Maharashtra

Nagpur

CC/10/327

Amruta Milind Paithankar - Complainant(s)

Versus

Flying Cats - Opp.Party(s)

Adv. P. Satyanathan

28 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/327
1. Amruta Milind PaithankarNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. Flying CatsNagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv. P. Satyanathan, Advocate for Complainant
Adv. Bhangde, Advocate for Opp.Party

Dated : 28 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 28/02/2011)
 
1.     तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारीचा आशय असा आहे की, गैरअर्जदार संस्‍था ही हंवाई सुंदरीचे प्रशिक्षण संस्‍था चालविते व हवाई कंपनीमध्‍ये नौकरी मिळण्‍याकरीता 100 टक्‍के मदत करते. तक्रारकर्तीने 12 वी ची परीक्षा उत्‍तीर्ण करुन गैरअर्जदार संस्‍थेन कॅबीन क्रु हवाई सुंदरी चा कोर्स करण्‍याकरीता गैरअर्जदार संस्‍थेमध्‍ये रु.1,10,000/- भरुन 2006-07 च्‍या बँच क्र.एफ.सी.11 ए अंतर्गत प्रवेश घेतला. तसेच विविध खर्चांतर्गत रु.40,000/- तिला खर्च आला.
 
      तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे प्रवेश घेतल्‍यावर 15 दिवसाच्‍या आत गणवेश संस्‍थेने पुरविण्‍याचे आश्‍वासन देऊनही ते पुरविले नाही व तिला बाहेरुन गणवेश घ्‍यावा लागला. यानंतर 7 महिन्‍यानंतर संस्‍थेने गणवेश उपलब्‍ध करुन दिला.
 
      तसेच गैरअर्जदार संस्‍थेत 2006-08 च्‍या बॅचमध्‍ये इंडिगो या हवाई कंपनीतर्फे इंटरव्‍ह्यु घेण्‍यात आला व तक्रारकर्ती ही त्‍यात 2 राऊंड यशस्‍वी ठरली आणि तिला कोर्स पूर्ण झाल्‍यावर गैरअर्जदार क्र. 2 तर्फे रुजू होण्‍याकरीता पत्र पाठविण्‍यात येईल असे सांगण्‍यात आले. परंतू आजतागायत कोणतेही पत्र तिला पाठविण्‍यात आले नाही. तक्रारकर्त्‍याने 2008 मध्‍ये झालेल्‍या परीक्षेत 600 पैकी 240 मार्कस् (ब-श्रेणी) यशस्‍वी झाली. परंतू शेवटची फी वेळेवर भरता आली नाही, म्‍हणून तिला 9 महिन्‍यांनंतर मार्कशिट देण्‍यात आली. तसेच कोर्स पूर्ण झाल्‍यावर आश्‍वासित केल्‍याप्रमाणे नोकरी मिळवून न दिल्‍याने तक्रारीतीने गैरअर्जदारांना नोटीस पाठविला असता गैरअर्जदार क. 1 व 2 ने तिला दूरध्‍वनी करुन पुणे येथील मॅट्रीक्‍स नावे बी.पी.ओ.अमेरीकन एअरलाईन्‍स येथे मुलाखतीस जाण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ती उत्‍तीर्ण झाली. परंतू गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीच्‍या आई वडिलांना बोलावून तिला पुण्‍याला न जाण्‍याबाबत परावृत्‍त केले. पवनसुत ट्रॅव्‍हल्‍समध्‍ये नोकरीचा प्रस्‍ताव दिल्‍यावर तेथेही तक्रारकर्तीस कोणतेही काम देण्‍यात न आल्‍याने तक्रारकर्तीने तेथे जाणे बंद केले.
 
      तक्रारकर्तीच्‍या मते तिने जे कॅबीन क्रु हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेतले होते, त्‍या अनुषंगाने तिला कोणतीच नोकरी देण्‍यात आली नाही. तसेच तिच्‍याकडून जबरदस्‍तीने ‘तक्रारकर्तीला ब-याच ठिकाणी नोकरीची संधी दिली व यापुढे गैरअर्जदाराची जबाबदारी राहणार नाही’ असे लिहून घेतले. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस पाठविला. परंतू गैरअर्जदारांनी काहीही प्रतिसाद दिला नाही, म्‍हणून सदर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने तक्रारकर्तील तिच्‍या प्रशिक्षणाशी निगडीत नोकरी मिळवून द्यावी, मानसिक त्रास, कोर्स फी व अतिरिक्‍त खर्चाबाबत रकमेची मागणी केलेली आहे.
 
2.    सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्‍यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी खालीलप्रमाणे तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले.
3.    गैरअर्जदार क्र. 1 ते 3 च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे वर्ष 2006-07 या एक वर्षाच्‍या डिप्‍लोमा अभ्‍यासक्रमाकरीता प्रवेश घेताला होता. या अभ्‍यासक्रमात (ग्रुमिंग फॉर इंफ्लाईट कॅबीन क्रीव, ग्राउंड हंडलींगृ हॉस्‍पीटॅलिटी मॅनेजमेंट – कोर्स कंटेंट) चा समावेश होता. तक्रारकर्तीने सर्व अटी, शर्ती व नियम वाचून स्‍वतः संस्‍थेत प्रवेश घेतला व तिच्‍या पालकांनी त्‍यावर सह्या केल्‍या. प्रवेश घेण्‍यापूर्वी त्‍यांनी सर्व अटी व शर्ती समजून घेतल्‍याने प्रवेश घेतल्‍यानंतर कुठलीही प्रवेश फी परत मिळत नाही आणि तसा अधिकार पालकांना व विद्यार्थ्‍यांना नाही. तक्रारकर्तीला व सर्व विद्यार्थ्‍यांना सिगापूर येथे प्रशिक्षणाकरीता विनामुल्‍य पाठविण्‍यात आले होते आणि सदर खर्च हा गैरअर्जदाराने केलेला होता. तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद खर्च हा वैयक्‍तीक कारणाकरीता केलेला आहे आणि त्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्‍याच्‍याशी गैरअर्जदाराचा काहीही संबंध नाही. गणवेश विलंबाने देण्‍यात आला ही बाब नाकारली असून तक्रारकर्तीने अभ्‍यासक्रमाची संपूर्ण फी दिलेली नाही असे नमूद केले आहे. कँपस मुलाखतीमध्‍ये इंडिगो हवाई कंपनीने तिचे सिलेक्‍शन केल्‍यानंतर पुढे का बोलाविले नाही याबद्दल सदर कंपनी सांगू शकते व त्‍याबाबत गैरअर्जदार जबाबदार नाही. तक्रारकर्तीने बी श्रेणीमध्‍ये सदर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पुढे आपल्‍या उत्‍तरात त्‍यापैकी काही विद्यार्थ्‍यांना नौकरी मिळाल्‍याचे नमूद केले असून तक्रारकर्तीने स्‍वतः अमेरीकन हवाई कंपनीच्‍या मुलाखतीमध्‍ये भाग घेतला. परंतू त्‍यात ती अयशस्‍वी झाली. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे इतर सर्व मुद्ये नाकारले असून त्‍यांची सेवेत त्रुटी नसल्‍याचे म्‍हटले आहे.
4.    सदर तक्रार मंचासमोर 24.02.2011 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला. तसेच उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवज व शपथपत्रे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
 
5.    उभय पक्षांच्‍या कथनावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराकडून तक्रारकर्तीने हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेण्‍याकरीता प्रवेश घेतला होता. तसेच सदर बाब तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांवरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारकर्ती गैरअर्जदाराची ग्रा.सं.का.नुसार सेवाधारक ठरते आणि सेवा घेण्‍याकरीता तिने गैरअर्जदारांना प्रशिक्षण फीसुध्‍दा दिलेली आहे ही बाब दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते.
6.    तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केले आहे की, तिला गणवेश गैरअर्जदार संस्‍थेने विलंबाने दिला. परंतू ही बाब दस्‍तऐवजावरुन अथवा कोणत्‍याही पुराव्‍यावरुन स्‍पष्‍ट होत नसल्‍याने अमान्‍य करण्‍यात येत आहे.
 
7.    गैरअर्जदाराने त्‍याच्‍या संस्‍थेतर्फे देण्‍यात येणा-या प्रशिक्षणाकरीता जाहिरात दिली होती व त्‍यासंबंधीचे ब्रोशरसुध्‍दा प्रसिध्‍द केले होते. सदर ब्रोशर तक्रारकर्तीने मंचासमक्ष दाखल केले आहे. सदर ब्रोशरवरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराने विद्यार्थ्‍यांना आकृष्‍ट करण्‍याकरीता सदर ब्रोशर तयार केले असून त्‍यामध्‍ये “Flying Cats is willing to do whatever it takes to make you 100%.”, “Take off from Every Campus”, आणि “100% assistance will be given in job placements.” जाहिरातीचा उल्‍लेख असून त्‍या विद्यार्थ्‍यांना/पालकांना आकर्षित करण्‍याकरीता तयार केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरात सदर ब्रोशर व जाहिरातीला वाचल्‍यानंतर तक्रारकर्तीच्‍या वडिलांनी सदर गैरअर्जदार संस्‍थेत दाखला घेतला असे म्‍हटले आहे. आकर्षक अशा भविष्‍यात नौकरी देणा-या जाहिरातीला भुलून तक्रारकर्तीने सदर संस्‍थेत प्रवेश घेतल्‍याचे व पालकांनी संमती दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस अटी व शर्ती सांगितल्‍या व तिच्‍या पालकांनी वाचल्‍यानंतर स्‍वाक्षरी केली असे आपल्‍या उत्‍तरात नमूद केले. जरीही अटी व शर्ती तक्रारकर्त्‍यास व तिच्‍या पालकांना सांगितल्‍या असल्‍या तरीही जाहिरात व ब्रोशर हे स्‍पष्‍टपणे 100 टक्‍के नौकरी देण्‍याचे अमिष सदर जाहिरातीद्वारे देत असल्‍याने तक्रारकर्ती व तिचे पालकांनी प्रवेश घेण्‍याचे निश्चित केले. नौकरी मिळवून देण्‍याचे आश्‍वासन गैरअर्जदाराने दिल्‍याचे यावरुन दिसते. त्‍यामुळे अशा प्रकारच्‍या खोटया जाहिराती अथवा ब्रोशर अथवा बुकलेट प्रसिघ्‍द करणा-यांविरुध्‍द ते दुरुस्‍त करण्‍याकरीता निर्देश देण्‍याचे अधिकार ग्रा.सं.का.नुसार ग्राहक मंचास आहे व त्‍यामुळे अशा दिशाभूल करणा-या जाहिरातीमुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदाराकडे आकृष्‍ट झाली होती व त्‍यामुळे तिने गैरअर्जदार संस्‍थेत प्रवेश घेतला.
8.    गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरात नमूद केले आहे की, त्‍यांनी तक्रारकर्तीस अनेक ठिकाणी नौकरी मिळवून देण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतू त्‍याबाबी योग्‍य पूराव्‍या अभावी सिध्‍द होत नाही. तसेच जर गैरअर्जदाराने आपल्‍या ब्रोशरमध्‍ये 100 टक्‍के आश्‍वासन दिले आहे. तर अशा परिस्थितीत तिने घेतलेल्‍या प्रशिक्षणला योग्‍य व अनुरुप नौकरी मिळवून देणे गैरअर्जदाराचे कर्तव्‍य होते, ते त्‍याने पार पाडले नाही. ही त्‍यांच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने मंचासमक्ष झारखंड राज्‍य आयोग, रांची यांचा IV (2008) CPJ 4 Anshuman Das Gupta Vs. Fiitjee & anr. हा निवाडा दाखल केला आहे. अटी व शर्तीचे संदर्भात सदर निवाडा आहे व त्‍या अटी आणि शर्ती प्रास्‍पेक्‍टस् मध्‍ये दिलेले असल्‍याने त्‍याबाहेर जाता येत नाही असे म्‍हटले आहे. परंतू सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याने जे दाखल प्रास्‍पेक्‍टस्/ब्रोशर छापील आहे, त्‍यावर 100 टक्‍के नौकरी मिळवून देण्‍याचे आश्‍वासन व कंपनीचे मार्फत नौकरी मिळवून देण्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यामुळे सदर निवाडा या प्रकरणाला लागू होत नाही. गैरअर्जदाराने खालील जे निवाडे दाखल केले आहेत ते व या प्रकरणातील बाबी या पूर्णतः भिन्‍न असून लागू पडत नाही.
1) II (2000) CPJ 457, Chakradhar Semwal Vs. Navjot Singh Waraich
2) I (2008) CPJ 346, Guru Jambheshwar University Vs. Dimple Bansal & ors.
3) 1999 (1) CPR 510, Kulsachiv Vs. Anil Kumar Sharma
4) VII 1995 CPR (2) 309, Dr. K. Ayyakkannu, Directorate of Distance Education Annammali University Vs. Dayanand
5)1999 (1) CPR 218, Co-ordinator, Indira Gandhi National Open University Margao-Goa & ors. Vs. Deven A. Valvaikar
6) 2008 (4) CPR 502 (NC), APEEJAY Institute of Mangement and Information Technology Vs. Shri Prashant Ashok
7) II (2009) CPJ 79, Sabir Khan Vs. Dehli Institute of Computer Sciences
8) 4 (2009) CPR 12, Saravpreet Singh. Vs. Lala Lajpat Rai Insitute of Engineering and Technology and Anr.
9) 1999 (1) CPR 513, Principal, Kisan Post Graduate Degree College Vs. Budharaj Gupta
 
      याउलट I (2000) CPJ 129 (NC), Cox & Kings (I) Pvt. Ltd. Vs. Joseph Fernandis या निवाडयात सेवा देण्‍या-या संस्‍थेने संदिग्‍ध जाहिरात दिल्‍याने मा. राष्‍ट्रीय आयोगाने अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब ग्राह्य धरली व सदर निवाडा या प्रकरणी अनूकुल असून व या प्रकरणामध्‍ये सुध्‍दा गैरअर्जदाराने दिशाभूल करणारी जा‍हिरात देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराला दिलेली रक्‍कम रु.1,10,000/- तक्रार दाखल केल्‍याचे दिनांकापासून म्‍हणजेच दि.20.05.2010 पासून 9 टक्‍के दराने व्‍याज संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत परत करावी. तक्रारकर्तीने खर्चाची रु.40,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी पुराव्‍याअभावी सिध्‍द होत नसल्‍यामुळे मान्‍य करण्‍यायोग्‍य नाही. तक्रारकर्तीने रु.2,00,000/- ची शारिरीक व मानसिक त्रासाकरीता मागणी केली आहे. सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्तीस दिशाभूल करणारी जाहिरात देऊन तिच्‍या आयुष्‍याचे अमूल्‍य दिवस वाया घालवले आहेत. त्‍यामुळे न्‍यायोचितदृष्‍टया तक्रारकर्ती रु.50,000/- मिळण्‍यास पात्र ठरते व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.3,000/- मिळण्‍यास पात्र ठरते. वरील सर्व निष्‍कर्षाच्‍या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला       रु.1,10,000/- तक्रार दाखल केल्‍याचे दिनांकापासून म्‍हणजेच दि.20.05.2010  पासून 9 टक्‍के दराने व्‍याज संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत परत करावी.
3)    गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीला रु.50,000/- शारिरीक व मानसिक  त्रासाची क्षतिपूर्तीबाबत द्यावे व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.
4)    गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून       30 दिवसाचे आत करावे.
 
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT