Maharashtra

Nagpur

EA/11/147

Amruta Milind Paithankar - Complainant(s)

Versus

Flying Cats, Exe.Director Through Priyanka Khosala - Opp.Party(s)

Adv. Sanjay Kasture

18 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/11/147
( Date of Filing : 22 Nov 2011 )
In
Complaint Case No. CC/10/327
 
1. Amruta Milind Paithankar
Sindhu Mahavidyalaya Marg, Balabhau Peth, Nagpur
Nagpur 440017
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. Flying Cats, Exe.Director Through Priyanka Khosala
Achraj Tower-2, Chhaoni chowk,
Nagpur
Maharashtra
2. Br.Director, Exe. Director Through Manish Agrawal
Acharaj Tower-2, Chhaoni Chowk,
Nagpur
Maharashtra
3. Cosmo Eviation Training School Pvt. Ltd., Exe.Director Priyanka Khosala
Administrative Office- S.C.O. 68-69, Sector C.
Chandigarh
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:Adv. Sanjay Kasture, Advocate
For the Respondent:
Dated : 18 Dec 2019
Final Order / Judgement

निशाणी क्रं. 1 वरील  आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये -

 

  1.       वर्तमान दरखास्‍त प्रकरणामध्‍ये स्‍थगनादेश असल्‍याच्‍या कारणाने प्रस्‍तुत तक्रार  ब-याच वर्षापासून प्रलंबित होती. परंतु दिनांक 07.11.2019 रोजी गैरअर्जदार यांच्‍या वकिलांनी पुरसीस दाखल करुन कळविले की, मा. राज्‍य आयोगाने अपील No A/11/201 हे दि. 21.04.2018 रोजी खारीज केलेले आहे आणि सदरहू आदेशाच्‍या विरुध्‍द गैरअर्जदार यांनी मा. राष्‍ट्रीय आयोगाकडे अपील अथवा रिव्‍हीजन दाखल केलेले नाही. गैरअर्जदार यांनी दिनांक 07.11.2019 रोजी कागदपत्रे दाखल करुन मा. राज्‍य आयोगाकडे वर्तमान प्रकरणात एकूण रक्‍कम रुपये 1,72,900/- जमा केल्‍याबाबत पुरसीस सदरहू अपील मध्‍ये दि. 02.05.2011 मध्‍येच दाखल केली होती. त्‍याची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. करिता मा. राज्‍य आयोगाकडे पत्र पाठवून रक्‍कम जमा असल्‍याबाबतचे माहिती मागविली होती, त्‍याप्रमाणे मा. राज्‍य आयोगाच्‍या अधिक्षकांचे जा. क्रं. रा.आ./ प.ख.ना/ विधी/ अपील/ अहवाल/2019/757, दिनांक 27.11.2019 चे पत्र जिल्‍हा न्‍यायमंचाच्‍या कार्यालयात आ.क्रं. 539 प्रमाणे दिनांक 28.11.2019 रोजी प्राप्‍त झाले आणि सदरहू पत्राप्रमाणे रुपये 1,72,900/- ही रक्‍कम मुदत ठेव नोंद मध्‍ये जमा असल्‍याचे कळविले आहे. यावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार यांनी दिनांक 02.05.2011 पर्यंत एकूण रक्‍कम 1,72,900/- जमा केलेली आहे.

 

  1.         आम्‍ही मुळ आदेशाचे अवलोकन केले असता असे दिसून आले की, मुळ आदेशाप्रमाणे तक्रारकर्तीला रक्‍कम रुपये 1,10,000/- देण्‍याबाबत आणि त्‍यावर दि. 20.05.2010 पासून 9 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याबाबतचा आदेश आहे. तसेच नुकसानीबाबत रुपये 50,000/- व खर्चाबाबत रुपये 3,000/- देण्‍याबाबतचा आदेश आहे.

 

 

  1.        सबब आम्‍ही दि. 02.05.2011 पर्यंतचे व्‍याज हिशोबामध्‍ये घेऊन गैरअर्जदार यांच्‍याकडून देय असलेली एकूण रक्‍कमेबाबतचा हिशोब केला असता गैरअर्जदार हे रुपये 1,72,405/- देण्‍यास जबाबदार आहेत. गैरअर्जदार यांनी रक्‍कम रुपये 495/- अधिकच्‍या हिशोबात घेऊन रुपये 1,72,900/- जमा केलेली आहे. गैरअर्जदार यांनी मुळ आदेशाचे दि. 02.05.2011 रोजीच पालन केलेले आहे आणि गैरअर्जदार यांनी दाखल केलेले अपील खारीज झाल्‍यामुळे वर्तमान प्रकरणात स्‍थगनादेश नसल्‍यामुळे वर्तमान दरखास्‍त प्रकरण यापुढे चालू शकत नाही. सबब वर्तमान प्रकरण खारीज करुन गैरअर्जदार यांना निर्दोष मुक्‍त करणे कायदेशीर वाजवी आणि योग्‍य आहे. तक्रारकर्तीला दिनांक 07.11.2019 पासून संधी दिल्‍यानंतर ही तक्रारकर्ती प्रकरण काढून घेण्‍याकरिता हजर झाली नाही आणि तिने काहीही कार्यवाही न करता आज रोजी ही गैरहजर आहे.

 

  •             सबब खालीलप्रमाण अंतिम आदेश पारित.

 

                                आदेश

 

  1. तक्रारकर्तीचा वर्तमान दरखास्‍त अर्ज मुळ आदेशाचे पालन झाल्‍यामुळे नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.

 

  1. गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांना ग्राहक सरंक्षण कायद्याच्‍या कलम 27 च्‍या गुन्‍हयातून  दोषमुक्‍त करण्‍यात येते.

 

  1. गैरअर्जदार यांनी जामीन दिलेले असल्‍यास जामीनपत्र रद्द करण्‍यात येते.
  2. उभय पक्षांना  आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.