ग्राहक तक्रार क्र. 147/2013
अर्ज दाखल तारीख : 19/10/2013
अर्ज निकाल तारीख: 09/04/2015
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 20 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. मधुकर पि. वामनराव वारगड,
वय - 75 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.वाणे गल्ली, वाशी, ता. वाशी, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कं. लि. उस्मानाबाद,
2. शाखा अभियंता,
म.रा.वि.वि.कं.लि.विभाग
वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.ए.आर.मेटे,
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी याच्या व्दारा
अ) विरुध्द पक्षकार (विप) वीज वितरण कंपनीने अवाजवी व भरमसाठ बिल दिले ते दुरुस्त करुन मिळावे म्हणून तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
1) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे..
तक हा वाशी येथील वयोवृध्द रहीवाशी आहे. त्याला घरगूती वापरासाठी विप यांनी विदयूत कनेक्शन दिले. त्याचा जुना ग्राहक क्र.743 व नवीन 600030146961 असा असून तक हा नियमीतपणे बिलाचा भरणा करत होता. फेब्रूवारी 2012 पर्यत त्याच्याकडे कसल्याही प्रकारची थकबाकी नव्हती. मार्च 2012 मध्ये बिलामध्ये 1 युनिट वापर दाखवला व रु.30 चे बिल दिले ते तक ने भरुन टाकले. अचानकपणे दि.30/04/2012 अखेरच्या महीन्यात बिल रु.230.97 पैसे व थकबाकी रु.17,301.34 पैसे असे एकूण बील रु.17,530/- चे बिल दिले. ते चुकीचे आहे. तक यांनी विप कडे बिल दुरुस्त करुन मागीतले तर विप यांनी वीज तोडण्याची धमकी दिली. शेवटी विज पुरवठा खंडीत करुनसुध्दा तक ला बिलाची मागणी केली. दि.31/08/2013 अखेर रु.22,690/- ची मागणी केली. तक ला त्यामुळे त्रास सहन करावा लागला तसेच वीज पुरवठा बंद झाला. त्यामुळे अवास्तव बिल दुरुस्त करण्याचा आदेश व्हावा तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- देण्याचा आदेश व्हावा. म्हणून ही तक्रार दि.19/10/2013 रोजी दाखल करण्यात आली आहे.
2) तक ने तक्रारी सोबत मार्च 2012 चे बिल ते भरल्याची पावती, एप्रिल 2012 चे बिल, ऑगस्ट 2013 चे बिल, डिसेंबर 2013 चे बिल व ते भरल्याच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) 1) विप यांनी हजर होऊन दि.01/12/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले आहे. त्याप्रमाणे तक हा घरवापरासाठी विजेचा वापर न करता शिवाय इतर वापराकरीता अनधिकृतपणे वीज वापर करत होता. हे निर्शनास आल्यामुळे अनाधीकृत वापराचे बिल रु.17,300.34 देण्यात आले, ते न भरल्यामुळे पुढील बिलात थकबाकी म्हणून दाखलविले आहे. तक ने बिलाची बाकी न भरल्यामुळे विदयूत पुरवठा खंडीत करावा लागला. तक ला वापरलेल्या युनिटचे बिल देण्यात आले होते. विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ पुढील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रामाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
1) तक चे म्हणणे आहे की फेब्रूवारी 2012 पर्यंत त्याच्याकडे कसलेही थकबाकी नव्हती. फेब्रुवारी 2012 चे बिल असे दाखवते की मागील रिडींग 1607 युनिट, चालू रिडींग उपलब्ध नाही, वापर 150 युनिट, चालू बिल 1,013/- रुपये थकबाकी रु.22,471/- एकूण मागणी रु.23,484/- मागील बाकी नव्हती हे तक चे म्हणणे खरे दिसत नाही. जानेवारी 2014 चे बिल असे दाखवते की मागील रिडींग 1607 युनिट, चालू उपलब्ध नाही, वापर 48 युनिट, चालू बिल रु.489/- थकबाकी रु.21,976/- डिसेंबर 2013 चे बिल असे दाखविते की मागील रिडींग 1607 युनिट, चालू 1607 युनिट, वापर 0 युनिट, चालू बिल रु.309, थकबाकी रु.21,666/- दाखवले आहे
2) डिसेंबर 2013 चे बिलावर मागील 12 महिन्यांचा वीज वापर दाखविला तो म्हणजे 0, 0, 48, 0, 0, 48, 0, 0, 0, 0, युनिट. हे उघड आहे की तक चे मिटर बंद होते. त्याचा मंजूर भार 0.20 Kw म्हणजेच 200 वॅट होता. त्यामध्ये 40 वॅटच्या पाच टयूब किंवा 20 वॅटच्या 10 टयूब किंवा बल्ब् पंखे असा वापर मंजूर होता. मात्र मिटर चालत नव्हते व बरीच थकबाकी राहीली होती.
3) विप चे म्हणणे आहे की घर वापराशिवाय इतर वापरासाठी अनधिकृतपणे तक ने वीज वापर केला. अनधिकृत वापराचे रु.17,301/- चे बिल देण्यात आले. विप तर्फे ऑक्टोबर 2010 पासूनचे सी.पी.एल. दाखल केले आहे. वापर दरमहा 50 युनिटच्या आसपास होता. मार्च 2011 मध्ये वीज चोरीच्या असेसमेंट बद्दल रु.17,300/- बिल दाखवले आहे. जुन 2012 पर्यंत मिटर साधारण वीज वापर दाखवत होते त्यानंतर कोणताही वापर मिटर वर दिसला नाही.
4) जे ई वाशीचे ए ई वाशीला दिलेले दि.09/03/2011 चे पत्राप्रमाणे तक ने व्यापारी कराणासांठी 6 महिने रोज 2 तास वीजेचा वापर केला. लोड 2.23 के. डब्लू. वापरला अशा प्रकारे 802.8 युनिट वीजेची चोरी केली. त्याचे असेसमेंट रु.17,300/- चे करण्यात आले व तसे बिल देण्यात आले. तक ची मागणी आहे की अवास्तव व जास्तीचे बिल दुरुस्त होऊन मिळावे मात्र इलेक्ट्रीसीटी अॅक्ट कलम 126 खाली वीज चोरीचे असेसमेंट केली असेल तर ग्राहक मंचास ज्यूरीसडीक्शन राहत नाही हा प्रस्थापीत कायदा आहे त्यामुळे विप ने त्रुटी केली व तक अनूतोषास पात्र असे आमचे मत नाही. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकाराथी देतो व खालीलप्रामाणे आदेश करतो
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते
2) खर्चाबाबत काणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.