Maharashtra

Satara

CC/15/144

Dhansham Narayandaru Chabda, Nandakumar Co. - Complainant(s)

Versus

Federal Agro Commodities Exchange and Supply Co-operation Of India - Opp.Party(s)

Jagdale

20 Nov 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

          मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य

                    मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.            

             

                तक्रार अर्ज क्र. 144/2015.

                                                                                                       तक्रार दाखल दि.12-06-2015.

                                                                                                      तक्रार निकाली दि.20-11-2015. 

घनःश्‍याम नारायणदास छाबडा,

नंदकुमार कंपनी,

रा. प्‍लॉट नं.30, गुलमोहर कॉलनी,

आय.टी.आय.समोर,गेंडामाळ,सातारा.                    ‍ ...  तक्रारदार.  

         विरुध्‍द

श्री. अग्रवाल,

मुख्‍य कार्यकारी अधिकारी,

फेडरेल अँग्रो कोमोडिटीज एक्‍सेंज अँण्‍ड

सप्‍लाय कार्पोरेशन ऑफ इंडिया,

न. 8, समाज भूषण लेआऊट,गजानन नगर,

रिध्‍दी सदनिका अपार्टमेंट, वर्धा रोडजवळ,

साई मंदिर, नागपूर 440 015.                      ....  जाबदार.

                              तक्रारदारातर्फे अँड.व्‍ही.पी.जगदाळे.

                              जाबदारएकतर्फा.                                                   

न्‍यायनिर्णय

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                      

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

    तक्रारदार हे सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवाशी आहेत. जाबदार यांचा फेडरल अँग्रो कोमो‍डिटीज एक्‍सेंज अँण्‍ड सप्‍लाय कार्पोरेशन ऑफ इंडिया या नावाने धान्‍य पुरवठयाचा व्‍यवसाय आहे.  तक्रारदाराने जाबदार यांचेकडून गहू खरेदीसाठी दि. 8/4/2015 रोजी रक्‍कम रु.8,00,000/- (रुपये आठ लाख मात्र) युनियन बँक ऑफ इंडिया, सातारा येथून आर.टी.जी.एस. व्‍दारे त्‍यांच्‍या यु.टी.आर.नंबर यु.बी.आय.एन.एच. 15098016665 ने गहू खरेदी अँडव्‍हान्‍स म्‍हणून जाबदार यांचेशी झाले चर्चेप्रमाणे पाठविले होते.  सदरची रक्‍कम जाबदारांला त्‍याचदिवशी म्‍हणजे दि. 8/4/2015 रोजी मिळालेली आहे.  सर्वसाधारण 50 टन गहू सप्‍लाय करणेबाबत उभयतांमध्‍ये ठरलेले होते.  परंतू जाबदार यांनी 40.325 टन गहू हा श्री. बनकेबिहारी ट्रेडींग कंपनी, गाला मंडई, (किराचोली) आग्रा यांचेमार्फत पाठवला.

प्रस्‍तुतच्‍या दोन ट्रकमधून पाठविले मालाची किंमत रक्‍कम रु.6,02,009/- अशी होत आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्‍कम रु.8,00,000/- (रुपये आठ लाख मात्र) पाठवलेले होते.  त्‍यामुळे जाबदार यांचेकडे तक्रारदार यांचे रक्‍कम रु.1,97,991/- (रुपये एक लाख सत्‍त्‍यानऊ हजार नऊशे मात्र) शिल्‍लक आहे.  प्रस्‍तुत उर्वरित रक्‍कम जाबदाराने परत करावी म्‍हणून तक्रारदाराने जाबदार यांना वकीलांमार्फत दि.12/5/2015 रोजी नोटीस पाठविली.  प्रस्‍तुत नोटीसला जाबदाराने दि. 18/5/2015 रोजी खोटे उत्‍तर देऊन रक्‍कम देणेस टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदाराने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारची फसवणूक केली आह व तक्रारदाराला जाबदाराने सदोष सेवा पुरविली असलेने तक्रारदाराने जाबदारांविरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.

2.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रारदाराने जाबदाराला गहू खरेदीपोटी दिलेली उर्वरीत रक्‍कम रु.1,97,991/- (रुपये एक लाख सत्‍यानऊ हजार नऊशे एक्‍क्‍यानऊ मात्र) द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजदराने वसूल होऊन मिळावेत,  दरम्‍यानच्‍या नुकसानीबाबत रक्‍कम रु.50,000/- जाबदाराने तक्रारदाराला द्यावेत, तक्रारदाराला तक्रारीचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.20,000/- तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- जाबदारांकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

3.   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 व नि.5/2 कडे तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली नोटीस, प्रस्‍तुत जाबदाराने तक्रारदाराचे नोटीसला दिलेले उत्‍तर, नि. 10 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 11 कडे लेखी युक्‍तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केले आहेत.

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार यांना पाठवलेली नोटीस जाबदाराला ‘इंटिमेशन दिली’ तसेच ‘अनक्‍लेम्‍ड’ या पोष्‍टाचे शे-याने परत आली आहे. सबब जाबदारांना नोटीस लागू होवूनही जाबदार याकामी मे मंचात हजर राहीले नाहीत त्‍यामुळे जाबदार यांचेविरुध्‍द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  जाबदार यांनी तक्रार अर्जातील तक्रारदाराचे कथन खोडून काढणेसाठी म्‍हणणेही जाबदाराने दाखल केलेले नाही. तसेच जाबदाराने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही किंवा याकामी कोणतेही आक्षेप जाबदाराने नोंदविलेले नाहीत.

5.  वर नमूद तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाच्‍या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.

अ.क्र.               मुद्दा                        उत्‍तर

1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                  होय.

2. जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय?     होय.

3. अंतिम आदेश?                                   खालील आदेशात  

                                                  नमूद केलेप्रमाणे

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार हे कुटूंबाच्‍या उदरनिर्वाहासाठी धान्‍य विक्रीचा व्‍यवसाय करतात.  प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदार यांचेकडून दि.8/4/2015 रोजी 50 टन गहू खरेदीसाठी रक्‍कम रु.8,00,000/- (रुपये आठ लाख मात्र) त्‍यांचे युनियन बँक ऑफ इंडिया,सातारा येथील आर.टी.जी.एस. ने गहू खरेदीसाठी अँडव्‍हान्‍स म्‍हणून जाबदार यांना त्‍यांच्‍या यु.टी.आर. नंबर युबीआयएनएच 1509801665 ने गहू खरेदीसाठी अँडवन्‍स म्‍हणून जाबदार यांचेशी दूरध्‍वनीव्‍दारे बोलणे  झालेप्रमाणे पाठविले होते.  परंतू जाबदाराने एकूण 40.325 टन गहू श्री. बनके बिहारी ट्रेडींग कंपनी, गाला मंडई, किराचोली (आग्रा) यांचेकडील बिल क्र. 4, वजन क्र. 20 टन व बिल क्र. 5 वजन 20.325 टन ता.11/4/2015 रोजी कलकत्‍ता पंजाब फ्राईट करीअर यांचेकडील एल.आर.नं.7024 ट्रक क्र.एम.पी.33एच.1650 व एल.आर.क्र.7023, ट्रक एम.पी.33 एच. 5550 व्‍दारे मिल पोहोच पाठविले आहेत.  दोन ट्रकमधून पाठविले मालाची किंमत जाबदार यांनी मालासोबत पाठविलेल्‍या बिलानुसार रु.2,99,329/- व रु.3,02,680/- असे दोन्‍ही मिळून रक्‍कम रुपये 6,02,009/- इतकी  होत आहे.  तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेले रक्‍कम रु.8,00,000/- मधून सदर रक्‍कम रु.6,02,009/- वजा जाता जाबदार यांचेकडून रक्‍कम रु.1,97,991/- (रुपये एक लाख सत्‍यानऊ हजार नऊशे एक्‍यानऊ मात्र) तक्रारदाराला येणे आहे.  प्रस्‍तुतची बाब जाबदाराने नि.5/2 चे नोटीस उत्‍तरमध्‍ये मान्‍य व कबूल केलेली आहे. तसेच सदर जाबदार हे तक्रारअर्जाची नोटीस लागू  होऊनही मे मंचात गैरहजर असलेने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि. 1 वर झालेला आहे.  प्रस्‍तुत जाबदाराने तक्रारदार हे प्रस्‍तुतच गहू व्‍यापारी कारणासाठी वापरतात, किंवा प्रस्‍तुत धंद्यातून तक्रारदार हे जास्‍तीतजास्‍त नफा मिळवतात त्‍यामुळे सदर कामी Commercial Purpose  असलेने तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत ही बाब सिध्‍द केलेली नाही किंवा त्‍यासाठी कोणताही लेखी व तोंडी पुरावा या मे. मंचात दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराने तक्रार अर्जात व पुराव्‍याचे शपथपत्रात केलेले कथन विश्‍वासार्ह वाटते.  त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  कारण तक्रारदाराने त्‍याचे पुराव्‍याचे शपथपत्रात सदरचा व्‍यसाय कुटूंबाचे उपजिविकेसाठी करत असलेचे शपथेवर कथन केले आहे.  प्रस्‍तुत बाब जाबदाराने खोडून काढलेली नाही.  त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा क्र. 2 (1)(डी) प्रमाणे तक्रारदार हे नात्‍याने जाबदारांचे ग्राहक आहेत. वरील सर्व बाबींवरुन तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत हे तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत दाखल केले कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते.  तसेच तक्रारदार जरी धान्‍यविक्रीचा व्‍यवसाय करत असते तरी त्‍यांनी त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्रात स्‍पष्‍ट कथन केले आहे की, तक्रारदार सदरचा व्‍यवसाय कुटूंबाच्‍या उदरनिर्वाहासाठी करतात.  तसेच तक्रारदार प्रस्‍तुत व्‍यवसाय हा Commercial purpose  (व्‍यापारी कारणासाठी) करत आहेत हे जाबदाराने सिध्‍द केलेले नाही किंवा तसा कोणताही पुरावा मे मंचात सदर केलेला नाही.  जाबदार यांना नोटीस लागू होऊनही जाबदार मे मंचात गैरहजर असून त्‍यांनी तक्रार अर्जातील कथन खोडून काढणेसाठी कोणतेही म्‍हणणे दाखल केलेले नाही.  जाबदार यांचे विरुध्‍द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  सबब या सर्व विवेचनावरुन तक्रारदार हे प्रस्‍तुतचा व्‍यवसाय व्‍यापारी कारणासाठी करत नसून कुटूंबांचे उदरनिर्वाहासाठी करत असलेने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 2 (1)(d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येतात. त्‍यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेदरम्‍यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते आहे हे स्‍पष्‍ट होते.  सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

7.   वरील विवेचनात नमूद केलेप्रमाणे जाबदाराने 50 टन गहू तक्रारदारला पाठविणेची हमी देऊन तक्रारदारकडून 50 टन गव्‍हाची किंमत रक्‍कम रु.8,00,000/- युनियन बँक ऑफ इंडिया,सातारा येथून आर.टी.जी.एस. व्‍दारे त्‍यांचे यु.टी.आर.नंबर सु.बी.आय.एन.एच. 15098016665 ने जाबदाराला पाठविले होते.  सदर रक्‍कम जाबदाराने दि.8/4/2015 रोजी मिळाली आहे. प्रस्‍तुतची बाब जाबदाराने नोटीस उत्‍तरमध्‍ये मान्‍य व कबूल केलेली आहे.  परंतू 50 टन गहू तक्रारदाराला पाठवलेले जाबदाराने मान्‍य व कबूल केले असतानाही जाबदाराने 40.325 टन गहू श्री. बनके बिहारी ट्रेडींग कंपनी, गाला मंडई, किराचोली (आग्रा) यांचेकडील बील क्र. 4 वजन 20 टन व बिल क्र. 5 वजन 20.325 टन दि.11/4/2015 रोजी कलकत्‍ता पंजाब फाईट करिअर यांचेकडील एम.आर.नं.7024 ट्रक क्र. एम.पी. 33 एच.1650 व एल.आर.क्र.7023 ट्रक क्र. एम.पी.33-एच. 5550 व्‍दारे मिलपोहोच पाठविली आहे.  प्रस्‍तुत दोन्‍ही ट्रक मधून पाठविले 40.325 टन गव्‍हाची किंमत रक्‍कम रु. 6,02,009/- इतकी आहे.  प्रस्‍तुत रक्‍कम तक्रारदाराने जाबदाराला पाठवले रक्‍कम रु.8,00,000/- मधून वजा जाता रक्‍कम रु.1,97,991/- ही उर्वरीत रक्‍कम जाबदारांकडून तक्रारदाराला येणे आहे हे स्‍पष्‍ट होते.  परंतू जाबदार यांचेकडे तक्रारदाराने प्रस्‍तुत ऊर्वरीत रक्‍कमेची मागणी केली असता जाबदाराने प्रस्‍तुत रक्‍कम तक्रारदाराला अदा करणेस नकार दिला व तक्रारदाराने नोटीस पाठविली असा नोटीसला खोटे उत्‍तर देऊन रक्‍कम तक्रारदाराला अदा करणेस टाळाटाळ केलेचे स्‍पष्‍ट होते. सदर कामी जाबदारांविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झाले आहेत. जाबदाराने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.  सबब जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे हे स्‍पष्‍ट होते म्‍हणून  मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

    वरील सर्व कागदपत्रे, विवेचन, तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद या सर्व बाबींचा विचार करता, प्रस्‍तुत तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असून जाबदाराने तक्रारदाराला ऊर्वरित रक्‍कम रु.1,97,991/- परत अदा करणेस टाळाटाळ केली व परत अदा न केलेने तक्रारदाराला सदोष सेवा जाबदाराने पुरविलेचे स्‍पष्‍ट झाले आहे. सबब प्रस्‍तुत जाबदाराने तक्रारदार यांना गहू खरेदीपोटी जाबदाराने पाठविले एकूण रकमेपैकी उवारित रक्‍कम रु.1,97,991/- (रुपयम एक लाख सत्‍यानऊ हजार नऊशे एक्‍यानऊ मात्र) व्‍याजासह परत अदा करणे न्‍यायोचीत होणार आहे असे या मे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.    

9.   सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

आदेश

1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह अंशतः मंजूर करणेत येतो.

2. तक्रारदार व जाबदार यांचेत ठरले व्‍यवहाराप्रमाणे तक्रारदाराची जाबदार यांचेकडे

   राहीलेली ऊर्वरित रक्‍कम रु.1,97,991/- (रुपये एक लाख सत्‍यानऊ हजार

   नऊशे एक्‍यानऊ मात्र) जाबदाराने तक्रारदाराला अदा करावी.

3.  वर नमूद रकमेवर आदेश पारीत तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत

    द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज जाबदाराने तक्रारदाराला अदा करावी.

4. जाबदाराने तक्रारदाराला झाले मानसिक व शारीरिक त्रासापोटी जाबदाराने

   तक्रारदार यांना रक्‍कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) अदा करावेत.

5. जाबदाराने तक्रारदाराला अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच

   हजार मात्र) अदा करावेत.

6. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदाराने आदेश पारीत झाले तारखेपासून 45

   दिवसात करावी.

7. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार

   यांना जाबदारांविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई

   करणेची मुभा राहील.

8. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

9. सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

ठिकाण- सातारा.

दि. 20-11-2015.

              (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

             सदस्‍या          सदस्‍य           अध्‍यक्षा

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.