Maharashtra

Ahmednagar

CC/17/74

Prabhakar Shrikrishna Thaware - Complainant(s)

Versus

Exide Batteries Authorized Dealer By For Pro-Pra. Akshay Batteries - Opp.Party(s)

03 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/74
( Date of Filing : 01 Mar 2017 )
 
1. Prabhakar Shrikrishna Thaware
Newasa Bu, Tal- Newasa,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Exide Batteries Authorized Dealer By For Pro-Pra. Akshay Batteries
Shop No- 2, Nawle Building, Lal Taki Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. M/s. EXIDE INDUSTRIES LTD.
59 E, Chowringhee Road, Kolkata 700020 Ph.033-22832120
Kolkatta
West Bengal
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party: S.C. Ithape, Advocate
Dated : 03 Feb 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०३/०२/२०२०

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)


१.   तक्रारदार हिने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे मौजे नेवासा बु. ता. नेवासा येथील रहिवासी असुन ते एल.आय.सी. प्रतिनिधी म्‍हणुन काम करतात. एलआयसी कार्यालयाने त्‍यांचेकडे एल.आय.सी.पॉलिसीधारकांना सेवासुविधा उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणुन सेवा केंद्र चालविण्‍यास दिलेले आहे. तक्रारदार यांना व्‍यवसायसाठी बॅटरीची आवश्‍यकता असल्‍याने त्‍यांनी सामनेवाले यांचेकडे एक्‍साईड बॅटरीची चौकशी केली असता त्‍यांनी बॅटरी खरेदी केल्‍यास तुम्‍हांला तीन वर्षांची गॅरंटी देतो, सदर बॅटरीमध्‍ये काही दोष झाल्‍यास तो त्‍वरीत काढुन देऊ, अगर नादुरूस्‍त झाल्‍यास तुम्‍हाला विनातक्रार सदर बॅटरी बदलुन देऊ, तुम्‍हाला चांगला फायदा होईल व तुमचे काही नुकसान होणार नाही, झाल्‍यास त्‍याची जबाबदारी आम्‍ही स्विकारतो असा विश्‍वास व भरोसा दिला व सामनेवालेचे शब्‍दावर जाहिरातीवर विश्‍वास ठेवुन तक्रारदाराने सामनेवालेकडुन दिनांक ०८-०९-२०१३ रोजी Battry Type ISI500 Serial No.A3H3C002681 3 H32 बिल नं.१९३६ रक्‍कम रूपये १४,५००/- नुसार खरेदी केलेली आहे. तक्रारदार व सामनेवाले यांचे ग्राहक मालक असे नातेसंबंध होते व आहेत. सामनेवाले यांनी दिलेल्‍या सुचना, नियमाचे पुर्णपणे पालन करून तक्रारदाराने सदर बॅटरी बसविलेली होती. सदर बॅटरी चालु असतांना नेहमीच वारंवार डिस्‍चार्ज होत असे व पुढे पुढे सदर बॅटरी ही चार्जच होत नसे. त्‍यामुळे तक्रारदारास सदर बॅटरीचा पाहिजे त्‍या प्रमाणात उपभोग घेता येत नव्‍हता व तक्रारदारास त्‍यांचे विमा व्‍यवसायासाठी ग्राहकांना सेवा सुविधा देण्‍यास अडचणी निर्माण झाल्‍या व तक्रारदाराच्‍या व्‍यवसायावर विपरीत परिणाम झाला. यासाठी सर्वस्‍वी सामनेवालेच जबाबदार होते. याबाबत सामनेवाले यांना सांगितले असता त्‍यांनी टाळाटाळ केली. सामनेवालेंकडे बॅटरी नेली असता दिनांक ३१-०८-२०१६ रोजी खोटे बॅटरीमध्‍ये दोष नाही, असे खोटे कागदपत्र तयार करून सांगितले. तसेच दिनांक ०८-१२-२०१६ रोजी तक्रारदार यांनी पुन्‍हा बॅटरी दुरूस्‍त करणेबाबत सांगितले असता सामनेवाले यांनी त्‍यास नकार दिला. तक्रारदारास खाली नमुद केल्‍याप्रमाणे सामनेवालेने दिलेली बॅटरी निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याने नुकसान झालेले आहे.     

अ.नं.

तपशील

रक्‍कम

१.

तक्रारदाराने सामनेवालेकडुन दि.०८-०९-२०१३ रोजी Battry Type ISI500 Serial No.A3H3C002681 3 H32 बिल नं.१९३६ रक्‍कम रूपये १४,५००  

१४,५००.००

२.

तक्रारदाराचे व्‍यावसायीक झालेले नुकसान दरमहा रूपये १०,००० प्रमाणे

१०,०००.००

३.

वेळोवेळी भेट घेणे, फोन करणे, बॅटरी नगरला पोहोच करणे, घेऊन येणे दोन वेळा व इतर

 ५,५००.००

४.

मानसीक व शारीरिक त्रासाबद्दल

 ५,०००.००

 

            एकूण रूपये पस्‍तीस हजार मात्र

३५,०००.००

     तक्रारदाराची मागणी अशी आहे की, सामनेवालेकडुन तक्रारदारास तक्रार अर्ज कलम ५ मध्‍ये नमुद केलेली नुकसान भरपाई रक्‍कम रूपये ३५,०००/- देणेचा हुकुम व्‍हावा, सामनेवाले यांचकडुन आजपावेतो रकमेवरील द.सा.द.शे. १८ टक्‍के प्रमाणे अगर मे. कोर्ट ठरवतील त्‍या दराने व्‍याज मिळावे, तक्रारदारास सदर निष्‍कृष्‍ट बॅटरी बदलुन देण्‍याबाबत सामनेवाले यांना हुकूम व्‍हावा, सदर अर्जाचा संपूर्ण खर्च तक्रारदारास सामनेवालेकडुन मिळावा.

३.   तक्रारीचे पुष्‍टयर्थ तक्रारदार यांनी निशाणी ३ सोबत एकुण ७ कागदपत्रांच्‍या  छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये बुकलेटची, अक्षय बॅटरी यांची पावती, दिनांक ३१-०८-२०१६ चा बॅटरी तपासणी अहवाल, दिनांक ०३-१२-२०१६ चा बॅटरी तपासणी अहवाल, दिनांक १५-१२-२०१६ रोजी अक्षय बॅटरी यांना पाठविलेले पत्र व पत्रासोबत पाठवलेले कागदपत्र, अक्षय बॅटरी यांना रजीस्‍ट पोस्‍टाने पाठविलेले पत्र, अक्षय बॅटरी यांना पत्र मिळालेची पोहोच दाखल आहे. निशाणी ११ वर तक्रारदाराने लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. निशाणी २२ वर तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे.  

४.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना मंचामार्फत नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले क्र.१ यांनी त्‍यांची कैफीयत नि.५ वर  दाखल केली आहे. तर सामनेवाले क्र.२ यांनी निशाणी २० वर कैफीयत दाखल केली. सदर दोन्‍ही कैफीयतीमधील कथने सारखेच असुन त्‍यात सामनेवाले यांनी तक्रार अर्ज व त्‍यातील मजकुर खोटा असुन नाकबुल आहे असे म्‍हटले आहे. पुढे वास्‍तविक सत्‍य परि‍स्‍थतीमध्‍ये असे नमुद केले आहे की, सामनेवाले हे एक्‍साईड बॅटरीज कंपनीचे अधिकृत विक्रेते असल्‍याने ग्राहकांना नियमानुसार खरेदी बिल, वॉरंटी कार्ड इत्‍यादी गोष्‍टी ग्राहकांना देतात. सदर बिल व वॉरंटी कार्डवर विक्रीची तारीख, बिल नंबर, सिरीयल नंबर तसेच बॅटरीज बदलुन देणेसंबंधी सर्व नियम व अटी स्‍पष्‍टपणे नमुद केलेल्‍या आहेत. या नियम व अटीप्रमाणे बॅटरीज मध्‍ये  उत्‍पदन गुणवत्‍ता  त्रुटी (Manufacturing Defect) असले तरच उत्‍पादने बदलनु देण्‍याविषयी स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. तक्रारदार बॅटरी खरेदी केलेनंतर दिनांक ०८-०९-२०१३ पासुन ते आजपावेतो कधीही व केव्‍हाही सामनेवाले यांचेकडे बॅटरीजच्‍या तक्रारीकामी आलेला नव्‍हता अथवा सदर बॅटरीजचे दोषाबाबत सामनेवालेकडे तक्रार केलेली नव्‍हती. दिनांक ३१-०८-२०१६ रोजी तक्रारदार बॅटरीजबाबत तक्रार घेऊन कंपनीचे वर्कशॉपमध्‍ये गेल्‍याचे प्रथमतः मे.मंचाचे तक्रारदारांचे अर्जासोबतचे कागदपत्रांवरून समजले. तक्रारदार बॅटरीजबाबत तक्रार घेऊन कंपनीचे वर्कशॉपमध्‍ये गेले असता संबंधीत तज्ञांनी तक्रारदार यांना समक्ष बॅटरी चार्ज करून त्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारे दोष नसल्‍याचे स्‍पष्‍ट रितीने दाखवुन दिले व त्‍यानुसार अहवाल तक्रारदार यांना दिला. सदर अहवालानुसार बॅटरीज चार्ज झाल्‍यानंतर किंवा बॅटरी चालण्‍याकरीता आवश्‍यक असणारे सर्व बाबींची व घटकांची पुर्तता होऊन बॅटरीमध्‍ये कोणत्‍याही प्रकारे दोष नसल्‍याचे स्‍पष्‍टरितीने दिसत आहे. त्‍यानंतरदेखील तक्रारदाराने कंपनीचे वर्कशॉपमध्‍ये  जाऊन बॅटरी बदलुन देण्‍याकरीता मागणी केली परंतु बॅटरीची पुर्ण तपासणी करून सामनवालेने तक्रारदाराला दिलेली बॅटरी ही दोषरहीत असल्‍याचे तक्रारदार यांना स्‍पष्‍टरितीने सांगितले. तक्रारदार यांना तक्रारीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे बॅटरीजच्‍या दोषास सामनेवाले कधीही करणीभूत नव्‍हते. सदरची बाब ही निश्चितच उत्‍पदनातील त्रुटी नव्‍हती व नाही. तक्रारदाराला बॅटरीजचे इतर त्रयस्‍थ व तज्ञ ठिकाणी पुन्‍हा तपासणी करणेचा अधिकार होता. तसेच सामनेवाले यांनी सांगितल्‍याप्रमाणे तक्रारदाराने बॅटरी बसविलेली नव्‍हती. तक्रारदाराचे सदरच्‍या  खोट्या अर्जामुळे सामनेवाले यांचे बाजारपेठेमध्‍ये नांव खराब झाले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी.

      सामनेवाले क्र.१ यांनी कैफीयतीच्‍या पुष्‍ट्यर्थ निशाणी ६ वर शपथपत्र दाखल केले आहे व सामनेवाले क्र.२ यांनी निशाणी २० वर लेखी म्‍हणणे व निशाणी क्र.२१ वर शपथपत्र दाखल केले.  

५.   तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्‍यांनी केलेला युक्तिवाद. तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, शपथपत्र, पाहता तसेच सामनेवाले यांचे वकील श्री. एस.सी. इथापे यांनी केलेला युक्तिवाद याचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्ररादार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

नाही

(३)

तक्रारदार नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

नाही

(४)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्र. (१) :  तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ कडुन सामनेवाले क्र.२ ने उत्‍पादीत केलेली बॅटरी दिनांक ०८-०९-२०१३ रोजी Battry Type ISI500 Serial No.A3H3C002681 3 H32 बिल नं.१९३६ रक्‍कम रूपये १४,५००/- नुसार खरेदी केलेली आहे. याबाबत तक्रारदाराने बॅटरीचे बिलाची छायांकीत प्रत दस्‍तऐवज यादी निशाणी ३ सोबत दाखल केली आहे. सदर बाब सामनेवाले यांना मान्‍य  असुन याबाबत उभयपक्षात वाद नाही. यावरून तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत ही बाब सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (२ व ३)  -  तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ कडुन सामनेवाले क्र.२ ने उत्‍पादीत केलेली बॅटरी दिनांक ०८-०९-२०१३ रोजी Battry Type ISI500 Serial No.A3H3C002681 3 H32 बिल नं.१९३६ रक्‍कम रूपये १४,५००/- नुसार खरेदी केलेली आहे. सदर बॅटरी चालु असतांना नेहमीच वारंवार डिस्‍चार्ज होत असे व पुढे पुढे सदर बॅटरी ही चार्जच होत नसे. याबाबत सामनेवाले यांना सांगितले असता त्‍यांनी टाळाटाळ केली. सामनेवालेंकडे बॅटरी नेली असता दिनांक ३१-०८-२०१६ रोजी बॅटरीमध्‍ये दोष नाही, असे खोटे कागदपत्र तयार करून सांगितले. तसेच दिनांक ०८-१२-२०१६ रोजी तक्रारदार यांनी पुन्‍हा बॅटरी दुरूस्‍त  करणेबाबत सांगितले असता सामनेवाले यांनी त्‍यास नकार दिला. यावर सामनेवाले यांनी त्‍यांचे कैफीयतीमध्‍ये असा बचाव घेतला की, तक्रारदाराला दिलेल्‍या बिल व वॉरंटी कार्डवर विक्रीची तारीख, बिल नंबर, सिरीयल नंबर तसेच बॅटरीज बदलुन देणेसंबंधी सर्व नियम व अटी स्‍पष्‍टपणे नमुद केलेल्‍या आहेत.  या नियम व अटीप्रमाणे बॅटरीज मध्‍ये उत्‍पादन गुणवत्‍ता त्रुटी (Manufacturing Defect) असले तरच उत्‍पादने बदलनु देण्‍याविषयी स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. तक्रारदार बॅटरी खरेदी केलेनंतर दिनांक ०८-०९-२०१३ पासुन ते आजपावेतो कधीही व केव्‍हाही सामनेवाले यांचेकडे बॅटरीजच्‍या तक्रारीकामी आलेला नव्‍हता अथवा सदर बॅटरीजचे दोषाबाबत सामनेवालेकडे तक्रार केलेली नव्‍हती. तक्रारदार बॅटरीजबाबत तक्रार घेऊन कंपनीचे वर्कशॉपमध्‍ये गेले असता संबंधीत तज्ञांनी तक्रारदार यांना समक्ष बॅटरी चार्ज करून त्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारे दोष नसल्‍याचे स्‍पष्‍ट रितीने दाखवुन दिले व त्‍यानुसार अहवाल तक्रारदार यांना दिला.

          तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्रावरून अक्षय बॅटरीज यांची मुळ पावतीची तक्रारदाराने दिनांक ०८-०९-२०१३ रोजी सामनेवाले क्र.१ कडुन सामनेवाले क्र.२ यांनी उत्‍पादीत केलेली एक्‍साईड बॅटरीची छायांकीत प्रत जोडलेली आहे. त्‍यात वॉरंटी पिरीयड, सर्व्‍हीस रेकॉर्ड तसेच वॉरंटीचे नियम व अटी, चार्जींग इंस्‍ट्रक्‍शन्‍स, अॅप्‍लीकेशन चार्ट इत्‍यादी विषयी माहिती आहे. वॉरंटी पिरीयडचे अवलोकन केले असता अटी व शर्ती क्रमांक ७,८,९, व १४ मध्‍ये  खालीलप्रमाणे नमुद आहे.

   7.  The defective battery arising out of the free replacement under this Warranty will become the property of the Company and no scrap      rebate will be given for it.

    8.  The Warranty Period on the battery being replaced Free of Cost shall commence from the date of sale of the original battery as stated in the original Warranty Booklet and not from the date of the replacemenr given.

   9.  The Warranty commences from the date of sale to the Original Purchaser.

  14.    The charging system & electrical circuit of the Inverter System shall be checked by the Company authorised personnel or Dealer before finalizing settlement of any Warranty claim.    

          त्‍याचप्रमाणे बॅटरीचे देखभालीसंबंधी माहती दिलेली आहे. सदर प्रकरणात सामनेवाले यांनी असे स्‍पष्‍ट केलेले आहे की, सदरील बॅटरी बुकलेटच्‍या नियम व अटी मध्‍ये एक्‍साईड बॅटरी कंपनी ही फक्‍त कंपनीच्‍या उत्‍पदीत बॅटरीज मध्‍ये  उत्‍पादन गुणवत्‍ता त्रुटी (Manufacturing Defect) असेल तरच बदलुन देणेविषयी स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे. त्‍याची तक्रारदारास पुर्ण ज्ञान व माहिती होती. सामनेवाले क्र.१ यांनी केवळ एक्‍साईड कंपनीची बॅटरी दिली, या अनुशंगाने कंपनीकरीता विक्री केलेली असल्‍याने सामनेवाले क्र.१ व तक्रारदार यांच्‍यात ग्राहक व सेवा पुरविणार असे नातेसंबंध निर्माण होत नाही, असे म्‍हटलेले आहे. सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांच्‍या बचावात असे नमुद केले आहे की तक्रारदार हा दिनांक ०८-०९-२०१३ पासुन बॅटरीजच्‍या तक्रारीकामी आलेला नव्‍हता व नाही. दिनांक ३१-०८-२०१६ रोजी तक्रारदार हा बॅटरी चार्ज होत नसल्‍याबद्दल सामनेवाले क्र.२ कंपनीचे वर्कशॉपमध्‍ये सामनेवाले क्र.१ हे कंपनीचे डिलर म्‍हणुन विक्री केलेल्‍या  बॅटरी चार्ज होत नसल्‍याबबात तक्रारी करून त्‍यातील असलेली त्रुटी दुर करण्‍यास सांगितले. त्‍यावेळेस कंपनीचे तज्ञांनी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारदाराचे बॅटरीजची प्रत्‍यक्ष पाहणी केली व तक्रारदार यांना समक्ष बॅटरी चार्ज करून त्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारे दोष नसल्‍याचे स्‍पष्‍ट रितीने दाखवुन दिले. त्‍यानंतर दिनांक ०३-१२-२०१६ रोजी कंपनीचे वर्कशॉपमध्‍ये जावुन सदर बॅटरीबाबत तक्रार घेऊन आले. सामनेवाले क्र.२ चे तज्ञांनी बॅटरी पाहिली असता,  बॅटरी अत्‍यंत निष्‍काळजीपणाने नियमाविरूध्‍द वापरल्‍याचे लक्षात आले. तक्रारदाराने त्‍याचे तक्रार अर्जामध्‍ये बॅटरी बदलुन देण्‍याकरीता दिनांक  ०३-१२-२०१६ रोजी मागणी केली. परंतु दिनांक ३१-०८-२०१६ रोजी कंपनीने पुर्ण तपासणी करून सामनेवाले यांनी दिलेली बॅटरी दोषरहित असल्‍याचे स्‍पष्‍टपणे सांगितले व बॅटरीचे विक्री करतांना दिलेले वॉरंटी कार्ड व दिलेल्‍या तरतुदी तक्रारदार यांना समजावुन सांगितले व सदर वॉरंटी कार्डतील मुख्‍य तरतुद व अट ही बॅटरी विकत दिल्‍यापासुन तीन वर्षाचे आत कोणत्‍याही प्रकारे उत्‍पादनातील त्रुटी असेल तरच बॅटरी बदलुन देण्‍याचे सांगितले होते. बॅटरीमध्‍ये त्रुटी नसल्‍याने तक्रारदाराचा मागणी अर्ज दिनांक ०३-१२-२०१६ रोजीचा अर्ज नामंजुर केला आहे. तक्रारदाराने बॅटरी बदलुन देण्‍याची मागणी ही दिनांक ०३-१२-२०१६ रोजी, मुदतबाह्य कालावधीमध्‍ये केली असल्‍याने व वॉरंटी कालावधी संपल्‍याने कंपनीने तक्रारदाराची बॅटरी बदलवुन देणेबद्दलची दखल घेण्‍यास असमर्थता दर्शविली. तक्रारदाराने दाखल केलेल्‍या निशाणी ३/४ वरील बॅटरी तपासणी अहवाल तसेच दिनांक ०३-१२-२०१६ रोजीचा तपासणी अहवालात तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ कडुन खरेदी केलेले सामनेवाले क्र.२ चे उत्‍पदान बॅटरीचा वॉरंटी पिरीयड संपुर्ण झाला असल्‍याचे सांगुन तक्रारदाराचे बॅटरीज बदलुन देण्‍याचे नाकारलेले सदर कागदपत्रावरून दिसते. तसेच दिनांक ३१-०८-२०१६ रोजीच्‍या तपासणी अहवाल यात बॅटरी चार्ज केलेली आहे व त्‍यात ‘ Battery charged, tested and found to be Okay’ असे नमुद केले आहे.  तक्रारदाराला सामनेवालेने नवीन बॅटरी बदलुन देण्‍यासाठी केलेला दावा वॉरंटी कालावधी बॅटरी खरेदीपासुन सुरू होतो. वॉरंटी पिरीयड संपल्‍यानंतर बॅटरी बदलुन देण्‍याची मागणी ही वॉरंटीचे नियमांत बसत नाही. त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारास बॅटरी बदलुन दिली नाही. या सर्व विवेचनावरून सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी दिलेली नाही, निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने कालावधी ३१-०८-२०१६ रोजी. वॉरंटीचा कालावधी संपल्‍यानंतर बॅटरी बदुन देण्‍याची मागणी तक्रारदाराने केली. तसेच तक्रारदाराने सदर बॅटरीची तपासणी तज्ञ व्‍यक्‍तीकडुन करून अहवाल दाखल करणे आवश्‍यक होते. परंतु तक्रारदाराने तसे केले नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवालेकडुन खरेदी केलेली बॅटरी निष्‍कृष्‍ट प्रतीची होती ही बाब तक्रार पुराव्‍यानिशी सिध्‍द करु शकला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. तसेच सामनेवालेंनी सेवेत त्रुटी दिली ही बाब स्‍पष्‍ट न झाल्‍यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्‍कम देणेचा आदेश हे मंच पारीत करू शकत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्‍हणुन मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (४) :  मुद्दा क्र.१, २ व ३ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

२.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

४.  तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.