ग्राहक तक्रार क्र. 111/2012
अर्ज दाखल तारीख : 08/05/2012
अर्ज निकाल तारीख: 05/09/2014
कालावधी:02 वर्षे 03 महिने 28 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) अशोक शंकरराव कुलकर्णी,
वय-66 वर्षे, धंदा – सेवानिवृत्ती/शेती,
रा.समर्थनगर, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.
विभाग, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
२) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही.मैंदरकर.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमुख.
निकालपत्र
मा.अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी, यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार हे मौजे बेंबळी ता. जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी असून अर्जदार यांची मौजे विठठलवाडी (बेंबळी) येथे ग.क्र.418 अशी शेतजमीन असून सेवानिवृत्ती नंतर अर्जदार यांनी या जमिनीत एक कुपनलिका घेतली. त्यास चांगले पाणी लागले म्हणून जानेवारी 2011 मध्ये 86032 या वाणाच्या ऊसाची लागवड केली. तक्रारदार यांचा ग्रा.क्र.AG09/LT/IV(UNMAPD)/3/5HP आहे. यावर तक्रारदार आपला ऊस जोपासत होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकार यांच्याकडून घेतलेल्या विद्युत पुरवठयासाठी स्वत:च्या खर्चाने अनुषंगिक रु.40,000/- खर्च केला असून करारानुसार सदर रक्कम भविष्यात अर्जदार यास येणा-या विज देयकातून टप्याटप्याने ती कपात करण्यात येणार होती. विरुध्द पक्षकार यांनी नोव्हेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 मध्ये अर्जदाराचा कोणत्याही कारणशिवाय अथवा नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे अर्जदार यांचा ऊस वाळुन गेला. व मार्च 2012 मध्ये मध्ये ऊस कारखान्यास नेला असता त्याचे वजन 60 टन ऐवजी 18 टन एवढेच भरले. अशाप्रकारे 120 टन पिकाचे प्रतीटन रु.1,850/- प्रमाणे रु.2,22,000/- एवढेच मिळाले नाही व रु.18,89,000/- चे नुकसान झालेले आहे. सदरबाबत विरुध्द पक्षकारास दि.19/01/2012 रोजी नोटीस पाठविली असता विरुध्द पक्षकाराने कनिष्ठांशी देयकाची दुरुस्ती किंवा तक्रारीचे समाधन करावे असे करण्याबाबत कळवून वेगळयाच विषयाचा पत्रव्यवहार केला असून मुळ विषयाकडे दुर्लक्ष केले म्हणून सदर तक्रार मंचात दाखल केली आहे व तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रास खर्च व नुकसान भरपाई मिळुन रु.2,46,000/- नोव्हेंबर 2011 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने तक्रारदार यांना देण्यात यावे अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने मौजे विठठलवाडी (बेंबळी) ता.जि. उस्मानाबाद येथील, भरलेले विद्युत देयक, सारख कारखाना येथील पावती क्र.34826, पाठविलेली नोटीस, कनिष्ठ अभियंता यांना लिहीलेले पत्र, मंचाच्या अभिलेखावर दाखल केले आहे.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.04/11/2012 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे.
तक्रारदाराने घेतलेली कुपनलीका व त्यावर केलेला खर्च व ऊसाची केलेली लागवडी बाबत विरुध्द पक्षकारास माहीत नाही. तक्रारदाराचा विद्युत पुरवठा नोव्हेंबर 2011 मध्ये खंडीत केला हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे हे स्पष्ट दिसुन येते. याशिवाय डि.पी. वरुन दिलेल्या विद्युत पुरवठयाबाबत इतर कोणत्याही ग्राहकाची तक्रार नाही. सदरचा डि.पी. हा दि.31/12/2011 रोजी नादुरुस्त (फेल) झाला होता तो डी.पी. दुरुस्त करुन दि.27/01/2012 रोजी बसवून चालू केला सदरचा कालावधी हा अल्पसा असल्यामुळे व सदरचे दिवस हे पावसाही असल्यामुळे अर्जदाराचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे नुकसान होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदाराने ऊस कारखान्यास घातल्याबाबत कागदपत्रे दाखल केली नाहीत. विरुध्द पक्षकाराने तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेवून कनिष्ठ अधिकारी यांना अर्जदार म्हणून सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करुन तक्रारदारास दंड करण्यात यावा असे नमूद केले आहे.
5) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
4) मुद्या क्र.1 व 2 चे उत्तर:
तक्रारदार याने त्याला विदयुत पुरवठा होणारा डी.पी.28 दिवस बंद असल्याने त्रुटीयुक्त सेवा पुरवल्याने व झालेल्या अनुषंगीक (थेट) नुकसानीची तक्रार दाखल केली आहे. विपने युक्तिवादात 28 दिवस डी.पी. बंद असल्याचे मान्य केले आहे. तथापि तक्रादार शेतक-या व्यतिरिक्त इतर कोणचीही तक्रार नाही असे निवेदन केले आहे. तथापि दि.19/01/2011 रोजी तक्रारदाराने विप कार्यकारी अभियंता यांच्याकडे सदर डी.पी. बाबत वितृत तक्रार देवून स्पष्टीकरण मागवले असल्याचे दि.02/202/2012 रोजीच्या विप यांच्य पत्रावरुन दिसते मात्र या पत्रावर विप ने काहीही उत्तर दिले नाही अथवा साजेशी कृती केली नाही. अथवा आक्षेपांना उत्तर दिले नाही. यावरुन विप चे वर्तन हे ग्राहकांना दिलेली योग्य सेवा या स्वरुपात बसत नाही व स्वत: ला paid service provider मानतच नाहीत असे दिसते.
तक्रारदाराने सदर डि.पी बाबत रु.40,000/- विप कडे अॅडव्हान्स देवून भरणा केलेला होता म्हणून सदर डी.पी.वरुन तक्रारदार यांना मिळणारा विदयुत पुरवठयाची काळजी घेण्याची जबाबदारी विप यांची होती. मात्र विप यांनी ती घेतलेली दिसुन येत नाही.
तक्रारदाराच्या नुकसानीचे मुल्यांकन न करता विपचा युक्तिवाद विचारात घेता येईल तथापि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पावसाळा असल्याने विपचे नुकसान पाण्या अभावी होणार नाही हा विपचा बचाव हास्यास्पद आहे. ऊस हे जलसिंचीत पिक आहे त्यामुळे त्याचे नुकसान होणे साहजीक आहे. ऊसाच्या बाबतीत पुर्णत: नुकसान झाले नाही तरी 1 महीना पाणी न दिल्याने उत्पन्नात घट होणे अपेक्षीतच आहे.
तथापि प्रस्तुत शेक-याने त्याच्या उत्पन्नाचे / नुकसानीचे कोणतेही पुरावे रेकॉर्डवर दाखल केले नाही. तथापि तक्रारदाराने विपने त्रुटीयुक्त सेवा दिलेली असल्याचे सिध्द केले आहे. म्हणुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या सेवेतील त्रुटीबाबत punitive damage अथवा दंड म्हणुन रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार फक्त द्यावी.
3) सदर आदेशाची पुर्तता विप यांनी करुन तसा अहवाल मा. मंचासमोर 45 दिवसात सादर करावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.