निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/08/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 09/08/2010 तक्रार निकाल दिनांकः- 18/07/2011 कालावधी 11 महिने 09 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. व्यंकटराव शंकरराव जोशी. अर्जदार वय 76 वर्ष.धंदा. निवृत्त कर्मचारी. अड.एस.एन.वेलणकर. रा.घर क्रमांक 1083,शिवाजी नगर,परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अड.एस.एस.देशपांडे. परभणी विभाग,जिंतूर रोड,परभणी. 2 उप – कार्यकारी अभियंता, महावितरण,शहर उपविभाग,जिंतूर रोड,परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा परभणी येथील शिवाजी नगर भागातील रहिवासी असून,त्याच्या मोठ्या भावाच्या नावे 1974 मध्ये घरगुती वापराकरता वीज पुरवठा घेण्यात आला वडिलभावाच्या मृत्यू नंतर गेली 25 वर्षे अर्जदारच त्या घरात रहातात व घरही त्यांच्या मालकीचे आहे.अर्जदाराच्या घरात एकुण 4 मीटर असून अर्जदार वापरत असलेल्या मीटरचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यासाठी दिनांक 03/10/2007 रोजी गैरअर्जदारास अर्ज दिला मात्र त्यानंतरही अर्जदारास त्या मीटरची अव्वाच्या सव्वा देयके येत होती.ऑक्टोबर 2009 मध्ये रु.12,06,996/- चे देयक आले.त्याचे गैरअर्जदाराने रु.2100/- चे देयक दिनांक 18/11/2009 रोजी दिले त्यानंतर दिनांक 27/07/2010 रोजी गैरअर्जदाराच्या कर्मचा-यांनी मीटरची पहाणी केली व या मीटर बद्दल रु.20, ते 25 हजार भरावे लागतील असे सांगीतले म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने तक्रारीत त्याला नुकसान भरपाई पोटी रु.5000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. व मीटर क्रमांक 9000518819 चा खंडीत केलेला वीजपुरवठा चालू करण्यात यावा .तक्रारीतील 4ही मीटर्सचे नावात बदल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत त्याचे शपथपत्र, गैरअर्जदाराशी अर्जदाराने केलेला पत्रव्यवहार, विद्युत देयके इ.कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदार हा त्यांचा ग्राहक नाही कारण विद्युत जोडणी ही अर्जदाराच्या भावाच्या नावावर आहे.अर्जदाराच्या एका मीटरचे “ Temporary disconnection ”केल्याचे गैरअर्जदाराना मान्य आहे.अर्जदारास गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी.अशी गैरअर्जदाराने विनंती केली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र जोडले आहे. अर्जदार व गैरअर्जदारांच्या वकीलांचा युक्तीवाद व तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. गैरअर्जदाराने अर्जदार हा त्यांचा ग्राहकच नाही असा मुद्दा त्याच्या लेखीजबाबात उपस्थित केला आहे,परंतु अर्जदार हा 1985 पासून त्या घरात रहातो व त्या घराचा मालक आहे असे अर्जदाराचे उत्तर आहे व अर्जदार हा उपभोक्ता या नात्याने गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे.तसेच अर्जदाराने नि.19/6 व 19/7 वर अर्जदार हा सदरील घराचा मालक व कब्जेदार असल्याचा पुरावा दाखल केलेला आहे. अर्जदाराने दिनांक 03/10/2007 रोजी मीटर क्रमांक 9000518819 हे तात्पुरते बंद करावे असा गैरअर्जदाराकडे अर्ज दिला व गैरअर्जदाराने त्याप्रमाणे मीटर बंद केले,परंतु दिनांक 18/11/2009 रोजी अर्जदारास P.D. Sanction (permanent Disconnection ) चे रु.2100/- चे विद्युत देयक (नि.5/2 ) दिले.अर्जदाराने ती रक्कम भरल्यानंतर सुध्दा गैरअर्जदाराने त्याला दिनांक 04/01/2010 रोजी रु. 16,36,140/-चे विद्युत देयक ( नि.5/3) वरील दिले.गैरअर्जदाराना सदरील ग्राहक क्रमांक व मीटर क्रमांकाचा वीज पुरवठा तात्पुरता खंडीत केलयाचे मान्य असतानाही त्यांनी अर्जदारास नि.5/3 वरील विद्युत देयक देवुन त्रुटीची सेवा दिलेली आहे. असे आम्हांस वाटते.त्यामुळे सदरील विद्युत देयक रद्द करण्यात येत आहे. अर्जदाराने केलेल्या मागणी प्रमाणे त्याच्या घरातील चारही मीटर्स काढून गैरअर्जदाराने घराबाहेर नवीन मीटर्स लावल्याचे अर्जदाराने मान्य केलेले आहे. अर्जदाराने दिनांक 30/05/2007 रोजी केलेल्या अर्जातील मागणी नुसार (नि.19/1) गैरअर्जदाराने अर्जदारास मीटरचे नावातील नाव बदल झाल्याबद्दलची माहिती माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या माहितीनुसार गैरअर्जदाराने अर्जदाराकडूनच माहिती मागविलेली दिसते. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 530010074133 मीटर क्रमांक 9000518819 चा तात्पुरता खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा चालु करुन द्यावा. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास ग्राहक क्रमांक 530010039184 ( मीटर क्रमांक 9000518827) ग्राहक क्रमांक 530010074133 ( मीटर क्रमांक 9000518819 ) ग्राहक क्रमांक 53001007414 ( मीटर क्रमांक 9000518826 ) ग्राहक क्रमांक 530010355345 ( मीटर क्रमांक 900056706 ) वरील ग्राहकांचे नाव निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत अर्जदाराकडून आवश्यकती कागदपत्रे घेवुन बदलून द्यावे. 4 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- आदेश मुदतीत द्यावेत. 5 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष. मंचाच्या मा.दोन सदस्यांनी निकालपत्रातील आदेशाशी मी सहमत नसल्यामुळे,मी वेगळे निकालपत्र देत आहे. (सौ.अनिता आस्तवाल) सदस्या- जिल्हा ग्राहक मंच,परभणी (निकालपत्र पारीत सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.) मुद्दे. उत्तर 1 अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 गैरअर्जदाराने लेखी निवेदनातून कायदेशिर मुद्दा असा उपस्थित केला आहे की,अर्जदार हा विज वितरण कंपनीचा ग्राहक नाही.माझ्या मते प्रस्तुत प्रकरणाचा निर्णय घेतांना हया मुद्याचा ऊहापोह करणे गरजेचे आहे.अर्जदाराने तक्रार अर्जात असे कथन केले आहे की, वर्ष 1974 मध्ये घर बांधल्यावर गैरअर्जदाराकडून मोठ्या बंधूच्या नावे म्हणजे डि.एस.जोशी यांच्या नावे घरगुती वापरासाठी विज पुरवठा घेतला होता त्यानंतर वर्ष 1988 मध्ये 2 ग्राहक क्रमांक अन्वये 2 नवीन मीटरव्दार विद्युत पुरवठा घेतला.सन 1985 मध्ये डि.एस.जोशी म्हणजे गैरअर्जदाराच्या ग्राहकाचा मृत्यू झाला तदनंतर 25 वर्षे अर्जदार तेथेच राहतात परंतु विज पुरवठा अजूनही डि.एस.जोशी यांच्या नावे असल्याचे अर्जदाराने मान्य केले आहे.त्यानंतर वर्ष 1999 मध्ये अजून एका मीटरव्दारे विज पुरवठा गैरअर्जदाराकडून घेतला पुढे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने अर्ज देऊन सुध्दा गैरअर्जदाराने पूर्वीच्याच नावे म्हणजे डि.एस.जोशी यांच्या नावाने विज पुरवठा केला आहे.व अशा प्रकारे घरात एकुण 4 मीटरव्दारे विज पुरवठा घेतलेला आहे.अर्जदाराचे उपरोक्त म्हणणे पुराव्या अभावी मान्य करता येणार नाही.कारण वर्ष 1999 पासून ते 2007 पर्यंत अर्जदाराने या संदर्भात गैरअर्जदाराकडे तक्रार केल्याचे दिसत नाही किंवा तसा पुरावा ही मंचासमोर दाखल करण्यात आलेला नाही.वर्ष 2007 मध्ये अर्जदाराने महितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल केलेला दिसतो (नि 19/1) त्यात अर्जदाराचे म्हणणे असे की, सर्व मिटर अर्जदारांच्या नावे असतांना देखील मीटर क्रमांक 9000518819, मीटर क्रमांक 900055753 डि.एस.जोशी व मीटर क्रमांक 9000518826, मीटर क्रमांक 9000518827 हे एस.डी.जोशी यांच्या नावे दर्शवुन त्याच नावाचे बील अर्जदारास दिले जात आहेत. याची दखल घेवुन गैरअर्जदाराने अर्जदारास उत्तर (नि.19/2) पाठविले त्यात स्पष्टपणे गैरअर्जदाराने असे नमुद केले आहे की, अर्जदाराच्या नावे जर जुने देयक असतील किंवा विज जोडणी घेतांना जर अर्जदाराच्या नावे घेतली असेल तर त्याची छायाप्रत अर्जदाराने जोडावी म्हणजे योग्यती कार्यवाही करता येईल गैरअर्जदाराने योग्यती भुमिका घेतलेली दिसते.परंतु अर्जदाराने अर्जाव्दारे (नि.19/5) जुन विद्युत देयक मिळत नसल्याचे गैरअर्जदारास कळविले आहे.उलटपक्षी तक्रार अर्जात विद्युत जोडणी डि.एस.जोशी यांच्याच नावाने असल्याचे अर्जदाराने मान्य केले आहे.पुढे गैरअर्जदाराचा ग्राहक डि.एस.जोशी यांचा वर्ष 1985 मध्येच मृत्यू झाला तेव्हा पासून ते अद्याप पावेतो अर्जदाराने 4 ही मीटर स्वतःच्या नावे करुन घेण्याची तसदी घेतलेली दिसत नाही तब्बल 25 वर्ष मृत इसमांच्या नावे असलेल्या विद्युत जोडणीचा उपभोग अर्जदाराने घेतला हेच गैर आहे म्हणून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नसल्याचे माझे मत आहे. रिपोर्टेड केस Chattisgarh state electricity board & others Vs Goverdhan Prasad Bhurandhar 1 (2010) CPJ 63 मध्ये मा.छत्तीसगड राज्य आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, IMP Point – Complainant was enjoying the electricity through the supply connection which was standing in the name of a dead person-- no application for change in the name of consumer or providing connection in the name of the complainant or Mutation of his name in place of his father was ever made by the complainant – complainant not a consumer under consumer protection Act.1986-- हे मत प्रस्तुत प्रकरणाला तंतोतंत लागु होते.तसेच गैरअर्जदाराने चारही मीटर घराबाहेर बसवुन द्यावे व अर्जदाराने नाव बदलण्या बाबत / स्वतःचे नाव टाकण्याबाबत अर्ज दिल्यास तो तत्परतेने 3 महिन्यात निकाली काढण्याचे आदेश मंचाने गैरअर्जदारास द्यावे अश मागण्या मंचासमोर केलया आहे,परंतु तशा आशयाची मागणी गैरअर्जदाराकडे न करता थेट मंचासमोर अर्जदाराने केलेली दिसते.वास्तविक पाहता 25 वर्ष पेक्षा जास्त कालावधी लोटल्या नंतर देखील आज पर्यंत अर्जदाराने डि.एस.जोशीच्या नावे असलेली विद्युत जोडणी स्वतःच्या नावे करुन घेण्यासाठी काहीही कार्यवाही केलेली दिसत नाही. पुढे नि.5/3 वर अर्जदाराने दिनांक 04/01/2010 चे रक्कम रु.163.6140/ चे विद्युत देयक मंचासमोर दाखल केले आहे.परंतु ते रद्द बातल करण्याची मागणी अर्जदाराने मंचासमोर केलेली नाही किंवा त्या बद्दलची अर्जदाराची तक्रार ही नाही त्यामुळे त्याचे Solution निघाले असावे असे अनुमान यावरुन काढावे लागेल.म्हणून वरील सर्व बाबीचा सारासार विचार करुन मी खालील प्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 संबंधितांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सदस्या.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |