Maharashtra

Nagpur

CC/629/2021

SONALI VASANT KANHEKAR - Complainant(s)

Versus

FLIPKART INTERNET PVT. LTD. - Opp.Party(s)

SELF

14 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/629/2021
( Date of Filing : 26 Oct 2021 )
 
1. SONALI VASANT KANHEKAR
R/O. 1641/B, KAMGAR COLONY, SUBHASH NAGAR, HINGNA ROAD, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. FLIPKART INTERNET PVT. LTD.
EMBASSY TECH VILLAGE, 8TH FLOOR BLOCK B, DEVARABEESANAHALLI VILLAGE, VARTHUR HOBLI, BENGALURU EAST TALUK, BENGALURU-560103
BANALURU
KARNATAKA
2. MD/GM, JEEVES CONSUMER SERVICES PVT. LTD.
EMBASSY TECH VILLAGE, TH FLOOR BLOCK B, DEVARABEESANAHALLI VILLAGE, VARTHUR HOBLI, BENGALURU EAST TALUK, BENGALURU-560103
Bangalore
KARNATAKA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 
Dated : 14 Jul 2022
Final Order / Judgement

आदेश

                                

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तिने विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे  दिनांक 19.10.2020 ला Thomson Company’s चा 55 inch LED Smart TV किंमत रुपये 28,999/- चा विकत घेण्‍याकरिता बुक केला होता व त्‍यानुसार विरुध्‍द पक्ष 1 यांनी invoice date 22.10.2020 अन्‍वये Thomson 9 R Series 139 cm (55inch) Ultra HD(4K)LED Smart Android TV (IMEI/Serial NO. TH55PATH505020200901384ATV हा तक्रारकर्तीच्‍या घरी दि. 25.10.2020 ला पाठविला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला  सदर टीव्‍ही.ची 12 महिन्‍याची वॉरन्‍टी दिली होती. विरुध्‍द पक्षाने त्‍यांच्‍या कंपनीचा technician तक्रारकर्तीच्‍या घरी  पाठवून सदरचा TV स्‍थापित करुन दिला, त्‍यावेळी तक्रारकर्तीला  TV वरील transparent sticker  काढले असता तक्रारकर्तीला  tv च्‍या  fiber frame वर भरपूर scratches आढळल्‍या. तेव्‍हा तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाच्‍या टेक्‍नीशयनला सदर टी.व्‍ही.परत घेऊन जाऊन नविन टी.व्‍ही.देण्‍याचे सांगितले, परंतु टेक्‍नीशयनने सदर टी.व्‍ही.चा स्‍टॉक उपलब्‍ध नसल्‍याचे सांगितले व ज्‍यावेळी पुरवठा उपलब्‍ध राहील त्‍यावेळी टी.व्‍ही. पुरविण्‍यात येईल असे आश्‍वासित केले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने टी.व्‍ही.बदलून देण्‍याची मागणी मागे घेतली. त्‍यानंतर वि.प.च्‍या technician ने तक्रारकर्तीला 3 वर्षाची Extended Warranty घेण्‍याबाबत आग्रह केला व त्‍यानुसार टी.व्‍ही.त काही दोष आढळल्‍यास टी.व्‍ही.ची संपूर्ण रक्कम परत करण्‍यात येईल किंवा त्‍याऐवजी त्‍याच किंमतीत नविन उपलब्‍ध मॉडेल आपणास देण्‍यात येईल असे सांगितले. तेव्‍हा तक्रारकर्तीने टेक्‍नीशयनने दिलेल्‍या आश्‍वासनानुसार टी.व्‍ही.च्‍या Extended करिता  त्‍याला रुपये 5000/- दिले. टेक्‍नीशयनच्‍या म्‍हणण्‍यानुसार 3 वर्षाची  वॉरन्‍टी कंपनीने सुरुवातीला दिलेल्‍या एक वर्षाच्‍या वॉरन्‍टीनंतर सुरु होईल, परंतु ज्‍यावेळी तक्रारकर्तीला 3 वर्षाच्‍या Extended वॉरन्‍टीबाबत ई मेल प्राप्‍त झाला, त्‍यावेळी टी.व्‍ही.विकत घेतला त्‍या तारखेपासून 3 वर्षाच्‍या कालावधीकरिता  इक्‍स्‍टेन्‍ड (Extended) करुन  देण्‍यात आल्‍याचे कळले.  तक्रारकर्तीने विकत घेतलेला टी.व्‍ही. स्‍थापित केल्‍यानंतर काही दिवसानी TV screen  च्‍या corner ला bubbles आणि colour fluctuations  दिसण्‍यास सुरुवात झाली तेव्‍हा तक्रारकर्तीने सदरची बाब विरुध्‍द पक्षाच्‍या निदर्शनास आणून दिली. परंतु टेक्‍नीशयनने वातावरणातील बदलामुळे screen flicker होत असल्‍याचे सांगितले.  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाच्‍या technician ला टी.व्‍ही.बदलून नविन TV देण्‍याची मागणी केली असता सदरचा टी.व्‍ही.उपलब्‍ध नसल्‍याचे सांगितले व तो बदलून देण्‍याकरिता वरिष्‍ठ अधिका-याशी पाठपुरावा करीत असल्‍याचे ही सांगितले.
  2.      तक्रारकर्तीने विकत घेतलेल्‍या टी.व्‍ही.च्‍या screen colour fluctuations & bubbles  यात वाढ झाल्‍यामुळे तिने विरुध्‍द पक्षाचे technician शी संपर्क साधला. तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्‍द पक्षाच्‍या टेक्‍नीशयनने सदरच्‍या टी.व्‍ही.चे Back Panel पॅनल उघडले त्‍यानंतर पुनश्‍च टी.व्‍ही.सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला असता टी.व्‍ही.सुरु झाला नाही. विरुध्‍द पक्षाच्‍या टेक्‍नीशयनने तक्रारकर्तीला नविन update Modal पुरविण्‍याकरिता रुपये 15000/- ची मागणी केली, परंतु तक्रारकर्तीने रक्‍कम देण्‍यास नकार दिला. सदरची बाब तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष कंपनीला कळविली त्‍यावेळी कंपनीने टी.व्‍ही.च्‍या Brand Box ची मागणी केली. परंतु तक्रारकर्तीने टी.व्‍ही.चा ब्रान्‍ड बॉक्‍स टेक्‍नीशयनने टी.व्‍ही. स्‍थापित करुन दिला त्‍यावेळी त्‍याच्‍या मागणीप्रमाणे  परत केला होता.
  3.      तक्रारकर्तीने सदरचा टी.व्‍ही.तिच्‍या आईकरिता विकत घेतला होता परंतु सदरचा टी.व्‍ही. आजतागायत बंद आहे, याबाबत विरुध्‍द पक्ष कंपनीकडे दोषपूर्ण टी.व्‍ही. दिल्‍याबाबत ई-मेल द्वारे पाठपुरावा करीत आहे. त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने  आजपर्यंत तक्रारकर्तीला सदरच्‍या टी.व्‍ही.ची रक्‍कम परत केली नाही अथवा टी.व्‍ही.बदलून दिला नाही. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 च्‍या प्रतिनिधीने दि.07.09.2021 ते 09.09.2021 पर्यंत तक्रारकर्तीशी संपर्क साधला व दि. 09.09.2021 ला सांगितले की, टी.व्‍ही.खरेदीबाबतची किंमत 28,999/- परत करण्‍यास तयार आहेत. परंतु टी.व्‍ही.स्‍थापित करण्‍याबाबतचे शुल्‍क व इक्‍स्‍टेंड वॉरन्‍टी बाबत अदा केलेली फी परत करु शकत नाही असे सांगितले. त्‍यामुळे  तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला टी.व्‍ही.ची किंमत रुपये 28,999/- , T.V. (टी.व्‍ही.) स्‍थापित करण्‍याची किंमत रुपये 1000/- व ई.एम.आय. पोटी अदा केलेली रक्‍कम रुपये 4,057/- व Extended warranty  पोटी अदा केलेली रक्‍कम रुपये 5000/- व नाहक त्रास झाल्‍यामुळे आईच्‍या वैद्यकीय खर्चाकरिता अदा केलेली रक्‍कम परत देण्‍याचा आदेश द्यावा.       तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई  व  तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.
  4.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द 18.05.2022 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.  

 

  1.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर आयोगाने प्रकरण निकाली काढण्‍याकरिता खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

1    तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय?                  होय

2    विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?    होय

3.    काय आदेश ?                                   अंतिम आदेशानुसार

 

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 कडे  दि. 19.10.2020 ला  Order ID OD219991010658442000  नुसार Thomson 9 R series 139 cm (55 inch) Ultra HD(4K)LED Smart Android TV, Serial No. TH55PATH505020200901384ATV हा किंमत रुपये 28,999/- चा खरेदीकरिता ऑर्डर दिला होता व त्‍याचा Invoice Number FAC5DK2100030509 असा असून इनव्‍हाईस दि.22.10.2020 रोजी पुरविला असल्‍याचे नि.क्रं. 2 (1) वर दाखल  दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्तीकडून रुपये 5000/- स्‍वीकारुन त.क.च्‍या टी.व्‍ही.ला 3 वर्षाची विस्‍तारित (इक्‍स्‍टेंड) वॉरन्‍टी दिल्‍याचे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाच्‍या टेक्‍नीशयनने तक्रारकर्तीच्‍या घरी टी.व्‍ही. स्‍थापित केल्‍यानंतर टी.व्‍ही.स्‍क्रीन मध्‍ये flicker आणि bubbles दिसत असल्‍याबाबत विरुध्‍द पक्षाकडे ई-मेल द्वारे तक्रार केली असल्‍याबाबतचे  नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्तीला दि.24.08.2021 ला व दि.13.11.2021 ला ई-मेल पाठवून सदरचा टी.व्‍ही. बदलून देण्‍याची मागणी मंजूर करुन त्‍यानुषंगाने विरुध्‍द पक्ष 1 फ्लीप कार्ड यांच्‍याशी संपर्क साधण्‍याकरिता कळविले होते हे नि.क्रं. 2 वर दाखल ई मेल वरुन दिसून येते. वि.प. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला पुरविलेल्‍या टी.व्‍ही.मध्‍ये निर्मित दोष असल्‍याबाबतचा  तज्ञ अहवाल तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल केलेला आहे. यावरुन विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती केले असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

 

सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला टी.व्‍ही. किंमत रक्‍कम रुपये 28,999/- आणि त्‍यावर दि. 22.10.2020 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.
  2. अथवा

विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला त्‍याच कंपनीचा त्‍याच मॉडेलचा नविन टी.व्‍ही. बदलून द्यावा.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आत करावी.

 

  1.    उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.

 

  1.    तक्रारकर्त्याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.