निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 23.10.2009 तक्रार नोदणी दिनांकः- 23.10.2009 तक्रार निकाल दिनांकः- 20.04.2010 कालावधी 5 महिने 27दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. किरण पिता कुंडलिक सवलगे अर्जदार वय 30 वर्षे धंदा खाजगी व्यवसाय रा.घर क्रमांक 1/239, ( अड शिरीष वेलणकर ) मित्र आदर्शनगर सेलू ता.सेलू, जि. परभणी. -- विरुध्द 1 कार्यकारी अभियंता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड, ( अड अतूल पालीमकर ) विभागीय कार्यालय परभणी विभाग, विद्युत भवन जिंतूर रोड,परभणी. 2 सहायक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड, उप विभाग सेलू ता.सेलू, जिल्हा परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती सुजाता जोशी, सदस्या ) अर्जदाराचा विद्युत पुरवठा विनाकारण खंडीत करुन गैरअर्जदाराने अर्जदारास त्रूटीची सेवा दिल्याबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा सेलू येथील रहिवासी असून कुटूंबीया समवेत किरायाच्या घरात राहातो. घरमालकाने त्याला स्वतंत्र वीजपुरवठा दिलेला आहे. या विद्युत प्रवाहाच्या देयकाबद्यल कुठलाही वाद नाही तरी सुध्दा गैरअर्जदारानी एन दिवाळीत अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केला. अर्जदार हा सेलू येथील घर क्रमांक 1/239 आदर्शनगर येथे गेल्या 15 वर्षापासून राहातो त्याचा ग्राहक क्रमांक 532530013229 व मिटर क्रमांक 9000448096 आहे. अर्जदाराने घर सोडावे म्हणून घराच्या मालकानी त्याच्या विरुध्द सेलू येथील दिवाणी न्यायालयात दिनांक 18.03.2009 रोजी एक दिवाणी दावा आर.सी.एस. 22/09 दाखल केला जो अजूनही प्रलंबित आहे. अर्जदारास त्रास देण्याच्या हेतूने घर मालकाने दिनांक 14.09.2009 रोजी गैरअर्जदाराकडे अर्ज देवून अर्जदाराच्या घरातील विद्युत पुरवठा आता नको आहे व हा विद्युत प्रवाह खंडीत करावा अशी मागणी केली. गैरअर्जदारानी कोणतीही चौकशी न करता ऐन दिवाळीत अर्जदाराच्या विज पुरवठा खंडीत केला व अर्जदारास त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली व अर्जदाराचा विद्युत पुरवठा पुन्हा खंडीत करु नये अशी मागणी केली व मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2500/- अर्जदारास मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) व पुराव्यातील कागदपत्रात (नि. 6) लगत विद्युत देयके , आर.सी.एस. 22/09 ची प्रत गैरअर्जदाराकडे घरमालकाने दिलेला अर्ज इत्यादी कागदपत्रे दाखलकेली आहेत. गैरअर्जदाराने लेखी जबाबात अर्जदार हा त्याचा ग्राहकच नाही कारण तक्रारीतील मिटर हे सौ.कुसूम भास्करराव दिवाकर यांच्या नावावर आहे म्हणून अर्जदार ही तक्रार दाखलच करु शकत नाही. कुसूम भास्करराव दिवाकर हिने गैरअर्जदाराकडे सदरील मिटरचा विद्युत पुरवठा खंडीत करावा असा अर्ज केला म्हणून गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा खंडीत केला कुसूम दिवाकर व अर्जदारामध्ये दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना विद्यमान न्यायमंचास हि तक्रार चालवण्याचा अधिकार नाही. अर्जदारास गैरअर्जदाराने कोणतीही त्रूटीची सेवा दिलेली नाही म्हणून ही तक्रार खर्चासहीत फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र जोडले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलाच्या युक्तिवादावरुन तकारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 सदरील तक्रार या न्यायमंचात चालू शकते काय ? होय 2 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिली आहे काय ? नाही. 3 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे. ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहकच नाही त्यामुळे तो ही तक्रार दाख्ंलच करु शकत नाही असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदाराने तक्रारीत तो घर क्रमांक 1/239 मध्ये आई-वडील व इतर कुटूंबियांसोबत राहतो असे म्हटलेले आहे व तो या गाहक क्रमांक 532530013229 मिटर क्रमांक 9000448096 चा उपभोक्ता म्हणून वापर करतो असे म्हटलेले आहे. अर्जदाराने तक्रारीत नि. 6/1 ते 6/4 वर या मिटरची विद्युत देयके दाखल केलेली आहेत. अर्जदार व त्याचे कुटूंबिय घर क्रमांक 1/239 मध्ये राहतात हे नि. 6/5 वर दाखल असलेल्या आर.सी.एस. क्रमांक 22/2009 वरुन सिध्द होते. सेलूच्या दिवाणी न्यायालयात अर्जदाराच्या वडीलांविरुध्द सौ.कुसूम भास्करराव दिवाकर यानी घर रिकामे करुन देण्याबाबत दावा दाखल केलेला आहे व त्यात अर्जदाराचे वडील या घरात राहातात असे म्हटलेले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, सेलूच्या दिवाणी न्यायालयात आर.सी.एस. क्रमांक 22/2009 हा दावा प्रलंबित असताना अर्जदार या न्यायमंचात गैरअर्जदाराविरुध्द त्रूटीच्या सेवेची तक्रार दाखल करु शकणार नाही. वास्तविक पहाता आर.सी.एस. क्रमांक 22/2009 चा दावा व सदरील तक्रारीचे विषय वेगळे आहेत. सेलू दिवाणी न्यायालयातील आर.सी.एस. क्रमांक 22/2009 हा “ Recovery of possession by way of eviction of the house “ बद्यल आहे तर सदरील तक्रार अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याबद्यलची आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार या न्यायमंचात चालण्यास बाधा येत नाही. अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेली विद्युत देयके व नि. 6/5 वरील सेलू येथील दिवाणी न्यायालयात दाखल आर.सी.एस. क्रमांक 22/2009 याचा परस्पर संबंध पहाता अर्जदार हा ग्राहक क्रमांक 522530013229 मिटर क्रमांक 9000448096 चा उपभोक्त आहे असे सिध्द होते. अर्जदाराच्या घरमालकांनी नि. 6/6 वरील अर्ज गैरअर्जदाराकडे अर्थिक अडचणीमुळे व प्रकृती अस्वास्थामुळे मिटर क्रमांक 9000448096 ची विद्युत देयक भरण्यास असमर्थ आहे म्हणून विद्युत पुरवठा खंडीत करावा असे म्हटले आहे. बाकी दुसरे कुठलेही कारण दिलेले नाही गैरअर्जदारानी या अर्जावरुनच अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे अर्जदाराच्या घरमालकांच्या अर्जावरुनचे गेरअर्जदारानी मिटर क्रमांक 9000448096 चा विद्युत पुरवठा खंडीत केलेला असल्यामुळे गैरअर्जदारानी अर्जदारास त्रूटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटत नाही मात्र अर्जदार उपभोक्त असलेल्या मिटर क्रमांक 9000448096 चा विद्युत पुरवठा सेलू दिवाणी न्यायालयातील आर.सी.एस. क्रमांक 22/2009 चा अंतिम निर्णय होइपर्यंत खंडीत करु नये असे आम्हास वाटते म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 ग्राहक क्रमांक 532530013229 मिटर क्रमांक 9000448096 चा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येवू नये. 3 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष मा. दोन सदस्यानी दिलेल्या निकालपत्रातील आदेश क्रमांक 2 शी मी सहमत नाही माझया मते निकाल पत्रातील आदेश क्रमांक 2 Subject to condition असावयास हवा होता तसा तो देण्यात आला नसल्यामुळे त्याला Prepetual injunction चे स्वरुप प्राप्त झाले आहे व मंचास तसा आदेश देता येणार नाही. सदर प्रकरणाचा मानवीय द्रष्टीकोनातून विचार करुन मी आदेश क्रमांक 2 पारीत करीत आहे. आदेश क्रमांक 2 ः- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 532530013229 व मिटर क्रमांक 9000448096 चा विज पुरवठा थकबाकी व्यतिरीक्त इतर कोणत्याही कारणास्तव सेलू दिवाणी न्यायालयातील आर.सी.एस. क्रमांक 22/2009 चा अंतिम निर्णय होइपर्यत खंडीत करु नये. सौ. अनिता ओस्तवाल सदस्या
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |