निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 16/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 11/07/2013
कालावधी 01 वर्ष. 05 महिने. 08 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
1) हितेंद्र पिता विनायकराव उपाध्याय. अर्जदार
वय 44 वर्षे. धंदा.शेती. अड.व्ही.पी.चोखट.
रा.सहकार नगर.परभणी.
2) सुभाष पिता साहेबराव सुक्रे.
वय 42 वर्षे.धंदा. शेती.
रा.वडगाव ता.जि.परभणी
विरुध्द
कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
म.रा.वि.वि.कं.मर्या,विभागीय कार्यालय, अड.एस.एस.देशपांडे
जिंतूर रोड,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदारांची तक्रार अशी आहे की, अर्जदार क्रमांक 1 व 2 च्या शेतातील शॉटसर्किटने जळालेल्या गट क्रमांक 442 मौजे वडगाव मधील ऊसाच्या फडाची नुकसान भरपाई 7,40,000/- रुपये व्याजासह मिळावी बाबत तक्रार आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार क्रमांक 1 हा परभणी येथील रहिवासी असून अर्जदार क्रमांक 2 हा मौजे वडगांव ता.जिल्हा परभणी येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करतात तसेच अर्जदार क्रमांक 1 हा अर्जदार क्रमांक 2 चा मित्र असून अर्जदार क्रमांक 1 यांना वडगांव येथे स्वतःच्या मालकीचे शेत गट क्रमांक 442 मध्ये 4 हेक्टर शेती असून व त्या शेतामध्ये विहिर असून सदरच्या विहिरीवर विद्युत मोटार बसविण्यासाठी अर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदाराकडून रितसर कोटेशन भरुन विज कनेक्शन घेतले, ज्याचा ग्राहक क्रमांक 537620343815 असा आहे, आणि त्यामुळे अर्जदार क्रमांक 1 हा विद्युत कंपनीचा ग्राहक असून तो वेळोवेळी बिल भरत आलेला आहे. अर्जदार क्रमांक 1 चे हे म्हणणे आहे की, त्याने स्वतःच्या शेतात मौजे वडगांव येथील गट क्रमांक 442 मध्ये 4 हेक्टर ऊसाची लागवड केली होती, व तो उस कापण्यास देखील आला होता. सदरच्या ऊस पिकासाठी अर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून संपूर्ण 4 हेक्टर ऊसाच्या फडाच्या मशागतीचे काम व इतर कामे करुन घेतली होती,व त्या कामासाठी अर्जदार 1 यास भरपूर खर्च आला, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरचे शेत गट क्रमांक 442 मध्ये गैरअर्जदार यांचे विद्युत तारेचे पोल वरुन अर्जदाराच्या विहिरीवर विद्युत मोटाराचे कनेक्शन घेतले होते व त्या तारा इतर ठिकाणी गेलेल्या आहेत. दिनांक 21/11/2011 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक विद्युत प्रवाह आल्याने गट क्रमांक 442 मधील विद्युत पोल वरील तारा एकमेकांना लागुन सदरील तारा तटुन आगीच्या ठिणग्या अर्जदार क्रमांक 1 याचे शेत गट क्रमांक 442 मधील 4 हेक्टर ऊसावरील व वाळलेल्या पाचटीवरुन ऊस जळून खाक झाले. तसेच अर्जदार क्रमांक 1 यांचे हे म्हणणे आहे की, 4 हेक्टर मधील ऊसाचे वजन अंदाजे 400 टन ( एकरी 40 टन ) प्रमाणे टनचा भाव 1850/- नुसार अर्जदार क्रमांक 1 यांचे रुपये 7,40,000/- चे नुकसान झालेले आहे. तसेच अर्जदार क्रमांक 1 यांचे हेही म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीच्या अधिका-यांना प्रस्तुत तारीची दुरुस्ती करण्यासाठी सदर घटने अगोदर तोंडी विनंती केली होती, परंतु गैरअर्जदार यांच्या कंपनीने त्या तारेची योग्य दुरुस्ती न केल्यामुळे अर्जदार यांचे गट क्रमांक 442 मधील 4 हेक्टर ऊस फडाचे शॉकसर्किटने 7,40,000/- चे नुकसान झाले त्यास गैरअर्जदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराचे नुकसान झाले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा स्वतःचा व कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी सदर शेतीची लागवड केली होती. अर्जदार हा शेतकरी असल्यामुळे शेती पीक व्यतिरिक्त इतर त्याचे कोठलेही उत्पन्न नाही. तसेच अर्जदार यांचे 4 हेक्टर वरील प्रति एकर 40, टन प्रमाणे 400 टनचे 400 X 1850 = 7,40,000/- गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामळे झाला व गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी दिली सदर घटना घडल्यानंतर अर्जदार क्रमांक 2 यांने 23/11/2011 रोजी तहसिल कार्यालय परभणी येथे जळीत ऊस फडाचा पंचनाम करणेसाठी अर्ज दिला होता त्यावरुन 25/11/2011 रोजी मंडळ अधिकारी दैठणा यानी 8 एकरचे रु. 8,00,000/- नुकसान झाल्याचे पंचनाम्यात दर्शविलेला आहे. तसेच अर्जदाराने पोलिस स्टेशन दैठणा येथे दिनांक 25/11/2011 रोजी घटनेची माहिती दिली. त्या अन्वये तपासणीक अंमलदार आकस्मात जळीत क्रमांक 11/11 चा घटनास्थळ पंचनामा केला व त्या पंचनाम्यात देखील 10,00,000/- नुकसान झाल्याचे दर्शविले. तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक विद्युत कंपनीकडे तारेने ऊस जळाल्या बद्दल पंचनामा करण्यासाठी देखील अर्ज दिला होता, परंतु गैरअर्जदार यांनी अद्याप कोठलाही पंचनामा केलेला नाही, अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे वेळोवेळी जावुन जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून कार्यकारी अभियंता यांना विनंती केली, परंतु संबंधी अधिका-यानी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या कार्यालयात 05/01/2012 रोजी जावुन जळीत ऊसाची नुकसान भरपाई देण्यासाठी तोंडी विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने उध्दटपणे जळीत ऊसाची नुकसान भरपाई देत नाही, म्हणून टाळून गेले. म्हणूण अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदाराने जळीत ऊस फडाची नुकसान भरपाई 740,000/- मंजूर करण्यात यावी तसेच मानसिकत्रासापोटी 1500/- व खर्च म्हणून 3,000/- मंजूर करण्यात यावे.अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदार क्रमांक 2 ने नि.क्रमांक 2 वर व अर्जदार क्रमांक 1 ने नि.क्रमांक 21 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 4 वर अर्जदाराने 7 कागदपत्रांच्या यादीसह 7 कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत.ज्यामध्ये 4/1 वर पोलिस स्टेशन दैठणा आकस्मात जळीत नोंद क्रमांक 11/11 ची झेरॉक्स कॉपी, 4/2 वर घटनास्थळ पंचनामाची माहिती, 4/3 वर अर्जदाराने तहसिल कार्यालय परभणी यांस पंचनामा करण्यासाठीचा अर्ज, 4/4 वर अर्जदार क्रमांक 1 यांच्या नावे असलेले 7/12 उतारा, 4/5 वर अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे पंचनामा करणे बाबत दिलेला अर्ज, 4/6 वर मंडळ अधिकारी दैठणा यांनी केलेले पंचनाम्याची प्रत, 4/7 वर अर्जदार क्रमांक 1 यांनी विज बिल भरलेली पावती जोडली आहे.
गैरअर्जदार यांना तक्रार अर्जावर लेखी म्हणणे दाखल करणेसाठी मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत हजर, नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब दाखल केला आहे. ज्यामध्ये गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावटी व गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही मुळात अर्जदर क्रमांक 2 हा विज कंपनीचा ग्राहक नाही व अर्जदार क्रमांक 1 यांस ऊस जळीत प्रकरणाशी कोणताही संबंध नाही व सदरील ऊस विज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जळाले याचा कोणताही ठोस पुरावा नाही,प्रस्तुत प्रकरणात ऊस कोणत्या कारणामुळे जळाले या विषयी साक्ष पुराव्याची नितांत आवश्यकता आहे.म्हणून गैरअर्जदाराने अशी विनंती केली आहे की, प्रस्तुतचे प्रकरण हाताळण्यासाठी मंचास अधिकारक्षेत्र नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी, व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार क्रमांक 1 ने कोटेशन विज कंपनीकडे भरले, परंतु कोटेशन कोणत्या गट क्रमांकासाठी व विहिरीसाठी आहे या विषयी पुरावा नाही व ग्राहक क्रमांक कोणत्या शेत गटाचा आहे या विषयी कोणताही पुरावा नाही. तसेच अर्जदार क्रंमांक 1 याचा ऊस जळीत प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, कारण अर्जदार क्रमांक 2 याने पोलिस स्टेशनला तक्रारीत असे स्पष्ट म्हंटले आहे की, सदरील ऊस हा त्यानेच लावलेला आहे व त्याचा पूर्ण खर्च त्यानेच केला आहे, परंतु अर्जदार क्रमांक 2 हा विज कंपनीचा ग्राहक नसल्यामुळे सदरचे प्रकरण चालवण्याचा मंचास अधिकार नाही, व सदर प्रकरण दिवाणी न्यायालयात दाखल करणे आवश्यक होते, अर्जदार क्रमांक 2 च्या तक्रारी नुसार अर्जदार क्रमांक 1 हा मुंबई येथे राहतो, त्यामुळे अर्जदार क्रमांक 2 यांने सदर ऊसाचे खर्च केले व अर्जदार क्रमांक 2 हा कंपनीचा ग्राहक नसल्यामुळे प्रकरण फेटाळण्यात यावे व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार क्रमांक 1 हा मुंबईला राहतो व अर्जदार क्रमांक 2 हा घटनेच्या दिवशी आळंदीला होता. असे अर्जदार क्रमांक 2 याने पोलिसाना दिलेल्या तक्रारीत सांगीतलेले आहे. त्यामुळे सदरचा ऊस कसा जळाला हे अर्जदारांनाच माहित नाही म्हणून सदरचे प्रकरण बनावटी आहे.व तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, विज तारामध्ये काही खराबी होती याबद्दल अर्जदाराने गैरअर्जदाराकडे कधीही तक्रार केली नव्हती व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार क्रमांक 2 ने पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हंटलेले आहे की, 12 एकर ऊस लावलेला होता जर अर्जदार क्रमांक 1 याच्या नावे 10 एकर रान असल्यास त्यात 12 एकर ऊस लावला कसा ? म्हणून ही केस बनावटी आहे व गैरअर्जदार कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 21/11/2011 रोजी दिली एवढा उशीर का लागला जर गैरअर्जदार कंपनीच्या कर्मचा-याची चुक राहिली असती तर पोलिसांनी गुन्हा नोंद न करता आकस्मात जळीत प्रकरण का नोंदवले. कारण पोलिसांना ऊस जळण्यात विज कंपनीच्या कर्मचा-याची कोणतीही चुकी आढळून आली नाही व तसेच अर्जदार एकदा म्हणतो शॉटसर्किटने ऊस जळाला तर एकदा म्हणतो तारा तुटून ऊस जळाला यावरुन हे स्पष्ट होते की, अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावट आहे, म्हणून मंचास विनंती केली आहे की, प्रस्तुतची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 13 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर
1 अर्जदाराच्या शेतातील जळालेल्या ऊस पिकाची नुकसान भरपाई
देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? या बाबतीच त्यांचेकडून
सेवात्रुटी झाली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदार क्रमांक 1 मौजे वडगाव ता.जि.परभणी येथील शेत गट क्रमांक 442 मधील 4 हेक्टर जमिनीचा मालक आहे.हि बाब अर्जदाराने नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या 7/12 च्या उता-यावरुन सिध्द केले आहे. तसेच अर्जदार क्रमांक 1 हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे त्याने नि.क्रमांक 4/7 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते.
दिनांक 21/11/2011 रोजी सकाळी 11 वाजता अर्जदाराच्या शेतातील विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होवुन निघालेल्या आगीच्या ठिणग्याने अर्जदारांचे ऊसाचे पाचोटी जळाले व ते ऊसाच्या फडापर्यंत पोहचून ऊस पूर्णपणे जळाले.ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/1, 4/2 वरुन सिध्द होते. तसेच नि.क्रमांक 4/6 वरील कागदपत्रांवरुन व नि.क्रमांक 20 वरील फोटोवरुन सिध्द केलेले आहे, परंतु सदरील ऊस किती फुट उंचीचा होता व त्याची लागवड केव्हा केली होती व तसेच सदरच्या ऊसापैकी किती ऊस जळाले याचा कागदोपत्री काहीच पुरावा दाखल केलेला नाही त्यामुळे किती टन ऊस जळाले याचा अंदाज काढता येत नाही, गैरअर्जदाराने अर्जदारास विद्युत पुरवठा केला होता जो की, Hazardous स्वरुपाचा होता व त्यामुळे आगीच्या ठिणग्या पडून अर्जदाराचा ऊस जळून गेले असे सिध्द होते.व Hazardous Services देवुन गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार हा ग्राहक होत नाही,
व त्यांच्या निष्काळजीपणामुळे ऊस जळाला नाही, हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही.व गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळेच सदरचा ऊस जळाला आहे असे मंचास वाटते. अर्जदाराचे म्हणणे की, त्याचे 7,40,000/- रुपयांचे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने तसा कोणताही सबळ पुरावा मंचासमोर आणून तो सिध्द केलेला नाही.म्हणून सदरचे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही.अर्जदाराचे ऊस जळून नुकसानी झाली ही गोष्ट त्यांने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द झालेली असल्यामुळे मंचास प्रति एकरी Approximately रु.15,000/- प्रमाणे 8 एकराची नुकसान भरपाई रु.1,20,000/- देणे हे मंचास योग्य वाटते.कारण नि.क्रमांक 4/6 वर दाखल केलेल्या तहसील कार्यालयाच्या पंचनाम्या मध्ये 8 एकर ऊस जळाले आहे. असे म्हंटले आहे.अशाच प्रकारच्या प्रकरणातील रिपोर्टेड केस 2002 (2) सी.पीआर. पान -61 (राष्ट्रीय आयोग दिल्ली) मध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, Failure of electricity board to set electric wire in proper position which were hanging loose and due to sparking caused damage to crop of complainant who was also consumer of electricity was deficiency in service on part of electricity board प्रस्तुत तक्रारीलाही हे मत लागु पडते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदाराने अर्जदार क्रमांक 1 यास निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत रु,1,20,000/- फक्त ( अक्षरी रु.एकलाख विसहजार फक्त) द्यावे.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष