Complaint Case No. CC/22/17 | ( Date of Filing : 01 Feb 2022 ) |
| | 1. Shri.Rajendra Harishchandra Thakre | R/o.Maldhongri,Post- Paradgaon,tah-Bhramhapuri | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Exotica Hi-Tech Seeds Pvt Ltd Marketed By East Vidarbha Eco Agro Science Pvt Ltd Through Manager | Marketed by east vidarbha eco agri sciences Pvt ltd, Register office-plot no-3,Kachimet,Chikli layout,Near N.B.B.B S,Amravati Road,nagpur-440033 | Nagpur | Maharashtra | 2. East Vidarbha Eco Sciences Pvt Ltd Through Administrator | Register office-plot no-3,Kachimet,Chikli layout,Near N.B.B.B S,Amravati Road,Nagpur-440033 | Nagpur | Maharashtra | 3. Deepak Krushi Kendra,Bramhapuri | Tah-Bramhapuri,Dist-Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, श्रीमती वैशाली आर. गावंडे, मा. अध्यक्ष) (पारित दिनांक २७/०२/२०२४ ) - तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता हा व्यवसायाने शेतकरी असून त्याची वडीलोपार्जीत शेती मौजा धानोली, तुकूम, सर्व्हे क्रमांक १७४, आराजी १.०७ हेक्टर आर व सर्व्हे क्रमांक १३४, आराजी ०.७६ हेक्टर आर असून शेती हे त्याचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. तक्रारकर्त्यानुसार विरुध्द पक्ष क्रमांक १ हे एक्सोटीका हाय-टेक सीड्स आशा धानाच्या वाणाचे बियाणाची निर्माती कंपनी असून विरुध्द पक्ष क्रमांक २ हे सदर बियाणांची मार्केटींग कंपनी तसेच विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे कृषी केंद्र आहेत. दिनांक १५/०६/२०२० रोजी तक्रारकर्ता याने आपले वडिलोपार्जीत शेत पेरणीकरिता आशा वाणाच्या धानाचे बियाणे विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून रुपये ६५०/- दर प्रमाणे एकूण ९ बॅग विकत घेतले त्याचे देयक क्रमांक ३७५० असून तक्रार अर्जासोबत दाखल केले आहे. कारणाने तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचा ग्राहक आहे. तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, सदर आशा वाणाच्या धानाचे बियाणे १२० दिवसात येणार असल्याचे विरुध्द पक्ष यांचेकडून सांगण्यात आले होते. तक्रारकर्ता याने दिनांक १८/०६/२०२० रोजी आवत्या पध्दतीने पेरणी केली परंतु १२० दिवसाच्या कालावधीनंतर सदरहू धानाचे पीक अर्धे (५० टक्के) निसवले (उगवले) तर ५० टक्के उशीराने उगवले.यावरुन सदरहू धानाचे बियाणे हे ५० टक्के भेसळयुक्त असल्याचे तक्रारकर्त्याच्या लक्षात आले. तक्रारकर्ता यांनी सदरहू कारणांकरिता दिनांक ०९/१०/२०२० रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, ब्रम्हपूरी, यांचेकडे तक्रार दिली व प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर, जिल्हा कृषी अधिकारी, चंद्रपूर, उपविभागीय कृषी अधिकारी, नागभीड, तालुका कृषी अधिकारी, ब्रम्हपूरी तसेच विरुध्द पक्ष क्रमांक २ यांना दिल्या.
- तक्रारकर्ता पुढे सांगतात की, तालुका कृषी अधिकारी, ब्रम्हपूरी यांनी दिनांक १४/१०/२०२० रोजी तक्रारकर्त्याच्या शेताची पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी यांनी केलेल्या मौका चौकशीनुसार व त्यांचे अहवालावरुन तक्रारकर्त्याने पेरणी केलेल्या आशा वाणाचे धान भेसळयुक्त असल्यचे आढळून आले. कारणाने तक्रारकर्त्यानुसार त्याला चालू खरीप पिकाचे रुपये १,९०,०००/- इतके व आगामी रब्बी पिकाचे रुपये ३,५०,०००/- नुकसान झालेले आहे. आशा पिकाचे वाणाच्या धानाचे बियाणे मागे पुढे उगवल्याकारणाने तक्रारकर्त्याचे इसवी सन २०२०-२०२१ मधील झालेले हंगामी पीक व आगामी कालावधीतील हंगामी पीक दोन्हीवर परिणाम होऊन त्याचे आर्थिक नुकसान झाले. करिता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे विरुध्द त्यांनी अवलंबलेल्या अनुचित व्यापार पध्दती व पुरविलेल्या सेवा कमतरतेसाठी सदरचा दावा आयोगापुढे दाखल करुन तक्रार अर्जात नमूद केलेल्या प्रार्थनेनुसार मागणी केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रार अर्जाच्या पृष्ठर्थ निशानी क्रमांक ४ वरील दस्तावेज यादीनुसार दस्त क्रमांक १ ते १२ तसेच दिनांक ०७/०६/२०२३ रोजी नव्याने दाखल केलेल्या दस्तावेज यादीनुसार दस्त क्रमांक १ ते ६ इत्यादी कागदोपञी पुरावे दाखल केलेले आहे.
- सदर प्रकरण दिनांक १५/०२/२०२२ रोजी दाखल करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ विरुध्द नोटीस बजावणी आदेश निशानी क्रमांक १ वर पारित करण्यात आला तसेच दिनांक २५/६/२०२२ रोजी नव्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस काढण्यात आली.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना दिनांक १२/०९/२०२२ रोजी प्रकरणात हजर होऊन आपले लेखी जबाब दाखल केले त्यानुसार विरुध्द पक्ष्ज्ञ क्रमांक ३ कबूल करतात की, त्याचे ब्रम्हपूरी येथे कृषी केंद्र असून सन २०२०-२०२१ च्या हंगामासाठी मौजा मालडोंगरी येथील ब-याच शेतक-यांनी त्यांचेकडून आशा वाणाच्या धानाचे बियाणे विकत घेतले परंतु आजतागायत कोणीही तक्रारदाराप्रमाणे तक्रार केलेले नाही. त्यांच्यानुसार मार्केट मधील त्यांच्या (ऐपतीला) (Goodwill) बदनाम करण्याचा वाईट उद्देशाने व नियोजन करुन त्याचेविरुध्द सदरचा खोटा दावा दाखल करण्यात आलेला आहे. पुढे विरुध्द पक्ष क्रमांक ३ निर्देशनास आणू इच्छितात की, तक्रारकर्त्याने पेरणीपूर्व तयारी, शेतातील मातीचे परिक्षण व त्यात सुधारणा या सर्व बाबी पूर्ण केलेल्या दिसून येत नाही व बहुधा शेतजमिनीच्या मातीतच पोषक तत्वाचा अभाव असू शकतो. तसेच तक्रारकर्ता यांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत व पिकाचे योग्य नियोजन न केल्याकारणाने असे घडू शकते. सबब आपल्या बेजबाबदारपणासाठी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांना कारणीभुत ठरवले व त्याच्याविरुध्द सदरचा खोटा दावा दाखल केला. तरी त्याच्याविरुध्दचा दावा नामंजूर करुन तो दंडासह खारीज व्हावा अशी विनंती करीत आहे.
- सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी त्यांच्या समर्थनार्थ कोणताही दस्तावेज वा शपथपञ सत्यापणावर दाखल केला नाही.
- तक्रारकर्ता यांनी दिनांक १०/०१/२०२४ रोजी दाखल केलेल्या आपल्या लेखी युक्तिवादात विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब सोडून सत्यापनावर जबाब दाखन न केल्याकारणाने जबाबात नमूद मजकुर विश्वासाहर्य नाही असे सांगितले आहे.
- आयोगासमोर तोंडी युक्तिवादाच्यावेळी विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ तसेच त्यांचे वकील उपस्थित नव्हते. कारणाने तक्रारकर्त्याचा वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला तसेच सदरहू प्रकरणाचे अवलोकन केले असता आयोग पुढीलप्रमाणे कारणमीमांसे सहीत निष्कर्ष पारित करीत आहे.
कारणमीमांसा - तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून दिनांक १५/०६/२०२० रोजी रुपये ६५०/- दराप्रमाणे एकूण ९ बॅग आशा वाणाच्या धानाचे बियाणे विकत घेतले. त्याचा देयक क्रमांक ३७५० असून निशानी क्रमांक ४ वरील दस्तावेज क्रमांक १ वर दाखल आहे. यावरुन तक्राकरर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक असल्याचे सिध्द होत आहे तसेच सदर आशा धानाचे बियाणे त्याने सन २०२०-२०२१ च्या चालु हंगामी पिकाच्या पेरणीकरिता वापरले असून ते अर्धे – अर्धे उगवल्याने तक्रारकर्त्याच्या दोन्ही हंगामी पिकांवर परिणाम होऊन शेती मालाचे आर्थिक उत्पन्नावर नुकसान झालेले आहे. सदरची बाब तालुका तक्रार निवारण समितीचा क्षेञ भेटीचा अहवाल व पंचनामा दस्तावेज क्रमांक ४ वर दाखल असून त्यात नमूद स्तंभ १६ नुसार इतर माहिती ‘जमिनीचे निरीक्षणे व निष्कर्षे मध्ये नमूद आहे की सदर पीक एकाचवेळी कापणी करणे शक्य नसल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झालेले आहे’ तसेच स्तंभ १८ उपविभागीय स्तरीय तक्रार निवारण समितीचे निष्कर्षे यात शेतक-यांचे पीकाचे अंदाजे आर्थिक नुकसान नमूद करण्यात आलेले आहे. (दस्त क्रमांक ४) (पान क्रमांक २५) चे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याचे इ.सन २०२०-२०२१ वर्षातील चालू वर आगामी हंगामी पिकाचे नुकसान झाल्याचे सिध्द होत आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी आपल्या लेखी जबाबात तक्रारकर्ता यांनी आपल्या शेतजमिनीची पेरणीपूर्व मशागत व पिकाचे योग्य नियोजन केले नसून तक्रारकर्त्याचे शेतीच्या मातीतच पोषक तत्वाचा अभाव असू शकतो असे कारण नमूद करुन त्याचाविरुध्दचा दावा फेटाळला आहे. तसेच २०२०-२०२१ च्या हंगामाकरिता मौजा मालडोंगरी येथील ब-याच शेतक-यांनी आशा वाणाच्या धानाचे बियाणे विकत घेतले परंतु अर्जदार व्यतिरिक्त कोणी ही तक्रार केली नाही असा बचाव केला आहे परंतु आपल्या बचावाकरिता कोणताही कागदोपञी पुरावा सादर केलेला नाही. याउलट सन २०२०-२०२१ च्या हंगामाकरिता मौजा मालडोंगरी येथील तक्रारकर्ता प्रमाणे इतर शेतक-यांनी सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून विकत घेतलेले आशा वाणाच्या धानाचे बियाणे बाबत तक्रार दाखल केलेली आहे असे हे तक्रारकर्ता यांनी दिनांक ०७/०६/२०२३ रोजी दाखल केलेल्या दस्तऐवज पुराव्यावरुन सिध्द होत आहे. करिता आयोग पुढीलप्रमाणे आदेश पारितकरीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्याप्रति अवलंबलेली कृती ही अनुचित व्यापार पध्दती असून सेवा न्युनता करिता त्यांना वैयक्तिक तसेच संयुक्तीकरित्या जबाबदार ठरविण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्यास वैयक्तिक तसेच संयुक्तीकरित्या इ.स. २०२०-२०२१ च्या चालु व आगामी हंगामी पिकाच्या आर्थिक नुकसान भरपाईसाठी रुपये २,००,०००/- तक्रार दाखल दिनांक ०१/०२/२०२२ पासून प्रत्यक्ष रक्कम हातात मिळेपर्यंत ९ टक्के व्याजासह अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी वैयक्तिक तसेच संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारीरिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
| |