निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 01/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/01/2013
तक्रार निकाल दिनांकः- 10/10/2013
कालावधी 09 महिने. 08 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सुरेशकुमार चंदनलाल परदेशी. अर्जदार
वय वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.शिवाजी नगर,परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महा.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. अॅड.एस.एस.देशपांडे.
परभणी विभाग,जिंतूर रोड, परभणी.
2 उप-कार्यकारी अभियंता.
महा.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
शहर उपविभाग, जिंतूर रोड.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या मीटरचे रिडींग न घेता अंदाजे बील देवुन सेवेत त्रुटी दिली आहे.या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार पूढील प्रमाणे आहे. अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून त्याने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापराकरीता विज जोडणी घेतली आहे. ज्याचा ग्राहक क्रमांक 530010508192 व सुरवातीचा मीटर क्रमांक 9000600208 असा आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने नोव्हेंबर 2007 पासून मे-2008 पर्यंत कधी आर.एन.ए. तर कधी ईन अॅक्सेस असे रिमार्क देवुन विद्युत बिले दिले होते.
व नंतर काही महिने रिडींग प्रमाणे बिले दिली, परंतु पुन्हा पहिलाच प्रकार सुरु झाला अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, एप्रिल 2009 मध्ये 5483 युनीटचे बील आले व त्यानंतर मात्र सतत दिड वर्षे म्हणजे डिसेंबर 2010 पर्यंत तीच रिडींग कायम ठेवुन आर.एन.ए. In access रिमार्क देवुन विद्युत बिल दिले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्याचा विज वापर महीना 250 ते 300 युनीट होता हे दिसून येते शेवटी डिसेंबर 2010 ते जानेवारी 2011 या काळात गैरअर्जदाराने सदर मीटर बदलून“ 76/04392668 ” हे मीटर बसवले व फेब्रुवारी 2011 मध्ये संपूर्ण कालावधीचे सुधारीत बिल दिले जे 20559.12 पैसेचे होते. अर्जदाराने सदरचे बील 31/03/2011 रोजी भरले अशा प्रकारे जुन्या मिटरचा वाद संपुष्टात आला या 37 महिन्याच्या कालावधीत अर्जदाराने एकुण 36,510/- रुपये भरले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, नवीन मीटर बसवल्यावर फेब्रुवारी 2011 मध्ये मीटर रिडींग 768 दाखवुन व 767 युनीटचा वापर धरुन वर नमुद केलेले 20,559/- रुपये बिल दिले होते, म्हणजेच नवीन मीटरचे 768 युनीट पर्यंतचे बील अर्जदाराने भरले होते. त्यानंतर मार्च 2011 ते सप्टेंबर 2011 या कालावधीत अर्जदाराला सतत आर.एन.ए. ची विद्युत बीलं आली व ऑक्टोबर 2011 मध्ये मागील रिडींग 768 दाखवुन चालू रिडींग 1266 दाखवली व 2770/- रुपयाचे बिल अर्जदारास दिले व ते 08/12/2011 रोजी भरले नंतर नोव्हेंबर 2011 पासून एप्रिल 2012 पर्यंत 1266 रिडींग दाखवून अर्जदारास आर.एन.ए. ची बिले आली व 26 मार्च 2012 रोजी फेब्रुवारी 2012 पर्यंतचे शेवटचे बील 830 रुपये भरले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 29/05/2012 रोजी जुनी रिडींग 1266 आहे व चालू रिडींग 14955 दाखवून 1,31,540/- रुपयाचे अर्जदारास विद्युत बील आले म्हणून अर्जदाराने सदरचे बील दुरुस्त करुन द्यावे अशी गैरअर्जदारास विनंती केली असता गैरअर्जदाराने कांहीही केले नाही व पुन्हा जून महिन्याचे विद्युत बिल 1,53,220/- रुपयाचे दिले. शेवटी 26/07/2012 रोजी सदरचे चुकीचे बील दुरुस्त करुन देण्या संबंधी व विज पुरवठा खंडीत करु नये बद्दल गैरअर्जदारास लेखी तक्रार दिली होती, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या उलट विजेचा भरमसाठी वापर दाखवून जुलै 2012 मध्ये 1,59,307/- रुपयाचे ऑगस्ट 2012 मध्ये 1,68,411/- रुपयाचे व सप्टेंबर 2012 मध्ये 1,75,053/- रुपयाचे बील अर्जदारास देण्यांत आली. पुन्हा 09/10/2012 रोजी अर्जदाराने सर्व विद्युत बीले दुरुस्त करुन देण्याची मागणी अर्ज दाखल केला असता सदर बिलावर “ Please revise by Slab Benefit w.e.f. present meter installation ” असा आदेश गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 ला दिला, परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 ने काहीही केलेले नाही. या उलट गैरअर्जदाराने दिनांक 28/10/2012 रोजीच्या लाईट बीलामध्ये पार्ट पेमेंट म्हणून 30,000/- रुपये भरावे अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल असे सांगुन गैरअर्जदाराने अर्जदारास चेक देण्याचे सांगीतले व दिनांक 07/11/2012 रोजी अर्जदाराकडून गैरअर्जदाराने 30,000/- रुपयांचा चेक घेतला वस्तुतः अर्जदाराची सरासरी देयक कमी असून तो 30,000/- रुपये सुध्दा देणे लागत नाही. असे अर्जदाराने गैरअर्जदारास सांगीतले होते त्याचा काही उपयोग झाला नाही पुन्हा दिनांक 27/11/2012 रोजी अर्जदारास 1,21,160/- रुपयांचे लाईट बील आले, व गैरअर्जदाराला भेटून 07/12/2012 रोजी नविन मिटर नोंद प्रत्यक्ष 350 युनीट आहे याची नोंद बिलावर घेतली व अर्जदाराने स्पष्ट केले की, मिटर दिनां 25/10/2012 रोजी बसवले व 44 दिवसांत 350 युनीट म्हणजे सरासरी जवळ-जवळ 8 युनीट प्रमाणे महिना 250 युनीट फक्त वापर आहे व त्याच प्रमाणे देयक दुरुस्त करुन देण्यात यावे म्हणून विनंती केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही फक्त नविन मिटरचे नोव्हेंबर 224 चे वापराचे व जुन्या मिटरचे 67 युनीट समायोजन करुन रिडींग 19298 दाखवले आहे व मिटर बदलतांना रिडींग 19365 आहे तो 67 युनीटचा फरक 291 युनीटची 2140/- चे बिल दिले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 19/12/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 याने अर्जदारास भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 56 अन्वये 1,12,240/- ही रक्कम 15 दिवसात भरावे अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल. अशी धमकी दिली जे की, एकदम चुकीचे होते. शेवटी 31/12/2012 रोजी अर्जदाराच्या घरी गैरअर्जदाराचे कर्मचारी विज पुरवठा खंडीत करण्यास पाठविले त्यांना नोटीसीची मुदत दाखविल्यावर त्यांनी 03/01/2013 पर्यंत भरा नाहीतर खंडीत करु असे सांगीतले. शेवटी अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजुर करुन गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचा मिटर क्रमांक 76/00600208 चे फेब्रुवारी 2011 पासून ते नोव्हेंबर 2012 पर्यंत चुकीचे विद्युत देयक देवुन त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिली आहे हे घोषीत करावे व त्या प्रमाणे
मे 2012 मध्ये दिलेले रुपये 1,31,542/- चे देयका पासून ते नोव्हेंबर 2012 मध्ये दिलेल्या शेवटचे 1,12,240/- रुपयांच्या देयका पर्यंत सर्व लाईट बिले रद्द करावेत. व गैरअर्जदाराने अर्जदारास 19/12/2012 रोजी दिलेली नोटीस रद्द करुन मे 2012 पासून नोव्हेंबर 2012 च्या कालावधीच्या सरासरी वापर पूर्वीच्या व नविन मिटर मिटर प्रमाणे काढण्यात येवून त्यामधून समायोजीत 67 वजा करुन स्लॅब बेनिफीट देवुन जमा पैसे वजा करुन सुधारीत फायनल लाईट बील देण्याचा आदेश गैरअर्जदारास देण्यात यावे व अर्जदारास झालेल्या मानसिकत्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 5,000/- रुपये गैरअर्जदारास अर्जदाराला देण्याचा आदेश व्हावा.अशी मंचास विनंती केली आहे.
नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 6 वर 14 कागदपत्रांच्या यादीसह 14 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये दिनांक 29/05/2012 चे रु. 1,31,540/- चे लाईट बील, अर्जदाराचा गैरअर्जदार क्रमांक 2 ला अर्ज, अर्जदाराचा गैरअर्जदार क्रमांक 1 ला अर्ज, अर्जदारास दिलेले 1,75,050/- रुपयांचे बिल, मिटर बदली अहवाल, अर्जदाराचे दिलेले 1,38,820/- रुपयांचे लाईट बील, अर्जदारास दिलेले रु. 30,000/- चे पार्टपेमेंटचा रिमार्क, अर्जदारास दिलेले 1,21,160/- रुपयाचे लाईट बील, अर्जदाराने गैरअर्जदारास दिले अर्ज, अर्जदाराच्या नविन मिटरचे 2140/- रुपयांचे लाईट बील, अर्जदारास दिेलेले दुरुस्त देयक 1,12,240/- रुपयांचे लाईट बील, गैरअर्जदाराची नोटीस अर्जदाराचा सी.पी.एल. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदाराना त्यांचा लेखी जबाब सादर करणेसाठी नोटीसा पाठविण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारांना त्यांचा लेखी जबाब सादर करण्यासाठी अनेक संधी दवुनही मुदतीत लेखी जबाब न दाखल केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विना जबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास फेब्रुवारी 2011 ते नोव्हेंबर 2012
पर्यंत मिटरचे रिडींग न घेताच लाईट बीले देवुन
सेवेतत्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हि बाब नि.क्रमांक 6 वरील दाखल केलेल्या लाईट बिलावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदारास नोव्हेंबर 2007 पासून ते मे 2008 पर्यंत कधी आर.एन.ए. तर कधी ईन अॅक्सेस रिमार्क देवुन लाईट बिल दिले हे नि.क्रमांक 6/13 वर दाखल केलेल्या सी.पी.एल. वरुन सिध्द होते तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास एप्रिल 2009 मध्ये 5483 युनीटचे बील दिले व तीच रिडींग डिसेंबर 2010 पर्यंत कायम दाखवुन लाईट बिल दिले ही बाब देखील नि.कमांक 6/13 वर दाखल केलेल्या सी.पी.एल. वरुन सिध्द होते. तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराचे जुने मीटर काढून नवीन मीटर फेब्रुवारी 2011 मध्ये बसवले ही बाब देखील नि.क्रमांक 6/13 वर दाखल केलेल्य सी.पी.एल. वरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने मार्च 2011 मध्ये 20,560/- रुपये बील भरले होते हे देखील सी.पी.एल. वरुन सीध्द होते तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास मार्च 2011 ते सप्टेंबर 2011 या कालावधीत कधी आर.एन.ए. तर कधी ईन अॅक्सेस दाखवुन लाईट बील दिले होते हि बाब देखील सी.पी.एल. वरुन सिध्द होते व तसेच ऑक्टोबर 2011 मध्ये मागील रिडींग 768 दाखवुन चालु रिडींग 1266 दाखवुन 2770 रुपयांचे बील अर्जदारास दिले व ते अर्जदाराने 08/12/2011 रोजी भरले व तसेच नोव्हेंबर 2011 पासून एप्रिल 2012 पर्यंत मागील रिडींग 1266 दाखवुन पुढील रिडींगसाठी आर.एनर.ए. चे रिमार्क देवुन बिले दिली. हि बाब देखील सी.पी.एल. वरुन सिध्द होते तसेच 29/05/2012 रोजी मागील रिडींग 1266 दाखवुन चालु रिडींग 15955 दाखवून अर्जदारास 1,31,540/- रुपयाचे बील दिले होते हि बाब सि.पी.एल. वरुन सिध्द होते सदरचे 1,31,540/- रुपयाचे बील रिडींग न घेता देणे ही बाब मंचास अगदी अयोग्य वाटते, पूढील जुन 2012, जुलै 2012, एप्रिल 2012 व सप्टेंबर 2012 मध्ये अनुक्रमें 1,53,220/- रुपये, 159,360/- रुपये, 1,68,411/- रुपये, व 1,75,050/- रुपयेचे बील देणे सुध्दा अत्यंत चुकीचे वाटते कारण मागील सरासरी बघता प्रतिमहा 1000/- चे बिल निघते. हे दाखल केलेल्या सी.पी.एल. वरुन सिध्द होत आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी देखील गैरअर्जदार क्रमांक 2 यांना जे की गैरअर्जदार क्रमांक 1 चे कनीष्ट अधिकारी आहे, निर्देश दिले होते की, माहे सप्टेंबर चे बील रुपये 1,75,050/- रुपये हे स्लॅब बेनिफिटसह दुरुस्त करुन अर्जदारास द्यावे. ही बाब नि.क्रमांक 6 वरील दाखल केलेल्या सप्टेंबर 2012 च्या बीलावरुन सिध्द होते तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी वरीष्ठ अधिका-यांचे आदेशाचे पालन न करता व अर्जदारास 30,000/- भरा नाहीतर विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली जे की, मंचास अयोग्य व नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधी आहे, असे वाटते.तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी असे करुन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने आर.एन.ए., ईन अॅक्सेस असे रिमार्क देवुन अर्जदारास अत्यंत चुकीचे बिले देवुन मानसिक त्रास दिलेला आहे. म्हणून अर्जदार हा मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले फेब्रुवारी 2011 ते नोव्हेंबर 2012 पर्यंतची सर्व
बिले रद्द करण्यात येते.
3 आदेश तारखेच्या नंतर पूढील 3 महिन्याचे अर्जदारा समक्ष फोटोसह मिटर
रिडींग घेण्यात यावी. व त्याची प्रतीमहा सरासरी काढण्यात यावी. व आलेल्या
प्रतीमहा सरासरी प्रमाणे फेब्रुवारी 2011 ते नोव्हेंबर 2012 पर्यंतची बिले
Calculate करण्यात यावी व त्यातून अर्जदाराने फेब्रुवारी 2011 ते नोव्हेंबर
2012 पर्यंत भरलेली सर्व रक्कम वजा करण्यात यावी.
4 वरील Calculation करतांना अर्जदारास Slab benefit देण्यात यावा.
5 अर्जदाराने अधीकचे रक्कम भरलेले निघाल्यास ती त्याच्या पूढील बिलात
समायोजित करण्यात यावी.
6 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या मानसिक त्रासापोटी गैरअर्जदाराने आदेश तारखे
पासून 30 दिवसांच्या आत 5,000/- फक्त (अक्षरी रु. पाचहजार फक्त ) व
तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- फक्त (अक्षरी रु.दोनहजार फक्त ) द्यावे.
7 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.