Maharashtra

Nagpur

CC/507/2020

RAMNARAYAN BABULAL PATNE - Complainant(s)

Versus

FITTJEE, FORUM FOR IIT-JEE, THROUGH DIRECT0R - Opp.Party(s)

ADV. C.K. CHANDRASHEKHAR

10 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/507/2020
( Date of Filing : 01 Dec 2020 )
 
1. RAMNARAYAN BABULAL PATNE
R/O. 24, SANTAJI COLONY, NEW BALPANDEY LAYOUT, NEAR AJANTA MARBELS, MANISHNAGAR, NAGPUR-440015
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. FITTJEE, FORUM FOR IIT-JEE, THROUGH DIRECT0R
FITTJEE HOUSE, 29-A, KALU SARAI, SARVAPRIYA VIHAR, NEW DELHI
DELHI
DELHI
2. FITTJEE, FORUM FOR IIT-JEE, THROUGH BRANCH MANAGER
NAGPUR CENTER, FIITJEE TOWER,210, OPPOSITE CHILDREN TRAFIC PARK, DHARAMPETH, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. C.K. CHANDRASHEKHAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 10 May 2022
Final Order / Judgement

 आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35  नुसार दाखल केलेली आहे.
  2. वि.प.टयुशन फी स्वीकारुन विद्यार्थ्‍यांना आयआयटी-जेईई च्या प्रवेश परिक्षेची तयारी करुन त्यांना आयआयटी-जेईई प्रवेशाकरिता तयार करण्‍याचा शिकवणीचा व्यवसाय आहे. वि.प.ने स्थानिक वर्तमानपत्रामधे दिलेली जाहिरात वाचून तक्रारकत्याने वि.प.शी संपर्क साधला व तक्रारदाराचे मूलाने वि.प.चे 2018-2020 चे 1151-दोन वर्षाचे शिकवणी वर्गामधे रुपये 2,62,115/- ईतकी फी भरुन जेईई (अॅडव्हास) करिता प्रवेश घेतला.
  3. तक्रारदाराचा मूलगा माहे आक्‍टोबर-2018 ला हिपेटायटिसने बाधित झाल्याने 3 महिने शिकवणी वर्गाला जावू शकला नाही. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.चे शिकवणी वर्गातून प्रवेश रद्द केला. तक्रारदाराचे मूलाने दोन वर्षाचे कोर्सकरिता पूर्ण फी दिली होती. परंतु तक्रारदाराचा मूलगा फक्त दोन महिने शिकवणीवर्गाला उपस्थीत होता. त्यामूळे तकारदाराने त्याचे मूलाचा प्रवेश रद्द केल्यानंतर वि.प.कडे जमा केलेल्या फी ची मागणी केली.
  4. तक्रारदाराने वि.प.क्रं.2 चे कार्यालयास अनेकदा भेटी दिल्या परंतु प्रत्येक वेळी वि.प.क्रं.2 यांनी तक्रारदाराला त्यांचे फी परत करण्‍याचे प्रस्ताव वि.प.क्रं.1 कडे पाठविल्याचे सांगून वेळ काढीत होता आणि ज्यावेळी वि.प.क्रं.1 कडुन सुचना प्राप्त होतील त्यावेळी तक्रारदाराला फी परत करतील. जेव्हा परत तक्रारकर्ता माहे डिसेंबर-2019 ला वि.प.चे कार्यालयात त्यांचेकडे जमा केलेली फी परत मिळण्‍याकरिता गेला असता वि.प.क्रं.2 ने जानेवारी -2020 ला तक्रारदाराला पूर्ण फी परत करतील असे सांगीतले. वि.प.ने आश्‍वासित केल्याप्रमाणे तक्रारदाराला माहे जानेवारी-2020 ला फी परत केली नाही व त्यानंतर वि.प.तक्रारदाराला फी करण्‍याचे टाळीत होता व नाकारीत होता. वि.प.ने तक्रारदाराला त्रूटीपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापारी पध्दतीचा वापर केल्यामूळे तक्रारदाराने दिनांक 16.7.2020 ला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु वि.प.ने सदर नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.प. ला निर्देश देण्‍यात यावे की, वि.प.ने तक्रारदाराकडुन 1151-दोन वर्षाचे शिकवणी कार्यक्रम 2018-2020 पोटी स्वीकारलेली संपूर्ण फी रुपये 2,62,115/-, 18 टक्के व्याजासह, सप्टेबर 2018 पासुन परत करावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचे खर्च रुपये 30,000/- देण्‍यात यावे.
  5. वि.प. 1 व 2  यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. तक्रारदाराने दाखल केलेले पोस्‍टाचे ट्रॅक अहवालानूसार सदर नोटीस वि.प.क्रं.1व 2 ला प्राप्त होऊनही वि.प.क्रं.1 व 2 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 08.9.2021 रोजी पारित करण्‍यात आला. 
  6. तक्रारदाराने तक्रारीत दाखल केलेले दस्‍तावेजांचे व लेखी युक्तीवाद, तोंडी युक्तीवादाबाबत दाखल पुरसिस चे अवलोकन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.

मुद्दे                                                                 उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                           होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?            होय
  3. विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                                            होय

  1. काय आदेश                                                                            अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1.  तक्रारदाराने त्यांचे मूलाचे आयआयटी-जेईई परिक्षेची तयारी करिता वि.प.चे 1151-2 वर्षाचे शिकवणी 2018-2020 चे शिकवणी वर्गामधे रुपये 2,62,115/- ईतकी फी जमा करुन प्रवेश घेतला असल्याचे नि.क्रं.2 वर दाखल दस्तऐवजावरुन स्पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते.
  2. तक्रारदाराचा मुलगा हिपेटायटीस ने बाधित असल्याचे नि.क्रं.2(5) वर दाखल वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन स्पष्‍ट होते व त्याला पूर्ण विश्रांती सांगीतल्यामूळे तक्रारदाराचा मूलगा वि.प.चे शिकवणी वर्गाला माहे आक्‍टोबर-2018 पासून जाऊ शकला नाही. त्यामूळे तकारदाराने दिनांक 31.7.2019 ला पत्र पाठवून त्याव्दारे शिकवणी वर्गापोटी जमा केलेल्या रक्कमेची मागणी केल्याने नि.क्रं.2 ( 4) वर दाखल पत्रावरुन स्पष्‍ट होते. तक्रारदाराने वि.प.ला त्यांने सन 2018-2020 चे वि.प.चे आयआयटी-जेईई शिकवणी वर्गापोटी जमा केलेल्या रक्कमेची मागणी करुनही वि.प.ने तक्रारदाराला फी परत केली नाही आणि तक्रारदार यांनी हजर केलेल्या पावती प्रमाणे शिकवणी फी परत करण्‍यात येणार नाही अशी अट नमूद नाही म्हणुन ही वि.प.ने तक्रारदाराला त्रुटी पूर्ण सेवा दिली आहे आणि अनुचित व्यापारी पध्‍दतीचा अवलंब केला आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. तक्रारदार वि.प. कडुन माहे जूलै-ऑगस्ट-सप्टेबर-आक्टोबर- 2018, या चार महिन्यांची टयुशन फी वगळता व पहिल्या सत्राची परिक्षा फी, प्रवेश फी वगळता,  वि.प.कडुन उर्वरित फी ची रक्कम परत मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्ता मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.क्रं.1 व 2 ने तक्रारदाराला रुपये 1,02,705/- परत करावे. सदर रक्कमेवर दिनांक 31.7.2019 पासून द.सा.द.शे.8 टक्के व्याजदराने मिळुन येणारी रक्कम प्रत्यक्ष अदायगी पावेतो अदा करावी.
  3. वि.प.क्रं.1 व 2 ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/-अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्षाने 1 व 2 ने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याचे तारखेपासून ४५  दिवसाचे आत संयुक्तीक अथवा वैयक्तीरित्या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.