तक्रारदार : स्वतः हजर. सामनेवाले : एकतर्फा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर(सदस्या) ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय तक्रार अर्ज संक्षिप्त स्वरूपात खालील प्रमाणे 1. सा.वाले यांची कुरीअर सेवा आहे. 2. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार रक्षाबंधन दि. 15.08.08 ला होते. म्हणून तक्रारदार यांनी दि. 11.08.08 रोजी भडोही येथे राहणारे श्री. विजय तिवारी यांना “ first flight couriers Ltd” तर्फे राखी पाठविली. वास्तविक राखी हवाई कुरीअर सेवेने पाठविल्याने 48 तासाच्या कालावधीत राखी श्री. विजय तिवारी यांना पोहचणे अपेक्षित होते. परंतू राखी श्री. विजय तिवारी यांना दि. 20.08.08 रोजी म्हणजेच सात दिवस उशिरा मिळाली. यामूळे तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीकडुन मानसिक व शारीरीक त्रास झाला. 3. तक्रारदारांचे अशी तक्रार आहे की, सा.वाले यांनी राखी पोहचण्यामध्ये दिरंगाई केली. त्यामूळे त्यांच्या सेवेत कमतरता आहे. 4. म्हणून तक्रारदारांनी या मंचापूढे तक्रार अर्ज दाखल करून 20,00,000/-रू नुकसान भरपाईची मागणी केली. 5. सा.वाले यांनी हजर राहून तक्रारदारास उत्तर दाखल करावे अशी नोटीस या मंचाकडून सा.वाले यांना पाठविण्यात आली. नोटीशीस अनुसरून सा.वाले हजर झाले. पंरतु कैफियत दाखल केली नाही. म्हणून तक्रार अर्ज सा.वाले यांचे विरूध्द बिना कैफियत चालविण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला. 6. तक्रार अर्ज, पुराव्याचे शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रे यांची पडताळणी करून पाहली असता निकालासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदार यांनी सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द केले आहे काय ? | होय. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्जात केलेल्या मागणीस पात्र आहेत काय ? | होय.अंशतः. | 3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार राखी पौर्णिमेचा सण दि. 15.08.08 रोजी होते. तक्रारदारांनी सा.वाले यांचे तर्फे राखी पौर्णिमेच्या निमीत्याने दि. 11.08.08 रोजी भडोही येथे राहणारे श्री. विजय तिवारी यांना त्यांच्या पत्नीतर्फे राखी पाठविली. त्याबद्दल अभिलेखावर पावती दाखल केली आहे. परंतू पाठविलेली राखी श्री. विजय तिवारी यांना दि.20.08.08 रोजी मिळाली.तक्रार याबद्दलचा पुरावा तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेला आहे. यावरून तक्रारदारांनी सा.वाले यांचे तर्फे पाठविलेली राखी श्री. विजय तिवारी यांना उशिरा मिळाली हे स्पष्ट होते. सा.वाले यांनी हजर राहून तक्रारदारांचे म्हणणे खोडले नाही किंवा दिरंगाई बद्दलच्या कारणाचे स्पष्टीकरण दिले नाही. यावरून सा.वाले यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द होते. तक्रारदारांचा तक्रार अर्ज शपथपत्रासह दाखल केलेला आहे. 8. तक्रारदार त्यांच्या पत्नीकडुन त्यांना झालेला मानसिक व शारीरीक त्रास याबद्दल नुकसान भरपाई म्हणून 20,00,000/- रू ची मागणी केलेली आहे. राखी पौर्णिमेचा दिवस बहिणीसाठी अतिशय महत्वाचा असतो या महत्वाच्या दिवशी राखी वेळेवर मिळावी म्हणून तक्रारदारांनी ती हवाई कुरीअर सेवेने पाठवली. परंतु या महत्वाच्या दिवशी तक्रारदारांच्या पत्नीला सा.वाले यांच्या सेवेतील कमतरतेमूळे आपल्या भावासाठी राखी वेळेवर पाठविता आली नाही. व त्या दिवसाचे महत्व पाळता आले नाही. याबद्दल तक्रारदार व त्यांच्या पत्नीला मानसिक त्रास झाला ही गोष्ट नाकारता येणार नाही. परंतू मानसिक त्रास हा पैशात मोजता येत नाही. तक्रारदारांनी मानसिक त्रासाबद्दल रू 20,00,000/- ची मागणी जास्त व अवास्तव वाटते. परंतू या त्रासाबद्दल रू. 5,000/- बयाना रक्कम सा.वाले यांनी तक्रारदारांना द्यावे असा आदेश देणे योग्य वाटते. तसेच सा.वाले यांनी तक्रारदारांना 1,000/- रू तक्रार अर्ज खर्च द्यावे. 9. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. सा.वाले यांनी तक्रारदारांना 5,000/- रू. मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून द्यावे. 2. सा.वाले यांनी तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च 1,000/- द्यावे. 3 वरील आदेशाची प्रमाणीत प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत करावे अन्यथा सा.वाले यांनी दरमहा रू. 100/- दंडात्मक रक्कम तक्रारदारांना द्यावे. 4. आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |