Maharashtra

Jalna

CC/13/2013

Vatsala Pralhad Tayade - Complainant(s)

Versus

Executive Engineer,MSEDCL - Opp.Party(s)

Vipul Deshpande

23 Dec 2013

ORDER

 
CC NO. 13 Of 2013
 
1. Vatsala Pralhad Tayade
R/O. Tulsai,Jaideep Nagar,Ambad Road,Jalna.
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer,MSEDCL
Mastgad,Jalna.
Jalna
Maharashtra
2. 2) Deputy Exeecutive Engineer,MSEDCL,Urban Sub Div.
Jalna
Jalna
Maharashtra
3. 2) Deputy Exeecutive Engineer,MSEDCL,Urban Sub Div.
Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:Vipul Deshpande, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(घोषित दि. 23.12.2013 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्‍या)

 

अर्जदार हे वीज महावितरण कंपनीचे ग्राहक आहेत. गैरअर्जदार यांनी नियमितपणे घरपोहच वीज बिले दिले नाहीत. याबाबत केलेल्‍या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्‍यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारी नुसार त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्‍यांचा ग्राहक क्रमांक 510030507744 असा आहे. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार गैरअर्जदार यांनी घरपोहच वीज बिल देणे वीज कायदा 2003 मधील तरतुदी नुसार त्‍यांच्‍यावर बंधनकारक आहे. गैरअर्जदार घरपोहच वीज बिल देत नसल्‍यामुळे त्‍यांना वेळोवेळी गैरअर्जदार यांच्‍या कार्यालयात जाऊन वीज बिल घेऊन नंतर त्‍याचा भरणा करावा लागत असे. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदार यांच्‍याकडे दिनांक 15.10.2011 व 29.05.2012 रोजी तक्रार दाखल केली. पण त्‍याची दखल घेण्‍यात आली नाही. अर्जदाराने दिनांक 10.10.2012 रोजी गैरअर्जदार यांच्‍याकडे तक्रार दाखल केल्‍यानंतर त्‍यांच्‍या मीटरची स्‍थळ पाहणी करण्‍यात आली तेंव्‍हा वीज बिलावर डी.टी.सी नंबर चुकीचा टाकण्‍यात आल्‍यामुळे वीज बिल घरपोहच मिळत नसल्‍याचे स्‍पष्‍टीकरण गैरअर्जदार यांच्‍या प्रतिनिधी कडून देण्‍यात आले. गैरअर्जदार यांच्‍या या सेवेतील त्रुटीमुळे त्‍यांचे आर्थिक नुकसान झाले असून मानसिक त्रास सहन करावा लागला. त्‍यामुळे अर्जदाराने मंचात सदरील तक्रार दाखल केली असून गैरअर्जदार यांना घरपोहच वीज बिल देण्‍याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार वीज कंपनीस दिलले अर्ज, मीटर पाहणी अहवाल इत्‍यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबानुसार अर्जदारास देण्‍यात आलेल्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्‍याचे म्‍हटले आहे. वीज बिलावर डी.टी.सी नंबर टाकण्‍यात झालेली तांत्रिक चूक त्‍वरीत दुरुस्‍त करुन देण्‍यात आली. त्‍यामुळे अर्जदाराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अर्जदाराने वीज बिलाची रक्‍कम न भरता वीज पुरवठा सुरळीत रहावा या उद्देशाने तक्रार दाखल केली असून ती रद्द करण्‍याची विनंती गैरअर्जदार यांनी मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत अर्जदाराचे सी.पी.एल दाखल केले आहे.
अर्जदार व गैअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन तसेच मंचा समोर झालेल्‍या सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे व त्‍यांचा ग्राहक क्रमांक 510030507744 असा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जानेवारी 2012 ते जानेवारी 2013 या कालावधीचे सी.पी.एल मंचात दाखल केले आहे. या सी.पी.एल चे निरीक्षण केल्‍यावर असे दिसून येते की, गैरअर्जदार यांनी मार्च 2012 पर्यंत अर्जदाराच्‍या मीटरवरील वीज वापराच्‍या नोंदी घेतल्‍या आहेत. परंतु एप्रिल 2012 ते जानेवारी 2013 या कालावधीत मीटरचे रिडींग न घेता INACCE असे दर्शवून अर्जदारास सरासरीवर आधारीत 105 युनिट वीज वापराचे बिल आकारले आहे. या कालावधीत मीटरवर चालू रिडींग व मागिल रिडींग 1363 व 1363 असे दाखविण्‍यात आलेले आहे. यावरुन गैरअर्जदार यांनी मीटरचे वाचन न करताच अर्जदारास सरासरीवर आधारीत वीज बिल दिले असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. अर्जदाराने दिनांक 15.10.2011, 21.05.2012 व 10.10.2012 रोजी या बाबत गैरअर्जदार यांच्‍याकडे तक्रार केली असल्‍याचे तक्रारी सोबत जोडलेल्‍या तक्रार अर्जावरुन दिसून येते.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या जवाबानंतर अर्जदाराने दिनांक 26.03.2013 रोजी मंचात शपथपत्र दाखल केले असून त्‍यांनी गैरअर्जदार हे मीटर रिडींग न घेता वीज बिल आकारणी करीत असल्‍याचे म्‍हटले आहे. या सरासरीवर आधारीत देण्‍यात आलेल्‍या वीज बिलाच्‍या वसुलीपोटी वीज पुरवठा खंडीत करण्‍याची नोटीस गैरअर्जदार यांनी दिली असल्‍याचे अर्जदाराने शपथपत्रात म्‍हटले आहे.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास मीटर रिडींग न घेता वीज बिल आकारणी केली व घरपोहच वीज बिले मिळाली नसल्‍याची तक्रार योग्‍य असल्‍याचे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांची ही कृती सेवेतील त्रुटी मानण्‍यात येते.

आदेश

1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेली सरासरीवर आधारीत वीज बिले रद्द करण्‍यात येत आहे.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या मीटर वरील वीज वापराची नोंद घेऊन त्‍यांना 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे व त्‍यामध्‍ये व्‍याज व दंड आकारु नये.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी बद्दल रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) व खर्चा बद्दल रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्‍त) 30 दिवसात द्यावे.
 

 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.