली. वॉरन्‍टीच्‍या काळामध्‍ये वाहनातील दोष दूर केला नाही ही विरुध्‍द पक्षाची कृती त्‍यांच्‍या सेवेतील त्रृटी दर्शविते असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. यासाठी आम्‍ही महाराष्‍ट्र राज्‍य आयोग, मुंबई यांनी पारित केलेल्‍या 2010 CTJ, 94 CP SCDRC – Adonis Electronices Pvt. Ltd. VS   Nikhil Gagan  या निकालपत्राचा आधार घेत आहोत.
7                    विरुध्‍द पक्ष 2 व 3 तसेच Owner manual  व Free Service Coupen इत्‍यादी दस्‍त स्‍वतः जवळ ठेवणे व तक्रारकर्त्‍यानी मागितले असता त्‍यास परत न करणे ही विरुध्‍द पक्ष नं. 2 व 3 यांची कृती ही अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला असे दर्शविते. त.क. ने  free service manual प्रमाणे तारखेच्‍या आधि    free service   घेतली नाही असे वि.प.चे म्‍हणणे आहे. परंतु तारखेनंतरही वि.प.ने तक्रारकर्त्‍यास  free service दिल्‍या आहे. तक्रारकर्त्‍याने  उशिरा घेतलेल्‍या   free service विरुध्‍द पक्षाने नियमित केल्‍या आहे. त्‍यामुळे त.क.ने Warranty च्‍या शर्ती व अटींचे उल्‍लंघन केले नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.
8                    वि.प.नं. 1 हे सदोष वाहनाचे निर्माते असून वि.प.नं. 2 मार्फत तक्रारकर्त्‍याने वाहन खरेदी केलेले आहे. त्‍यामुळे वाहनातील दोष विरुध्‍द पक्ष नं. 1 व 2 यांनी 15 दिवसाच्‍या आत दुरुस्‍त करुन द्यावे. अन्‍यथा तक्रारकर्त्‍यास सदोष वाहन बदलवून नविन वाहन नविन वॉरन्‍टीसह द्यावे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.
9                    वि.प. नं. 2 व 3 जवळ असलेले वाहनाचे दस्‍त त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला परत करावे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. वि.प. ने वाहन दुरुस्‍त न केल्‍यामुळे दि. 5.6.2011 पासून सद्यस्थितीत वाहन बंद अवस्‍थत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे आर्थिक नुकसान झाले याबाबत वाद नाही. परंतु त्‍या संदर्भात किती नुकसान झाले याबाबतचा पुरावा दाखल न केल्‍यामुळे त्‍याची ही मागणी मान्‍य करता येत नाही.
10                विरुध्‍द पक्षांच्‍या सेवेतील त्रृटीबाबत तक्रारकर्त्‍याला तक्रार दाखल करावी लागली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला तसेच तक्रार मंचामध्‍ये दाखल करावी लागली त्‍यामुळे तक्रारकर्ता शारीरिक व मानसिक नुकसान भरपाईसह तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पात्र आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.
करिता आदेश.
 
 
     अंतिमआदेश
 
1.                  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2     विरुध्‍द पक्ष नं. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनातील दोष 15 दिवसात दुरुस्‍त करुन वाहन पूर्ववत चालू स्थितीत करुन द्यावे अन्‍यथा वि.प. ने वाहन बदलवून नविन वाहन त्‍याच मॉडेलचे नविन वॉरन्‍टीसह द्यावे.
3                    वि.प. नं. 2 व 3 यांनी तक्रारकर्त्‍याकडून घेतलेले संपूर्ण Document (दस्‍त) परत करावे.
4                    वि.प. नी तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2000/-द्यावे.
5                    विरुध्‍द पक्षांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांच्‍या आत करावे.
 
 
 
 
(श्रीमती गीता रा. बडवाईक)           (श्रीमती अलका उ. पटेल)
                    सदस्‍या                            सदस्‍या
                             जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गोंदिया
 
 
 
[HON'ABLE MRS. R.D. Kundle]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Alka Patel]
MEMBER
 
[HONABLE MS. Geeta R. Badwaik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.