Maharashtra

Ahmednagar

CC/15/411

Bharat Ramnath Darandale - Complainant(s)

Versus

Executive Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd. - Opp.Party(s)

Palve/Shaikh

23 Mar 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/15/411
( Date of Filing : 03 Oct 2015 )
 
1. Bharat Ramnath Darandale
At Sonai,Tal Newasa
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
Gramin Vibhag,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Adhikshak Abhiyanta,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
O & M Circle,Old Power House,New Administrative Building,Station Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Palve/Shaikh, Advocate
For the Opp. Party: Swati Shyam Nagarkar, Advocate
Dated : 23 Mar 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २३/०३/२०२०

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्‍वये सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, तक्रारदार यांचे मौजे सोनई तालुका नेवासा येथील कौतुकी नदीपात्रामध्‍ये १० बाय १० फुट मोजमापाचा गाळा असुन सदरील गाळ्यामध्‍ये तक्रारदार हे मुंजोबा पशुखाद्य नावाने दुकान चालवित आहेत. तक्रारदार हे दिनांक २५-०८-१९९९ पासुन सामनेवाले यांचे ग्राहक आहे. तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ चे अखत्‍यारीतील सामनेवाले क्र.२ यांच्‍या  नियंत्रणाखाली संबंधीत कार्यालयाकडे अधिकृतरित्‍या कोटेशन व अधिकृत रक्‍कम भरून वाणिज्‍य स्‍वरूपाची वीज जोडणी करून मागीतलेली होती. सामनेवालेने तक्रारदाराला विद्युत जोडणी दिलेली होती. तक्रारदार हे सामनेवालचे येणारे बिले नियमाप्रमाणे भरणा करत होत व आहे. तक्रारदार यांना ऑगस्‍ट २०१२ पासुन सामनेवालेकडुन येणारी बिले ही कोणतेही रिडींग न घेता फॉल्‍टी मिटर असे, नमुद करून बिले येऊ लागली. सदरचा प्रकार तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे स्‍थानिक विद्युत कर्मचारी यांच्‍या निदर्शनास वेळोवेळी आणुन दिला. मात्र सामनेवाले यांच्‍या कर्मचा-यांनी तुम्‍हाला तुमच्‍या वापराप्रमाणे बिल देत आहोत, तुम्‍ही काळजी करू नका, तुमचे मिटर तुम्‍हाला बदलुन देवू अशी म्‍हणुन बोळवण केली. सामनेवाले यांच्‍या कर्मचा-यावर विश्‍वास ठेवुन तक्रारदार यांनी मिटर बदलणेकरीता कोणताही अर्ज दिला नव्‍हता व नाही. तक्रारदार यांना नोव्‍हेंबर २०१४ मध्‍ये सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या दुकानामध्‍ये येवून कोणतेही मिटर रिडींग न घेवून सदरचे फॉल्‍टी मिटर असतांना अत्‍यंत चुकीचे व अवास्‍तव असे अचानकपणे रूपये २,३७,२९०/- चे खोटे व बनावट बिल कोणत्‍याही तक्रारदाराच्‍या योग्‍य व रास्‍त वापराशिवाय दिलेले होते व आहे. सदरचे बिल प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारदाराला फार मोठा मानसिक व धक्‍का बसला. त्‍यानंतर तक्रारदाराने यांनी दिनांक १७-११-२०१४ रोजी सामनेवालेकडे तक्रार अर्ज देऊन बिल दुरूस्‍त करून मिळणेबाबत विनंती केली होती व आहे. त्‍यानंतर सामनेवालेचे कर्मचा-यांनी सदरची बिलात दुरूस्‍ती करून देण्‍याचे आवश्‍वासन सामनेवालेने तक्रारदाराला दिलेले होते. त्‍यावेळी तक्रारदार यांना सदरील बिल आम्‍ही दुरूस्‍त  करून देण्‍याचे आवश्‍वासन सामनेवाले तक्रारदाराला दिलेले होते. त्‍यावेळी तक्रारदार यांनी सदरील बिल आम्‍ही दुरूस्‍त करून देऊ तुम्‍ही काळजी करू नका, असे कळविले होत. परंतु कोणतेही कोणत्‍याही प्रकारचे बिल दुरूस्‍त करून न देता अचानक जानेवारी २०१५ मध्‍ये तक्रारदार यांच्‍या विरूध्‍द कंपनीने खोट्या कारणासाठी सामनेवाले क्र.१ व २ चे कर्मचारी तक्रारदाराचे दुकानावर आले. त्‍यांना तक्रारदाराने तुम्‍ही बिल दुरूस्‍त करून देता असे तुम्‍ही मला सांगितले होते, माझे बिल दुरूस्‍त करून द्या, मी बिल भरण्‍यास तयार आहे, असे सांगितले. त्‍यावर त्‍यांनी आम्‍हीला वरून आदेश आहे, तुम्‍ही बिल भरा अन्‍यथा आम्‍ही तुमचे कनेक्‍शन कट करून टाकु अशी धमकी दिली. त्‍यानंतर तक्रारदार यांनीसामनेवाले यांचे सहाय्यक अभियंता सोनई शाखा यांच्‍याकडे संपर्क केला असता नोव्‍हेंबर २०१४ मध्‍ये दिलेले रक्‍कम रूपये २,३७,२९०/- च्‍या बिलामध्‍ये   दुरूस्‍त करून रूपये १०,०००/- सध्‍या भरा, तुमचे लाईट कनेक्‍शन आम्‍ही कट करत नाही, तुम्‍हाला मिटर बदलुन देवू व त्‍याद्वारे तुम्‍ही आमचेकडे भरलेल्‍या  रूपये १०,०००/- मधुन तुमच्‍या उर्वरीत रकमा वजावट करून देवू अशीहमी दिली. त्‍यामुळे तक्रारदार यांनी दिनांक ०५-०१-२०१५ रोजी सामनेवाले यांच्‍याकडे रक्‍कम रूपये १०,०००/- ची अनामत रक्‍कम भरलेली आहे. त्‍याचबरोबर यांनी विज मिटरच्‍या टेस्‍टींग फी पोटी देखील रक्‍कम रूपये १५०/- दिनांक ०६-०१-२०१५ रोजी सामनेवाले यांच्‍याकडे  भरणा केलेली आहे. परंतु तक्रारदार यांच्‍या तक्रारीची सामनेवालने कोणतीही दखल घेतली नाही व तक्रारदार यांना अवास्‍तव दिलेले बिल कमी करून दिले नाही. तक्रारदाराने सामनेवालेकडे तगादा केल्‍यानंतर सामनेवालेने तकारदार यांचे मिटर टेस्‍टींग करण्‍यासाठी म्‍हणुन जानेवारी २०१५ मध्‍ये काढुन घेऊन गेले आहे व तक्रारदार यांना नविन मिटर बसवुन दिलेले आहे. सदरील नविन मिटर बसवुन दिल्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांना कोणतीही कल्‍पना न देता फेब्रुवारी २०१५ पासुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा बेकायदेशिरपणे खंडीत केला आहे. त्‍याचबरोबर तक्रारदार यांनी नोडल ऑफीसर यांच्‍याकडे केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनीही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे मिटर चेक करण्‍याचे दिलेले दिनांक १८-०६-२०१५ रोजीचे आदेश न पाळता तक्रारदार यांचे मिटर शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीने तपासणी न करता तक्रारदार यांच्‍या वास्‍तविक वापराचा कोणताही विचार न करता तक्रारदार यांना अवास्‍तव बिल देवून तक्रारदार यांचा विज पुरवठा खंडीत केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार अंधारात राहावे लागत आहे. सामनेवाले यांनी दुषित सेवा दिलेली आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार मे. मंचात तक्रारदाराने दाखल केली आहे.

३.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले यांनी नोव्‍हेंबर २०१४ मध्‍ये दिलेले चुकीचे व बेकायदेशिर रक्‍कम रूपये २,३७,२९०/- चे बिल चुकीचे असल्‍याने तात्‍काळ रद्द करावे. सामनेवालेने तक्रारदाराकडुन आश्‍वासन देऊन भरून घेतलेली रक्‍कम रूपये १०,०००/- ही तक्रारदारास परत देण्‍याचा आदेश व्‍हावा, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा बेकायदेशिरपणे खंडीत केलेला विज पुरवठा पुर्ववत करून देण्‍याबाबत सामनेवाले विरूध्‍द आदेश व्‍हावा, सामनेवाले यांनी तक्रारदारास झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी एकत्रीत रक्‍कम रूपये ५०,०००/- द्यावी, सदर तक्रारीचा संपुर्ण खर्च सामनेवाले यांच्‍याकडुन मिळावा.

४.   तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ६ वर दस्‍तएवेज यादीसोबत एकुण ८ कागदपत्र दाखल केले आहेत. त्‍यामध्‍ये   विद्युत देयक दिनांक १५-१२-२०१४, १२-०१-२०१५, १३-०३-२०१५, दिनांक १४-१०-२०१४ ते १६-०९-२०१४ व दिनांक ११-०६-२०१४ ते १९-०७-२०१२ दाखल आहे.

५.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना मे. मंचातर्फे ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १३(१) (क) (३) नुसार नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाले हजर होऊन त्‍यांची कैफीयत निशाणी १५ वर दाखल केलेली आहे. त्‍यामध्‍ये वस्‍तुस्थितीमध्‍ये असे नमुद केलेले आहे की, तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे तक्रार दाखल केल्‍यानंतर दिनांक १८-०६-२०१५ रोजी तक्रारदाराचे मीटर टेस्‍ट केलेले आहे.  सदर टेस्‍टचा अहवाल करेक्‍ट म्‍हणुन आलेला असुन तक्रारदारास दिले गेलेले बिल हे मिटरचे रिडींगप्रमाणे योग्‍य व बरोबर आहे. तक्रारदाराने त्‍याचे रिडींग न घेता फॉल्‍टी मीटर असे नमुद करून बिल आलेले होते. त्‍यावेळी बिल रक्‍कम कमी असल्‍याने तक्रारदाराने सामनेवालेकडे कुठलीही तक्रार केली नाही. तक्रारदार हा त्‍याची असलेली वस्‍तुस्थिती २०१२ पासुन पासुन सामनेवाले यांचेपासून लपवून ठेवत आलेला आहे. तक्रारदाराने जागृत ग्राहक म्‍हणुन त्‍यावेळी सामनेवाले यांचेकडे लेखी तक्रार करणे आवश्‍यक होते. सदरची तक्रार तक्रारदाराचे कथनानुसार २०१२ पासुन सुरूवात झालेली दिसून येते. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक मंचाकडे दि.०२-११-२०१५ रोजी दाखल केलेली दिसून येते. त्‍यामुळे सदरची तक्रार ही मुदतीत नसल्‍याने रद्द होण्‍यास पात्र आहे. तक्रारदाराने दिलेले कारण व कोर्ट फी स्‍टॅम्‍प पाहता तक्रारदाराने मे.कोर्टात तक्रार दाखल करतेवेळी केवळ ६०,०००/- रूपये मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल केलेली आहे व विनंती पॅरा ‘अ’ मध्‍ये  नोव्‍हेंबर २०१४ मध्‍ये दिलेले बिल रूपये २,३७,२९०/- चुकीचे असलेबाबत नमुद केलेले आहे. तक्रारदाराचे तक्रारीत कोठेही एकाग्रता दिसून येत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी, असे नमूद केले आहे.

     सामनेवाले यांनी निशाणी १६ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी क्र.१८ सोबत तक्रारदाराची सी.पी.एल. ओरिजनल सन २०१२ दाखल केली आहे.

६.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र पाहता तसेच सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र व दाखल कागदपत्र पाहता मंचासमोर  न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे काय ?

होय

(३)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

७.  मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी मौजे सोनई तालुका नेवासा येथील कौतुकी नदीपात्रामध्‍ये असलेले मुंजोबा पशुखाद्य या दुकानाकरीता सामनेवाले यांच्‍याकडुन वाणिज्‍य स्‍वरूपाची वीज जोडणी घेतली होती. याबाबत तक्रारदार यांनी निशाणी ६ वरील दस्‍तऐवज यादीसोबत विद्युत देयके दाखल केलेली आहेत. सदर विद्युत देयकांवर तक्रारदार यांचे नाव नमुद आहे. तसेच तक्रारदार यांना विद्युत पुरवठा केलेची बाब सामनेवाले यांना मान्‍य आहे. यावरून तक्रारदार हा या सामनेवालेचा कंपनीचा ग्राहक आहे, हे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (२) : उभयपक्षांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारदाराचा ग्राहक क्रमांक १४८०३००४४१३१ बाबत सामनेवालेने माहे नोव्‍हेंबर २०१४ मध्‍ये २,३७,२९०/- चे बिल दिले या संदर्भात तक्रारदाराची तक्रार असुन सामनेवालेने दिलेले विद्युत बिल योग्‍य आहे, असे सामनेवालेचे कथन आहे. तथापी तक्रारदाराने दाखल केलेले निशाणी ६ सोबतचे लाईट बिल माहे नोव्‍हेंबर २०१४ चे सामनेवालेने पाठविलेली बिले व त्‍यावर तक्रारदाराने सामनेवालेंना जादा आलेली बिल मिटर फॉल्‍टी असल्‍याने कमी करून देणे बाबत अर्ज तसेच डिसेंबर २०१४ चे बिल, फेब्रुवारी २०१५ चे बिल, अशी बिले तक्रारदाराने दाखल केलेली आहेत. तथापी सामनेवाले यांनी दाखल केलेले निशाणी १८ सोबतचे सी.पी.एल. मधील जुलै २०१२, ऑगस्‍ट २०१२, सप्‍टेंबर २०१२, ऑक्‍टोबर २०१२, नोव्‍हेंबर २०१२, डिसेंबर २०१२, जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१३, जानेवारी २०१४ ते सप्‍टेंबर २०१४ पर्यंतचे सी.पी.एल. चे अवलोकन केले असता Meter Status मध्‍ये फॉल्‍टी असे नमुद करून अंदाजे युनिटनुसार विद्युत बिलाची शुल्‍क आकारणी केली आहे. तक्रारदाराने निशाणी ६/७ वर महावितरण अहमदनगर मुख्‍यालयात कलेल्‍या तक्रार अर्जावर दिलेल्‍या  निर्णयाची प्रत दाखल केलेली आहे. सदरचे निर्णयात आ.जी.आर.सी. यांनी त्‍यांचे निष्‍कर्ष नोंदविलेले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. ‘ ग्राहकाला मागील तीन महिन्‍यांपासून फॉल्‍टी बिल दिले आहे. ऑक्‍टोबर २०१४ मध्‍ये घेतलेले मिटरचे रिडींग आणि बिले हे रिडींगप्रमाणे ग्राहकाला दिलेली आहेत. तक्रारदारास मार्च २०१५ मध्‍ये स्‍लॅब बेनेफीट दिलेला आहे.’ असे निरीक्षण नोंदवुन मिटर टेस्‍टींग रिपोर्ट नुसार कारवाई होणे आवश्‍यक आहे, असा निर्णय दिलेला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारास वरील कालावधीची विद्युत बिले फॉल्‍टी अश्‍या शे-याने दिली तर दुसरीकडे मिटर टेस्‍टींग अहवालात तक्रारदाराचे मिटर सुस्थितीत असल्‍याचे नमुद आहे. अशा प्रकारे तक्रारदाराचे विद्युत मिटरबाबत सामनेवालेचे कथन परस्‍परविरोधी आहे. वास्‍तवीक पाहता तकारदाराने विद्युत मिटरची तक्रार केल्‍यानंतर सामनेवालेने विद्युत मिटरची तपासणी करून तक्रारदाराचे विद्युत मिटर फॉल्‍टी असेल तर ते तातडीने दुरूस्‍त करून अथवा बदलुन देऊन नियमीत विद्युत वापराचे युनिटप्रमाणे विद्युत बिल तक्रारदारास देणे सामनेवालेची कायदेशीर जबाबदारी आहे. अथवा या कालावधीत तक्रारदाराचे विद्युत मिटर सुस्थितीत असल तर फॉल्‍टी असा शेरा नमुद न करता नियमीतपणे रिडींग घेऊन विद्युत देयक तक्रारदारास देणे सामनेचाले यांची कायदेशीर जबाबदारी आहे.  परंतु असे काहीही सामनेवाले यांनी केलेले नाही आणि तक्रारदारास अचानकपणे नोव्‍हेंबर २०१४ मध्‍ये रक्‍कम रूपये २,३७,२९०/- एवढ्या मोठ्या रकमेचे विद्युत बिल तक्रारदारास दिले आहे. त्‍यामुळे सहाजिकच तक्रारदारास मानसिक त्रास सोसावा लागला आहे. तसेच तक्रारदाराला या मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे, असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवालेकडुन नुकसान भरपाईबाबत रक्‍कम मिळणेस पात्र आहे, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्‍हणुन मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.   

९.  मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. तक्रारदारास अचानकपणे २,३७,२९०/- एवढ्या मोठ्या रकमेचे विद्युत देयक तक्रारदारास दिले. त्‍यामुळे तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रासापोटी सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैयक्तिकरितीने अथवा संयुक्तिकरितीने तक्रारदारास रक्‍कम रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार मात्र) द्यावी.

३. सामनेवालेने तक्रारदारास सदर तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) द्यावा.

 

४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.