निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 05.03.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 18.03.2010 तक्रार निकाल दिनांकः- 07.07.2010 कालावधी 3 महिने 19 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 शेख मिरा पिता शेख सुलतान अर्जदार वय 50 वर्षे धंदा शेती रा.मंगरुळ (बृ) ( अड. व्हि.पी.चौखट ) ता.मानवत जि.परभणी. 2 शेख आसीम पिता शेख मिरा वय 19 वर्षे धंदा शेती रा.मंगरुळ (बृ) ता.मानवत जि.परभणी -- विरुध्द 1 कार्यकारी अभियंता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड ( अड.अतूल पालीमकर ) कार्यालय जिंतूर रोड,परभणी ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती सुजाता जोशी सदस्या ) शॉर्टसर्कीटने जळालेल्या उस फडाची नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळणेसाठी अर्जदाराने प्रस्तूतची तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, दोन्ही अर्जदार हे मौजे मंगरुळ (बृ) ता. मानवत जि.परभणी येथील रहिवासी असून अर्जदार क्रमांक 1 हे अर्जदार क्रमांक 2 चे वडील आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून पाणी पुरवठयासाठी वीज कनेकशन घेतले आहे. अर्जदाराचे गट क्रमांक 250 व 265 मधील शेत एकमेकाना लागून आहेत गट क्रमांक 250 व 260 मधील एल.टी लाइन चे तीन पोल वत्यावरील तारा शेजारच्या शेख खुतुब यांच्या विहीरीवर गेल्या आहेत या तारा ठिक ठिकाणी जोडलेल्या होत्या व त्या तारांना योग्य ताण दिलेला नव्हता. अर्जदाराने गट क्रमांक 250 व 265 मधील शेतात उसाची लागवड 2007 मध्ये केलेली होती व तो उस कापणीस आला होता या शेतावरील विजेच्या तारा एकमेकांना घासून आगीच्या ठिणग्या अर्जदाराच्या उभ्या उसाच्या फडावर पडून दिनांक 25.02.2008 रोजी अर्जदाराचा 4 एकरातील उस लळून खाक झाला व अर्जदाराचे प्रति एकर 30 टन प्रमाणे प्रति टन रुपये 700/- भाव गृहीत धरल्यास दोन्ही अर्जदारांचे प्रत्येकी रुपये 42000/- नुकसान झाले. त्यानंतर अर्जदाराने अर्ज केल्यामुळे मंडल अधिकारी केकर जवळा यानी दिनांक 26.03.2008 रोजी जळीत उसाचा पंचनामा केला तसेच पोलीस स्टेशन मानवत च्या तपास अधिका-यानीही जळीत उसाचा पंचनामा केला कनिष्ठ अभियंता रामपूरी विभाग यानी जळीत उसाचा स्थळ निरीक्षण अहवाल केला. यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारांच्या कार्यालयात जावून जळीत उसाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून कार्यकारी अभियतांना विनंती केली पण आजपर्यत नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदाराने ही दाखल केली व रुपये 84000/- नुकसान भरपाई व दाव्याचा खर्च रुपये 1000/- व मानसिक त्रासापोटी रुपये 1500/- व्याजासह मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 5 लगत गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार, क्राइम डिटेल्स फॉर्म, स्थळनिरीक्षण अहवाल, सात/बारा इत्यादी कागदपत्रे दाखलकेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसपाठविल्यावर नेमलेली दिनांक 17.06.2010 रोजी लेखी म्हणणे (नि.16) सादर केले आहे. लेखी निवेदनामध्ये तक्रार अर्जातील वीजपुरवठा हा व्यापारी कारणासाठी घेतलेला आहे म्हणून सदरील तक्रार या न्यायालयात चालणेस पात्र नाही तसेच अर्जदार क्रमांक 2 च्या नावाचा उल्लेख गट क्रमांक 250 आणि 265 चा 7/12 –यात नाही त्याच्या नावावर जमिनच नाही. गैरअर्जदाराने एल.टी लाईनची व्यवस्थीत काळजी घेतली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे कुठलाही अर्ज केलेला नाही. गेरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही त्रूटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र नि. 17 दाखल केले आहे. अर्जदार व गैरअर्जदारांच्या वकिलांचा युक्तीवाद व तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज ग्राहक मंचात चालणेस पात्र आहे काय ? होय 2 अर्जदाराच्या शेतातील जळालेल्या उस पिकाची नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? या बाबतीत त्यांच्याकडून सेवा त्रूटी झाली आहे काय ? होय 2 अर्जदार किती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 - गैरअर्जदारातर्फे अड उमरीकर यानी तक्रार अर्ज ग्राहक मंचात चालणेस पात्र नाही कारण उसाचे पीक नगदी उत्पन्न देणारे असून विक्री करण्याचे उद्येशाने पीक घेतले असल्याने ग्राहक संरक्षण कायदयाच्या ग्राहक संज्ञेत येत नाही असा आक्षेप घेतला आहे. याबाबतीत जिल्हा मंचाचे मत असे की, उसाचे पीक नगदी उत्पन्न देणारे पीक असले तरी अर्जदारांसारख्या अल्पभुधारक शेतक-याने घेतलेल्या उसाच्या पिकाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे मुख्यतः कौटूंबिक चरीतार्थासाठीच खर्च करत असतो त्यामुळे ते व्यापारी सदरातील किंवा नफा मिळविण्याच्या हेतूने विकले असे म्हणता येणार नाही. मा. राष्ट्रीय आयोगाने रिपोर्टेड केस 1995 (1) सी.पी.जे. पान 45 लक्ष्मी अग्रो सीडस विरुध्द धूपसिंग या प्रकरणात आणि अशाच प्रकारच्या अनेक प्रकरणात राज्य आयोग यानीही याबाबत वरीलप्रमाणेच मत व्यक्त केले आहे तमुळे गैरअर्जदारांचा आक्षेप ग्राहय धरता येणार नाही म्हणून मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. मुद्या क्रमांक 2 व 3 - अर्जदाराच्या मंगरुळ (बु) ता.मानवत जि. परभणी गट क्रमांक 250 व 265 मधील शेतीसाठी गैरअर्जदाराकडून विद्युत कनेकशन घेतले आहे ही बाब सर्वमान्य आहे. दिनांक 25.02.2008 रोजी दुपारी 12 वाजता अर्जदाराच्या शेतावरील ढिल्या असलेल्या विजेच्या तारा एकमेकांवर घासून आगीच्या ठिणग्या अर्जदारांच्या उभ्या उसाच्या फडातील वाळलेल्या पाचोळयावर पडून अर्जदारांचा 4 एकरातील उस जळून खाक झाला ही वस्तूस्थिती सिध्द करण्यासाठी पुराव्यात नि. 5/5 वरील पोलीसानी पंचासमक्ष केलेल्या गुन्हयाच्या तपशीलाचा नमुना दाखल केला आहे तसेच नि. 5/7 वरील गैरअर्जदारानी केलेला स्थळनिरीक्षण अहवाल दाखल केला आहे तसेच नि. 12/1 वरील तहसील कार्यालय मानवत नी केलेला पंचनामा अर्जदाराने दाखल केलेला आहे त्यातही अर्जदारांचे गट क्रमांक 250 मधील 80 आर व गट क्रमांक 265 मधील 80 आर उस जळालेल्या अवस्थेत दिसून आला असा उल्लेख आहे. अर्जदार क्रमांक 1 व अर्जदार क्रमांक 2 यांची नावे नि.5/8 व नि.5/9 वरील सात बाराच्या उता-यावर आहेत. अर्जदाराने सदरची घटना घडल्यानंतर गैरअर्जदारास व तहसीलदार मानवत याना लेखी अर्ज देवून झालेल्या नुकसानाचा पंचनामा करावा अशी लेखी विनंती केली हे पुराव्यातील नि. 5/3 वरील अर्जावरुन सिध्द होते त्यावर गैरअर्जदाराच्या कार्यालयाची सही व शिक्का आहे म्हणजेच घटनेची माहिती गैरअर्जदारास होती हे स्पष्ट दिसते. त्यानंतर गैरअर्जदाराने काहीही कारवाई न केल्यामुळेच अर्जदाराला कायदेशीर दाद मिळणेसाठी प्रस्तूतची तक्रार करणे भाग पडले आहे हे अर्जातून अर्जदाराने केलेले कथन खोटे मानता येणार नाही. आपल्या चुकीमुळे व निष्काळजीपणामुळे शेतक-यांच्या पिकाचे नुकसान झाले हे माहीत असतानाही नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत गैरअर्जदाराने दुर्लक्ष करुन अर्जदारावर अन्याय करुन सेवा त्रूटी केली आहे. अशाच प्रकारच्या प्रकरणातील रिपोर्टेड केस 2002(2) सी.पी.आर. पान 61 ( राष्ट्रीय आयोग दिल्ली ) मध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, Failure of electricity Board to set electric wire in proper position which were hanging loose and due to sparking caused damage to crop of complainant who was also consumer of electricity’ was deficiency in service on part of Electricity Board. प्रस्तूत तक्रारीलाही हे मत लागू पडते. अर्जदाराने तक्रार अर्जातून 4 एकरातील एकूण 120 टन उसाची नुकसान भरपाई प्रती टन रुपये 700/- प्रमाणे एकूण रुपये 84000/- मागितले आहेत. परंतू साखर कारखान्याकडून किमान दर रुपये 600/- प्रतिटन दिला जातो या हिशोबाने अर्जदारास 30 x 40 = 120 टन 120 टन x 600 = 72000/- रुपये नुकसान भरपाई मिळणे न्यायोचीत होइल असे आम्हास वाटते म्हणून अर्जदाराला रुपये 72000/- ची नुकसान भरपाई मंजूर करीत आहोत सबब मुद्या क्रमांक 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. . आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येतो. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखेपासून 30 दिवसाचे असत अर्जदारास रुपये 72000/- अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे 9 % दराने व्याजासह नुकसान भरपाई द्यावी. 3 या खेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 1000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- अर्जदारास आदेश मुदतीत रोख द्यावा. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |