Maharashtra

Nagpur

CC/315/2017

Shri Swaraj Alias K. Upendra Rao - Complainant(s)

Versus

Flipkar Internet Pvt. Ltd., Through Managing Directro - Opp.Party(s)

Adv. K.E. Meshram

30 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/315/2017
( Date of Filing : 25 Jul 2017 )
 
1. Shri Swaraj Alias K. Upendra Rao
R/o. Qtr.No. 171/5, Near Pump House No. 3, Motibagh, Nagpur 440004
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Flipkar Internet Pvt. Ltd., Through Managing Directro
Regd. Office- Vaishnavi Summit No. 6/B, 7th main, 80 Feet Road, 3rd Block, Koramangala, Bangalore 560034 And Flipkart Internet Pvt. Ltd., Office- Zone manay Tech.Park, 56/18 and 55/09, 7th floor, Garvebhavipalya, Hosur Road, Bangalore 560034
Bangalore
Karnataka
2. Shreyash Retail Pvt. Ltd.
No. 42/1 and 42 KACHERAKANAHALLI Village, JADIGENAHALLI HOBLI HOSKOTE TALUK, Bangaluru
Bangaluru
Karnataka
3. Apple India Pvt. Ltd.
19th Floor, Conorde Tower Tower-C, UB City, No. 24, Vitthalmallya Road, Banglore
Banglore
Karnataka
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. K.E. Meshram, Advocate for the Complainant 1
 ADV. ANOOP JAISWAL, Advocate for the Opp. Party 1
 ADV. HITESH N. VERMA, Advocate for the Opp. Party 1
Dated : 30 Nov 2021
Final Order / Judgement

 

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.             तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ही  www.flipkart.com ही वेबसाईट असून विरुध्‍द पक्ष 2 हा  विक्रेता आहे  व वि.प. 3 ही Apple   i phone Handset उत्‍पादक आहेत. तक्रारकर्त्‍याने वि.प. 3 ने निर्मित केलेला Apple   i phone Handset वि.प. 2 यांच्‍याकडून विरुध्‍द पक्ष 1 www.flipkart.com या बेवसाईट वरुन दि. 05.05.2017 ला एक apple i phone  mobile handset 7 , 8 GB, Jet Black , Sr.No. DNRSH3YPHG7P (i phone)  हा बुक केला होता व वि.प. 1 ने त.क.ची Apple   i phone ची ऑर्डर www.flipkart.com या वेब साईटवरुन स्‍वीकारली होती व  तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या HDFC Bank च्‍या खाते क्रं. 50100194811963 मधून क्रेडिट कार्ड द्वारे रुपये 57,589/- अदा केले होते.  विरुध्‍द पक्षाला रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर वि.प. 1 व 2 यांनी वरील Apple i phone दि. 06.05.2017 ला  Ekart logistics Courier Service / post द्वारे तक्रारकर्त्‍याला पाठविले होते.
  2.       तक्रारकर्त्‍याला वरील ऑर्डरप्रमाणे दि. 06.05.2017 ला ठिक 1.00 वा. Ekart logistics Courier Service / post च्‍या डिलीव्‍हरी बॉय द्वारे वि.प. 1 यांनी पाठविलेला सीलबंद पॅकेट प्राप्‍त झाला व सीलबंद पॅकेट प्राप्‍त झाल्‍याची तक्रारकर्त्‍याने स्‍वीकृती पावती दिली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदरचा सीलबंद पॅकेट उघडला असता Apple  i phone Handset, Sr.No. DNRSH3YPHG7P आढळला.  सदरचे  सीलबंद पॅकेट उघडल्‍याबरोबर i phone start बटन द्वारे सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला असता तो सुरु झाला नाही. तेव्‍हा सदरच्‍या  i phone ची बॅटरी low असल्‍याच्‍या कारणास्‍तव  सुरु होत नाही असे समजून तक्रारकर्त्‍याने  i phone सोबत असलेले चार्जर द्वारे i phone चार्ज करण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु  i phone चार्ज झाला नाही.  याबाबत लगेच तक्रारकर्त्‍याने वि.प. 1 व 2 ला फोन करुन सर्व प्रकार सांगितला व दि.06.05.2017 ला दूरध्‍वनी द्वारे तक्रार क्रमांक 101090911050627428 अन्‍वये तक्रार नोंदविली  व  त्‍याद्वारे i phone बदलून नविन देण्‍याबाबत किंवा संपूर्ण रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली.  तसेच दि. 06.05.2017 याच दिवशी वि.प. 1 द्वारे तक्रारकर्त्‍याला ई-मेल प्राप्‍त झाला व त्‍याद्वारे तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचे लवकरच निराकरण करण्‍यात येईल असे कळविले. त्‍यानंतर ही वि.प. 1 यांनी दि. 07.05.2017 व 11.05.2017 ला ई-मेल पाठवून लवकरच तक्रारकर्त्‍याच्‍या i phone च्‍या तक्रारीचे निराकरण करण्‍याकरिता पुढील 7 दिवसात तक्रारकर्त्‍याशी तज्ञ चमू संपर्क करतील व माहिती घेऊन तक्रारीचे निरासन करतील असे सांगितले होते.त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याला त्‍याचा i phone हॅन्‍डसेट  हा सीलबंद पॅकेट मध्‍ये प्राप्‍त असल्‍याने तक्रारकर्त्‍याची i phone  बदलून देण्‍याची विनंती अमान्‍य करण्‍यात येत असल्‍याचे उत्‍तर प्राप्‍त झाले.
  3.      तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडून उत्‍तर प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍याने सदरचा i phone हा विरुध्‍द पक्ष 3 चे असलेले अधिकृत सर्विस सेंटर मे. एन.जी.आर.टी. सिस्‍टीम प्रा.लि. 6 वा मजला नारंग टावर, पाम रोड, सिव्‍हील लाईन,  नागपूर यांच्‍याकडे तपासणीकरिता घेऊन गेला तेव्‍हा तक्रारकर्त्‍याला कळले की, त्‍याला प्राप्‍त झालेला i phone हा Apple प्रोडक्‍ट नसून तो Fake  आहे व Inspection report रिपोर्ट मध्‍ये आहे की, ......
  1. The unit is counter fit, unit lighting Cable and ear pots are counter fit unit returned to the costumer.
  2. Unit is counter fit and unit doesn’t have any serial number or IMEI No. On sim tray. The original IMEI No. Of booked Apple i7 phone is 359154075164550.
  3. The Product is not powering clearly shows that the said phone was not a genuine Apple i7 phone product and was dispatched at the O.P.No.1 end in damaged condition.”.  

                वरील प्रमाणे अॅपलचे अधिकृत सर्विस सेंटरचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदरचा अहवाल दि. 11.05.2017 ला वि.प. 1 ला ई-मेल द्वारे पाठविला. परंतु वि.प. 1यांनी Apple i phone च्‍या अधिकृत सर्विस सेंटरने पाठविलेल्‍या अहवालाकडे दुर्लक्ष केले आणि त्‍यांनी त.क.ला Apple चा original i- phone पाठविल्‍याचा आधार घेतला.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ला ई-मेल द्वारे कळविले की, त्‍याला जो i phone प्राप्‍त झालेला आहे तो original नसल्‍यामुळे सदरचा i phone बदलून द्यावा किंवा त्‍याच्‍याकडून घेतलेली रक्‍कम परत करण्‍यात यावी.  परंतु वि.प. 1 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या सदरच्‍या तक्रारीचे निवारण केले नाही अथवा रक्‍कम ही परत केली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍या विरुध्‍द पाचपावली पोलिस स्‍टेशनला तक्रार नोंदविली होती, परंतु पोलिसांनी देखील तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ते 3 ला दि. 15.05.2017 ला व वि.प. 4 ला दि. 31.05.2017 ला वकिलामार्फत  कायदेशीर नोटीस पाठविली होती. विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांना सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची/ नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला नविन Apple चा Original  i phone द्यावा किंवा तक्रारकर्त्‍याकडून  i phone करिता स्‍वीकारलेली रक्‍कम परत करण्‍याचा आदेश द्यावा.  तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या  शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व  तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

  1.      विरुध्‍द पक्ष 1 हे इन्‍टरनेट द्वारे त्‍यांच्‍या वेबसाईट www.flipkart.com वरुन ऑनलाईन द्वारे ग्राहकांनी वस्‍तू बुक करण्‍याकरिता तयार केलेले प्‍लॅटफॉर्म आहे.  . वि.प. 1 चा व्‍यवसाय हा Information Technology Act 2000 कलम 2 (1) (w) मधील inter mediator  च्‍या व्‍याख्‍येत मोडतो, त्‍यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे ग्राहक या संज्ञते मोडत नाही. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍यामध्‍ये कोणताही गुप्‍त करार झालेला नाही. तक्रारकर्त्‍याने i phone चा काही काळ वापर केल्‍यानंतर  त्‍यामधील दोषाकरिता तक्रार दाखल केलेली आहे. i phone मधील दोषाची जबाबदारी किंवा विक्रीनंतरची   सेवा बाबतची बाब ही i phone निर्माता व अधिकृत सर्विस सेंटर संबंधात आहे, त्‍याकरिता विरुध्‍द पक्ष 1 जबाबदार नाही.

तक्रारकर्त्‍याला कुरियर सर्विस सेंटर द्वारे सीलबंद पॅकट प्राप्‍त झाला,   त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला मोबाईल हॅन्‍डसेट तपासण्‍याचा अधिकार आहे.  मोबाईलचा Sr. No. हा Invoice Sr. No. शी मिळताजुळता नाही,  कुरियर सर्विसच्‍या एजंट द्वारे तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष 3 ने निर्मित केलेली व्‍यवस्थितीत वस्‍तू प्राप्‍त झालेली आहे. त.क.ने स्‍वतःहून काही mischief केले असून स्‍वतः mischievous complaint दाखल केली आहे. म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

  1.       विरुध्‍द पक्ष 2 ने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की,  वि.प. 2 ही श्रेयश रिटेल प्रा.लि. ही कंपनी कायद्या अंतर्गत नोंदणीकृत असून  तिचा दुस-याने निर्मित केलेल्‍या वस्‍तूचा विक्रीचा व्‍यवसाय आहे. वि.प. 2 हे Flipkart वेबसाईटवर नोंदणीबध्‍द विक्रेता आहे आणि वेबसाईट द्वारे इतर नि‍र्माते व्‍यापा-यांची वस्‍तू यांच्‍या  ब्रान्‍डची विक्री करतो.  वि.प. 2 हा स्‍वतः निर्माण केलेल्‍या वस्‍तू विक्रीचा व्‍यवसाय करीत नाही.  वि.प. 2 ने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने सदर वस्‍तूचा काही वेळ वापर केल्‍यानंतर वस्‍तू मधील दोषाबाबत तक्रार केली आहे.  वस्‍तू मधील दोष निर्मितीबाबत  जबाबदारी ही निर्मात्‍याची व अधिकृत सर्विस सेंटरची आहे. त्‍यामुळे वि.प. 2 ला वस्‍तू मधील दोषाकरिता जबाबदार ठरविण्‍यात येऊ नये.  वि.प. 2 यांची ग्राहकापर्यंत वेळेवर व योग्‍य पत्‍त्‍यावर वस्‍तू पोहचविण्‍याची जबाबदारी आहे व ती त्‍याने व्‍यवस्थितीत पार पाडलेली आहे. विरुध्‍द पक्ष 2 हा वस्‍तूचा निर्माता नाही  अथवा अधिकृत सर्विस सेंटर ही नाही, म्‍हणून वस्‍तू विक्रीनंतरची सेवा  देण्‍याची जबाबदारी ही वि.प. 2 ची नाही.

विरुध्‍द पक्ष 2 ने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने  विकत घेतलेल्‍या वस्‍तुला संबंधित निर्मात्‍याने निर्मिती दोषाबाबत वॉरन्‍टीच्‍या शर्ती व अटीनुसार वॉरन्‍टी दिलेली आहे. निर्मात्‍याने दिलेल्‍या वॉरन्‍टी व्‍यतिरिक्‍त वि.प. 2 ग्राहकाला  10 दिवसाची परत करण्‍याची  किंवा बदलवून देण्‍याची सुविधा पुरवितो, परंतु तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे सदरचा  i phone     सुमारे एक वर्ष वापरला व त्‍यानंतर वि.प. 2 विरुध्‍द सदरची तक्रार दाखल केलेली आहे.  त.क.ने i phone    विकत घेतला त्‍यावेळी व त्‍यानंतर सुध्‍दा i phone    व्‍यवस्थितीत कार्यरत होता, त्‍यामुळे वि.प. 2 यांना i phone    मधील आलेल्‍या दोषाकरिता जबाबदार ठ‍रविण्‍यात येऊ नये. तसेच ग्रा.सं.का.1986 अंतर्गत त.क. व वि.प. 2 यांच्‍यामध्‍ये ग्राहक वाद निर्माण झालेला  नाही. तसेच  तक्रारकर्त्‍याने तक्रारीत आवश्‍यक पक्षकार न केल्‍याच्‍या कारणाने व  वि.प. 2 ने कुठलीही दोषपूर्ण सेवा न दिल्‍याच्‍या कारणाने त्‍याच्‍या विरुध्‍द दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

  1.           विरुध्‍द पक्ष 3 ने लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, सदर प्रकरणात त.क. ने  apple i phone  mobile handset 7 , 8 GB, Jet Black , Sr.No. DNRSH3YPHG7P   हा चार्ज होत नसल्‍याच्‍या कारणाने अधिकृत सर्विस सेंटर वि.प. 3 यांच्‍याकडे दि. 11.05.2017 ला संपर्क साधला. सदरच्‍या i phone   तपासणीनंतर  सदर i phone   व त्‍यामधील सुटे भाग ओरिजनल असल्‍याचे आढळून आले नाही. सर्विस सेंटरमध्‍ये सेवा देणा-याने सदरच्‍या i phone   चे फोटो घेतले व सर्व फोटो जमा करुन सदर प्रकरण SSE  यांच्‍याकडे रेटले. एस.एस.ई. यांनी सदरचा i phone   प्रोडक्‍ट  Genuine नसल्‍याचे confirm केले.  ER यांनी त.क.ची मोबाईल बदलून देण्‍याची तसेच रक्‍कम परत करण्‍याची मागणी फेटाळली.  त.क. ज्‍या वस्‍तुकरिता वॉरन्‍टची मागणी करीत आहे ती वस्‍तु अधिकृत अॅपल वस्‍तु पेक्षा वेगळी आहे, त्‍यामुळे त.क. अॅपल लि.  वॉरन्‍टीच्‍या शर्तीनुसार सेवा मिळण्‍यास पात्र नाही. सर्विस सेंटरचे सर्विस प्रोव्‍हायडरने  सांगितले की, i phone    हा बनावट आहे आणि सदरचा i phone    बनावट असल्‍याचे  AASP यांनी सुनिश्चित केले आहे. i phone    मधील सिम ट्रे ला IMEI No. नाही. त.क.ने सदरचा i phone     वि.प. 3 च्‍या एक्‍सीकेटयु रिलेशन  टीमकडून तपासला व त्‍यांनी सुध्‍दा i phone    बनावट असल्‍याचे निश्चित केले आणि त्‍यांना खालील   Discrepancies  आढळल्‍या.

    Fonts & Fonts colour on enclosure was different as compare to

other known good unit.

Sim Tray do not have the IMEI No.

Designed by California was mentioned on the lighting to USB

Cable.

त.क.चा i phone    बनावट असल्‍यामुळे  त.क.ला वॉरन्‍टी अंतर्गत सेवा नाकारण्‍यात आली आणि त.क.ला वि.प. 1 व 2 यांच्‍याशी संपर्क साधण्‍यास सांगण्‍यात आले की, त्‍यांनी त.क.ला  बनावट प्रोडक्‍ट का विकला.

 

  1.        उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेज, त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे              उत्‍तर

  1.   तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय

 

  1.   विरुध्‍द पक्ष 1 व 3 ने दोषपूर्ण सेवा दिली काय ?     नाही

 

  1.   विरुध्‍द पक्ष 2 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ? होय

 

  1.   काय आदेश ?                             अंतिम आदेशाप्रमाणे

 

  • निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 च्‍या  वेबसाईट www.flipkart.com  या प्‍लॅटफॉर्मवरुन ऑनलाईन द्वारे विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून वि.प. 3 ने निर्मित केलेले i phone  i phone  mobile handset 7 , 8 GB, Jet Black , Sr.No. DNRSH3YPHG7P (i phone)   दि. 05.05.2017 ला बुक केला होता व त्‍याच्‍या HDFC Bank च्‍या खाते क्रं. 50100194811963 मधून क्रेडिट कार्ड द्वारे रुपये 57,589/- अदा केले होते हे नि.क्रं. 2 वर दाखल दसतावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 1 ते 3 चा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.   विरुध्‍द पक्ष 1 ला रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर वि.प. 1 व 2 यांनी वरील Apple i phone दि. 06.05.2017 ला  Ekart logistics Courier Service / post द्वारे तक्रारकर्त्‍याला पाठविले होते. परंतु सदरचा i phone  mobile handset हा सुरु होत नसल्‍यामुळे त्‍याने i phone  हा वि.प. 3 चे अधिकृत सर्विस सेंटरवर तपासणी करिता नेला असता सदरचा i phone   हा अहवालानुसार बनावट असून तो अॅपल प्रा.लि. निर्मित नसल्‍याने त्‍यांच्‍या नियमानुसार वॉरन्‍टी कालावधीतील सेवा नाकारण्‍यात आल्‍या. विरुध्‍द पक्ष 2 हा विरुध्‍द पक्ष 1 च्‍या वेबसाईटवर नोंदणीबध्‍द विक्रेता आहे व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 च्‍या वेबसाईटवरुन नोंदणीबध्‍द असलेला विक्रेता विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून विरुध्‍द पक्ष 3 ने निर्मित केलेला i phone  खरेदी केला होता.
  2.      सदरहू मोबाईल हॅन्‍डसेट हा इन्‍स्‍पेक्‍शन रिपोर्टप्रमाणे genuine नसल्‍यामुळे आणि विरुध्‍द पक्ष 2 यांनी सदरहू मोबाईल हा विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडून खरेदी केल्‍याबाबतचा पुरावा दाखल न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 3 यांना वर्तमान प्रकरणात जबाबदार धरता येणार नाही. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 हा Product service provider  आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हा Product Seller असल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 2019 प्रमाणे जबाबदार आहेत आणि विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याला बनावट i phone विकून तक्रारकर्त्‍याची फसवणूक केलेली आहे आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे दिसून येते.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर .

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांच्‍या विरुध्‍द कोणतेही आदेश नाही.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याने i phone  पोटी अदा केलेली रक्‍कम रुपये 57,589/- व त्‍यावर दि. 06.05.2017 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या  अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.