PRAKASH RAJARAM PATIL filed a consumer case on 10 Jul 2015 against FHALTAN TREDERS NAGARI SAHAKARI PATASANSTHA LTD. in the Satara Consumer Court. The case no is CC/12/95 and the judgment uploaded on 31 Aug 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 95/2012.
तक्रार दाखल दि.12-6-2012.
तक्रार निकाली दि. 10-7-2015.
1. श्री.प्रकाश राजाराम पाटील.
2. श्री.कालिदास राजाराम पाटील.
3. श्रीमती इंदिरा राजाराम पाटील.
4. श्री.पियुश प्रकाश पाटील.
5. कु.मधुरा प्रकाश पाटील.
क्र.1 ते 5 रा. आटके, ता.कराड, जि.सातारा.
तक्रारदार क्र.1 स्वतःसाठी व तक्रारदार क्र.2 ते 5
साठी कुलमुखत्यार म्हणून. .... तक्रारदार
विरुध्द
1. फलटण ट्रेडर्स नागरी सह.पतसंस्था मर्या, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा.
2. फलटण ट्रेडर्स नागरी सह.पतसंस्था मर्या, फलटण,
शाखा कराड, ता.कराड, जि.सातारा.
3. श्री.हिंदुराव निळकंठराव नाईक-निंबाळकर.
4. श्री.समशेरबहाद्दर हिंदुराव नाईक निंबाळकर,
जाब.क्र. 3 व 4 रा.गोळीबार मैदान, संभाजीनगर, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा.
5. श्री.रविंद्र औदुंबर पवार,
रा.महतपुरा पेठ, फलटण.
6. श्री.सचिन सुधाकर कांबळे,
रा.संभाजीनगर, फलटण.
7. श्री.सदाशिव मारुती गुरव.
मु.पो.वडूज, ता.खटाव, जि.सातारा.
8. श्री.हणमंत विठ्ठल कापसे,
रा.मु.पो.पिंप्रद, ता.फलटण, जि.सातारा.
9. श्रीमती रिजवाना सज्जाद बारगीर,
रा.वानवडी, पुणे.
10. श्री.ज्ञानेश्वर गणपत पिसे,
रा.मु.पो.करकंब, ता.पंढरपूर, जि.सोलापूर.
11. श्रीमती सविता संतोष शिंदे,
रा.पिंप्रद, ता.फलटण, जि.सातारा.
12. श्री.रविंद्र निवृत्ती शिंदे,
रा.महतपुरा पेठ, फलटण.
13. श्री.नानासो.पोपट इवरे,
रा.टाकळवाडी, ता.फलटण, जि.सातारा.
14. श्री.राजेंद्र किसन ननावरे,
रा.महतपुरा पेठ, फलटण.
15. श्री.शिवाजीराव आण्णासो फडतरे,
रा.फडतरवाडी, ता.फलटण, जि.सातारा.
16. श्री.दुर्याधन दत्तात्रय रणनवरे.
17. श्री.शंतनु दुर्योधन रणनवरे.
दोघे रा.द्वारा- डॉ.निलेश आर जगताप,
रॉयल हॉस्पिटल, अनुपम आर्केड,
पुणे सातारा रोड, कात्रज सर्पोदयानाचे मागे
पुणे 46.
18. सुधाकर गजानन कांबळे,
माईबझार, गोळीबार मैदान, फलटण.
19. नौशाद आलीखान पठाण.
रा.महतपुरा पेठ, फलटण.
20. राजेंद्र महादेव पवार,
रा.विवेकानंद नगर, हॉटेल रायगडजवळ,
फलटण, जि.सातारा.
21. श्रीपाद लक्ष्मण बक्षी,
रा. बिरदेवनगर, जाधववाडी, फलटण.
22. आण्णा बाळू शिंदे.
रा.ठाकुरकी (वाठारमळा)
ता.फलटण, जि.सातारा.
23. अजितसिंह लालासो.माने.
माळशिरस, ता.माळशिरस, जि.सोलापूर.
24. हणुमंत महादेव गोरे,
मु.पो.पाल, ता.कराड, जि.सातारा.
25. सुभाष यशवंत जाधव,
रा.मु.पो.कसबा, ता.फलटण.
26. सुरेश बापूराव कदम,
रा.रहिमतपूर, ता.कोरेगाव, जि.सातारा.
27. श्रीमती इला उदयसिंह भोसले,
रा.दत्तकृपा गोळीबार मैदान, फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.डी.एन.नलवडे.
जाबदारातर्फे- अँड.एस.डी.शिंदे
जाबदार क्र.5,7,12,14,19- एकतर्फा आदेश.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या यानी पारित केला
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
जाबदार संस्था ही महाराष्ट्र सहकारी कायदयान्वये नोंदणी झालेली पतसंस्था असून जाबदार क्र.1 हे फाऊंडर चेअरमन व जाबदार क्र.3 ते 15 हे संस्थेचे विदयमान व जबाबदार संचालक आहेत. संस्थेच्या धोरणात्मक निर्णयात त्यांचा सहभाग असतो, तसेच जाबदार क्र.16 ते 27 हे संस्थेचे माजी संचालक मंडळाचे सदस्य आहेत. त्यांचे कार्यकाळात तक्रारदारानी जाबदार संस्थेत ठेवपावत्या ठेवल्या होत्या.
2. तक्रारदारांचे नावे त्यांचे वडिलांनी खाली दर्शविले परिशिष्टाप्रमाणे जाबदार संस्थेत मुदतठेवी ठेवल्या होत्या. त्या मुदतठेवी तक्रारदारांचे व त्यांचे वडिलांचे नावे असून त्या खालीलप्रमाणे परिशिष्ट क्र.1,2,3 व 4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे आहेत.
परिशिष्ट क्र.1 राजाराम यशवंत पाटील
अ.क्र. | पावती क्र. | ठेव ठेवलेची तारीख | परतीची तारीख | रक्कम रु. | व्याजदर टक्के |
1 | 11398 | 24-6-08 | 24-10-08 | 12,000/- | 12 |
2 | 11314 | 23-6-08 | 23-6-09 | 10,000/- | 13 |
3 | 11399 | 24-7-08 | 24-10-08 | 12,000/- | 12 |
4 | 11329 | 30-6-08 | 30-6-09 | 11,000/- | 13 |
5 | 11400 | 24-7-08 | 24-10-08 | 12,000/- | 12 |
6 | 11335 | 23-6-08 | 23-6-09 | 10,000/- | 13 |
7 | 10650 | 8-1-08 | 8-1-09 | 13,000/- | 12 |
8 | 8173 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
9 | 8168 | 26-8-08 | 26-8-09 | 13,000/- | 13 |
10 | 11242 | 05-06-08 | 5-6-09 | 12,000/- | 13 |
11 | 8246 | 24-8-07 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
12 | 11048 | 15-4-08 | 15-4-09 | 10,000/- | 12 |
13 | 11047 | 15-4-08 | 15-4-09 | 10,000/- | 12 |
14 | 5570 | 3-12-07 | 3-12-08 | 10,000/- | 12 |
15 | 5571 | 3-12-07 | 3-12-08 | 10,000/- | 12 |
16 | 9454 | 4-4-08 | 4-4-09 | 10,000/- | 12 |
17 | 11032 | 4-4-08 | 4-4-09 | 10,000/- | 12 |
18 | 8244 | 24-8-07 | 24-8-08 | 12,000/- | 12 |
19 | 8247 | 24-7-08 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
20 | 10611 | 22-12-07 | 22-12-08 | 10,000/- | 12 |
21 | 10644 | 5-1-08 | 5-1-09 | 11,000/- | 12 |
22 | 8323 | 5-9-07 | 5-9-08 | 12,000/- | 12 |
23 | 11241 | 5-6-08 | 5-6-09 | 12,000/- | 13 |
24 | 11049 | 15-4-08 | 15-4-09 | 10,000/- | 12 |
25 | 11290 | 19-6-08 | 19-6-09 | 15,400/- | 13 |
26 | 8269 | 24-8-07 | 24-8-08 | 5,000/- | 12 |
27 | 11485 | 26-8-08 | 26-8-09 | 14,411/- | 13 |
28 | 11291 | 19-6-08 | 19-6-09 | 15,400/- | 13 |
29 | 11292 | 19-6-08 | 19-6-09 | 15,400/- | 13 |
30 | 8208 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
31 | 10378 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
32 | 8292 | 28-8-07 | 28-8-08 | 20,000/- | 12 |
33 | 8291 | 28-8-07 | 28-8-08 | 20,000/- | 12 |
34 | 8267 | 24-8-07 | 24-8-08 | 20,000/- | 12 |
35 | 8172 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
36 | 10375 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
37 | 10379 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
38 | 10377 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
39 | 8169 | 26-8-08 | 26-8-09 | 13,000/- | 13 |
40 | 8245 | 24-8-07 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
41 | 8268 | 24-8-07 | 24-8-08 | 20,000/- | 12 |
42 | 10376 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
43 | 8322 | 5-9-07 | 5-9-08 | 15,000/- | 12 |
44 | 8290 | 28-8-07 | 28-8-08 | 20,000/- | 12 |
परिशिष्ट क्र.2 सौ. इंदिरा राजाराम पाटील
अ.क्र. | पावती क्र. | ठेव ठेवलेची तारीख | परतीची तारीख | रक्कम रु. | व्याजदर टक्के |
1 | 8325 | 5-9-07 | 5-9-08 | 12,000/- | 12 |
2 | 9455 | 4-4-08 | 4-4-09 | 10,000/- | 12 |
3 | 8270 | 24-8-07 | 28-8-08 | 20,000/- | 12 |
4 | 8294 | 28-8-07 | 28-8-09 | 20,000/- | 12 |
5 | 8324 | 5-9-07 | 5-9-08 | 15,000/- | 12 |
6 | 8167 | 26-8-08 | 26-8-09 | 13,000/- | 13 |
7 | 8175 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
8 | 8271 | 24-8-07 | 24-8-08 | 20,000/- | 12 |
9 | 8243 | 24-7-08 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
10 | 8242 | 24-8-07 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
11 | 8293 | 28-8-07 | 28-8-08 | 20,000/- | 12 |
12 | 8207 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
13 | 8174 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
14 | 8166 | 26-8-08 | 26-8-09 | 13,000/- | 13 |
15 | 8241 | 24-8-07 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
16 | 11050 | 15-4-08 | 15-4-09 | 10,000/- | 12 |
17 | 11054 | 15-4-08 | 15-4-09 | 10,000/- | 12 |
18 | 10650 | 8-1-08 | 8-1-09 | 10,000/- | 12 |
19 | 10645 | 5-1-08 | 5-1-09 | 11,000/- | 12 |
20 | 10352 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
21 | 10381 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
22 | 10380 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
23 | 11294 | 19-6-08 | 19-6-09 | 15,400/- | 13 |
24 | 10383 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
25 | 10384 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
26 | 11293 | 19-6-08 | 19-6-09 | 15,400/- | 13 |
27 | 11243 | 5-6-08 | 5-6-09 | 11,000/- | 13 |
परिशिष्ट क्र.3 पियुष प्रकाश पाटील
अ.क्र. | पावती क्र. | ठेव ठेवलेची तारीख | परतीची तारीख | रक्कम रु. | व्याजदर टक्के |
1 | 8273 | 24-8-07 | 24-8-08 | 20,000/- | 12 |
2 | 8272 | 24-8-07 | 24-8-08 | 20,000/- | 12 |
3 | 8163 | 26-8-08 | 26-8-09 | 13,000/- | 13 |
4 | 8164 | 26-8-08 | 26-8-09 | 13,000/- | 13 |
5 | 8206 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
6 | 8177 | 26-6-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
7 | 8176 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
8 | 10385 | 12-9-07 | 12-9-08 | 25,000/- | 12 |
9 | 8326 | 5-9-07 | 5-9-08 | 15,000/- | 12 |
10 | 11031 | 4-4-08 | 4-4-09 | 10,000/- | 12 |
11 | 8295 | 28-8-07 | 28-8-08 | 11,000/- | 12 |
12 | 8249 | 24-8-07 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
13 | 8248 | 24-8-07 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
14 | 5500 | 8-12-07 | 8-12-08 | 8,000/- | 12 |
15 | 9456 | 4-4-08 | 4-4-09 | 5,000/- | 12 |
16 | 10653 | 8-1-08 | 8-1-09 | 10,000/- | 12 |
17 | 10646 | 5-1-08 | 5-1-09 | 11,000/- | 12 |
परिशिष्ट क्र.4 मधुरा प्रकाश पाटील
अ.क्र. | पावती क्र. | ठेव ठेवलेची तारीख | परतीची तारीख | रक्कम रु. | व्याजदर टक्के |
1 | 8209 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
2 | 8327 | 5-9-07 | 5-9-08 | 15,000/- | 12 |
3 | 8251 | 24-8-07 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
4 | 2498 | 8-12-07 | 8-12-08 | 8,000/- | 12 |
5 | 10648 | 5-1-08 | 5-1-09 | 11,000/- | 12 |
6 | 10654 | 8-1-08 | 8-1-09 | 10,000/- | 12 |
7 | 8250 | 24-8-07 | 24-8-08 | 10,000/- | 12 |
8 | 8275 | 24-8-07 | 24-8-08 | 20,000/- | 12 |
9 | 10386 | 12-9-07 | 12-9-08 | 29,995/- | 12 |
10 | 6632 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
11 | 8178 | 26-8-08 | 26-8-09 | 20,000/- | 13 |
12 | 8274 | 24-8-07 | 24-8-08 | 20,000/- | 12 |
13 | 8165 | 26-8-08 | 26-8-09 | 25,500/- | 13 |
तक्रारदारांचे वडील कै.राजाराम यशवंत पाटील यानी वेळोवेळी जाबदार पतसंस्थेचे कराड शाखेत प्रस्तुत अर्जामधील परिशिष्टानुसार त्यांचे स्वतःचे नावे आणि तक्रारदार क्र.3 ते 5 यांचे नावे जाबदार संस्थेकडे मुदतठेव योजनेखाली परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे रकमा ठेव म्हणून ठेवल्या होत्या. त्यानुसार त्यानी जाबदार पतसंस्थेकडे एकूण रक्कम रु.15,50,911/- इतकी रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. राजाराम यशवंत पाटील यांचे 2011 मध्ये निधन झाले. तक्रारदार क्र.1 ते 5 हे एकत्र कुटुंबात रहात आहेत. तक्रारदारांचे वडिलांनी सदरच्या ठेवी जाबदार पतसंस्थेत त्यांचे एकत्र कुटुंबासाठीच ठेवल्या होत्या. तक्रारदार क्र.1 याना दि.12-4-2012 रोजी तक्रारदार क्र.2 यांनी तसेच तक्रारदार क्र.3 यानी दि.5-9-2011 रोजी व तक्रारदार क्र.4 व 5 यानी दि.5-4-12 रोजी तक्रारदार क्र.1 याना कुलमुखत्यारपत्र करुन दिले आहे. जाबदार पतसंस्था सहकार कायदयानुसार नोंदणीकृत पतसंस्था असून सदर संस्थेचे मुख्य कार्यालय फलटण येथे आहे. कराड येथे जाबदार संस्थेची शाखा आहे. सदरची पतसंस्था विविध लोकांकडून बचतखाते, मुदतबंद ठेवखाते, पिग्मी खाते वगैरे खात्यांवर पैसे ठेवणेसाठी स्विकारत असते. त्यामुळे ठेवी स्विकारणे व कर्जपुरवठा करणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे. जाबदार पतसंस्थेचे जाबदार क्र.3 चेअरमन, व जाबदार क्र.4 हे व्हाईसचेअरमन आहेत. सध्या जाबदार क्र.3 ते 15 हे संस्थेचा दैनंदिन कारभार पहात आहेत, त्यामुळे सदर कामी परिशिष्टात नमूद ठेवपावत्यांवरील रकमा देणेची त्यांचीही जबाबदारी आहे. तक्रारदार क्र.1 व 2 यांचे वडिलांनी त्यांचे हयातीत वेळोवेळी जाबदार क्र.1 संस्थेकडे आणि त्यावेळच्या जाबदार क्र.16 ते 27 या संचालक मंडळाकडे वेळोवेळी ठेवीची मुदत संपल्याने आणि त्यांना गरज असल्याने रकमांची मागणी केली होती, परंतु जाबदार संस्थेने तक्रारदारांचे वडिल राजाराम यशवंत पाटील याना ठेवपावतीवरील रकमा दिल्या नाहीत, उलट प्रत्येक वेळी काहीतरी सबबी सांगून जाबदार संस्थेने आणि त्यावेळच्या पदाधिका-यानी त्यांना पैसे परत करणेचे टाळले होते. तक्रारदारांचे वडिलांनी दि.19-6-2009 रोजी रजि.पोस्टाने जाबदार क्र.16 याना पत्र पाठवून सदर रकमांची मागणी केली होती, परंतु सदरचे पत्रही जाबदार पत्त्यावर रहात नसल्याच्या शे-यासह परत आले होते. सदर धक्क्यानेच तक्रारदारांचे वडिलांचे निधन झाले. वडिलांचे मृत्यूपश्चात तक्रारदार क्र.1 यांनीही वेळोवेळी जाबदार संस्थेकडे व संचालक मंडळाकडे ठेवपावत्यावरील नमूद रकमांची वारंवार मागणी केली. दि.23-4-12 रोजीही प्रत्यक्ष संस्थेत जाऊन ठेवीवरील रकमांची मागणी केली, परंतु संचालक मंडळानेही सदर रकमा देणेची टाळाटाळ केली. आजपर्यंत ठेवपावत्यांची मुदत संपूनही जाबदार संस्थेने तक्रारदाराना कधीही पैसे दिलेले नाहीत, सदर कृत्य पूर्णतः बेकायदेशीर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारे आहे. त्यामुळे तक्रारदाराना सदरचा अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. जाबदार क्र.16 ते 27 यांचेविरुध्द सहकार खात्याने कारवाई केली असली तरीही तक्रारदारांच्या रकमा परत करणेची जाबदार संस्थेची जबाबदारी जात नाही. तक्रारदारांना सदर रकमांची अत्यंत आवश्यकता आहे. जाबदार रक्कम देत नसल्याने तक्रारदारांचे वडिलांना आणि तक्रारदाराना खूप मानसिक, आर्थिक, त्रास सोसावा लागला व लागत आहे. जाबदार संस्थेची मुख्य शाखा मे.कोर्टाचे अधिकार स्थळसीमेत फलटण येथे असून तक्रारदार व जाबदार संस्थेतील व्यवहार कराड येथील शाखेत झाले असल्यामुळे या मंचास सदर तक्रार चालवणेचा अधिकार आहे. तक्रारदारानी दि.23-4-2012 रोजी व त्यापूर्वी वेळोवेळी जाबदार संस्थेत जाऊन ठेवींवरील रकमा सव्याज मागितल्या त्या वेळी अर्जास कारण घडले व घडत राहिले आहे. तक्रारदार व जाबदारांमध्ये या वादविषयाबाबत अन्य कोणत्याही न्यायालयात दावा किंवा अर्ज प्रलंबित नाही. सबब तक्रारदारानी मागणी केली आहे की, ठेवपावत्यावरील सर्व रक्कम रु.15,50,911/- त्यावर होणा-या व्याजासह तक्रारदाराना देणेबाबत आदेश व्हावेत, सदरच्या रकमांवर आजअखेर ठरलेल्या व्याजाप्रमाणे रक्कम व्याजासह परत मिळावी. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- देणेचा आदेश व्हावा, तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- देणेचे आदेश व्हावेत. याप्रमाणे तक्रारदारानी अर्ज दाखल केला आहे.
3. जाबदार क्र.1 यानी नि.15 कडे तक्रारअर्जास म्हणणे दिले आहे ते खालीलप्रमाणे- तक्रारदारांचा तक्रारअर्ज व त्यात कथन केलेला संपूर्ण मजकूर खोटा व लबाडीचा असल्याने जाबदार संस्थेस मुळीच मान्य वा कबूल नाही. सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार हा संस्थेचे व्यवस्थापक पहात असतात. वस्तुतः कायदयाप्रमाणे संस्थेचे प्रमुख अधिकारी म्हणून व्यवस्थापक असतात. चेअरमन हे सभासदांनी पाच वर्षासाठी निवडलेले असतात. त्यांना वेतन नसते. ते समाजसेवा म्हणून काम पहात असतात. तरी संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यवस्थापकच पहात असतात. तरी व्यवस्थापक हे संस्थेचे कॉन्स्टिटयूशनल हेड आहेत.
तक्रारअर्ज कलम 1 मध्ये कथन केलेला जाबदार ही पतसंस्था असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा 1960 अन्वये नोंदविलेली सहकारी पतसंस्था आहे. तक्रारदारानी संस्थेमध्ये तथाकथित ठेव ठेवली त्यावेळी संस्थेचे चेअरमन म्हणून दुर्योधन दत्तात्रय रणनवरे व व्यवस्थापक विजया नामदेव खेडकर या काम पहात होत्या. त्यांनी संस्थेचा कारभार व्यवस्थित पाहिला नाही. संस्थेच्या रकमांचा अपहार केला. संस्थेचे व्यवहार ठप्प होऊन संस्था बंद पडली. तक्रारदारांचे नुकसानीस तेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. जाबदार संस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार नोंदलेली सहकारी संस्था आहे. सदर संस्थेचा कारभार हा महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा 1960 मधील तरतुदीखाली येतो त्यामुळे तक्रारदाराना संस्थेच्या व्यवसायाशी संबंधीत काही वाद असेल तर तो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 91 चे कक्षेत येतो. तक्रारदारानी ठेवलेल्या ठेवी या जाबदार क्र.16 ते 27 यांचेशी विचार करुन ठेवलेल्या आहेत. त्यामुळे जाबदार क्र.16 ते 27 हेच त्यांना ठेवी परत देणेस जबाबदार आहेत. तक्रारदारानी ठेवी ठेवल्या त्याची मुदत ऑगस्ट 2000 मध्ये संपली. त्या काळात जाबदार क्र.3 ते 15 संचालक नव्हते त्यामुळे कायदयाने त्यांचेवर जबाबदारी येत नाही. तक्रार कलम 2 मध्ये कथन केलेला मजकूर जाबदार 1 याना मान्य व कबूल नाही. तक्रारदारानी संस्थेमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. त्या ऑगस्ट 2007 ते ऑगस्ट 2009 पर्यंत ठेवलेचे दिसते त्यावेळी जाबदार क्र.16 ते 27 हेच संस्थेचे कामकाज पहात होते. कोष्टकात दाखवलेप्रमाणे तक्रारदारांच्या मुदती या 26-8-09 रोजी संपलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची मागणी ही ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे मुदतीत नाही. तरी तक्रार फेटाळणेत यावी. कलम 3 व 4 मधील मजकूर जाबदाराना मान्य व कबूल नाही. तक्रारदारानी तो शाबित करावा. कलम 5 मधील संस्था नोंदणीबाबत व व्यवसायाबाबत केलेला मजकूर सोडून उर्वरित मजकूर खरा नाही. संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा 1960 चे कलम 88 अन्वये चौकशी होऊन संस्थेच्या व्यवहारास जबाबदार असणारेचे वर रु.35 कोटी 23 लाख इतक्या रकमेची आर्थिक जबाबदारी निश्चित केली आहे. तरी तक्रारदारांच्या ठेवी देणेस तक्रारदारांनी ज्यावेळेस ठेवी ठेवल्या त्यावेळचे चेअरमन संचालक मंडळ व व्यवस्थापक जबाबदार आहेत. तक्रार कलम 8 ते 12 मधील मजकूर खरा व बरोबर नाही. सदरची तक्रार दाखल करणेस दि.23-4-12 रोजी कारण घडले असे केलेले कथन खरे नाही. तक्रारदार 23-4-12 रोजी संस्थेत आलेले नव्हते त्यामुळे दिलेले कारण कायदेशीर नाही. तक्रारदारांनी जाबदारांकडे केव्हाही ठेवीच्या रकमांची मागणी केलेली नव्हती. त्यामुळे रक्कम देणेची टाळाटाळ करणेचा प्रश्नच येत नाही. जाबदार क्र.3 ते 15 हे संचालक मंडळ सदस्य वा चेअरमनही नव्हते. तक्रारदारानी सदरची खोटी व लबाडीची तक्रार दाखल केलेली आहे. कर्जदारांमध्ये तत्कालीन संचालक मंडळाचे नातेवाईक व संचालक यांचेकडून 15 कोटीपेक्षा जास्त येणे आहे. अशा कर्जदारांची थकीत कर्जबाकी रु.15 कोटीचे पुढे आहे त्यामुळे सदर कर्जाची वसुली करणे ही अशक्यप्राय बाब आहे व सदर कर्जदारांचे वसुली दावे न्यायप्रक्रीयेत असल्यामुळे वसुली प्रक्रीया प्रलंबित आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे सभासद आहेत. त्यांनी सभासद या नात्याने संस्थेत ठेवी ठेवलेल्या आहेत. जाबदारांच्या ठेवी स्विकारणे व व्याजाने कर्जाचा पुरवठा करणे हाच जाबदार संस्थेचा व्यवसाय आहे, तरी जाबदार संस्थेच्या व्यवसायाशी संबंधित वाद असल्यास तो या मंचाचे अधिकारकक्षेत येत नाही. तक्रारदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक नाहीत. तक्रारदार जाबदार संस्थेचे सभासद आहेत. सहकारी संस्थेचा सभासद हा संस्थेचा भागधारक असतो त्यामुळे तो मालक आहे तरी तक्रारदार हा मालक असल्याने जाबदार संस्था ही मालक होऊ शकत नाही. तरी तक्रारदार व जाबदार हे ग्राहक व मालक असे होत नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार चालवणेस मे. मंचास अधिकार नाहीत. याच कारणाने तक्रार रद्द करणेत यावी. तक्रारदारांनी जाबदार संस्थेकडे केव्हाही ठेवीच्या रकमेची मागणी केलेली नाही, तरी तक्रारदारांना सदर तक्रार दाखल करणेस काहीही कारण घडलेले नाही. तरी ती खर्चासह रद्द करणेत यावी. तक्रारदारानी कलम 13 क व ड मध्ये शारिरीक आर्थिक, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- मागितलेली नुकसानभरपाईची मागणी देणेस संस्था जबाबदार नाही तसेच कलम 13 ड मधील केलेली अर्जाचे खर्चाची रु.5000/-ची मागणी मंजुरीस पात्र नाही.
येणेप्रमाणे तक्रारदारांचे तक्रारीस जाबदारानी दिलेले म्हणणे आहे.
4. नि.1 वर तक्रारअर्ज असून नि.2 वर तक्रारदार क्र.1 यांचे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे तक्रारदारांचा वकील नियुक्तीसाठी परवानगीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.4 वर अँड.नलवडे यांचे वकीलपत्र, नि.5 कडे कागदयादी, नि.5/1 ते 5/52 कडे तक्रारदारांच्या मुदतठेवीच्या झेरॉक्सप्रती, नि.5/53 कडे सौ.इंदिरा राजाराम पाटील यानी प्रकाश राजाराम पाटील याना दिलेले पॉवर ऑफ अँटॉर्नीची झेरॉक्स प्रत, नि.5/54 कडे कालिदास राजाराम पाटील यानी प्रकाश राजाराम पाटील याना दिलेले पॉवर ऑफ अँटॉर्नीची झेरॉक्स प्रत, नि.5/55 कडे पियुश प्रकाश पाटील व मधुरा प्रकाश पाटील यानी प्रकाश राजाराम पाटील याना दिलेले पॉवर ऑफ अँटॉर्नीची झेरॉक्स प्रत, नि.5/55/ए कडे राजाराम यशवंत पाटील यांचा मृत्यू दाखला झेरॉसप्रत, नि.5/56 कडे राजाराम यशवंत पाटील याचे मृत्यूपत्राची झेरॉक्सप्रत, नि.5/57 कडे गावकामगार तलाठी, आटके,कराड यांचा वारसदाखला झेरॉक्सप्रत, नि.5/58 कडे जाबदार क्र.16 यांचे लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.6 कडे मंचाने जाबदाराना पाठवलेली नोटीस, नि.7 कडे तक्रारदाराचा फेरनोटीसीसाठीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.7/1 कडे मंचाने पाठवलेली फेरनोटीस, नि.8 कडे जाबदार 1 ते 27 यांना रजि.पोस्टाने फेरनोटीसीसाठीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.8/1 कडे जाबदाराना पाठवलेली फेरनोटीस, नि.8/2 कडे जाबदार क्र.5 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.8/3 कडे जाबदार क्र.27 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.8/4 कडे जाबदार क्र.12 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.8/5 कडे जाबदार क्र.19 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि. 8/6 कडे जाबदार क्र. 14 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.8/7 कडे जाबदार क्र.7 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.8/8 कडे जाबदार क्र.2 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.8/9 कडे जाबदाराना पाठवलेल्या रजि.ए.डी.च्या पोस्टाच्या पावत्या, नि.9 कडे जाबदार क्र.9 यांचे म्हणणे, नि.10 कडे जाबदार 9 तर्फे कागदयादी दाखल, नि.11 कडे जाबदाराना जाहीर नोटीसीसाठी परवानगीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.12 कडे अँड.शिंदे यांचे नियुक्तीसाठी जाबदार संस्थेतर्फे व्यवस्थापकाचा अर्ज, नि.13 कडे अँड.शिंदे यांचे वकीलपत्र, नि.14 कडे जाबदाराचा म्हणणे देणेसाठीचा मुदत अर्ज, अर्ज मंजूर, नि.15 कडे जाबदार क्र.1 चे म्हणणे, नि.16 कडे विक्रम साबळे यांचे प्रतिज्ञापत्र, नि.16/1 कडे जाबदार क्र.5चा अनक्लेम्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/2 कडे जाबदार क्र.23 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/3 कडे जाबदार क्र.8 चा अनक्लेम्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/4 कडे जाबदार क्र.19 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/5 कडे जाबदार क्र.2 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/6 कडे जाबदार क्र.27 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/7 कडे जाबदार क्र.18 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/8 कडे जाबदार क्र.6 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/9 कडे जाबदार क्र.16 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/10 कडे जाबदार क्र.3 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/11 कडे जाबदार क्र.12चा अपुरा पत्ता या शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/12 कडे जाबदार क्र.25 चा अपुरा पत्ता या शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/13 कडे जाबदार क्र.20 चा अनक्लेम्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/14 कडे जाबदार क्र. 13 चा अनक्लेम्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/15 कडे जाबदार क्र. 4 चा रिफ्यूज्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/16 कडे जाबदार क्र.26 चा अपुरा पत्ता या शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/17 कडे जाबदार क्र.15 चा अनक्लेम्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/18 कडे जाबदार क्र.11 चा अनक्लेम्ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.16/19 कडे जाबदार क्र. 17 चा लेफ्ट शे-याने परत आलेला लखोटा, नि.17 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.17/1 कडे मंचाचे जाहीर समन्ससाठीचे संपादकांना पत्र, नि.17/2 कडे जाहीर नोटीसचा मसुदा, नि.18 कडे दै.पुढारीची प्रत दाखल करणेसाठी परवागनी अर्ज, अर्ज मंजूर. नि.19 कडे कागदयादीने नि.20 कडे जाहीर नोटीस प्रसिध्द केलेला अंक दाखल, नि.21 कडे जाबदारांचा कागदपत्रे दाखलसाठी परवानगी अर्ज, अर्ज मंजूर, नि.22 कडे कागदयादी दाखल, नि.22/1 कडे जाबदार पतसंस्थेचा कलम 88 खालील चौकशीचा अहवाल, नि.23 कडे विक्रम साबळे यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.23/1 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.24 कडे कागद दाखल करणेस परवानगीचा अर्ज, नि.25 कडे कागदयादी, नि.25/1 कडे जाबदार पतसंस्थेचा कलम 88 खालील चौकशीचा अहवाल, नि.26 कडे कागद दाखल करणेस परवानगीचा अर्ज, नि.27 कडे कागदयादी, नि.27/1 कडे जाबदार पतसंस्थेचा कलम 88 खालील चौकशीचा अहवाल. येणेप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, जाबदारांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे तसेच लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
विवेचन-
6. मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. प्रस्तुत कामी तक्रारदार क्र.1 हे स्वतः साठी व तक्रारदार क्र.2 ते 5 यांचेकरिता कुलमुखत्यार म्हणून आहेत. तक्रारदार क्र.1 यांचे वडिल राजाराम यशवंत पाटील यांचे 2011 मध्ये निधन झाले. त्यांचे मागे त्यांची पत्नी व मुले हयात असून ते कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार क्र.1 ते 5 हे एकत्र कुटुंबात रहात आहेत. जाबदार पतसंस्था ही लोकांचे पैसे विविध खात्यांवर ठेवून घेते व त्यावर वेगवेगळया पध्दतीने ठेवीदारास व्याज देते. तसेच ती लोकांना कर्जरुपाने पैसे देते व त्यावर व्याज घेते अशा प्रकारे जाबदारांचा व्यवहार-व्यापार चालतो. तक्रारदार यांचे वडिलांचे मृत्यूनंतर तक्रारदार क्र.1 ते 5 हे वारस असलेने मुदतठेवपावत्यांचेही तेच कायदेशीर वारस झाले आहेत. तसेच ते म्हणजेच तक्रारदार क्र.1 ते 5 हे जाबदार पतसंस्थेचेही ग्राहक झाले आहेत. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार पतसंस्थेचे ग्राहक झाले आहेत हे सिध्द होते. तसेच जाबदार पतसंस्थेने रकमा ठेवून घेतल्या आहेत व त्यावर ती व्याज देणार असलेने जाबदार पतसंस्था ही त्यांना-ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्था ठरते. जाबदारानी तक्रारदारांच्या रकमा मुदती संपून गेल्या तरी परत केल्या नसल्यामुळेच त्यांचेकडून त्यांच्या-(जाबदारांच्या) कर्तव्यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्यांचेकडून दयावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे. आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम सव्याज परत केलेली नाही, ती त्यांनी त्यांना सव्याज परत केली पाहिजे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत. सदर कामात जाबदारानी नि.27/1 कडे जाबदार संस्थेचा 88 खालील झालेला चौकशीचा अहवाल दाखल केलेला आहे. दाखल केलेल्या अहवालानुसार मे.मंचाने जाबदार क्र.1 पतसंस्था, जाबदार क्र.2 पतसंस्था शाखा कराड व जाबदार क्र.16 ते 27 यांना दोषी धरलेले आहे व ते तक्रारदाराचे पैसे देणेस वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 पतसंस्था, जाबदार क्र.2 पतसंस्थेची शाखा व जाबदार क्र.16 ते 27 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहे. येथे आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. परिशिष्ट क्र.1 मध्ये दर्शविलेल्या राजाराम यशवंत पाटील यांचे नावे असलेल्या अ.क्र.1 ते 44 वरील सर्व मुदतठेवपावत्यांवरील रकमा ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावत्यांवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2 व 16 ते 27 यांनी तक्रारदाराना अदा करावी.
3. परिशिष्ट क्र.2 मध्ये दर्शविलेल्या इंदिरा राजाराम पाटील यांचे नावे असलेल्या अ.क्र.1 ते 27 वरील सर्व मुदतठेवपावत्यांवरील रकमा ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावत्यांवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2 व 16 ते 27 यांनी तक्रारदाराना अदा करावी.
4. परिशिष्ट क्र.3 मध्ये दर्शविलेल्या पियुष प्रकाश पाटील यांचे नावे असलेल्या अ.क्र.1 ते 17 वरील सर्व मुदतठेवपावत्यांवरील रकमा ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावत्यांवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2 व 16 ते 27 यांनी तक्रारदाराना अदा करावी.
5. परिशिष्ट क्र.4 मध्ये दर्शविलेल्या मधुरा प्रकाश पाटील यांचे नावे असलेल्या अ.क्र.1 ते 13 वरील सर्व मुदतठेवपावत्यांवरील रकमा ठेव ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावत्यांवर नमूद केलेल्या व्याजदराने होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1,2 व 16 ते 27 यांनी तक्रारदाराना अदा करावी.
6. वरील आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे, तसे न केलेस जाबदाराना आदेश पारित तारखेपासून सव्याज रकमेवर द.सा.द.शे.6 टक्के दराने तक्रारदाराच्या हाती रक्कम पडेपर्यंत व्याज दयावे लागेल.
7. तक्रारदारास जाबदार क्र.1,2 व 16 ते 27 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.18,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.4,000/- अदा करावेत.
8. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
10. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 10–7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.