निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 05.10.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 05.10.2010 तक्रार निकाल दिनांकः- 01.04.2011 कालावधी 05 महिने26दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. संभाजी पिता रामराव चव्हाण अर्जदार वय 52 वर्षे धंदा शेती, अड.एम.ई.भोसले रा.दादाराव प्लॉट जि.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अड.सचीन देशपांडे जिंतूर रोड,परभणी. 2 कनिष्ठ अभियंता. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. जिंतूर रोड, परभणी. ----------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष.) अवास्तव वीज बिलाबद्यल प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदाराने घरगुती वापराचे गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010131269 अन्वये वीज कनेकशन घेतलेले आहे व विद्युत बिले तो वेळीच्या वेळी भरत आहे परंतू माहे डिसेंबर 2008 मध्ये अचानक रुपये 38410/- चे अवास्तव रक्कमेचे बिल दिले. सदरचे बिल प्रत्यक्ष रिडींग न घेता दिले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. बिलाची रक्कम न भरल्यामुळे दिनांक 21.02.2009 रोजी गैरअर्जदाराचे कर्मचारी विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी घरी आले होते म्हणून अर्जदाराने रुपये 20,000/- भरणा केली त्याची पावती देवून येणा-या बिलात ती रक्कम कमी करुन मिळेल असे अर्जदारास सांगितले. अर्जदारानी त्यानंतर भरणा केलेली रक्कम कमी करुन देण्याची विनंती केली परंतू रक्कम कमी करुन दिली नाही त्यानंतर पुन्हा दिनांक 25.09.2010 रोजी रुपये 56,600/- चे बिल दिले ते देखील अवास्तव असल्यामुळे व बिलात दुरुस्ती करुन देत नसल्यामुळे अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन शेवटचे विद्युत बिल रुपये 56,600/- रद्य करुन मिळावे. दिनांक 21.02.2009 रोजी भरलेली रक्कम रुपये 20,000/- पुढील बिला कमी करुन यावी असा आदेश व्हावेत व मानसिक त्रासापोटी रुपये 5000/-व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 7 लगत दिनांक 25.09.2010 च्या वादग्रस्त बिलाची मुळ प्रत, गैरअर्जदाराकडे भरणा केलेले रुपये 20,000/- ची पावती व ती रक्कम पुढील बिलातून कमी करण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेल्या अर्जाची स्थळप्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना नोटीस पाठविल्यावर त्यानी तारीख 10/02/2011 रोजी एकत्रीतपणे आपला लेखी जबाब ( नि.17) दाखल केला आहे. अर्जदाराने तक्रार अर्जातून गैरअर्जदाराकडून आलेली बिले वेळोवेळी भरतो हे केलेले विधान साफ नाकारले असून अर्जदाराने कधीही वेळोवेळी बिले भरलेली नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे अर्जदाराने दिनांक 30.01.2008 रोजी बिलापोटी रक्कम भरल्यानंतर पुन्हा कधीही बिल भरलेले नव्हते. माहे डिसेंबर 2008 चे दिलेले बिल नियमानुसार योग्य असून ते मागील थकबाकीसह दिलेले आहे. अर्जदारानी दिनांक 21.02.2009 रोजी भरलेली रक्कम रुपये 20,000/- वरील बिलापोटी अनामत म्हणून भरलेली आहे. गैरअर्जदाराकडे भरलेली रक्कम पुढील बिलातून कमी करण्यात येइल असे अर्जदारास मुळीच सांगितले नव्हते. दिलेले बिल योग्य असून याबाबतीत गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. प्रस्तूतचे प्रकरण युक्तिवादासाठी दिनांक 15.03.2011 पासून तीन वेळा प्रलबित राहीले होते. तिन्ही तारखांना अर्जदार अथवा गैरअर्जदार याबाबतीत कोणीही युक्तिवादासाठी हजर नसल्यामुळे आज नेमलेल्या तारखेस मेरीटवर अंतिम निर्णयासाठी घेण्यास येत आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारानी अर्जदारास माहे डिसेंबर 2008 चे बिल रुपये 38410/- आणि दिनांक 25.09.2010 चे बिल रुपये 56,600/- चुकीचे व अवास्तव रक्कमेचे आणि पूर्ण रिडींग न घेता देवून सेवा त्रूटी केली असल्याचे अर्जदाराने शाबीत केले आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दाखल केलेल्या प्रस्तूतच्या तक्रारीमध्ये त्याला माहे डिंसेबर 2008 चे रुपये 38400/- चे अवास्तव रक्कमेचे दिले असे म्हटलेले आहे परंतू ते वादग्रस्त बिल तक्रार अर्जासोबत दाखल केलेले नाही. वादग्रस्त बिल देण्या पूर्वीची सर्व बिले त्यानी वेळोवेळी भरलेली आहे असे त्याने तक्रार अर्जात म्हटलेले आहे परंतू त्या संबधीचा देखील कसलाही ठोस पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. माहे डिंसेबर 2008 चे बिलापोटी त्यानी दिनांक 21.02.2009 रोजी रुपये 20,000/- भरल्यानंतर सदर बिलाबाबत गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार केली होती व ते अवास्तव रक्कमेचे बिल दुरुस्त करुन मिळण्याची मागणी केली होती त्याबाबतचा ही पुरावा तक्रारी सोबत दिलेला नाही. बिल न भरल्यामुळे गैरअर्जदाराचे कर्मचारी विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी आले होते त्यावेळी अर्जदाराकडून गैरअर्जदाराचे कर्मचा-यानी रुपये 20,000/- भरुन घेतले आहे त्याची पावती नि. 7/2 वर दाखल केली आहे. सदर पावती वर Subject to adjustment असा शेरा लिहलेला आहे मात्र अर्जदाराने ती भरलेली रक्कम पुढील बिलातून कमी करण्यात येइल असे गैरअर्जदारानी सांगितले होते. असे तक्रार अर्जात म्हटलेले आहे ते चुकीचे आहे. गैरअर्जदाराचे म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने माहे फेबृवारी 2008 पासून दिनांक 21.02.2009 पर्यंत मागिल एकही बिलाची रक्कम भरलेली नाही असे लेखी जबाबात आणि शपथपत्रातूनही नमूद केलेले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे खोटे आहे हे मंचापुढे शाबीत करण्यासाठी पूर्वीच्या भरलेल्या बिलाच्या पावत्याही दाखल केलेल्या नाहीत. अर्जदाराने ज्याअर्थी मौन पाळलेले आहे त्याअर्थी अर्जदाराकडे माहे फेबृवारी 2008 पासून मागिल थकबाकी होती या गैरअर्जदाराचे म्हणण्यात तथ्य वाटते. दिनांक 25.09.2010 रोजी अर्जदारास रुपये 56,600/- चे दिलेले बिल पुराव्यात दाखल केलेले आहे ते बिल देखील मागिल थकबाकीसह असले पाहीजे हे वरील बाबीवरुन शाबीत होते. ग्राहक मंचात अर्जदाराने प्रस्तूतचा तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या तक्रार अर्जासोबत नि. 3 चा तूर्तातूर्त ताकीदीचा अर्ज देवून माहे संप्टेबर 2010 चे वादग्रस्त बिल रुपये 56,600/- भरलेले नाही म्हणून विद्युत पुरवठा खंडीत करु नये व वादग्रस्त बिल गैरवाजवी व चुकीचे असल्याचे जाहीर करावे म्हणून मागणी केली होती त्या अर्जावर मंचात दिनांक 06.10.2010 रोजी आदेश पारीत करुन वादग्रस्त बिलापोटी तूर्त रुपये 14000/- अर्जदारानी 10 दिवसात भरावेत. तक्रार अर्जाचा अंतिम निकाल लागेपर्यंत गैरअर्जदाराने खंडीत केलेला वीज पुरवठा पुर्ववत चालू करावा अशी गैरअर्जदारास तूर्तातूर्त ताकीदीचा आदेश पारीत केला होता मात्र अर्जदाराने आदेश तारखेपासून मुदतीत रुपये 14000/- मुदतीत भरले नाहीत यावरुन देखील अर्जदार बिलाची रक्कम भरण्याचे बाबतीत कसूरवार असल्याचे सिध्द होते. गैरअर्जदाराकडून मिळालेले वादग्रस्त बिलही अर्जदाराचे नियमीत येणारे बिलापेक्षा अवास्तव व गैरवाजवी आहे हे दाखवून देणारा एकही सबळ पुरावा अर्जदारानी मंचापुढे दिलेला नाही एवढेच नव्हेतर गैरअर्जदारानी लेखी निवेदनात म्हटल्याप्रमाणे अर्जदाराने माहे फेबृवारी 2008 पासून आजपर्यंत एकही बिल भरलेले नाही हे विधान खोटून काढणारा एकही पुरावा दाखल केलेला नसल्यामुळे गैरअर्जदाराकडून दिलेले बिल चुकीचे वादग्रस्त अथवा गैरवाजवी आहे हे ग्राहय धरता येणे कठीण आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 पक्षकारानी आपला खर्च आपण स्वतः सोसावा. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |