Maharashtra

Nagpur

CC/4/2021

VINAY BORKAR - Complainant(s)

Versus

FLIPKART INTERNET PVT. LTD. - Opp.Party(s)

SELF

05 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/4/2021
( Date of Filing : 04 Jan 2021 )
 
1. VINAY BORKAR
PLOT NO.1403, YOGI ARVIND NAGAR, YASHODHARA SQUARE, KAMPTEE ROAD, NAGPUR-440026
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. FLIPKART INTERNET PVT. LTD.
BUILDING ALYSSA BEGONIA & CLOVER, EMBASSY TECH VILLAGE, OUTER RING ROAD, DEVARABEESANAHALLI VILLAGE, BANGALORE, KARNATAKA-560103
BANGALORE
KARNATAKA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 05 Aug 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५(१) अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने दिनांक १६/१०/२०२० रोजी विरुध्‍द पक्षाचे Online Website ला  Aristocrat PHOTON STROLLY 55 360 TBL Cab Luggage 22 Inch विकत घेण्‍याकरिता भेट दिली. तक्रारकर्त्‍याने Aristocrat PHOTON STROLLY 55 360 TBL Cab Luggage 22 Inch विकत घेण्‍याकरिता ऑनलाईन पेमेंट मोडची निवड केली आणि खरेदी किंमत रुपये १२९९/- विरुध्‍द पक्षाला अदा केले. तक्रारकर्त्‍याने रक्‍कम विरुध्‍द पक्षाला अदा केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडून ऑर्डर आय.डी. क्रमांक OD219970027516816000  देण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाचे ऑथॉरिटी कडून आश्‍वासीत केले की, Aristocrat PHOTON STROLLY 55 360 TBL Cab Luggage 22 Inch दिनांक १९/१०/२०२० ला पोहचविण्‍यात येईल. परंतु निर्धारीत वेळेनंतरही तक्रारकर्त्‍याला Aristocrat PHOTON STROLLY 55 360 TBL Cab Luggage 22 Inch मिळाली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला धक्‍का बसला.
  3. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे वेबसाईट चॅटबॉक्‍स मध्‍ये मेसेज पाठवून वस्‍तू विकत घेण्‍याबाबत लुबाडणूक झाल्‍याबाबत कळविले. संबंधित अधिका-याने तक्रारकर्त्‍याला वाद विषय बाबीवर काम करीत असल्‍याचे कळविले परंतु विरुध्‍द पक्ष कंपनीने वादाचे निवारण केले नाही. दिनांक २४/१०/२०२० रोजी विरुध्‍द पक्षाकडून झालेल्‍या फसवणूकीमुळे तक्रारकर्त्‍याने Consumer Cell Grievance  कडे फाईल क्रमांक २३४०१७२ अन्‍वये तक्रार केली व विरुध्‍द पक्ष कंपनीने दिनांक १/११/२०२० रोजी उत्‍तर पाठविले व त्‍याव्‍दारे कळविले की, कुरीअर च्‍या सेवेमुळे विरुध्‍द पक्ष आपणास वस्‍तु पाठवू शकणार नाही. त्‍यामुळे आपण सदरचा ऑर्डर फ्लीपकार्ट अॅपवरुन रद्द करुन नव्‍याने ऑर्डर द्यावा.
  4. तक्रारकर्ता नमूद करतो की, सदर वाद सोडविण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष अधिकारी यांनी तक्रारकर्त्‍याला सदरचा ऑर्डर रद्द करुन नव्‍याने ऑर्डर देण्‍याकरिता सांगितले परंतु किंमतीतील बदलामुळे तक्रारकर्त्‍याने ते करण्‍याचे नाकारले आणि सदरचा वाद सोडविण्‍याकरिता त्‍यांनी मला २ ते ३ दिवस थांबण्‍याकरिता सांगितले. दिनांक ४/११/२०२० रोजी तक्रारकर्त्‍याला कळले की, विरुध्‍द पक्षाचे कुरीअर सर्व्हिसने विकत घेतलेल्‍या वस्‍तुची डिलीवरी न दिल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाचे ऑथॉरिटीने परचेस ऑर्डर रद्द केले. तक्रारकर्ता नमूद करतो की, वरील नमूद वाद विरुध्‍द पक्षाचा निष्‍काळजीपणा दर्शवितो. विरुध्‍द पक्ष कंपनी अनुचित व्‍यापार पद्धतीचा वापर करुन तक्रारकर्त्‍याची फसवणूक करीत आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक ञासाकरिता व ञुटीपूर्ण सेवेकरिता रुपये १००००/- द्यावे व तक्रारीचा खर्च द्यावा.
  1. विरुध्‍दपक्षाला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. सदरची नोटीस विरुध्‍द पक्षाला दिनांक १५/३/२०२१ रोजी प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर झाले नाही. करिता विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ३०/०७/२०२१ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केल्‍यावर तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?              

तसेच अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय ?             होय

  1. काय आदेश ?                                                                          अंतिम आदेशाप्रमाणे 

 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने दिनांक १६/१०/२०२० रोजी विरुध्‍द पक्षाचे ऑनलाईन वेबसाईटवरुन ऑनलाईन पेमेंटव्‍दारे Aristocrat PHOTON STROLLY 55 360 TBL Cab Luggage 22 Inch ची विरुध्‍द पक्षाला ऑर्डर दिली व तक्रारकर्त्‍याने त्‍यापोटी खरेदी किंमत रुपये १२९९/- विरुध्‍द पक्षाला ऑनलाईन पेमेंटव्‍दारे अदा केली. तक्रारकर्त्‍याने खरेदी किंमत रुपये १२९९/- विरुध्‍द पक्षाला अदा केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाकडून तक्रारकर्त्‍याला ऑर्डर आय.डी. क्रमांक OD219970027516816000 देण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्षाकडून पञाव्‍दारे तक्रारकर्त्‍याला आश्‍वासीत करण्‍यात आले होते की, तक्रारकर्त्‍याला ऑर्डर करण्‍यात आलेली वस्‍तु दिनांक १९/१०/२०२० रोजी प्राप्‍त होईल. परंतु तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडून ऑर्डर देण्‍यात आलेली वस्‍तु Aristocrat PHOTON STROLLY 55 360 TBL Cab Luggage 22 Inch प्राप्‍त न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने Consumer Cell Grievance  कडे फाईल क्रमांक २३४०१७२ अन्‍वये तक्रार केली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही. विरुध्‍द पक्षाने दिनांक १/११/२०२० रोजी तक्रारकर्त्‍याला ईमेल पाठवून त्‍याव्‍दारे कळविले की, ‘ Shipment is cancelled, Your item has been returned’ तसेच ईमेल व्‍दारे कळविले की, ‘Due to unforeseen issue, the courier service provider will not be able to deliver the product. Hence request you to cancel the current order from your flipkart app and place a fresh order.’ याचाच अर्थ असा आहे की, विरुध्‍द पक्ष यांचेकडे सदरहू वस्‍तु उपलब्‍ध असतांनाही नवीन ऑर्डर देण्‍यास सांगणे ही विरुध्‍द पक्ष यांची अनुचित प्रथा आहे. तक्रारकर्त्‍याने वस्‍तुच्‍या किंमतीतील बदलामुळे नव्‍याने ऑर्डर विरुध्‍द पक्षाला दिला नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या ऑर्डरपोटी रक्‍कम रुपये १,२९९/- स्‍वीकारुन तक्रारकर्त्‍याला वस्‍तुची डिलीवरी दिली नाही व Shipment cancel चा आधार घेवून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे नोंदविलेला ऑर्डर क्रमांक OD219970027516816000 रद्द करण्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला सुचवून व नव्‍याने ऑर्डर देण्‍याकरिता कळविले, ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रती अनुचित व्‍यापार पद्धतीचा वापर करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता प्रती अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करण्‍यात येत आहे.
  3. विरुध्‍द पक्षाला आदेशीत करण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये ३,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १,०००/- अदा करण्‍यात यावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.