Maharashtra

Jalna

CC/50/2014

Jyoti Ramesh Sonawane - Complainant(s)

Versus

Executive Engineer,MSEDCL - Opp.Party(s)

S.B.Bhalerao

12 Jan 2015

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/50/2014
 
1. Jyoti Ramesh Sonawane
R/o Satkar Nagar ,Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer,MSEDCL
R/o Mastgad,Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Adv.G.R.Kad
 
ORDER

(घोषित दि. 12.01.2015 व्‍दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्‍या)

 

अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून त्‍यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वाढीव वीज बिल दिले असता अर्जदाराने केलेल्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात न आल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.

      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. मे 2013 मध्‍ये गैरअर्जदार यांनी 899 युनिट वीज वापराचे 38,370/- रुपयाचे वीज बिल आकारले. सदरील वीज बिल हे चुकीचे व अवास्‍तव असल्‍यामुळे त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे तक्रार केली. परंतु गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या तक्रारीची दाखल न घेता वाढीव वीज बिल आकरणी करणे सुरु ठेवले. अर्जदाराने या वाढीव वीज बिलापोटी दिनांक 31.05.2014 रोजी 6,000/- रुपयाचा भरणा केला आहे. अर्जदाराने त्‍यांना देण्‍यात आलेले वाढीव वीज बिल रद्द करावे व सरासरी प्रमाणे वीज बिल भरण्‍याची तयारी असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. अर्जदाराने मानसिक त्रासाबद्दल रुपये 25,000/- व खर्चाबद्दल रुपये 5,000/- ची मागणी केली आहे.

      अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्‍या प्रती, गैरअर्जदार यांच्‍याकडे केलेल्‍या तक्रारीची प्रत मंचात दाखल केली आहे.

      गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या जवाबानुसार अर्जदारास मीटर वरील रिडींग प्रमाणे व त्‍यांच्‍या वापराप्रमाणे वीज बिल देण्‍यात आले असून ते योग्‍य आहे. अर्जदाराच्‍या मागणी प्रमाणे त्‍यांना प्रोव्हिजनल बिल देण्‍यात आले आहे. अर्जदाराचे मीटर देखील चाचणी केल्‍यानंतर योग्‍य रीतीने वीज वापराची नोंद घेत असल्‍याचे दिसून आले. अर्जदारास देण्‍यात आलेल्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नसून अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍याची विनंती मंचास केली आहे.

      गैरअर्जदार यांनी मीटर चाचणी अहवाल व अर्जदाराचे जानेवारी 2012 ते ऑगस्‍ट 2014 या कालावधीचे सी.पी.एल दाखल केले आहे.

      अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे दिसुन येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्‍यांचा ग्राहक क्रमांक 510030333533 असा आहे. सी.पी.एल वरुन जानेवारी 2012 ते जुलै 2012 या कालावधीत लावण्‍यात आलेल्‍या मीटरचा क्रमांक 74/000452 असा आहे. अर्जदाराचे हे मीटर ऑगस्‍ट 2012 मध्‍ये बदलण्‍यात आल्‍याचे दिसून येते. त्‍या जागी 82/00132744 या क्रमांकाचे मीटर लावण्‍यात आल्‍याचे सी.पी.एल वरुन स्‍पष्‍ट होते. या मीटरव्‍दारे ऑगस्‍ट 2012 ते मे 2013 या कालावधीतील वीज वापराची नोंद घेण्‍यात आलेली आहे. ऑगस्‍ट 2012 ते मार्च 2013 या कालावधीत अर्जदाराचा सरासरी वीज वापर 100 ते 150 युनिट असल्‍याचे दिसून येते. एप्रिल 2013 मध्‍ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास 620 युनिट व मे 2013 मध्‍ये 2338 युनिट वीज वापराच्‍या बिलाची आकरणी केली. अर्जदाराने फेब्रूवारी 2013 पर्यंतच्‍या वीज बिलाचा भरणा केलेला दिसून येतो. एप्रिल 2013 व त्‍या नंतरच्‍या कालावधीत आकारण्‍यात आलेल्‍या बिला बाबत अर्जदाराची मूळ तक्रार आहे.

      जानेवारी 2013 मध्‍ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे मीटर पुन्‍हा बदलून 82/00132744 त्‍या जागी 58/02228944 हे नवीन मीटर बसविले. गैरअर्जदार यांनी जानेवारी 2012 ते जुलै 2013 या कालावधीत दोन वेळेस अर्जदाराचे मीटर बसविले आहे. परंतु ते बदलण्‍याची कारणे किंवा मीटर बदली अहवाल मंचात दाखल केलेला नाही. जुन 2013 ते ऑगस्‍ट 2014 पर्यंत 58/02228944 या मीटर वरील नोंदी प्रमाणे अर्जदारास वीज बिल आकरणी करण्‍यात येत असल्‍याचे दिसून येते.

      अर्जदाराने त्‍यांना देण्‍यात आलेल्‍या वाढीव वीज बिलाबाबत अनेक वेळेस गैरअर्जदार यांच्‍याकडे तक्रार केलेली दिसून येते. अर्जदाराने दिनांक 13.08.2013 रोजी मीटर चाचणीसाठी 150/- रुपये गैरअर्जदार यांच्‍याकडे भरले असल्‍याचे दिसून येते. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास मीटर चाचणीसाठी उपस्थित राहण्‍याची कोणतीही सुचना न देता स्‍वत: मीटर चाचणी केलेली दिसून येते. दिनांक 10.10.2013 रोजी गैरअर्जदार यांनी 00132744 या मीटर क्रमांकाचा चाचणी अहवाल जबाबासोबत निरीक्षण केले असता त्‍यावर ग्राहकाची सही नाही. यावरुन हे मीटर ग्राहकाच्‍या उपस्थितीत चाचणी करण्‍यात आले नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍याच प्रमाणे नियमानुसार पूर्णपणे चाचणी करण्‍यात आलेली नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे गैरअर्जदार यांनी दाखल केलेला चाचणी अहवाल फेटाळण्‍यात येत आहे.

      वरील बाबींचे निरीक्षण केल्‍यावर गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रिल 2012 ते जून 2012 या तीन महिन्‍याच्‍या कालावधीसाठी आकारलेले वीज बिल योग्‍य नसल्‍याचे मंचाचे मत आहे. जून 2013 ते डिसेंबर 2013 सरासरी वीज वापर (162 + 113 + 130 + 188 + 181 + 124 =  898 – 6 = 150 युनिट 150 युनिट) प्रतिमाह असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. मार्च 2013 नंतर अर्जदाराच्‍या वीज वापरात वाढ झालेली दिसून येते असल्‍यामुळे सरासरी 150 युनिट प्रतिमाह प्रमाणे एप्रिल 2013 ते जून 2013 या कालावधीसाठी वीज बिल आकारणी करणे योग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे.       

आदेश

  1. अर्जदाराची तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येते.
  2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रिल 2013 व त्‍यापुढे आकारलेली वीज बिले रद्द करण्‍यात येत आहेत.
  3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रिल 2013 ते जून 2013 या तीन महिन्‍याच्‍या कालावधीसाठी 150 युनिट प्रतिमाह या प्रमाणे वीज बिल आकारणी करावी.
  4. वरील प्रमाणे वीज बिल आकारणी केल्‍यावर अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे व यामध्‍ये व्‍याज व दंडाची आकारणी करु नये. अर्जदाराने या कालावधीत भरलेल्‍या रकमेची वजावट करावी.
  5. खर्चाबद्दल आदेश नाही. 
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.