Maharashtra

Ahmednagar

CC/15/320

Girish Tukaram Jadhav - Complainant(s)

Versus

Executive Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd. - Opp.Party(s)

Hendre-Joshi

19 Nov 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/320
( Date of Filing : 11 Aug 2015 )
 
1. Girish Tukaram Jadhav
Near Satalkar Hospital,Delhi Gate,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
Station Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Sub-Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
M.I.D.C.Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
3. Vilas Yashwant Mistri
Near Iskcon Temple,Yashoda Nagar,Pipeline Road,Savedi,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Hendre-Joshi, Advocate
For the Opp. Party: adv.kakani, Advocate
Dated : 19 Nov 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक १९/११/२०१९ 

 (द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.  तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हे अहमदनगर येथील रहिवासी आहेत. एम.आय.डी.सी. अहमदनगर येथील प्‍लॉट क्र. बी-१११ त्‍यांनी सामनेवाले क्र.३ यांच्‍याकडुन भाडे तत्‍वावर घेतलेला आहे व त्‍या ठिकाणी ते कोटींग आणि फॅब्रिकेशनचा व्‍यवसाय करतात. तक्रारदाराने कथन केले की, सदरचा व्‍यवसाय ते स्‍वतः व कुटुंबाच्‍या उपजिवीकेसाठी करतात. सदरच्‍या  प्‍लॉटवर सामनेवाले क्र.३ यांनी सामनेवाले क्र.२ यांच्‍याकडुन विद्युत पुरवठा घेतलेला आहे. सदरचा विद्युत पुरवठा हा चिराग इंजिनिअरिंग या नावाने घेतलेला आहे.  तक्रारदार सदरचे विद्युत पुरवठ्याचा वापर फेब्रुवारी २०१४ पासुन करत आहे. तक्रारदार हे सर्व विद्युत बिले नियमीत भरत आहे. तसेच सामनेवाले क्र.३ यांनी आणखी एक भाडेकरी श्री.शहा यांना भाडे तत्‍वावर दिला.  श्री.शहा तेथे जय एन्‍टरप्रायझेस या नावाने व्‍यवसाय करतात. सदरचे ग्राहक क्रमांकानुसार विद्युत देयके नियमीत तक्रारदार व श्री.शाह भरतात. परंतु  दिनांक ०८-०८-२०१५ रोजी सामनेवाले यांनी अचानकपणे येऊन तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला. यासाठी त्‍यांनी कुठलीही पुर्व सुचना दिली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्‍याकडे चौकशी केली असता त्‍यांनी हे सांगितले की, सामनेवाले क्र.३ यांनी दिनांक २८-०७-२०१५ रोजी सामनेवाले  क्र.१ व २ यांना पत्र दिले व त्‍या पत्रानुसार विद्युत पुरवठा बंद केलेला आहे. यासाठी सामनेवाले क्र.१ व २ यांनी कोणतीही पुर्व सुचना दिली नाही व त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या व्‍यवसायाचे बरेच आर्थिक नुकसान झाले.  तक्रारदाराला त्‍यामुळे कोणतेही काम करता आले नाही. व्‍यवसायावर परिणाम झाला. म्‍हणुन तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करून परिच्‍छेद क्रमांक ११ प्रमाणे मागणी केली आहे.

३.   सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्‍यांची लेखी कैफीयत निशाणी १२ वर दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी कथन केले आहे की, सामनेवाले यांनी कुठलीही सेवेत त्रुटी केलेली नाही. सदरचा तक्रार अर्ज हा मेनटेनेबल नाही. तक्रारदार हा सामनेवाले यांचा ग्राहक होऊ शकत नाही. तसेच विद्युत वापर हा वाणिज्‍य वापरासाठी केलेला आहे. त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम २ नुसार तक्रार अर्ज या मंचात चालु शकत नाही. सदरचा अर्ज तक्रारदाराने इलेक्‍ट्रीसीटी अॅक्‍ट च्‍या तरतुदीनुसार स्‍थापन झालेल्‍या मंचामध्‍ये दाखल करावा. या मंचाला सदरची तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. सबब तक्रारदराचा अर्ज रद्द करण्‍यात यावा.  तसेच पुढे असे कथन केले आहे की, सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदाराला दिनांक २८-०७-२०१५ रोजी पत्र देऊन विद्युत पुरवठा खंडीत  करण्‍याबाबत विनंती केली.  त्‍यानुसार विद्युत पुरवठा बंद केलेला आहे. यासाठी सामनेवाले यांनी कोणातही अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला नाही व तक्रारदारास झालेल्‍या नुकसानीसाठी सामनेवालेस जबाबदार ठरवता येणार नाही.  तक्रारदाराने चुकीचे कारणाने सदरचा अर्ज मंचात दाखल केलेला आहे. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. सदरचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्‍यात यावा, अशी सामनेवाले यांनी मंचाला विनंती केली.   

४.   सामनेवाले क्र.३ यांनी त्‍यांची लेखी कैफीयत नि.२७ नुसार दाखल केली. त्‍यामध्‍ये त्‍यांनी कथन केले की, ते एम.आय.डी.सी. प्‍लॉट बी-१११ मध्‍ये चिराग इंजीनीअरींग नावाने व्‍यवसाय करता. सदरचा प्‍लॉट या सामनेवाले क्र.३ यांच्‍या  मालकीचा असुन तेथे कागदपत्र त्‍यांच्‍या नावे आहे, विद्युत मिटरसुध्‍दा सामनेवाले क्र.३ यांच्‍या नावे आहे. सदरचा कारखाना हा काही कारणामुळे बंद असल्‍याने सामनेवाले क्र.३ यांची तक्रारदाराशी ओळख असल्‍याने काही दिवसांकरीता वापरण्‍यासाठी परवानगी दिली.  मात्र याबाबत लेखी अथवा तोंडी करार झालेला नाही. सामनेवाले क्र.३ यांच्‍या मुलाला या जागेत व्‍यवसाय करावयाचा असल्‍याने तोंडी तक्रारदाराला ही जागा सोडण्‍याबाबत कळविले. त्‍यानंतर सामनेवाले क्र.३ यांनी सामनेवाले क्र.२ कडे पत्र देऊन त्‍यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्‍यात यावा, अशी मागणी केली. सदरचा तक्रार अर्ज हा खोट्या स्‍वरूपाचा असुन तो खारीज करण्‍यात यावा, अशी सामनेवाले यांनी विनंती केली आहे.

५.   तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र तसेच त्‍यांचे वकील श्रीमती प्रज्ञा हेन्‍द्रे यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले क्र.१ व २ यांनी दाखल केलेले कागदपत्र, सामनेवाले क्र.१ व २ यांचे वकील श्री.एस.एच. काकाणी यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले क्र.३ यांचे शपथपत्र यावरून न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.      

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत

काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार हे अहमदनगर येथील रहीवासी असुन त्‍यांचा एम.आय.डी.सी. अहमदनगर येथील प्‍लॉट क्र. बी-१११ त्‍यांनी सामनेवाले क्र.३ यांच्‍याकडुन भाडे तत्‍वावर घेतलेला आहे व त्‍या ठिकाणी ते कोटींग आणि फॅब्रिकेशनचा व्‍यवसाय करतात. सदरचा प्‍लॉट हा तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.३ यांच्‍याकडुन भाडे तत्‍वावर घेतलेला आहे. तक्रारदाराच्‍या कथनाप्रमाणे तक्रारदार सदरचा व्‍यवसाय ते स्‍वतः व कुटुंबाच्‍या उपजिवीकेसाठी करतात. सदरच्‍या  प्‍लॉटवर फेब्रुवारी २०१४ पासुन विद्युत वापर करतात त्‍याचा ग्राहक क्रमांक १६०२०१९००६५२० असा आहे. सदरचा ग्राहक क्रमांक हा सामनेवाले क्र.३ यांच्‍या  नावे असुन चिराग इंजिनीअरींग या नावाने विद्युत बिल येत असते व तक्रारदार हे सामनेवाले क्र.३ यांचा भाडेकरी आहे. तक्रारदार २०१४ पासुन विद्युत वापराचा लाभ घेत असल्‍याने तो लाभार्थी आहे व लाभार्थी हा ग्राहक या सदरता मोडतो, त्‍यामुळे तक्रारदाराने दाखल केलेले विद्युत बिल यावरुन स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार हा बेनिफीसीयरी असल्‍यामुळे तो सामनेवालेचा ग्राहक या सदरात मोडतो.  सामनेवाले क्र.३ कडे तो भाडेकरू आहे व तो विजेचा वापर करत आहे. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.  

७.  मुद्दा क्र. (२) :   तक्रारदार हे  सामनेवाले क्र.३ यांचे भाडेकरी आहेत, ही बाब सामनेवाले क्र.३ यांनासुध्‍दा मान्‍य आहे. त्‍यांच्‍या लेखी कथनामध्‍ये ही बाब मान्‍य केली आहे की, त्‍या ठिकाणी तक्रारदार कोटींग व फॅब्रीकेशनचा व्‍यवसाय करतात. त्‍यासाठी ते विद्युत वापर करतात त्‍याचा ग्राहक क्रमांक १६२०१९००६५२० असा आहे, ही बाब दाखल विद्युत बिलावरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारदार हे फेब्रुवारी २०१४ पासुन लाभार्थी म्‍हणुन विजेचा वापर करत आहे.  तक्रारदाराच्‍या कथनाप्रमाणे त्‍यांनी विद्युत देयके नियमीत भरलेली आहेत.  सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये विद्युत देयक नियमीत भरले नाही, याबाबत कोणताही वाद नाही. मात्र तक्रारदाराने त्‍याचा विद्युत पुरवठा दिनांक ०८-०८-२०१५ रोजी कुठलीही पुर्व सुचना न देता खंडीत केला. तक्रारदाराच्‍या या कथनाला सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्‍यांच्‍या लेखी कथनामध्‍ये असा बचाव घेतला की, सदरचा विद्युत पुरवठा हा सामनेवाले क्र.३ यांनी दिनांक २८-०७-२०१५ रोजी पत्र देऊन त्‍यांच्‍या प्‍लॉटवरील विद्युत पुरवठा बंद करण्‍यास कळविले.  त्‍यानुसार सामनेवाले क्र.१ व २ यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला.  यामध्‍ये सामनेवाले क्र.१ व २ यांचा कोणताही दोष नाही, असे कथन केले आहे. सदरचा वाद हा भाडेकरी व मालक यांचा दिवाणी स्‍वरूपाचा असुन सदरची तक्रार या मंचात चालु शकत नाही. मात्र प्रकरणाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराला कोणतीही पुर्व सुचना दिली नाही व विद्युत पुरवठा खंडीत केला, ही बाब निश्‍चीतच सेवेतील त्रुटी ठरते. सामनेवाले क्र.१ व २ यांनी सामनेवाले क्र.३ पत्राचा विचार करून विद्युत पुरवठा खंडीत केला, ही बाब संयुक्तिक वाटत नाही, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार हा सामनेवाले क्र.३ यांचा भाडेकरू आहे व तो २०१४ पासुन विजेचा वापर करत आहे, तो लाभार्थी असल्‍याने सामनेवाले क्र.१ व २ यांचा ग्राहक आहे या संदर्भात मुद्दा क्र.१ मध्‍ये स्‍पष्‍ट झालेले आहे. त्‍यामुळे सामनेवाले क्र.१ व २ यांनी घेतलेला बचाव तो सामनेवाले यांचा ग्राहक नाही, सदरची तक्रार ही मेनटेनेबल नाही ही बाब ग्राह्य धरता येणार नाही. तक्रारदार हा लाभार्थी असल्‍यामुळे तो सामनेवाले क्र.१ व २ चा ग्राहक आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी विद्युत पुरवठा खंडीत करण्‍यापुर्वी पुर्व सुचना देणे गरजेचे होते व ते केले नाही, ही बाब सामनेवाले यांची सेवेत त्रुटी ठरते. तसेच सामनेवाले यांनी लेखी कथनात असे कथन केले आहे की, तक्रारदार हा वाणिज्‍य वापरासाठी विजेचा वापर करत होता. परंतु तक्रारदाराने त्‍याच्‍या  तक्रारीमध्‍ये  कथन केले की, तो सदरचा व्‍यवसाय हा स्‍वतःच्‍या व कुटुंबाच्‍या उपजीवीकेकरीता करीत होता. त्‍यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव हा अमान्‍य करण्‍यात येतो.  तक्रारीमध्‍ये तक्रारदार हा लाभार्थी म्‍हणुन सामनेवाले क्र.१ व २ चा ग्राहक आहे व स्‍वतःच्‍या व्‍यवसायासाठी विजेचा वापर करतो.  त्‍यामुळे तो वाणिज्‍य वापर करत आहे, असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदाराची मागणी आहे की, त्‍याचा विद्युत पुरवठा सामनेवाले यांनी खंडीत करू नये. तक्रारीमध्‍ये मनाईहुकुमाचा आदेश पारीत करून तक्रारदाराचा विद्युत पुरवठा सामनेवाले क्र.१ व २ यांनी पुर्ववत करून दिलेला आहे. सबब तक्रारदारास असे निदर्शीत करण्‍यात येते की, त्‍यांनी नियमीत येणारे विद्युत देयके नियमीत भरावी. सामनेवाले यांनी त्‍यांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये.  तक्रारदाराचा विद्युत पुरवठा दिनांक ०८-०८-२०१५ रोजी सामनेवाले क्र.१ व २ यांनी कुठलीही पुर्व सुचना न देता खंडीत केला, ही बाब निश्चितच सेवेत त्रुटी आहे. तक्रारदाराची झालेली नुकसान भरपाईची काही रक्‍कम व तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी व आर्थिक खर्चापोटी काही रक्‍कम देणे न्‍यायाचे ठरेल, असे मंचाचे मत आहे.  सबब मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.     

         सामनेवाले क्र.३ हे तक्रारदार यांचे मालक असुन त्‍यांना तक्रारीत सामनेवाले क्र.३ म्‍हणुन सामील केले. परंतु प्रकरणात वादविषयी त्‍यांचा कोणताही संबंध नाही. त्‍यामुळे सामनेवाले क्र.३ यांच्‍याविरूध्‍द कोणताही आदेश करण्‍यात येत नाही.  

८.  मुद्दा क्र. (३) :    मुद्दा क्र.१ व २  चे विवेचनावरून आम्‍ही  खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.   

आदेश

      १. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

     २.  तक्रारदाराचा विद्युत पुरवठा तक्रारदाराच्‍या घरमालकाच्‍या अर्जावरुन  सामनेवाले क्र.१ व २ यांनी खंडीत करू नये व तक्रारदाराने येणारे विद्युत देयके नियमीत भरावी, असे निर्देश देण्‍यात येतात.

     ३. तक्रारदाराला मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रूपये ५,०००/- व आर्थिक खर्चापोटी रक्‍कम रूपये ५,०००/- सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराला द्यावे.

    ४.  सामनेवाले क्र.३ विरूध्‍द तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

    ५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

    ६.  तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.