निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 17/10/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 18/10/2011 तक्रार निकाल दिनांकः- 03/02/2012 कालावधी 03 महिने.16 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. साधना भ्र.आसाराम पाटील. अर्जदार वय 40 वर्ष.धंदा.- नौकरी. अड.साहेबराव अडकिणे. रा.अमेय कॉलनी,परभणी.ता.जि.परभणी विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. महा.राज्य विद्युत वितरण कं मर्या.जिंतूर रोड. परभणी.ता.जि.परभणी. 2 उप अभियंता. महा.राज्य विद्युत वितरण कं.मर्या.जिंतूर रोड. परभणी ता.जि.परभणी.(शहरी ) ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष.) अवास्तव व चुकीचे विज बिला बद्दल प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने ग्राहक क्रमांक 530010467151 अन्वये गैरअर्जदाराकडून 10 वर्षांपूर्वी घरगुती वापराचे विज कनेक्शन घेतले आहे. दरमहाची नियमित बीले त्यांने भरीत आला आहे.माहे मार्च 2010 चे बील अचानक 1382 युनिटचे रु.10,370/- चे दिले. त्यावर मिटर फॉल्टी असा शेरा आहे. त्या बीलाबाबत गैरअर्जदाराकडे तक्रार केली असता गैरअर्जदाराने बील भरले नाही तर विज पुरवठा खंडीत केला जाईल अशी धमकी दिली अर्जदाराने त्यानंतर 06/07/2010 रोजी गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार देवुन चुकीचे बिल दुरुस्त करुन मागणीची विनंती केली, परंतु त्याबाबत कसलीही कार्यवाही केली नाही.उलट पुन्हा तारीख 26/11/2010 चे बिल मागील थकबाकीसह रु.21,990/- चे बील दिले. त्याबाबतही तक्रार केली असता बिलापोटी रु.6,000/- भरुन घेवुन मिटर बदलून देतो असे सांगीतले. अर्जदाराने रु. 6,000/- भरल्यानंतर 09/01/2011 रोजी नवीन मिटर बदलून दिला. मिटर बदलल्यानंतर देखील पुन्हा मागील थकबाकीसह देयके दिली मार्च 2011 चे रु.22,490/- चे बील दिले.त्याबाबतची तक्रार केली असता 2,000/- रु. भरा नाहीतर विज पुरवठा खंडीत करण्याची पुन्हा धमकी दिली.अशा रितीने चुकीचे बिले देवुन गैरअर्जदाराने मानसिकत्रास दिला आहे. म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन तारीख 27/09/2011 चे देयक रद्द करण्यात यावे, आणि 22/07/2011 ते 27/09/2011 च्या देयकामध्ये दुरुस्ती करण्याचे गैरअर्जदाराना आदेश व्हावेत, मानसिकत्रासापोटी रु.5,000/- मिळावे अशी शेवटी मागणी केली. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र, (नि.2) आणि नि.8 लगत माहे फेब्रुवारी 2010 ते नोव्हेंबर 2011 पर्यंतच्या बिलांच्या मुळप्रती, पैसे भरलेल्या पावत्या , मिटर बदली अहवाल,वगैरे 18 कागदपत्रे दाखल केली आहेत. अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसा रजि.पो.ने पाठविलेल्या होत्या, त्या स्विकारुनही नेमल्या तारखेस हजर होवुन त्यांनी आपले लेखी म्हणणे न सादर केल्यामुळे व संधी देवुनही गैरहजर राहिल्याने तारीख 07/01/2012 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. व सुनावणीच्या नेमले तारखेस अर्जदाराचा युक्तिवाद ऐकून प्रकरण अंतिम निकालासाठी ठेवण्यात आले. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारानी अर्जदारास चुकीची व अवास्तव रक्कमेची बिले देवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब अथवा सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घरगुती वापवराचे ग्राहक क्रमांक 530010467151 विज कनेक्शन घेतलेले आहे हे पुराव्यात (नि.8) लगत दाखल केलेल्या विद्युत बिलातील नोंदीवरुन लक्षात येते.नि.8/1 वरील विज बिल माहे डिसेंबर 2010 चे असून त्याचे अवलोकन केले असता सदरचे बिलात चालु रिडींगच्या ठिकाणी फॉल्टी व मागील रिडींगच्या ठिकाणी 4963 नोंद करुन 87 युनिटचे बील दिल्याचे दिसते. बिलावर फेब्रुवारी 2009 ते डिसेंबर 2009 अखेरच्या मागिल बिलाच्याही नोंदी देखील 87 युनिट प्रमाणेच आकारणी केली असल्याचे दिसते.एवढेच नव्हेतर त्या पुढील माहे जानेवारी 2010 च्या बिलात मार्च 2009 ते जानेवारी 2010 अखेरच्या मागील विज वापरातील नोंदीमध्ये 87 यूनिटचीच बिले दिलेली दिसतात.तक्रार अर्जात नमुद केलेले माहे मार्च 2010 चे वादग्रस्त बील देयक तारीख 09/04/2010 मध्ये चालू रिडींग “ RNA ” व मागील रिडींग 6345 दाखवुन 281 युनिट विज वापराची आकारणी करुन मागील थकबाकीसह एकुण 11,560/- रु.चे बील दिल्याचे दिसते. फेब्रुवारी 2009 पासून फेब्रुवारी 2010 अखेर चालू व मागील रिडींग घेतले नसतांना मार्च 2010 च्या वादग्रस्त बिलात 281 युनिटची आकारणी कशी काय केली ? हा प्रश्न पडतो.त्यानंतरचे एप्रिल 2010 पासून नोंव्हेबर 2010 पर्यंत दिलेली बिले (नि.8/5 ते 8/10 ) देखील 281 स्थीर युनिटचीच देवुन मागील थकबाकी ओढून फेब्रुवारी 2011 चे वादग्रस्त बील (नि.8/13) 281 युनिटचे मागील थकबाकीसह रु.22,490/- चे दिलेले आहे. अर्जदारास दिलेले वर नमुद केलेल्या सर्व बिले रिडींग अभावीच मनमानी पध्दतीने दिलेले असल्याचे स्पष्ट दिसते. अर्जदाराच्या घरातील जुने मीटर तारीख 09/1/2011 रोजी बदलून नवीन मिटर बसवलेल्याचा मिटर बदली अहवाल ( नि.18/12 ) वर दाखल केलेला आहे.मिटर बदलल्या नंतर देखील फेब्रुवारी 2011 चे बीलात नवीन मिटरचे चालू रिडींग 1 असतांना फेब्रुवारीचे बीलात मागील रिंडींग 1 ऐवजी 6345 दाखविलेले आहे व 6345 चालू रिडींग 114 अशी नोंद करुन पुन्हा पूर्वी प्रमाणे मागील थकबाकीचे बिल दिल्याचे दिसते. ते ही चुकीच्या रिडींगचे असल्याचेच प्रथमदर्शनी लक्षात येते.त्यानंतरचीही पुराव्यात दाखल केलेले जुन 2011 चे बील वरील प्रमाणेच 281 युनिटचे दिलेले दिसते.नि.8/17 व नि.8/18 वरील माहे ऑगस्ट 2011 व सप्टेंबर 2011 चे बिलाचे अवलोकन केले असता चालू रिडींग व मागील रिडींगची नोंद चुकीचीच असल्याचे लक्षात येते. अर्जदारास सुरवातीला मार्च 2010 मध्ये दिलेले वादग्रंस्त बील रु.11,560/- चे चुकीच्या रिडींगचे असल्यामुळे त्याबाबत तक्रार केल्यानंतरही गैरअर्जदाराने त्याची दुरुस्ती न करता मनमानी पध्दतीने अर्जदाराकडून एकदा रु.6,000/- पुन्हा रु.2,000/- भरुन घेवुन मागील थकबाकी पुढे ओढत नेवुन शेवटच्या तारीख 27/09/2011 च्या देयका पर्यंत (नि.8/18) थकबाकी ओढून चुकीचे बील दिले असल्यामुळे ते निश्चितपणे रद्द होण्यास पात्र आहे.अर्जदाराने या संबंधी ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल केल्यानंतर मंचाची नोटीस स्वीकारुनही गैरअर्जदारांनी नेमले तारखेस मंचापुढे हजर राहून तक्रार अर्जावर आपला लेखी खुलासा न देता आजपर्यंत गप्प राहिले व प्रकरणात गैरहजर राहिले यावरुन अर्जदाराची तक्रार त्यांना एक प्रकारे मान्यच आहे असे. मानावे लागेल.गैरअर्जदारांनी अर्जदारास चुकीची व अवास्तव रक्कमेची बिले देवुन त्याच्यावर अन्याय केलेला आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवात्रुटी केलेली असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले वादग्रस्त तारीख 27/09/2011 चे देयक रद्द करण्यात येत आहे.त्या ऐवजी अर्जदाराच्या घरातील नवीन मिटरवर एक महिन्याचे प्रत्यक्ष रिडींग घेवुन एक महिन्यात होणा-या विज वापरा प्रमाणे माहे जुन 2011 ते सप्टेंबर 2011 ची बिले त्यानुसार आकारणी करुन दुरुस्त बिले आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास द्यावीत.या कालावधीत अर्जदाराने जर काही जादा रक्कम भरली असेल तर ती त्याला परत करावी अगर जादा रक्कम पुढिल बिलात समायोजित करावीत. 3 याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.2,000/- व अर्जाचा खर्च रु. 1,000/- आदेश मुदतीत द्यावा.अगर ती नुकसान भरपाईची रक्कम येणा-या पुढील बिलात समायोजित करावी. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |