// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2014
दाखल दिनांक : 06/01/2015
निर्णय दिनांक : 01/04/2015
श्रीमती नुरुन्नीसा मतीन खान
वय 60 वर्षे, धंदा - घरकाम
रा. शुक्रवार बाजार, चपराशीपुरा
कॅम्प, अमरावती : तक्रारकर्ती
// विरुध्द //
कार्यकारी अभियंता (शहर विभाग)
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.
जिल्हा स्त्री रुग्णालयाचे मागे, अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ती तर्फे : अॅड. मजीद खान
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. बाबरेकर
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 01/04/2015)
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2014
..2..
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सदरील तक्रार दाखल केली.
2. तक्रारदार यांच्या कथना प्रमाणे ती विरुध्दपक्षाची ग्राहक असून तिचा विज ग्राहक क्र. ३६६४७३११२४३९ आहे. तक्रारकर्ती हिने हयापुर्वी तक्रार क्र. १९७/२०१४ नुसार तक्रार दाखल केली होती परंतु ती आजारी असल्याने मंचात हजर झाली नाही त्यामुळे मंचाने सदर तक्रार दि. १२.१२.२०१४ च्या आदेशान्वये निकाली काढली.
3. तक्रारकर्तीकडे मे २०१४ पर्यंत कोणतेही विज देयक थकीत नाही. तक्रारकर्तीचा विजेचा वापर हा अत्यल्प आहे. परंतु जुन २०१४ मध्ये रु. ९७१.०२ चे देयक दिले व त्यात मागील थकबाकी रु. १९,९७४.९९ जोडून एकूण रु. २०,९५०/- चे देयक दिले. तक्रारकर्तीकडे असलेले मिटर फेब्रुवारी २०१४ मध्ये जळाले होते त्यामुळे रु. ६००/- भरुन नविन मिटर बसविले परंतु ते मिटर जोरात फीरत होते. त्यामुळे विरुध्दपक्षाने दिलेले रु. २०,९५०/- चे देयक हे चुकीचे आहे. त्यामुळे तकारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने ही तक्रार
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2014
..3..
दाखल करुन विनंती केली की, रु. २०,९५०/- चे देयक रद्द करण्यात यावे व नुकसान भरपाई रु. २०,०००/- व न्यायीक खर्च रु. १०,०००/- ची मागणी केली. तक्रारदाराने निशाणी 2 प्रमाणे दस्त 1 ते 14 दाखल केले आहेत.
4. विरुध्दपक्षाने निशाणी 10 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला. ज्यात त्यांनी प्राथमिक आक्षेप नोंदवून नमूद केले की, विरुध्दपक्षाच्या भरारी पथकाने दि. ५.६.२०१४ रोजी विद्युत कनेक्शनचे स्थळ निरीक्षण केले असता मिटर बॉक्स व िमटर सिल तोडून मिटर मध्ये छेडछाड केलेली होती त्यामुळे तक्रारकर्तीचे मिटर ९७.६९ टक्के कमी विज वापराची नोंद करीत होते त्यामुळे तक्रारकर्तीने विजेची चोरी केलेली आहे हे प्रथम दर्शनी सिध्द होते. म्हणुन सदर तक्रार वि. मंचात चालु शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला असेसमेंट करुन विज देयक देण्यात आले. विरुध्दपक्षाने विज अधिनियम कायदा २००३ नुसार एफ.आय.आर नं. ४३१० दि. ११.६.२०१४ रोजी दिलेला आहे. त्यामुळे सदर तक्रार रु. १०,०००/- खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2014
..4..
5. तक्रारकर्तीने हया पुर्वी तक्रार क्र. १९७/१४ दाखल केली हे मान्य करुन तक्रारकर्तीला दिलेले विज देयक हे योग्य आहे. कारण तकारकर्ती हिचे कडे दि. ५.६.२०१४ रोजी विज चोरी पकडली त्यानुसार विज देयक देण्यात आले. सदर देयक विरुध्दपक्षाच्या भरारी पथकाने चोरी प्रकरण विद्युत नियम 2003 कलम 135 अंतर्गत दि⠁ఀेले असून ते योग्य व बरोबर आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने कोणतीही सेवेत कमतरता केली नाही त्यामुळे रु. ५,०००/- खर्चासह तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
6. तक्रारकर्तीने निशाणी 14 नुसार प्रतिउत्तर दाखल केले.
7. तक्रार, लेखी जबाब तसेच तक्रारकर्ती तर्फे अॅड. श्री. मजीद खान व विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. बाबरेकर यांचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आली.
मुद्दे उत्तर
- सदर तक्रार चालविण्याचा मा. मंचास
अधिकार आहे का ? ... नाही
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2014
..5..
- विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी
केली आहे का ? ... नाही
- आदेश ? ... अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा ः-
8. तक्रारकर्ती तर्फे अॅड. श्री. मजीद खान यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्तीने मिटर रिडींग नुसार विज देयकाचा भरणा केलेला आहे. तक्रारकर्तीवर कोणतीही थकबाकी नाही. तक्रारकर्तीचा विज वापर हा अत्यल्प असून आलेल्या विज देयकानुसार विज भरणा केला आहे. विरुध्दपक्षाने दिलेले रु. २०,९५०/- चे देयक हे चुकीचे आहे त्यामुळे ते रद्द करण्यात यावे अशी विनंती केली.
9. विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. बाबरेकर यांनी असा युक्तीवाद केला की, वादातीत बिल हे ग्राहक मंच अमरावती यांचे कार्यक्षेत्रात येत नाही व तो तक्रार अर्ज हा चालु शकत नाही. कारण तक्रारकर्तीला दिलेले विज देयक रु. २०,९५०/- हे असेसमेंट करुन
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2014
.6..
विज चोरी बाबत दिलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
10. मा. मंचाने वरील प्रकरणाचा बारकाईचे अभ्यास केला असता असे दिसून आले की, तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करतांना विरुध्दपक्षाने तिच्या विद्युत मिटरचे स्थळ निरीक्षण केले आहे असे कोठेही नमूद केले नाही. परंतु विरुध्पक्षाने दाखल केलेल्या निशाणी 11/1 हया दस्तावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीचे विद्युत मिटरचे स्थळ निरीक्षण करण्यात आले असून सदरील मिटर मध्ये छेडछाड केल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्ती विरुध्द एफ.आय.आर. दाखल केल्याचे नमूद केले तसेच स्थळ निरीक्षण अहवालावर तक्रारदार यांची सही सुध्दा आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने विज चोरी केली असे सिध्द होत असल्याने हया मंचास सदर तक्रार चालविण्याचा अधिकार येत नाही. त्यानुसार सदरील प्रकरण हे विज चोरीबद्दल आहे असे गृहीत धरावे लागेल व त्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालय यांनी UP Power Corpn. Vs. Anees Ahmed reported in III (2013) CPJ I SC यातील निकाला प्रमाणे हा तक्रार अर्ज चालु
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2014
..7..
शकत नाही. हया निष्कर्षाप्रतवि. मंच आले असून मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
11. मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात आल्याने व विरुध्दपक्षाने कोणतीही सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होत नसल्याने मुद्दा क्र. 2 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
12. वरील कारणावरुन तक्रार ही रद्द होण्यास पात्र असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
- उभय पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 01/04/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष