निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 02/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 01/02/2012 कालावधी 10 महिने.30 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सौ.साधना किशोर जोशी. अर्जदार वय 45 वर्ष.धंदा.- घरकाम. अड.एस.एन.वेलणकर. रा.पारेख कॉलनी,बसस्टँड समोर,सेलू ता.सेलू.जि.परभणी. विरुध्द 1 अधिक्षक अभियंता. गैरअर्जदार. महा.राज्य विज वितरण कं.म. परभणी मंडल,जिंतूर रोड.परभणी. 2 सहाय्यक अभीयंता. महा.राज्य विद्युत वितरण कं.म. उपविभाग सेलू,ता.सेलू जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) चुकीचे देयक देवुन दिलेल्या त्रुटीची सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार गैरअर्जदारा विरुध्द दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने दिनांक 30/09/1998 रोजी घरगुती वापरा करीता ग्राहक क्रमांक 532530054201 अन्वये विद्युत पुरवठा घेतलेला आहे. 1998-99 पर्यंत अर्जदारास व्यवस्थीत देयके आली. मात्र नंतर त्यामध्ये अनियमितता आली व RNA, LOCKED AVARAGE अशी वेगवेगळया पध्दतीने देयके येण्यास सुरवात झाली व दरमहा चुकीची देयके भरता न आल्याने व्याजाची थकबाकी वाढण्यास सुरुवात झाली.मार्च 2011 पर्यंत जवळपास 150 महिने व वीजवापर 42800 युनिट म्हणजे दरमहा साधारण 285 युनिट आहे. सरासरी काढल्यास देयक रु. 2,25000/- होईल व अर्जदाराने 13 वर्षात भरलेले पैसे वजा केले तर केवळ रु.1,50,000/- एवढीच थकबाकी राहते.दिनांक 08/03/2011 चे देयक पाहिलेतर थकबाकी रु. 1,60,000/- व व्याज रु.1,86,521=30 आहे.म्हणजे गैरअर्जदाराने चुकीच्या देयकांमुळे मुद्दलापेक्षा व्याजच जास्त आले आहे म्हणूनच अर्जदाराची सर्व देयके रद्द करुन त्याचे Revision होणे गरजेचे आहे.अर्जदार त्याची देयके दुरुस्त करुन दिल्यास सर्व देयके भरण्यास तयार आहे, परंतु गैरअर्जदार योग्य कार्यवाहीस – टाळाटाळ करीत आहेत व त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा ग्राहकास देत आहेत म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व दिनांक 08/03/2011 चे विद्युत देयक व आधीची सर्व देयके रद्द करण्यात यावीत व मानसिक त्रासाबाबत रु.5000/- व तक्रारीचा खर्च रु.2,500/- मिळावा अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, व विद्युत देयके दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने नोटीस मिळाल्यानंतर लेखी जबाब दाखल केला नाही, म्हणून गैरअर्जदारांविरुध्द तक्रार लेखी जबाबा शिवाय तक्रार चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 532530054201 अन्वये घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतलेला आहे हे तक्रारीत दाखल विद्युत देयकांवरुन सिध्द होते.तक्रारीत दाखल विद्युत देयकांवरुन व्याजाची थकबाकी ही निव्वळ थकबाकी पेक्षा जास्त आहे. गैरअर्जदाराना योग्य संधी देवुनही त्यांनी न्यायमंचापुढे हजर राहून त्यांची बाजुही मांडली नाही. विद्युत देयक दिनांक 08/03/2011 वरुन अर्जदारांच्या मीटरचे चालू रिडींग 42789 होते.मीटर घेतल्या तारखे पासून आजपर्यंत जेवढे महिने होतात त्यांनी चालू रिडींगला भाग देवुन दरमहा किती वापर होतो हे स्पष्ट होईल व त्याप्रमाणे अर्जदारास सुधारीत विद्युत देयक देता येवु शकेल. गैरअर्जदाराने जर अर्जदारास दरमहा रिडींग घेवुन विद्युत देयक दिले असते तर एवढी थकबाकी वाढली नसती गैरअर्जदारांनी चुकीची देयके देवुन त्रुटीची सेवा अर्जदारास दिलेली आहे असे आम्हांस वाटते. म्हणून खालील आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 अर्जदारास ग्राहक क्रमांक 532530054201 चे दिनांक 08/03/2011 रोजी दिलेले रु. 3,50,810/- चे व आधीची सर्व देयके रद्द करण्यात येत आहेत. त्याऐवजी आदेशाची प्रत मिळाले पासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या घरातील मिटरचे प्रत्यक्ष रिडींग घेवून रिडींग युनिटची कोणताही दंड व्याज न लावता आकारणी करुन अर्जदारास दुरुस्त बीले द्यावीत. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष. मा.दोन सदस्यांनी दिलेल्या निकालपत्रातील आदेशाशी मी सहमत नसल्यामुळे या सोबत माझे वेगळे निकालपत्र देत आहे. सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या- जिल्हा ग्राहक न्याय मंच. परभणी. (निकालपत्र पारीत व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.) मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे ठोस रित्या 1 शाबीत झाले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने दिनांक 30/09/1998 रोजी घरगुती वापरा करीता ग्राहक क्रमांक 532530054201 अन्वये विज पुरवठा घेतलेला आहे.वर्ष 1998 – 99 पर्यंत अर्जदारास व्यवस्थीत देयके आली त्यानंतर कधी RNA व Locked, Average अशी वेगवगळया पध्दतीने देयक देण्यास सुरवात झाली.दरमहा चुकीची देयके भरता न आल्यामुळे व्याजाची थकबाकी वाढण्यास सुरवात झाली गैरअर्जदाराने अर्जदाराची सर्व देयके रद्द करुन त्याचे Revision करावे अशी मागणी अर्जदाराने मंचासमोर केली आहे. निकालासाठी महत्वाचा मुद्दा असा की, तक्रार अर्जातून व मंचासमोर दाखल केलेल्या पुराव्यातील कागदपत्रावरुन गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. कारण अर्जदाराचे म्हणणे असे की, वर्ष 1999 पासुन विद्युत देयका मध्ये अनियमितता सुरु झाली.त्यामुळे विद्युत देयकाची रक्कम भरता न आल्यामुळे व्याजाची थकबाकी वाढण्यास सुरुवात झाली याचा अर्थ असा की, अर्जदारास वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव होती.वर्ष 1999 पासून ते आजता गायत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे या संदर्भात तक्रार केल्याचे दिसत नाही.तसेच अर्जदाराचे म्हणणे असे की, RNA, Locked व Average अशी वेगवेगळया पध्दतीने देयक दिलेली आहेत,परंतु मंचासमोर अर्जदाराने दाखल केलेल्या विद्युत देयकाची पाहणी केली असता (नि.6/1 ते नि.6/6) जवळपास सर्वच विद्युत देयक रिडींग घेऊनच देण्यात आल्याचे निदर्शनास येते तसेच अर्जदाराने स्वतःच तिचा साधारणपणे 285 युनीट प्रतीमहाचा विजवापर व रक्कम रु.1,50,000/-ची थकबाकी असल्याचे तक्रार अर्जातून कबुल केले आहे.अर्जदाराने दिनांक 22/10/1999 रोजी विद्युत देयकाचा भरणा केल्यानंतर दिनांक 31/03/2010 रोजी पर्यंत विद्युत देयकाची रक्कम जमा केलेली नसल्यामुळे सहाजीकच व्याजाची थकबाकी ही वाढली असावी तसेच मीटर फॉल्टी असल्याचे किंवा रिडींग घेतांना गैरअर्जदाराकडून चुकीच्या पध्दतीने रिडींग घेण्यात आल्याचे व व्याजाची थकबाकी अवास्तव, अयोग्य असल्याचे अर्जदाराने ठोसरित्या मंचासमोर शाबीत केलेले नाही.अर्जदाराने आजपावेतो किती रक्कम विद्युत देयकापोटी भरलेली आहे हे ही मंचासमोर स्पष्ट झालेले नाही.अर्जदाराची तक्रार मुळातच ढोबळ स्वरुपाची आहे.फक्त मुद्दल रककमे पेक्षा व्याजाची रक्कम जास्त असल्याचे कथन करुन सर्वच देयक रद्द करण्याची म्हणजे वर्ष 1999 पासूनची सर्व विद्युत देयके रद्द करण्याची केलेली मागणी अयोग्य व वस्तुस्थितीला धरुन नसल्याचे माझे मत आहे. तसेच यास अर्जदाराचा हलगर्जीपणा देखील कारणीभुत आहे.उलट अर्जदाराकडे प्रचंड थकबाकी असून देखील तिचा विजपुरवठा सुरळीत असल्यामुळे तिला याची दखल घ्यावीशी वाटली नाही असेच अनुमान यावरुन काढावे लागेल.तसेच गैरअर्जदाराने सेवात्रुटी केल्याचे अर्जदारास ठोसरित्या शाबीत करता आलेले नाही असे मला वाटते.म्हणून वरील सर्व बाबीचा सारासार विचार करुन मी खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. जिल्हा ग्राहक मंच,परभणी.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |