निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18.08.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 20.08.2010 तक्रार निकाल दिनांकः- 01.01.2011 कालावधी 4महिने11 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 कारभारी पिता विश्वनाथराव निरस अर्जदार वय 46 वर्षे धंदा शेती रा.पडेगाव, अड.कुलदिप टेंगसे ता.गंगाखेड जि.परभणी 2 कालीदास पिता विश्वनाथराव निरस वय 41 वर्षे धंदा शेती रा.पडेगाव, ता.गंगाखेड जि.परभणी विरुध्द 1 मुख्य कार्यकारी अभियता गैरअर्जदार महावितरण जिंतूर रोड, नुतन कॉलजेच्या शेजारी, एम.एस.ई.बी.आफीस परभणी ता.जि.परभणी. 2 मा.कनिष्ठ अभियंता आर 2 ग्रामीण महावितरण सबस्टेशनच्या बाजूस, परळी नाका गंगाखेड ता.गंगाखेड जि.परभणी. 3 सहायक अभियंता महावितरण अड तांदळे यांचे घर वकील कॉलनी, गंगाखेड ता.गंगाखेड जि. परभणी. 4 कनिष्ट अभियंता आर 03 सबस्टेशनचे बाजूस तामसेकर कॉम्पलेकस, परळी नाका गंगाखेड ता.गंगाखेड, जि.परभणी कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्य ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) गैरअर्जदाराच्या डि.पी च्या शॉर्ट सर्कीटमुळे अर्जदाराच्या उसाला लागलेल्या आगीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळणेसाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे पडेगांव ता. गंगाखेड येथील रहीवासी असून शेती हा त्याचा व्यवसाय आहे. गट क्रमांक 67/1 व गट क्रमांक 69 या जवळजवळ असणा-या शेत जमिनीत 12 एकरात डिसेंबर 2008 मध्ये 671 या जातीच्या उसाची लागवड केली. या उच्च प्रतीच्या उसाची चांगली वाढ झाल्यानंतर उस कारखान्याकडे पाठवण्यासाठी कारखान्याकडून गाडीचीही मागणी केली परंतू तत्पूर्वी दिनांक 15.02.2010 रोजी डी.पी.वर स्पार्कींग होवून अर्जदाराचा 8 एकरातील उस पूर्णतः जळून गेला व अर्जदाराचे नऊ लाखाचे नुकसान झाले. या नुकसानाचे तहसिल कार्यालय गंगाखेड मार्फत मंडळ अधिका-याने येवून पंचनामा केला. अर्जदाराने सहायक अभियंता गंगाखेड यांचेकडे तक्रार अर्ज व नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज सादर करुन ही गैरअर्जदारानी कोणतीही नुकसान भरपाई अर्जदारास दिलेली नाही म्हणून रजिस्टर पोस्टाने दिनांक 15.03.2010 रोजी गैरअर्जदाराना नोटीस पाठवली व दिनांक 06.08.2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराना त्यांच्या कार्यालयात जावून नुकसान भरपाई देण्याची विनंती केली असता गैरअर्जदारानी नुकसान भरपाई देण्यास स्पष्ट नकार दिला म्हणून अर्जदारानी ही तक्रार दाखल केली आहे व उसाच्या पिकाची नुकसान भरपाई रुपये 900000/- द.सा.द.शे 9 % व्याजदराने मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदारांची शपथपत्रे ( नि.2) तहसीलदार, पोलीस स्टेशन गंगाखेड, एम.एस.ई.बी. यांना दिलेले अर्ज, पंचनामा विद्युत देयके , 7/12 वकिलामार्फत गैरअर्जदारास दिलेली नोटीस, वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत . तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास वेळोवेळी संधी देवूनही त्याना त्यांचा लेखी जबाब दाखल केला नाही म्हणून दिनांक 15.11.2010 रोजी त्यांच्याविरुध्द तक्रार “ Without say ” चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला व दिनांक 30.11.2010 रोजी अर्जदारानी त्याचा लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारीत दाखल कागदपत्र व अर्जदाराच्या वकिलांचा युक्तिवादावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. . मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदारानी अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे काय ? नाही 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत हे सिध्द करण्यासाठी नि.5/7 व नि. 5/8 वर अर्जदारानी विद्युत देयके दाखल केलेली आहेत जी दिनांक 24.10.2008 ( नि.5/7 बी ) व दिनांक 24.04.2009 ( नि.5/8) ची आहेत. घटना घडली त्या काळातील एकही विद्युत देयक तक्रारीत नाही. अर्जदारानी तक्रारीतील उसजळीताची घटना घडण्यापूर्वी गैरअर्जदारांकडे ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी तोंडी विनंती केली असल्यामुळे त्याबाबतही पुरावा तक्रारीत दाखल नाही. तसेच नि. 5/12 अ व नि. 5/12 बी वर दाखल पंचनामा जो मंडळ अधिका-यानी केलेला आहे त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर नेमका कुठल्या गट नंबर मध्ये आहे व त्याची नेमकी जागा कुठे आहे याबाबत काहीही उललेख नाही. अर्जदारानी तक्रार दाखल करताना अर्जदारांचा ऊस हा ट्रान्सफॉर्मच्या स्पर्कींगमुळे जळाला याचा कोणताही ठोस पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. अर्जदाराचा ऊस हा गैरअर्जदाराच्या त्रूटीच्या सेवेमुळे जळाला याबाबत कोणताही ठोसपुरावा तक्रारीत दाखल नसल्यामुहे गैरअर्जदारानी अर्जदारास त्रूटीची सेवा दिली असे आम्हास वाटत नाही. मा. राज्य आयोग, मुंबई यानी अपिल नंबर 1426/2008 MSEB V/s Dnyandeo Waghchavare and other व अपील क्रमांक 1423/2008 MSEB V/s Kristinadev Waghchavare and other मध्ये व्यकत केलेले मत “ Respondents have placed on record the panchanama of Talathi of village Bhambewavi that does not mean that it should be accepted. It does not prove deficiency in service on the part of appellant Sugarcane crops of the respondents got fire due to sparking from the transformer. It is not a direct cause. It is a proximate cause. Therefore respondents are not entitled for damage, loss or compensation. Fire to the sugarcane crop is an accident. It cannot be called as deficiency in service. Moreover respondents have failed to place on record documentary evidence with regard to fire due to sparking . It is purely on accident and accident is nothing to do with the deficiency in service”. मा. राज्य आयोग, मुंबई यांचे मत सदील तक्रारीस तंतोतंत लागू पडते म्हणून आम्हीखालीलप्रमाणेआदेशदेत आहोत. आदेश 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गेरअर्जदारानी आपआपला सोसावा. 3 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |